लॉकडाऊन: बाविसावा दिवस
व्यायामाची नशा : व्यायामाची आवड तशी जुनीच आहे मला...काॅलेजचै दिवसात रोज सकाळी तासभर जीममधे घासल्याशिवाय बरं वाचायचं नाही...लोकांचे नाही माहीत पण अंग मोडून व्यायाम केल्यावर शरीराचा प्रत्येक अंजर पंजर बोलायला लागले मला बरं वाटतं...चांगल्या व्यायामाची पावती आहे ती...स्क्वाट्स मारून झाल्यावर दुसर्या दिवशी दुपारी पाय लटपटलेच पाहीजेत...साधं सोफ्यावर बसायलासुद्धा त्रास झालाच पाहीजे...कुणीससं म्हटले आहे ‘no pain, no gain '
तीच आवड आजदेखील जिवंत आहे ( रामाची क्रूपा ) आणि वाढल्या वयाबरोबर वेगवेगळे व्यायाम करायची हौसदेखील वाढली...व्यायामशाळेत जाऊन वजनं उचलण्यात मजा येईनाशी झाली...मजा म्हणण्यापेक्षा नशा हा योग्य शब्द आहे...मला वेगवेगळे व्यायाम करण्याची नशा आहे ....रनिंग, सायकलिंग, वेट ट्रेनींग हे सगळं मी आनंदाने करतो...ह्या सगळ्या ॲक्टीवीटी करताना मी सगळं काही विसरतो...
‘सायकल सायकल‘ गटात सामिल: त्यातच मला एक अवलियाचे भेटला...बदलापुरला जात होतो सायकलवरून. एकटाच होतो आणि प्रारुप चाललो होतो...एक काका निवांत चालले होते...नमस्कार चमत्कार झाले, बदलापुरला चहाचं दुकान बघून थांबलो आणि मग औपचारिक ओळख झाली...विनायक वैद्य...भटक्या खेडवाला...काही माणसं आपल्याला द्यायलाच आलेली असतात...भोखेकाकांनी मला एक व्यासपीठ दिले ‘सायकल सायकल‘
सगळे एकसे एक अवलीये...सायकीलींचे अतीरथी, महारथी...त्यांच्याकडून खुप प्रोत्सहन मिळाले...मी काही त्यांच्याएवढी सायकल चालवली नाही पण तरी बरीच चालवली...सायकलिंग बरोबर इतर व्यायामदेखील शेअर होऊ लागले...डाएट प्लान येऊ लागले...साधारण नोव्हेंबर १९ ला डाॅकने त्याचे फोटो टाकले...झालं ...लगेच मला कंड आलीच...डाॅकला फोन करून किटोची दिला घेतली...पहिले २० दिवस खुप प्रामाणिकपणे डाएट प्लान फाॅलो केला आणि छान फरक जाणवला...वजन कमी झालं, फॅट परसेंट कमी झालं आणि खिसापण हलका झाला...मग लो कार्बवर शिफ्ट झालो...३ महान्यांमधे १२ किलो वजन आणि ६% बाॅडी फॅट कमी केलं...खरं सांगायचे झालं तर हे फक्त विरून दिसणारे बदल होते...दुपारी झोपावं असं अजुनही वाटत नाही...पोट डब्ब नाही आणि मेंदू एकदम चौकन्ना असतो...ह्याचा फायदा असा कि धावायचा स्पीड वाढला, सायकलींगचा स्पीड वाढला...दिवसभर फ्रेश वाटू लागलं...दुर्दैवाने माझं बाँडच फॅट पर्सेंटचं टार्गेट पुर्ण होण्याच्या आत लाॅकडाऊन झाला...व्यायाम नाही सोडला पण तोंडावरचा ताबी नक्कीच सुटला...
२३ मार्च २०२०२ पासुन वजन ७८.५ वरून ७६.२ ला वळसा घालून ७७.४ ला स्थिरावले आहे...
लॉकडाऊन
ह्या लाॅकडाऊनचे दुष्परीणाम बरेच आहेत आणि त्याबद्दल बरेच तज्ञ बोलत आहेत. पण त्याला एक चांगली बाजु आहे...हे सगळे व्यायाम, ॲाफीस, त्यानिमीत्ताने होणारं भटकणं ह्यातून कुटुंबाला वेळ दिला जात नाही...आता दुसरे काही नाहीच करण्यासारखं त्यामुळे जबरदस्ती का होईना घरातील चार कामं होतात आपल्या हातून...मनवाचा अभ्यास हा विषय मी माझ्या सिलॅबसमधे घेतलाच नव्हता, ती आता आला. ॲाफिसचं काम सांभाळून माझी काही आवडीचीकामं मी करतोच आहे...बाथरूम साफ करणे ( आवडीपेक्षा ते साफ असण्याचं obsession आहे मला ). त्याबरोबर मी चक्क किचनमधे घुसखोरी केली आणि एकदा बटर चिकन, एकदा बिर्याणी आणि बदमी कबाब ट्राय केले...आणि फक्कड जमले..परत किचन आणि भांडी घासुन पुसुन दिली बायकोला त्यामुळे तीही खुश...शेफ केडी बर्याचदा पदार्थ करून पोस्ट टाकतो..म्हटलं आपण पण बघावं...मोदकाने केलेलं लोणचे चाखायला जाणे आहे आहे लाॅकडाऊन संपला की...
घरात बसायची सवय नसलेल्या आमच्यासारख्यांना करावं काय हा प्रश्ण मोठा असतो. पण आज मला विचाराल तर I don’t miss going out...माझा दिवस अगदी प्लॅन केल्यासारखा जातो...व्यायाम, घरातील कामं, ॲाफीसची कामं, १.३० ला जेवण, परत स्काईप काॅल आणि पुर्णविराम. त्यानंतर फक्त अम्मीजान, नेटफ्लीक्स आणि बातम्या. सकाळ मात्र फार उत्साहात जाते कारण व्यायाम आणि ग्रूपात येणारी चॅलेंज.
७ दिवस रोज ३७५ बैठका मारायच्या.. हे बैठकांचं चॅलेंज माझ्या डोक्यतुन आल, मला स्वत:ला खात्री नव्हती पण फाटली नाही तर चॅलेंज कसलं म्हणुन सुरू केलं आणि पुर्णदेखील झालं. माझ्यासोबत डॉक (डॉ श्रिहास) ने पण हे चॅलेंज पुर्ण केल.
लगेच डाॅक म्हणाला दोन दिवस ब्रेक सोमवार १३ एप्रिल पासुन ७ दिवस रोज १०० बर्पी हे चॅलेंज घेवुया..बघतां बघतां ८ जणं तयार...ह्याला म्हणतात उत्साह
एक चांगली गोष्ट अशी कि वर्क फ्राॅम होममुळे बायको आणि मुलगीदेखील माझ्यासोबत व्यायाम करतात...सुर्यनमस्कार, बर्पी सगळं करतात..त्यामुळे व्यायामपण मजेशीर होऊन जातो. सोमवारी बर्पी चॅलेंजला सुरवात झाली...माझ्या १०० बर्पी झाल्या आणि मिनलच्या २५, मनवा ५...मजा येते...हे काही कायम जमणार नाही पण जेवढे दिवस जमेल तेवढे आपले
...हा लेख लिहू पर्यंत सिए केडी आणि अनुप बदलापुरचे आजचा अपडेट यायचे आहेत बाकी सगळे २ दिवसातून रोज १०० बर्पी काढत आहेत .
पुढच्या आठवड्यात अजुन काहीतरी निघेल...एकूण काय तर, लाॅकडाउन मधे आम्ही जास्त जोमाने व्यायाम करतोय...ट्रेक डोमानेवर टांग कधी मारतोय असं झालाय खरं पण ती वेळ येईल तेव्हा I will be ready & fitter than I was on 19th March 2020 ( last ride )
तुम्हि पण सामिल व्हा ७ दिवस रोज १०० बर्पी चॅलेंज मधे कदाचित काहिंना सुरुवातीला १०० बर्पी काढण शक्य होणार नाहि जमतिल तेवढ्या काढा आणि येथे टाका.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jatt Ludhiyane Da... :- Student Of The Year 2