लॉकडाऊन: एकविसावा दिवस
गेल्या वर्षीचे शेवटचे दोन महिने हापिसात खूप काम होतं जे नव्या वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत अधिकच वाढलं. या कारणाने बातम्यांकडे नेहमीसारखे लक्ष ठेवता येत नव्हते. तरी देखील जानेवारीत चीनमधून येणाऱ्या करोना व्हायरसच्या बातम्या दृष्टीस पडत होत्या. हे गंभीर प्रकरण आहे असे जाणवत होते. तपशिलात जाणून घ्यायला मात्र वेळ मिळाला नाही. मिपावरच्या ३१ जानेवारीला प्रकाशित झालेल्या या काथ्याकुटाच्या शीर्षकावरून या व्हायरसचा उच्चार करोनाऐवजी कहोना तर नाही असा विचार मनात आला. लेख उघडल्यावर दोन्हीचा दुरान्वयेही संबंध नाही हे लगेच कळले.
फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत चीनमधली परिस्थिती खूपच गंभीर असल्याचे बातम्यांमधल्या रुग्णांच्या व मृतांच्या आकड्यांवरून जाणवू लागले. तोवर अमेरिकेत या व्हायरसचा फारसा शिरकाव झाल्याचे जाणवत नव्हते.
मात्र फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवसापासून पश्चिम किनाऱ्यावरच्या वॉशिंग्टन राज्यातल्या रुग्णांबाबत बातम्या येणे सुरू झाले. हापिसात सर्वजण सॅनिटायझरने हात आवर्जून स्वच्छ करू लागले. आम्ही मार्च ४ ते ११ या दरम्यान अमेरिकेतच नातेवाइकांकडे जायचे बुकिंग दोन महिन्यांपूर्वी करून ठेवले होते. ४ तारखेला विमानप्रवासादरम्यान प्रवाशांच्या लोकांच्या व विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या तसेच विमानातल्या केबिन क्रुच्या आचरणात काहीच फरक जाणवला नाही. आम्ही मात्र सोबतच्या सॅनिटायझरने अधून मधून हात स्वच्छ करत होतो. तसेच डिसइंफेक्टटन्ट वाइपने ट्रे टेबल व हॅण्डरेस्ट वगैरे स्वच्छ करत होतो. ४ मार्चला मिपावर डॉ. सुबोध खरे यांचा करोना विषाणू COVID-19 (Coronavirus disease 2019) हा लेख प्रकाशित झाला. या लेखातून व लेखावरच्या प्रतिसादांतून अत्यंत मोलाची माहिती व सूचना मिळत राहिल्या. यासाठी डॉ. खरे व इतर मिपाकरांचे मनःपूर्वक आभार.
पुढचा आठवडाभर अमेरिकेतल्या बातम्यांची तीव्रता अधिक वाढू लागली होती. ११ तारखेला परतताना विमानतळावर ४तारखेच्या तुलनेत थोडाफार फरक जाणवू लागला. लोक एकमेकांपासून नेहमीपेक्षा थोडे अधिक अंतर ठेवू लागले होते.माध्यमांमधल्या बातम्यांमधे कोरोनाव्हायरसचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढू लागले होते. १३ तारखेला आमच्या राज्यातल्याशाळा त्यापुढील सोमवारपासून (१६ तारीख) बंद राहतील अशी घोषणा झाली. हापिसमध्येही ज्यांना घरून काम करायचेआहे त्यांनी आवर्जून तसे करावे अशा सूचना मिळाल्या. त्यानंतर १८ तारखेपासून तर हापिसात काम करायचे असल्यासविशेष परवानगी घ्यावी लागेल असे कळवण्यात आले.
आम्ही स्वतःच्या गावी नसताना ९-१० मार्चलाच अनेकांनी दुकानांमधून टॉयलेट पेपर्स, हॅंड सॅनिटायझर्स, डिस इंफेक्टन्ट वाइप्स सारख्या वस्तू मोठ्या प्रमाणावर खरेदी करून दुकानांतली फडताळे रिकामी केली. त्यानंतर एकदाच सकाळी एक दुकान उघडल्यावर टॉयलेट पेपर्स आम्हाला खरेदी करता आले. १३ मार्चला टॉयलेट पेपर्सची एक ऑनलाईन खरेदी केली जे १३ एप्रिलला मिळणार होती. १० एप्रिलला संदेश मिळाला की ही ऑर्डर पूर्ण केली जाऊ शकणार नाही. ऍमेझॉन व इतर ऑनलाईन रिटेलर्सने मास्क्स, डिस्पोझेबल ग्लोव्ज्स, सॅनिटायझर्स वगैरे हॉस्पिटल्स व सरकारी संस्थाना प्राधान्याने विकणार असे दर्शवले आहे. टॉयलेट पेपर्स वगैरे ऑनलाईन रिटेलर्सकडे आऊट ऑफ स्टॉक आहेत. अॅमेझॉन कमी महत्त्वाच्या वस्तू उशीराने ग्राहकांना पोचत्या करण्याचे धोरण राबवत आहे जेणेकरून जीवनावश्यक वस्तू वेळेत पोचवता येतील.
दुकानातले टॉयलेट पेपरचे रिकामे फडताळ
किचन टॉवेल्सचीही टंचाई सुरू झाली होती जी आता आटोक्यात आल्याचे आढळत आहे.
मार्चच्या मध्यावर तर भारतीय वाणसामानाच्या दुकानांमध्येही झुंबड होवू लागली. भारतीयांखेरीज स्थानिक लोकही तांदूळ वगैरे मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना आढळले. या काळात केवळ हात धूत राहण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. सोशल डिस्टंसींग ही संज्ञा वापरली जात नव्हती. विविध दुकानांमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असल्याने करोनाव्हायरसचा प्रसार या काळात वाढला असावा. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून अमेरिकेतले वाढलेले रुग्णांचे व मृतांचे आकडे तरी हेच दर्शवतात.
मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच विविध सेवादात्यांच्या अन सरकारी संस्थांच्या COVID-19 बाबत ईमेल्स येऊ लागल्या. त्यापैकी काही भारतातल्या बँकांचाही होत्या. किमान ५० आयडीजवरून १०० हून अधिक ईमेल्स आतापर्यंत आल्या आहेत. त्यामध्ये आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांची, ग्राहकांची कशी काळजी घेत आहोत याची माहिती होती. काहींनी ग्राहकांच्या रिवॉर्ड पॉइंटसची मुदत वर्षभराने वाढवल्याचे कळवले.
२० मार्चच्या रात्रीपासून आम्ही राहतो त्या राज्यातही (मिनेसोटा) गवर्नरने स्टे ऍट होम अध्यादेश जारी केला. केवळ जीवनावश्यक वस्तू व औषधांच्या खरेदीसाठी घराबाहेर पडावे. तेव्हापासून आम्ही वाणसामानाच्या खरेदीसाठी आठवड्यातून एकदाच दुकानात गेलो आहोत. बऱ्याच दुकानांनी कर्बसाइड पिक अप सुविधा सुरू केली किंवा तिची व्याप्ती बरीच वाढवली. यामध्ये ग्राहकांनी ऑनलाईन ऑर्डर द्यायची. ऑर्डरनुसार जिन्नस तयार असल्यावर दुकानातर्फे नोटिफिकेशन येते. त्यानंतर त्या दुकानाच्या पार्कींग लॉट मध्ये जाऊन ऑनलाईन चेक-इन करायचे. दुकानाचे कर्मचारी खरेदी केलेले सामान थेट ग्राहकांच्या गाडीपाशी आणून देतात (डिक्कीत किंवा सांगाल त्या सीटवर ठेवून देतात). यापुढे दुकानाच्या आत जाण्यापेक्षा हा पर्याय वापरायचे आम्ही ठरवले आहे.
आमच्या राज्यातल्या स्टे ऍट होमची मुदत १० एप्रिलला मध्यरात्री संपणार होती. ती आता ४ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. स्टे ऍट होम ऑर्डरमध्ये पायी फिरायला जायला, सायकलने फिरायला किंवा स्केटिंग वगैरेला तसेच पाळीव प्राणी फिरवायला मुभा देण्यात आली आहे. फक्त कुणीही शेजारून जात येत असल्यास किमान ६ फुटांचे अंतर ठेवण्याच्या सूचना आहेत. कुठलेही कारण नसताना मौज म्हणून कारने फिरणाऱ्या लोकांना ट्रॅफिक पोलिस सायटेशन (आपल्याकडच्या चलानपेक्षा एक मात्रा कमी) देत आहेत.
इतर वेळीही फारशी वर्दळ नसलेले आमच्या घराजवळचे रस्ते अधिकच रिकामे दिसत आहेत.
इथल्या शाळांचे शैक्षणिक वर्ष जूनच्या पहिल्या आठवड्यात संपते. राज्याराज्यांनुसार ही तारीख वेगळी असते. कॅलिफोर्नियाने उरलेल्या शैक्षणिक वर्षात शाळा पुन्हा भरणार नाही असे जाहीर केले आहे. हेच बहुतांश राज्यांत घडण्याची शक्यता दिसत आहे. ऑनलाईन लर्निंगचा व वर्च्युअल क्लासरुम्सचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. आमच्या ४ वर्षाच्या कन्येसाठी तिच्या शिक्षिकांचे आम्हाला ईमेल्स येत असतात. त्यात व्हिडिओ द्वारे कथावाचन व घरी करण्याजोगे उपक्रम सुचवलेले असतात. तसेच त्यांचे फोटो / व्हिडिओ काढून त्यांना ते पाठवता येतात.
या सगळ्या घडामोडींमध्ये लहान मुलांच्या भावविश्वावर परिणाम होत आहे. त्यांची मित्रमंडळी फुटपाथवर मैदानात दिसली तरी त्यांच्याशी दुरूनच बोलावे लागणे. सार्वजनिक पार्कांमध्ये घसरगुंडी, झोपाळा व इतर खेळण्यांवर न खेळता येणे. एवढेच काय सतत घरचेच जेवण जेवणे इत्यादी. असे असले तरी मोठ्यांपेक्षा लहान मुलेच बदलत्या परिस्थितीशी सहजपणे जुळवून घेताहेत असे माझे निरीक्षण आहे.
आमच्या घराजवळचा एका सार्वजनिक पार्क
मागच्या अंगणात बर्ड फीडरवर एकाहून एक देखणे पक्षी येत असतात. परंतु बाहेर जाऊन कॅमेराने फोटो काढायला गेल्यास दूर पळतात. काचेच्या दारापलिकडून टिपलेला हा एक रेड विंग्ड ब्लॅकबर्डचा फोटो.
अन हा एक ब्लु जेचा फोटो
अमेरिकेतल्या बातम्या पाहून भारतातल्या अनेक आप्तांनी, मित्रमंडळींनी काळजी व्यक्त करणारे संदेश पाठवले. आमच्या सुदैवाने आम्ही राहतो त्या राज्यात COVID-19 चा प्रसार बराच आटोक्यात आहे. मिनेसोटाचा अमेरिकेत ५१ (५० राज्ये व १ राजधानी) पैकी सध्या रुग्णांच्या संख्येत ३५ वा क्रमांक आहे. तसेच COVID-19 चे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण निम्म्याहून अधिक आहे. भारतातल्या लोकांना अमेरिकेत COVID-19चा प्रसार पाहून खूप आश्चर्य वाटते जे साहजिकच आहे. परंतु इथे काही वर्षांपासून राहिल्यावर जाणवलेले काही घटक पाहता जे घडत आहे ते अगदीच अनपेक्षित नाही.
अमेरिका जगात लोकसंख्येचा बाबतीत तिसरा मोठा देश आहे. अमेरिकेचा मोठ्या भूभागात थंडी व बर्फामुळे लोकवस्ती बरीच विरळ आहे. यामुळे उरलेल्या बर्याच ठिकाणी लोकसंख्येची घनता भरपूर आहे. अमेरिकेतले बरेच लोक नोकरी / व्यवसाय व पर्यटनाच्या निमित्ताने जगभर फिरत असतात. तसेच इतर देशातले अनेक लोक नोकरी / व्यवसाय, शिक्षण व पर्यटनाच्या निमित्ताने अमेरिकेला भेट देत असतात. अमेरिकेतले हेल्थकेअर सेक्टर अतिशय गुंतागुंतीचे आहे अन गेली काही दशके अनेक समस्यांनी हैराण आहे. या समस्यांवर राजकीय क्षेत्रात सतत चर्चा होत असते परंतु परिणामकारक उपाययोजना मात्र होत नाही. पुढचे काही महिने अतिशय खडतर असणार आहेत. करोनाव्हायरसमुळे सार्वजनिक आचरणात होणारे बदल पुढची अनेक वर्षे टिकतील असा अंदाज अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. करोनाव्हायरसच्या या संकटामुळे होणारे आर्थिक परिणाम अत्यंत घातक असतील असे अंदाज वर्तवले जात आहेत.
अमेरिकेच्या तुलनेत भारतात झालेल्या अधिक कडक उपाययोजना पाहता COVID-19च्या प्रसाराला रोखून धरण्यास आतापर्यंत उत्तम यश लाभले आहे. हीच परिस्थिती भारतात पुढेही कायम राहो अन अमेरिका व COVID-19 ने भरडले जात असलेल्या देशांमधली परिस्थिती आटोक्यात येवो ही परमेश्वराकडे प्रार्थना. आपण सर्वांनी स्वतःची व भोवतालच्या माणसांची काळजी घेत राहणे अन प्रशासनाकडून मिळणार्या सूचनांचे पालन करणे हे खूपच महत्त्वाचे आहे. एवढे लिहून हे लेखन थांबवतो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Badshah - Genda Phool | JacquelineFernandez | Payal Dev- What happened to all the toilet paper, according to professors of psychology and supply chains
- CORONAVIRUSCharmin And Unrolling The Mystery Of The Great Toilet Paper Shortage
- Toilet paper makers: 'What we are dealing with here is uncharted'
- Bio Bidet Brightens Beleaguered, Besmirched Bootys
अमेरिकेत काही काळासाठी आलेले अनेक भारतीय (बहुतेक करून ज्येष्ठ नागरिक) सध्या इथे अडकले आहेत. तसेच काही अमेरिकन नागरिक (यात बहुसंख्येने पूर्वाश्रमीचे भारतीय नागरिक) भारतात अडकले आहे. अमरिकेचे स्टेट डिपार्टमेंट त्यांच्यासाठी चार्टर्ड फ्लाईटची व्यवस्था करत आहे. माझे एक स्नेही श्री मोहन रानडे त्यांच्या फेसबुकवर याबाबत वेळोवेळी नवी माहिती प्रकाशित करत असतात. आम्ही राहतो त्या राज्याविषयी एक बातमी - Experts explain why Minnesota has the nation's lowest per capita COVID-19 infection rate.