Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

लॉकडाऊन: अठरावा दिवस

A
amol gawali
Sat, 04/11/2020 - 05:30
🗣 32 प्रतिसाद
नमस्कार ... मिपाकर !! न भूतो न भविष्यती ...प्रसंग म्हणजे लॉकडाउन....अगदी कल्पनातीत. मी त्यादिवशी नेहमी प्रमाणे ऑफिस मध्ये होतो ( मुंबई मध्ये ) . "लॉकडाउन " ची चिन्हे दिसत होती . मनात अगणित प्रश्न फेर धरून नाचायला लागले. मी तसाच ऑफीस मधून निघालो . घरी कस पोहचायच हा " यक्ष " प्रश्न होता . गावाकडून सारखे फोन येत होते , घरी येण्यासंबधी सारखा आग्रह होत होता . वर्क फ्रॉम होम ची इच्छा होती पण , मला स्वयंपाक करता येत नाही. त्यामुळे मुंबईत रहायचं कस ? सर्व बंद होत. रोजच्या खाण्या पिण्याचा ही प्रश्न होता. औरंगाबादला येण्याविषयी आग्रह होत होता . अशातच शेवटच्या क्षणी मोबाइल वर बघितलं शेवटच्या ट्रेन च शेवटच तिकीट होत . शेवटी ईश्वरा ला स्मरून तिकिट बुक केलं शेवटी जीव भांडयात पडला. एकदाचा प्रवास सुरु झाला.... हा प्रवास नेहमीचा नक्कीच नव्हता. भय , चिंता , काळजी व तणाव सोबत घेऊन प्रवास सुरु झाला, अखेर रात्री १ वाजता औरंगाबाद स्टेशन ला उतरलो. माझा भाऊ एवढ्या रात्री मला घ्यायला आला होता. जीवनात आलेल्या प्रसंगाला धीरानं , सयंमान तोंड दयाव लागतं. मार्ग निघत असतो ह्या आई च्या शिकवणीन अलगद डोळयाच्या कडा ओल्या झाल्या. ते निश्चितच नकळत ओघळणारे "आनंद अश्रू " होते .... - अमोल गवळी ======================================================================================== ========================================================================================

मी काढलेली व्यंगचित्रे.

1 2 3 4 5 6 8 7

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 15723 views

🗣 चर्चा (32)
च
चौकटराजा Sat, 04/11/2020 - 05:59 नवीन
लेखकाच्या शम्भर शब्दापेक्षा हास्यचित्रकाराची एक सफाईदार रेषा पार मनाच्या गाभार्यापर्यंत पोहोचते ! सलाम अमोल साहेबा !
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 04/11/2020 - 06:02 नवीन
देशी विदेशी कोणतीच न मिळाल्याने विड्रावल सिम्पटम मुळे 300 दारुड्याना रुग्णालयात भरती करावे लागले म्हणे !
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sun, 04/12/2020 - 06:01 नवीन
हे "विड्रावल सिम्पटम" म्हणजे नक्की काय असते ?
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Mon, 04/13/2020 - 05:01 नवीन
व्यसन सुटताना होणारा मानसिक वा शारीरिक त्रास. दारूड्या माणसाला हळू हळू दारू कमी करूनच तिच्या पाशातून सोडवावे लागते .
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Mon, 04/13/2020 - 05:06 नवीन
एरवी दुचाकी व चारचाकी वाहनावर धावून जाणारे आमच्या सोसायटी समोरचे एक कुत्रे " लॉक्डाउन " मुळे फार अस्वस्थ येरझार्या घालीत असलेले लोकानी पाहिले आहे. याला म्हणतात विड्रोअल सिम्पटम !!
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा Mon, 04/13/2020 - 05:42 नवीन
काय उदा. दिलात जबरदस्त. हाहाहा.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Mon, 04/13/2020 - 06:08 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 04/11/2020 - 17:07 नवीन
चौराजी,

+१

  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 04/11/2020 - 06:10 नवीन
खूप सुंदर ! भावली.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 04/11/2020 - 06:15 नवीन
हाहाहा.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 04/11/2020 - 06:39 नवीन
एकदम समर्पक व्यंगचित्रे. लॉकडाऊनमध्येदेखील ह्या धाग्यांमुळे आणि एकंदरीतच ह्या लेखमालिकेमुळे विरंगुळा मिळाला.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 04/11/2020 - 07:21 नवीन
अमोल सर, सगळीच व्यंगचित्रे आवडली. लॉकडाऊनच्या काळात आपण उत्तम व्यंगचित्रे काढली आहेत. आपण मिपासदस्य आहात त्याचाही अभिमान आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
झ
झेन Sat, 04/11/2020 - 08:09 नवीन
छान गंमत आणलीत
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Sat, 04/11/2020 - 08:26 नवीन
खुप छान !
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 04/11/2020 - 08:38 नवीन
लॉकडाऊन लेखमालेमुळे दिवाळी अंक वाचल्याचा फील येत आहे. सर्व व्यंगचित्रे मस्त. सं - दी - प
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Sat, 04/11/2020 - 10:03 नवीन
ऊत्तम
  • Log in or register to post comments
स
सौ मृदुला धनंज… Sat, 04/11/2020 - 11:18 नवीन
खूप छान.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 04/11/2020 - 11:39 नवीन
सर्व व्यंगचित्रे मस्त. यानंतरच्या लॉकडाऊनच्या प्रत्येक दिवशी तुमचे एक तरी व्यंगचित्र पाहिजेच बॉ. रोजच्या व्यंगचित्रासाठी, कोणीतरी दररोज त्यांच्या मागे लागा रे. :)
  • Log in or register to post comments
A
amol gawali Sat, 04/11/2020 - 12:07 नवीन
नमस्कार ... मिपाकर !! न भूतो न भविष्यती ...प्रसंग म्हणजे लॉकडाउन....अगदी कल्पनातीत. मी त्यादिवशी नेहमी प्रमाणे ऑफिस मध्ये होतो ( मुंबई मध्ये ) . "लॉकडाउन " ची चिन्हे दिसत होती . मनात अगणित प्रश्न फेर धरून नाचायला लागले. मी तसाच ऑफीस मधून निघालो . घरी कस पोहचायच हा " यक्ष " प्रश्न होता . गावाकडून सारखे फोन येत होते , घरी येण्यासंबधी सारखा आग्रह होत होता . वर्क फ्रॉम होम ची इच्छा होती पण , मला स्वयंपाक करता येत नाही. त्यामुळे मुंबईत रहायचं कस ? सर्व बंद होत. रोजच्या खाण्या पिण्याचा ही प्रश्न होता. औरंगाबादला येण्याविषयी आग्रह होत होता . अशातच शेवटच्या क्षणी मोबाइल वर बघितलं शेवटच्या ट्रेन च शेवटच तिकीट होत . शेवटी ईश्वरा ला स्मरून तिकिट बुक केलं शेवटी जीव भांडयात पडला. एकदाचा प्रवास सुरु झाला.... हा प्रवास नेहमीचा नक्कीच नव्हता. भय , चिंता , काळजी व तणाव सोबत घेऊन प्रवास सुरु झाला, अखेर रात्री १ वाजता औरंगाबाद स्टेशन ला उतरलो. माझा भाऊ एवढ्या रात्री मला घ्यायला आला होता. जीवनात आलेल्या प्रसंगाला धीरानं , सयंमान तोंड दयाव लागतं. मार्ग निघत असतो ह्या आई च्या शिकवणीन अलगद डोळयाच्या कडा ओल्या झाल्या. ते निश्चितच नकळत ओघळणारे "आनंद अश्रू " होते .... - अमोल गवळी
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 04/11/2020 - 13:52 नवीन
अमोल सर चांगलं लिहिलं. खरं तर अचानक लॉकडाऊनमुळे अनेकांची अडचणी झाल्या. आपल्याला सुखरुप औरंगाबादला येता आलं हे वाचून छान वाटलं. आता वर्क फ्रॉम होम व्यंगचित्र आणि ऑफीस काम करत राहाल. काळजी घ्या, बोलत राहू या. आपलं महाराष्ट्राचं लॉकडाऊन ३० एप्रील पर्यंत राहणार आहे. तेव्हा आपण या संकटावर विजय मिळविणारच!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sat, 04/11/2020 - 14:30 नवीन
लॉकडाऊनचे अजून १५ धागे काढायची सोय झाली.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 04/11/2020 - 16:30 नवीन
आजचा चेस गेम एकदम जबरदस्त झाला. माझी बाजू वरचढ असतानाही सरांनी जबरदस्त कलाटणी दिली आणि धक्कादायकरित्या त्यांनी चेकमेट केलं. window.addEventListener("message",e=>{e.data&&"6598972"===e.data.id&&document.getElementById(`${e.data.id}`)&&(document.getElementById(`${e.data.id}`).style.height=`${e.data.frameHeight+30}px`)});
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 04/11/2020 - 16:50 नवीन
राजाच्या आजूबाजूला नेहमी हवा खेळती राहिली पाहिजे. ;) सं - दी - प
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 04/11/2020 - 17:15 नवीन
सरांनी जबरदस्त कलाटणी दिली आणि धक्कादायकरित्या त्यांनी चेकमेट केलं.
वरील वाक्यातून माझा जो दनदनीत विजय झाला आहे, तो निदर्शनास येत नाही. 'सरांनी आज मला लैच बेक्कार हरवलं' असं बोल्ड अक्षरात पाहिजे होतं. बाय द वे, वल्लीसर पूर्ण डावावर तुमचं वर्चस्व होतं. तुम्ही अप्रतिम खेळत होता. माझा बचावही नावापुरता शिल्लक राहिला होता. हे मी कबूल करतो. पण, शेवटच्या तुमच्या तीन चाली वृथा आत्मविश्वासाने भरलेल्या स्पष्ट दिसत होत्या, गर्व ,अभिमान बियरच्या फसफसणा-या फेसाप्रमाने फसफसत होत्या, मी मात्र रामायण मालिकेतल्या रामाप्रमाणे शांत आणि स्थितप्रज्ञ होतो. आणि मी संधीचं सोनं केलं. Thanks. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 04/11/2020 - 17:39 नवीन
=)) खरं आहे, माझं बचावाकडे दुर्लक्ष झालं, तुम्ही पुढच्या २ चालीत चेकमेट होणार ह्या आनंदातच मी होतो आणि हरलो.
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Mon, 04/13/2020 - 03:37 नवीन
:)
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 04/11/2020 - 17:05 नवीन
व्वा. अमोल गवळी सुपर ! व्यंगचित्रे पाहून मजा आली. आजचा लॉक डाउनचा दिवस वेगळा ठरला ! शेवटी कोरोनावर "लस" शोधलीच आणि शेवटचे "तराजू'चे भाष्यचित्र खूप आवडले !
  • Log in or register to post comments
M
MipaPremiYogesh Mon, 04/13/2020 - 12:46 नवीन
अमोल सर, काय सुन्दर चित्रे अप्रतिम...
  • Log in or register to post comments
P
palambar Mon, 04/13/2020 - 17:46 नवीन
आज आॅफिसला जातांना (4-5 दिवसांनी एकदा जवळच्या शाखेत जाते) रस्त्यावर गर्दी नसून सुध्दा मूर्ख लोक हाॅर्न वाजवत होते. असा संताप होत होता. मनाला वाटेल तसे वागायची या देशातल्या लोकांना सवय झाली आहे. कोणीतरी हुकूमशहाच यायला हवा .
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 04/29/2020 - 13:28 नवीन
वा वा. व्यंगचित्रे भारीच आहेत.. रेषांच्या फटकाऱ्यांची भाषा कित्येक शब्दांपेक्षा भारी ठरते आणखीन येऊद्या
  • Log in or register to post comments
P
Prajakta२१ Wed, 04/29/2020 - 13:31 नवीन
+१११
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 05/05/2020 - 14:17 नवीन
आपले मिपाचे व्यंगचित्र कलाकार amol सेठ यांना जागतिक व्यंगचित्रदिनाच्या खुप खुप शुभेच्छा...! आपलं व्यंगचित्राच्या बाबतीत मोठं नाव व्हावे ही सदिच्छा....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा