Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

नाभिका रे केस वाढले रे, धैर्याने उघड जरा आज सलून रे

च — चामुंडराय, Sun, 04/05/2020 - 06:08
केस वाढलेत, कापायचे आहेत परंतु ह्या लॉक डाऊन मुळे नाभिक बंधूंची दुकाने बंद आहेत. त्यामुळे वैतागून "नाविका रे, वारा वाहे रे" चे विडंबन करायला घेतले. मूळ गीत : नाविका रे, वारा वाहे रे डौलाने हाक जरा आज नाव रे कवी : अशोकजी परांजपे प्रकार : कोळीगीत विडंबन : नाभिका रे, केस वाढले रे धैर्याने उघड जरा आज सलून रे जटाधारी झालो आता, काप माझे केस रे क्वारेंटीनचे दिस गेले, घरकैदेचा मास चाले, कोरोना आला माझिया केसा गुंता होऊनि गेला, धाव घेई तुजकडे माझे मन, नाही तुला ठाव रे नाभिका रे, केस वाढले रे धैर्याने उघड जरा आज सलून रे पोनी स्टाईल ल्यायलो मी, झिपऱ्यावाणी सजलो मी, केसजाळी ल्यालो माझे कुंतल डोक्यावरी फुलुनी आले, नाचती रे बघ माझे केस, सांग तुझा भाव रे नाभिका रे, केस वाढले रे धैर्याने उघड जरा आज सलून रे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 11171 views

💬 प्रतिसाद
च
चौथा कोनाडा Sun, 04/05/2020 - 08:09 नवीन
व्वा, धम्माल विडंबन ! केसांचा गुंता, पोनी स्टाईल, झिपऱ्या ही सगळी चित्रं डोळ्यापुढं नाचायला लागली. (सध्या मी पण याच अवस्थेत आहे) मस्त, मजा आली चामुंडाराय !
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sun, 04/05/2020 - 14:41 नवीन
कविता चांगली, पण 'नाभिक' नसून 'नापित' हा शब्द 'न्हावी' या अर्थाचा आहे. नाभिक म्हणजे Nucleus आणि नाभिकीय म्हणजे Nuclear Image removed.
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Mon, 04/06/2020 - 07:12 नवीन
'भ' चा भयंकर प्रताप आहे. प बरा हे वाचून वाटले कि दर वाढीचे नाभिक समाजातून प्रसिद्ध होणारे परिपत्रक वाचत नाही वाटतं ? त्यांनी निषेध व्यक्त करायच्या आधीच पडते घेऊन हेयर कट मारून बसा...
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 04/06/2020 - 17:56 नवीन
न्हावी म्हणजे बहुतेकदा पुरुषांचे केशवपन, केशकर्तन, श्मश्रू (दाढी) करणे, केशभूषा, केशसज्जा इत्यादीचा व्यवसाय करणारी व्यक्ती असते. याला नापित, नाभिक, वारीक, म्हाली (महाला), हजाम असेही शब्द आहेत. कंगवा, कैची व वस्तरा ही न्हावी वापरत असणारी प्राथमिक साधने आहेत. केशकर्तनासाठी विजेवर किंवा बॅटरीवर चालणारी अनेक साधने सध्या उपलब्ध आहेत. मुंबईस पहिला न्हावीखाना (हेअर कटिंग सलून) लोणकर व बडनेरकर यांनीं काढला असे म्हणतात. नंदन कालेकर हा लंडनला जाऊन केस कापण्याचे आधुनिक तंत्र शिकून आधी मुंबईत आणि मग पुण्यात पुण्यात सलून काढणारा पहिला 'न्हावी' होय. गुजराथमध्ये आणि महाराष्ट्रातही हे लोक लग्न जुळविण्यांत मध्यस्थ असतात.गावभर फिरून ते लग्नाची बोलावणी करतात. ज्या ठिकाणी जुनी शंकराची मंदिरे आहेत त्या ठिकाणी सनई-चौघडा, ढोल, तुतारी, नगारा वाजविण्याचे काम घडशी समाजातील कलावंतांकडे असते. मात्र, महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये हेच काम न्हावी करतात. सनई-चौघड्याच्या आणि संबळीच्या आवाजात तुळजापूरच्या तुळजाभवानी या देवीपर्यंत नैवेद्य पोचविण्याची जबाबदारी ब्राह्मणांकडे असते. सनई-चौघडा न्हावी वाजवतात आणि गोंधळी संबळ. या सर्वांना कोल्हापूर संस्थानच्या वतीने मानधन सुरू असते. गणपतराव पिराजी वसईकर हे व्यवसायाने न्हावी होते. त्यांनी सनईवादनावर पुस्तकें लिहिली आहेत. न्हावी हे पूर्वी शस्त्रक्रिया करून तुंबड्या लावीत. यांच्या बायका सुइणीचा धंदा करतात. ही माणसे जावळ काढणे, जखमा साफ करणे, नारू रोगाचे उपचार करणे हीही कामे करतात. बऱ्याच ठिकाणी लग्नघरातील स्वयंपाकाची व्यवस्था लावणे हे काम न्हावी करतात. काही ठिकाणीं तथाकथित उच्च वर्णीयांच्या जेवणावळीत न्हावी हा पाणी वाढतो
एकंदरीत नाभिक (नापित) मल्टीस्किल्ड व्यक्तिमत्व आहे असे दिसते ! मास्त्रो : https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 04/07/2020 - 05:07 नवीन
वा वा खूपच माहीती समजली.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 04/05/2020 - 14:50 नवीन
पण आता कोरोनामुळे आमच्या नेहमीच्या नापिताकडे जावा की नाही असा प्रश्न पडलाय. नाक नेहमी गळत असतं त्याचं !
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 04/05/2020 - 15:09 नवीन
मलाही वाढलेल्या केसांचा लईच कंटाळा आला आहे ! तसही मला मिलेटरी कट किंवा झिरो कट प्रिय असल्याने वाढलेले केस नकोसे वाटतात ! त्यात उन्हाळा असल्याने घामाने केस भिजतात. बाकी नाभिक हा शब्द योग्य असुन ज्यांना हा शब्द माहित नाही त्यांनी केशकर्तनालयात कधीही भिंतीवर लावलेले दर पत्रक वाचले नसावे ! ज्यात बर्‍याच वेळा नाभिक संघटना किंवा नाभिक महामंडळ असा उल्लेख असतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tere Mere Beech Mein... :- Ek Duuje Ke Liye
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 04/07/2020 - 05:09 नवीन
मी देखील दर एप्रील मध्ये टक्कल करतो. आता पंधरा एप्रीलला ड्यू आहेत.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 04/06/2020 - 23:11 नवीन
कविता जमली आहे. कंगवा आणि कात्री घेऊन दोन आरशांमध्ये ( एक मोठा आणि एक छोटा)बसल्यास केस कापणेही जमेल. रेडिओ चालू ठेवणे.
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Tue, 04/07/2020 - 01:15 नवीन
मला हे दोन्हीही शब्द माहित होते. परंतु माझ्या मते नाभिक हा शब्द जास्त प्रचलित आहे. समाजाचे महामंडळ, संघटना, वेब-साईट, वधुवर सूचक मंडळ, फेसबुक पेज इत्यादी "नाभिक" या नावाने आहेत. नापित हा संस्कृत शब्द आहे आणि तो मराठीत संस्कृतोद्भव आहे. न्यूक्लिअस ला नाभिक हा शब्द शास्त्रीय संज्ञांचे भाषांतर असावे. कदाचित नापित चा अपभ्रंश नाभिक असावा. परंतु नाभिक ची व्युत्पत्ती काय आहे हे कुठेतरी वाचल्याचे किंवा ऐकल्याचे स्मरते. बहुधा रामनगरी मध्ये ऐकले असावे.
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Tue, 04/07/2020 - 05:46 नवीन
अगदी मनातलं दुःख व्यक्त केलत राव तेही हसू येईलसं आवडलं
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 04/10/2020 - 09:09 नवीन
मिशा आणि डोक्यावरचे केस आता लोंबू लागले आहेत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 04/10/2020 - 09:12 नवीन
वाढू द्या, लोंबू द्या, कापू नकात एवढ्यात, लॉकडाऊन नंतर मिपा सलूनकट्टा करू !
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 04/10/2020 - 09:18 नवीन
एकवीस तारखेचा धागा नुसता वाढलेली दाढी, मिशा आणि डोक्यावरचे केस. यांचे फोटो, आणि सर्वात बेक्कार दिसत असेल तो वीजेता. त्याला शे पाश्शे बक्षीस देऊ. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 04/10/2020 - 09:38 नवीन
दिलीप बिरुटे साहेब _/\_ दंडवत घ्यावा !
  • Log in or register to post comments
ब
बाजीगर Fri, 04/10/2020 - 19:11 नवीन
बेहद्द खूष झालो विडंबन वाचून.मस्त. आता इतर ज्ञान पाजळण्यांनो,तुमची भंकस दुसरीकडे करा. इथे विषय का आहे तर हे मस्त विडंबन,त्यावर बोला. काही लोकांचं हे असतं, स्वत:ला काहि सुचत नाही, दुस-यांचं कौतुकही करता येत नाही, व्यूतपत्तीशास्त्रासाठी स्वतंत्र धागा काढा.
  • Log in or register to post comments
न
नूतन Wed, 04/15/2020 - 06:14 नवीन
मस्त जमलंय
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Fri, 04/17/2020 - 03:21 नवीन
एक व्हॉट्स अप फॉरवर्ड, ह्या धाग्यासाठी अगदी समयोचित आज जर तुम्ही 50 तोळ्याची चेन घालुन फिरला तरी कोणीही विचारणार नाही कोठे बनवली. पण जर तुम्ही केस कापून रस्त्यावर फिराल तर पन्नास जण विचारतील कोठे कापले बाबा.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 18 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 18 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 18 hours ago
  • सुंदर !!
    1 day 19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा