डाएट-भाग-१ -Intermittent Fasting
मित्रांनो
डाएट या विषयावर सखोल चर्चा करण्याची इच्छा आहे. डाएट हा एक अत्यंत व्यापक विषय आहे वाढलेले वजन घटवण्यासाठी ची विशिष्ट आहारप्रणाली म्हणजे डाएट असा जो दृष्टीकोण आहे तो माझ्या मते फारच तोकडा असा आहे. सुदैवाने मला जरी वजन ही समस्या कधी आली नाही तरी अनेकांच्या आयुष्यात वाढलेले वजन हा मोठा गंभीर प्रश्न आहे याची जाणीव आहे. त्याचप्रमाणे वजन कमी करणे हा मुद्दा केंद्रात असल्यास ( व तो एक स्वतंत्र मुद्दाही अर्थातच फार महत्वाचाही असल्याने ) लोक डाएट साठी प्रेरीत होतात म्हणून आपणही तोच मुद्द्दा केंद्रीत ठेवुया मात्र त्या अनुषंगाने एकुण डाएट वर चर्चा होइल अशी अपेक्षा आहे. तर मला असे वाटते की एका एका भागात आपण एक पॉप्युलर डाएट घेऊन त्याची चिकित्सा केली तर नवे नवे पैलु समोर येतील. मी एक कच्चा खर्डा यासाठी Intermittent Fasting हा विषय घेऊन बनवला मात्र तो फारच विस्कळीत दिर्घ झाल्याने मलाच "पचला" नाही म्हणुन त्याएवजी मी विचार केला की फक्त विषय समोर ठेवतो व जसजसे प्रतिसाद येतील तशी एकेका मुद्द्यावर चर्चा करु या म्हणजे सर्वांनाच नवे पैलु उलगडतील व मजाही येइल.
तर बेसीक ओपनींग देण्याचा प्रयत्न करतो. सध्या Intermittent Fasting महाराष्ट्रात डॉ. दिक्षीत डाएट या नावाने लोकप्रिय आहे. Fasting चे मुळ तसे फार जुने वा प्राचीन असे आहे. डॉक्टर दिक्षीत यांच्या अगोदर डॉ. श्रीकांत जिचकार यांनी महाराष्ट्रात सर्व प्रथम याची ओळख व प्रचार केलेला होता. त्यांच्या अकाली निधनाने मध्ये काही काळाची गॅप पडली नंतर डॉ, दिक्षीत यांनी त्यांचा विचार पुढे अधिक प्रमाणात महाराष्ट्रात पोहोचवला. तर यामध्ये डॉ. दिक्षीत Intermittent Fasting च्या अनेक पॅटर्न पैकी केवळ एक ( याचे इतर व्हर्जन्स आपल्याकडे अजिबात चर्चेत नसतात असा अनुभव आहे किंबुहना हे एक व्हर्जन म्हणजेच सर्व काही असाही समज आहे ) १६/८ व्हर्जन वापरताअधिक यामध्येही डॉ. दिक्षीत १६/८ असा स्पेसीफिक आग्रह धरत नाहीत किंवा ही टाइम फ्रेम इनसीस्ट करत नाहीत. ते दोन जेवणाच्या सर्वसाधारण जेव्हा अधिक भुक लागते त्या ठरवुन घेण्यास सांगतात त्यामध्ये म्हणजे दिवसातुन दोन वेळेसच फक्त जेवण करावे त्यानंतर इतर वेळेत पुर्ण उपाशी रहावे असे सांगितले जाते. इतर मधल्या वेळात भुक लागल्यास डॉ. दिक्षीत काही ठराविक खाण्यासाठी परवानगी देतात. त्यात प्रामुख्याने साखरविरहीत ब्लॅक टी / ब्लॅक कॉफी , ताक , नारळपाणी एक टोमॅटो आणी अर्थातच पाणी दिवसभर. यामागचा तर्क असा आहे की या गोष्टींनी शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढत नाही म्हणुन या गोष्टी घेण्याची परवानगी आहे. संपुर्ण डाएट चा पाया शरीरातील इन्सुलीनची पातळी नियंत्रणात ठेवणे हा आहे. त्याचबरोबर ग्लुकॉगॉन या हार्मोन ला सक्रीय करण्यास वाव देऊन त्याद्वारे अनावश्यक मेदाचे फॅट चे ज्वलन करणे. व इतर बरेच असे आहे. शरीरात इन्सुलीन ची वाढलेली अनावश्यक पातळी व त्यामुळे निर्माण झालेला इन्सुलिन रेसीस्टन्स हा लट्ठपणासहीत अनेक रोगांचे मुळ आहे. यात एक निरिक्षण असे आहे की डॉ.दिक्षीत हे मुळ Intermittent Fasting चे " अतीसुलभीकरण" करतात त्यामानाने डॉ. श्रीकांत जिचकार हे अतीशय व्यवस्थित शास्त्रशुद्ध व्यापक मांडणी करत होते असे त्यांचे व डॉ. दिक्षीतांचे युट्युब वरील सर्व व्हिडीओ बघितल्यानंतरचे माझे मत आहे. जिचकारांचा प्लॅन व्यापक असा होता. दुसरी एक बाब डॉ. दिक्षीतांच्या अगोदरच सुलभ डाएट चे लोक त्याहुन अधिक सुलभीकरण करत त्यांच्या एकुण हेतुला व एकुण Intermittent Fasting च्या थेअरीची पार वाट लावुन काही भलतेच अंमलात आणतात. आश्चर्य म्हणजे कोणी Intermittent Fasting हा शब्च च वापरत नाहीत. स्वतः डॉ. दिक्षीत यांच्या तोंडुन हा शब्द ऐक्ल्याचे स्मरत नाही. म्हणजे जर डॉ. दिक्षीत यांची प्रणाली ( जी मुळात त्यांची नाही हे ते स्वतः ही मान्य करतात ) समजुन घ्यावयाची असेल तर मुळात हा विषय Intemittent Fasting या नावाने प्रचलित आहे हे समजुन घ्यायला हवे. बरेच मंडळींना माहीत असेलही पण इतर बरेच दिक्षीत डाएट म्हणून ओळखतात म्हणून हे सांगावेसे वाटते . म्हणजे या दिशेने जालावर शोधल्यास सखोल जाता येइल यासाठी हे म्हणतोय.
तर मित्रांनो तुमचे काय म्हणणे आहे तुमचा काय अनुभव आहे ?
व्यायाम न करता केवळ या फास्टिंगने वजन कमी होण्याचा ( वजन होईलही कमी काही दिवस) आणि मुख्य म्हणजे ते मेंटेन्ड राहण्याचा रेट कंसिस्टन्ट असेल कि नाही माहित नाही. पण १६/८ सुरु केल्यापासून वजनाचे टेन्शन गेलंय हे नक्की( टच वूड)https://www.youtube.com/playlist?list=PLFbLg_bIQgxBG0hlJ7t2VjbtYC53tSRsoतसेच डॉ. जॅसन फंग चे ओबेसीटी कोड हे या विषयाशी संबंधित सर्वात जबरदस्त पुस्तक मला आजपर्यंत वाटले एकवार जरुर वाचुन पहा तुम्हाला आवडेल नक्की. https://www.amazon.com/Obesity-Code-Unlocking-Secrets-Weight/dp/B01MRKEO0U/ref=sr_1_1?keywords=OBESITY+CODE&qid=1585316853&sr=8-1