Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

लॉकडाऊन : पहिला दिवस

प
प्रशांत
Wed, 03/25/2020 - 07:59
🗣 65 प्रतिसाद
नमस्कार मिपाकर्स, कसे आहात? ... घरातच आहात ना? कोरोनावर मात करण्यासाठी मा. पंतप्रधान यांनी २१ दिवसाचा लॉकडाऊन घोषित केला त्याचा आज पहिला दिवस. इतर देशात मुख्यता इटली, स्पेन, अमेरीका येथिल परिस्थिती वरुन आपल्याला अंदाज आला असेलच कि किति मोठ संकट आपल्यासमोर आहे. या काळात काय करावे काय करु नये याबाबत विविध माध्यमातुन आपल्याला माहिती मिळत आहेच यावर सर्वात उत्तम उपाय म्हणजे बाहेर न पडणे. ही सुचना वारंवार मिळत असुन सुद्धा लोक बाहेर पडतच आहेत म्हणुन आज पासुन २१ दिवस लॉकडाउन घोषित केला आहे. सर्वांना विनंती आहे कि याचे स्वता पालन करा व आपल्या प्रियजनांना पण सांगा. यावेळी आपण घरात राहुन काय काळजी घेतो, वेळ घालवण्यासाठी काय काय करतो यावर चर्चा येथे करु या. तसेच व्यायाम, प्रानायम, पाकृ.... याची सुद्धा माहिती कोरोना विषाणुविरुद्धच्या जागतिक लढ्यात भारतीय बनावटीची कोरोना (कोविड १९) टेस्ट किट बनवण्यात मायलॅब कंपनीला यश मिळाले आहे या संशोधनात आपले मिपाकर श्री. शैलेंद्र कवाडे यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे त्याबद्दल त्यांची टिम व त्यांना शुभेच्छा. .. आणि हो. नववर्षाच्या, पाडव्याच्या शुभेच्छा मंडळी. इडा पिडा टळो, वैश्विक संकटाशी लढण्याचं बळ तुम्हा आम्हा सर्वांना लाभो. - प्रशांत

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 33002 views

🗣 चर्चा (65)
अ
अनिरुद्ध.वैद्य Wed, 03/25/2020 - 17:30 नवीन
बऱ्याच वेगवेगळ्या चर्चा वर! आमचं वर्क फ्रॉम होम सुरुय! सो नेहमीप्रमाणेच रुटीन!
  • Log in or register to post comments
फ
फुटूवाला Wed, 03/25/2020 - 19:51 नवीन
घरी थांबणे माझ्यासाठी नवीन नाही. मी वर्षभरातले जास्तीत जास्त ८०-९० दिवस लग्नसमारंभात बाहेर असतो. त्यानंतर घरी मी माझं एक डिजाईन युनिट सेटअप केलंय. ज्यावर मी अल्बम डिझाईनचे काम करतो. आता फरक इतकाच आहे कि इतर वेळी मी संध्याकाळी दोन तीन तास कामानिमित्त, विरंगुळा म्हणून बाहेर जायचो मुख्य मार्केट ला. आता ते बंद झालं. आता काम तर नाहीच पण लोडशेडिंग चालू आहे. गेल्या महिनाभरात दररोज ३-४ तास लोडशेडिंग होती. आता ६-७ तास लाईट जातेय याचा खूप वैताग येतोय. बाकी सगळं जैसे थे. भाजीपाला मिळतोच. दूध घरापर्यंत येत. आता ईश्वरचरणी प्रार्थना आहे कि खरच १४ एप्रिल ला संपून १५ एप्रिल पासून मोकळीक मिळावी. नाहीतर ज्या लगनसराईची वर्षभर वाट पाहतो ती हातून निसटायची भीती आहे.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Wed, 03/25/2020 - 21:00 नवीन
शैलेंद्र -खूप खूप अभिनंदन आणि कौतुक__/\__ घरी सगळ्यांचे वर्क फ्रॉम होम चालू आहे. दोन्ही मुलींच्या शाळा ऑनलाईन आहेत. अगदी नेहमीच्या वेळापत्रकानुसार त्यांचे वर्ग, अभ्यास सुरु आहे. सकाळी जेवणाच्या ब्रेक मधे सगळे एकत्र असतो हा एक वेगळाच अनुभव. आम्ही पुढचे एकवीस दिवस नव्हे तर अजून बरेच दिवस / महिने घरात राहावं लागणार याची मानसिक तयारी केली आहे. घरात कणीक, तांदूळ आणि डाळी भरपूर आहे फक्त आता भाज्या आणि दुधाची काळजी आहे. दुकाने सुरु आहेत पण त्या गर्दीमध्ये जाणं कटाक्षाने टाळतोय. घरपोच सेवा आहे मदतीला पण त्याचे टाइम स्लॉट्स मिळणे दुरापास्त होऊन बसलेय. लोकांनी गेल्या महिन्याभरात इतकी वेड्यासारखी खरेदी केली कि सुपरमार्केट्स ना सगळ्यांना पुरवठा करण्यात नाकी नऊ येताहेत. आता त्यांनी वस्तूंच्या विक्रीवर लिमिट घातलीय. एखादि गोष्ट एका व्यक्तीला फक्त दोन किंवा तीनच्याच संख्येने विकत घेता येतील. हे अतिशय योग्य पाऊल आहे. घरात भाज्या, दूध नियमित यायला लागले कि घरी बसून राहण्याचा फारसा प्रॉब्लेम नाही. हळूहळू गाडी रुळावर येईल. विकांताला रात्री नेटफ्लिक्स वर एखादा चित्रपट आणि वीकडेज मधे एखादी सिरीज बघतोय. सध्या ' द अमेरीकन्स' नावाची मालिका सुरु आहे.
  • Log in or register to post comments
P
palambar गुरुवार, 03/26/2020 - 04:18 नवीन
सुट्टी असल्याने घरातली इतकी कामं करता येतील पण उत्साहचं वाटत नाहीए, झोप खूप येते आहे. पण एखादी भाषा शिकणार आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 03/26/2020 - 04:52 नवीन
प्रतिलिपी नावाचे एक अ‍ॅप सापडले आहे त्यावर आजच्या तरूणाईने लिहिलेल्या अनेक प्रकारच्या कथा आहेत . त्यातील नुकतीच " ईन्सेप्शन " ही गूढ कथा वाचली.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 03/26/2020 - 04:58 नवीन
बाहेर वडापाव ई पटकन मिळत असल्याने तोच खायची सवय झाली होती. नुकतेच घरी बटाटे वडे केले अन इतके दिवस आपण बाहेरचे किती थर्डक्लास वडे रुचकर मानून खात होतो याचा प्रत्यय आला. घरी केलेली मिसळ ही बाहेर पेक्शा उत्तम होत आहे ! आता पाव मात्र मिळेनासे झालेत.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 03/26/2020 - 05:07 नवीन
गड्डा झब्बू , बदाम सात, पाच तीन दोन, ३०४ हे खेळ आंतरजालावर उपलब्ध आहेत का? जिथे अपरिचितांशी खेळता येईल!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 03/26/2020 - 05:20 नवीन
३०४ लै जबरदस्त आहे, जाम मजा येते. गोटूला ३०, नव्वीला २०, एक्क्याला ११ आणि राजा राणीला ३ व २, त्यात मॅरेजेस.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 03/26/2020 - 05:52 नवीन
अमिताभ - गड्डा झाब्बू सचिन तेन्डूलकर - लॅडिस सचिन पिळगावकर - पाच तीन दोन विराट कोह्ली - भिकार सावकार सलमान - डाव लावणे मुकेश अम्बानी - मेंढी कोट राहुल व मम्मी - तीन पत्ती मोदी - फक्त पत्ते पिसणे शरद .अजित सुप्रिया पवार ------ बदाम सात
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 03/26/2020 - 05:54 नवीन
कोणता तरी एक पत्ता अडवून धरणे यात माहीर !
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 03/26/2020 - 05:27 नवीन
मिपावर पूर्वी एका धाग्यात पत्यांतील गोल्फ नावाच्या खेळाची माहिती दिली होती. हा फार मनोरंजक खेळ आहे. सापडला धागा तर खेळ अवश्य ट्राय करावा. आत्ता लिंक हाताशी नाही. एका युट्युब चॅनेलविषयी धागा आहे.
  • Log in or register to post comments
स
स्वलिखित गुरुवार, 03/26/2020 - 06:01 नवीन
कमाल आहे , मिपाकरानी कोरोना ला अजुन मिपाचे नाव दिले नाही....
  • Log in or register to post comments
P
palambar गुरुवार, 03/26/2020 - 06:06 नवीन
आॅफिस मधील कलिगची मुलगी फ्रान्सवरून 15-16 तारखेला आली , तिची कोरोना टेस्ट निगेटीव्ह होती, कलिग आॅफिसला येत होती,हे आम्हाला चारपाच दिवसांनी कळाले त्यामुळे डोक्यात शंका वळवळू लागल्या. अजूनही टेन्शन आहे. तिने असे कसे केले. आॅफिसला यायला नको होते असे वाटते.
  • Log in or register to post comments
उ
उपेक्षित गुरुवार, 03/26/2020 - 15:27 नवीन
काल गुढीपाडवा होता पण लॉकडाऊनमुळे तसा मूड नव्हता पण सर्वांचे मनोधैर्य टिकवणे आणि सकारात्मक वातावरण टिकवणे गरजेचे आहे. लॉकडाऊन असूनही माणसे मुर्खासारखी वागत आहेत म्हणून डोक्यात एक किडा आला तसाही वेळ होता आणि चैत्रपाडव्याचा मुहूर्तही होता म्हणून आमच्या बायडीचा एक विडीयो काढून टाकला सामाजिक संदेशपर. https://youtu.be/xkM0EFuYg3k
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 05/14/2020 - 17:16 नवीन
मायलॅब ला सलाम.. सिरम ने त्यांना नंतर अर्थ पुरवठा केला आहे जास्त असे ऐकण्यात आले.. ---- बाकी कोसारा मध्येच का आले कोणी सांगेल का.. बाकी या धाग्याबरोबर आम्ही सांगितल्या प्रमाणे सर्व धागे वाचले.. आभार
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा