Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

करोना आणि मिपाचे कल्पक बॅनर !

च
चौथा कोनाडा
Mon, 03/23/2020 - 16:23
🗣 14 प्रतिसाद
करोना विषाणूच्या लागणीची साथ आली, आणि आपले दैनंदिन जीवन ढवळून निघाले, अन मग मिपाकर ही या ताज्या विषयावर चर्चा करायला मागे का राहातील ? डॉ सुबोध खरे यांचा कोविड-१९ विषयीचा लेख म्हणजे शास्त्रीय माहिती, जैविक तपशील यांचा आरसाच, बऱ्याच लोकांनी तिथं चर्चा केली, शंका विचारल्या, उत्तरं मिळून प्रबोधनही झालं. कुमार१ यांचा हात, जंतू, पाणी आणि साबण हा देखील स्वच्छतेच्या अंगाने चर्चला गेलेला सुरेख लेख. संदीप चांदणे यांची मास्कमधून ही जिद्द आणि जगवणं सांगणारी कविता. ही काही वानगी दाखल उदाहरणे. आणि या पार्शवभूमीवर मिपाचे कलाकार तरी का मागे का राहतील ? आणि मग, मिपा सजलं आकर्षक समयोचित बॅनरनं ! आपण करोना विरुद्धची लढाई लढायला सज्ज आहोत हे आश्वस्त करणारी टॉपलाईन. करोनाचा प्रतिबंध करण्यासाठी प्रमुख उपायांची आटोपशीर ग्राफिक्स मांडणी. MPB मास्क लावला तरी तुम्हाला कुणी डुआयडी म्हणणार नाहीत ही जबरी कोपरखळी ! आणि त्यावर कळस म्हणजे मिपाच्या लोगोला चक्क " गो करोना, करोना गो " अशी सिग्नेचर लाईन असलेला मास्क ! क्या बात हैं !!! हॅट्स ऑफ फॉर बॅनर ! सलाम !

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6474 views

🗣 चर्चा (14)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 03/23/2020 - 17:23 नवीन
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव याविषयी जागरूकता आणि त्याविरुद्धचा लढा सर्वत्र लढल्या जात असतांना मिपा मागे राहणे शक्यच नाही. आपण उल्लेख केला त्या मान्यवरांनी योग्य माहिती दिली त्यामुळे त्याबद्दल काळजी कशी घ्यावी त्याची उत्तम माहिती मिळत गेली, मिळत आहे. त्याच वेळी अभ्याने केलेले बॅनर नंबर एक झालं. अभ्याच्या कलाकुसरीचा आपण जूने पंखा आहोत, त्यांच्याकडून अशीच मिपासेवा सेवा होत राहावी अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 03/24/2020 - 08:17 नवीन

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटेसाहेब ! खरंच, अभ्याशेठनं केलेलं बॅनर एकदम भारी झालेय ! हे बॅनर नक्की कुणी केलंय हे माहित नव्हतं, नाही तर धाग्यात देखील उल्लेख केला असता ! हॅट्स ऑफ अभ्याशेठ ! अभ्याचे आम्ही देखिल फॅन आहोत हे या ठिकाणी सांगायला आनंद होतोय ! भेटायची इच्छा आहे या कलावंताला एकदा !
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Tue, 03/24/2020 - 08:31 नवीन
अभ्याशेठनं केलेलं बॅनर एकदम भारी झालेय ! बाडिस...
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 03/24/2020 - 08:43 नवीन
मिपाच्या लोगोला मास्क लावण्याची कल्पना भारीच आवडली... एकंदरीत बॅनर मस्तच वाटतोय! एक नंबर काम झालंय अभ्या.. _/\_
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 03/24/2020 - 14:28 नवीन
एकंदरीत बॅनर मस्तच वाटतोय! एक नंबर काम झालंय अभ्या.
>> +१११ संचालकांचेही अभिनंदन !
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 03/24/2020 - 14:40 नवीन
अभ्या हाडाचा कलाकार आहे.
  • Log in or register to post comments
फ
फुटूवाला Wed, 03/25/2020 - 02:05 नवीन
मिपाकर श्री शैलेंद्र कवाडे यांचे हार्दिक अभिनंदन...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 03/25/2020 - 03:30 नवीन
कशाबद्दल ?? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 03/25/2020 - 04:19 नवीन
शैलेंद्र कवाडे यांचे हार्दिक अभिनंदन...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 03/25/2020 - 05:18 नवीन
अरे वाह अभिनंदन शैलेंद्रसेठ, प्राऊड फिलिंग. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 03/25/2020 - 05:44 नवीन
Image removed. बॅनर आणि शैलेन्द्रसेठ.... दोन्ही भारी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 03/25/2020 - 06:18 नवीन
सुंदर बॅनर, शैलेंद्र कवाडे यांचे हार्दिक अभिनंदन !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- On the floor baby Hit it hard baby Rock the party baby Pattoolengil podi... :- Love Action Drama
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 03/25/2020 - 07:15 नवीन
मिपाकर श्री शैलेंद्र कवाडे यांचेखुप खुप हार्दिक अभिनंदन... ! आम्हाला तुमचा अभिमान वाटतो !
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 03/25/2020 - 17:11 नवीन
आताच झी मराठी वर श्री. शैलेंद्र कवाडे यांची हिंदीत दिलेली मुलाखत बघीतली. एका मिपाकराला टिव्हीवर अत्यंत महत्वाच्या बातमीत बघताना आनंद झाला.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा