बिपिनभाऊ,
एक मित्राच्या नात्याने सल्ला देऊ?
रागावू नका, पण आता बायकोला बोलावून घ्या!!!!
नायतर तुमचं कठीण आहे.....
एकदा पोटात अल्सर झाले ना, तर जन्मभर पस्तावावं लागेल....
:)
आपल्या बायकांना आपल्यापेक्षा खूपच छान स्वयंपाक येतो यावर दृढ विश्वास असलेला,
डांबिसकाका
अमा डांबिसमियाँ, आपका हुक्म सर आँखो पर. लगेच बोलावतो तिला इथे... नाही आली तर, लोकली दुसरी शोधावी म्हणतो ;)
आपल्या बायकांना आपल्यापेक्षा खूपच छान स्वयंपाक येतो यावर दृढ विश्वास असलेला
१०१% सहमत. पण तिथेच घोळ झाला ना... कधी पाऊल नाही टाकलं स्वैपाकघरात... आता भोगतोय. :(
बिपिन कार्यकर्ते
माशाल्ला , माशाल्ला, मरहब्बा .. जन्नत जन्नत ..
अबब !! काय हे .. घोर कलियुग .. जगदंब! जगदंब!!
असो , तुम्हाला अशी पर्यायी सोय देणारी एजन्सी सापडली तर सांगा भौ .. तिकडं येतोच मग .. नाय तरी आम्हाला सध्या पर्यायांशीवाय पर्याय नाही.
अरे वा बिपिनकाका !! तुम्ही सध्या पहिलीत आहात, मी चवथीत आहे अन उत्तम स्वयंपाक येणार्या बायका ग्रॅजुएट असतात. पुरण, चकलीसारखी चकली, शंकरपाळ्यासारखे शंकरपाळे, झालच तर गेलाबाजार एखादी पास्ता सारखी कॉन्टिनेंटल डिश येणार्या स्त्रिया पीयचडी असतात.
तुम्हाला पुढचे टारगेट म्हणजे बटाटा भाजी, भेंडी, कोबी, गवार अन कोणतेही वरण !! मग तुम्ही चवथीत याल .. अन मग आपण दोघेही चवथीतच राहु !! कारण या लेव्हल पर्यंत झालेल्या मानसिक शारिरिक त्रासामुळे हुच्च शिक्षणाची विच्छा संपलेली असते.
आता घ्या हलकटाचा सल्ला:
धमाल मुलासारखे सुग्रण बायको असणारे मित्र शोधा .. त्यांची इच्छा नसली तरी त्यांच्या बायका तुम्हाला जेवायला बोलावतात .. चांगलं चुंगलं खाउ घालतात.
अदितीसारख्या सज्जन नवरा असणार्या विक्षिप्त मैत्रीणी शोधा .. त्या अन त्यांचा नवरा मिळुन स्वयंपाक करतील आण तुम्हाला जेवायला बोलावतील. कींवा ते एखाद्या छानश्या हाटेलात जेवायला जाणार असतील तर तुम्हाला पण नेतील अन जेवु घालतील !!
असे प्रसंग वारंवार आल्यावर तुम्हीच तुम्ही तयार जेवणाला विटताल अन निमुट शहाण्या पुरुषासारखे जगु लागताल !!
पण पाकृ मी काही वाचली नाही. जेवायच्या आधी मी पाकृ वाचत नाही. ;-)
आधीच च्यायला मिपावर काही तथाकथित मित्र 'काका' म्हणताहेत.
आणि तथाकथित मैत्रीणी+बहिणी ज्या कधीमधी काकाही म्हणतात त्यांना विसरू नका म्हणजे झालं.
आंद्यासाठी:
अदितीसारख्या सज्जन नवरा असणार्या विक्षिप्त मैत्रीणी शोधा .. त्या अन त्यांचा नवरा मिळुन स्वयंपाक करतील आण तुम्हाला जेवायला बोलावतील. कींवा ते एखाद्या छानश्या हाटेलात जेवायला जाणार असतील तर तुम्हाला पण नेतील अन जेवु घालतील !!
माझ्या नवर्याच्या हातचं तू अजून जेवला नाही आहेस, एकदा जेवलास तर पुढच्या वेळी त्याच्याशीच बोलशील जेवण्याबद्दल! (बाकी तो सज्जन आहे आणि मी विक्षिप्त हे वादलेस आहे.) तुला नीट आठवत नाही आहे, पण छानश्या हाटेलात तूच हरी पत्ती खर्च केली होतीस.
असे प्रसंग वारंवार आल्यावर तुम्हीच तुम्ही तयार जेवणाला विटताल अन निमुट शहाण्या पुरुषासारखे जगु लागताल !!
अरे अगदी खरं! उगाच का माझा नवरा एवढा छान स्वयंपाक करायला शिकला! ;-)
आंद्याभाऊ,
मी दुसरीच्या पहिल्या सहामाहीत आहे. मला भात, खिचडी, तयार लोणचं, बुक्की मारून फोडलेला कांदा, साधं वरण, फोडणी घातलेलं वरण, बटाट्याची भाजी आणि वरती लिहिलेली बॅचलर भाजी एवढं सगळं येतं.
अवांतर निरीक्षणः आपल्या दोघांचे काही मित्र / मैत्रिणी कॉमन आहेत असे मला वाटते. ते जर का खरे असेल तर आपण त्यांच्या पासून कसे सांभाळून राहतो या बद्दलच्या नोट्स शेअर करूयात.
बिपिन कार्यकर्ते
याच्या पुढची पाककृती "टोमॅटोची विवाहीत" भाजी अशी येउद्यात
बाकी अन्द्यालाडुचा सल्ला पटला. अनुभवातून त्याला हे ज्ञान प्राप्त झाले आहे.
तो सध्या सुपात आहे जात्यात भरडला जाईल तेंव्हा पाहु. त्याला सुग्रण बायको मिळो ही सदीच्छा. ( त्यामुळे आपल्याला उत्तम डीशेस मिळतील ; त्याची इच्छा असो वा नसो)
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
आमच्या भागातल्या रेस्टारंटमधे बटाटा पापुलर आहे.
इकडच्या भेळीला (बंगलोरच्या भाषेत "बेल" ) भेळ म्हणणे हा भेळीचा अपमान आहे. गंमत म्हणजे ही असली फडतूस भेळ लोकांना कौतुकाने खाताना दया येते. :S
बटाटा आमच्याइथेही ( कोरमंगलामध्ये) लागेल तेवढा मिळतो ...
>> इकडच्या भेळीला (बंगलोरच्या भाषेत "बेल" ) भेळ म्हणणे हा भेळीचा अपमान आहे. गंमत म्हणजे ही असली फडतूस भेळ लोकांना कौतुकाने खाताना दया येते.
+++१, सहमत आहे.
पहिल्यांदा भेळ खाल्ली तेव्हा शहाण्याने भेळमध्ये चक्क " गाजर + मुळा" कापुन टाकला होता, मी डोक्याला हात लावला, त्याला ( मनातल्या मनात ) म्हटले " पुन्हा जर ह्यात गाजर दिसले तर मार खाशील ...". असो.
अजुन एक झांटामाटिक अनुभव ...
आमच्या एरियातला एक भेळवाला ओळखीचा झाला आहे. आमचे नेहमी येणे जाणे असते तिकडे ...
त्याला एकदा आम्ही मित्रांनी घोळात घेऊन " हम भेळ बनाता है, तुम खाली देखो" म्हणुन सांगितले व चक्क मी स्वतः भेळ बनवली भेळच्या गाड्यावर ( स्गळे साहित्य तयार असल्याव्र आमचे काय जातेय तयार करायला ) व त्यालाच उलट आग्रह करु करुन खाऊ घातली. तो म्हणाला "साब इस्कु बंबय्या बेल बोला हम", आम्ही नुसते हसलो मग ...
त्या सज्जनाने त्या दिवशी भेळ चे पैसे नाहीत घेतले आमच्याकडुन ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
नेहमी प्रमाणे सबसे हटके presentation.....
पाककृती छानंच.........
________________________________________
अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर
आधी हाताला चटके तेव्हा मि़ळते भाकर
----संत बहीणाबाई
आमच्या आदरणीय "बिपीनकाकांची" झटापट "कांदा टॉमेटोची बॅचलर भाजी" वाचुन मज्जा आली ...
भाजी सारखीच शैली खुसखुशीत आहे, मस्तच, अजुन अशाच पाकॄ येऊद्यात ...
आता मी कितवीत आहे आणि तुम्ही कितवीत आहात हा हिशोब नाही काढत, गणित अंमळ कच्चे आहे ना ...
पण तुमच्या रुम पार्टनरची ऐश असेल भौ, एवढे भारी भारी करुन खायला घालताय , मग अजुन काय पाहिजे ?
>> जेवायला बसताना जवळ दह्याची वाटी घ्यायला विसरू नका. कारण भाजी एकदम तिखटजाळ होते. आणि त्या बरोबर थोडं दही खाणं दुसर्या दिवसाच्या दृष्टीने बरं असतं.
=)) =))
मस्तच, अगदी शब्दश: खरे आहे ....
( येडा कुठचा ) छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
पाकृ आणि सांगण्याची पद्धत आवडली.
आजकाल विविध पाकृ बरोबरच त्यांच्या सादरीकरणाचेही विविध प्रकार येत आहेत ही चांगली गोष्ट आहे.
बिपिनभौ, एक सुचवणी. या भाजीत बटाट्याचा समावेश करा आणि चिकन मसाल्याऐवजी कांदा-लसूण मसाला वापरून पहा. तसेच आले चिरण्याऐवजी कीसा.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
त्रिवार अभिनंदन..
चला म्हणजे पुढच्या सुट्टीत वहिनी आणि मुली आल्या की, किमान भाजी तरी तुझ्या हातची खायला मिळेल त्यांना. आणि तो पर्यंत ही भाजी आणखी चांगली करायला लागला असशील. :)
बाकी,एकूणच रेसिपी आणि त्यातल्या बारिक सारिक सूचना वाचून अंमळ करमणूक झाली. मजा आली. बाय द वे बिपिनदा, मी तुला एक अशी मस्त भाजीची रेसिपी सांगेन एकदम सुटसुटीत. पण थोडे दिवस हीच भाजी हाण. हिचा कंटाळा आला की मग सांगेन तुला. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मी पण एकदा बॅचलर मुलांमधे रहात असताना असला प्रकार केला होता. ते बॅचलर मुले खुप छान स्वयंपाक बनवायचे. मी आपला उगीच कांदे काप, तांदुळ धु असे करायचो. एकदा अगदी न रहावुन खिचडी चा सोपा पाक् प्रकार बायकोला विचारला अन् ती मुले नको नको म्हणत असताना बनवला. मुलांनी बग ती खिचडी "त्राही माम् त्राही माम्" करीत खाल्ली. तेव्हापासुन मी काही बनवतो म्हटलं की सगळे बेंबीच्या देठापासुन "नको" म्हणतात.
तसा मी स्वयंपाकात एकदम् "ढ" नाहीये .. दुध गरम करने , अंडी उकडने, कांदा कापने यात माझा कुनीही हात धरु शकत नाही.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
०१. रेसिपी आवडली असं सांगणार्या सर्वांचे आभार.
०२. न सांगणार्यांना (त्यांच्या आणि त्यांच्या सर्व प्रियजनांच्या) वाढदिवसाच्या शुभेच्छा.
०३. प्रतिसाद टाकले पण पाकृ आवडली असे न सांगणार्यांना बघून घेण्यात येईल.
काही लोकांनी अवांतर प्रतिसाद टाकले आहेत त्यांच्यावर नजर ठेवली जाईल. त्यांनी एखादा धागा सुरू केला की आम्ही पण असेच अवांतर प्रतिसाद टाकू. आणि या धाग्याचा आम्हाला झालेला एक वैयक्तिक फायदा म्हणजे कुंदनशेठ वठणीवर आलेले आहेत आणि त्यांनी लवकरच आम्हाला भेट देऊन त्यांचे प्रसिद्ध पाककौशल्याचा फायदा आम्हाला करून द्यायचे कबूल केले आहे. (आता आमी पन कट्टा करनार... टुक टुक) लेखणी (कळफलक) ही कशी तलवारीपेक्षा श्रेष्ठ असते याचे प्रत्यंतर आले.
पहिली ओळ वगळता बाकी सगळे ह. घेणे हे वे. सां. न. ल. :)
बिपिन कार्यकर्ते
जरा उशीरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व!
लै भारी बरं का का रेशिपी बिपीनभाउ :) बाकी बिपीनभौंना काका म्हणणार्यांनी संपूर्ण उस त्यांच्यासारखा नुसत्या दातांने सोलून-खाऊन दाखवावा (संदर्भः ऑर्कुट) .. बाघोबाच्या इतक्या जवळ जावे वगैरे वगैरे ;)
बाकी बेशिक रेसिपी मस्त.. आता यात पनीर / बटाटा वगैरे घालून दुसरी पायरी.. नंतर फोडणीचे वेगवेगळे प्रकार करून तिसरी पायरी गाठता येईल.. (हे सगळं वरही बर्याच जणांनी सांगितलेले दिसले.. पण आता टाईप केले आहे तर असु दे :) )
ह्या झाल्या माझ्यासारख्या कुडमुड्या आचार्याच्या टिप्स.. बाकी खास टिप्स साठी बल्लवाचार्य प्रभाकरपंत / पाकात मुरलेल्या (म्हणजे पाककलेत रे ;) )स्वातीताईला गाठावे
-(कुडमुडा) ऋषिकेश
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी