Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

एकदा प्रेमी राधा कृष्ण होऊन पहावे.

म — माहितगार, Wed, 02/19/2020 - 11:35
ज्या कृष्णांना राधा नसतात आणि ज्या राधांना कृष्ण नसतात त्यांनी काय करावे ? ज्या कृष्णांना राधा असतात आणि ज्या राधांना कृष्ण असतात त्यांचे मनोमन कौतुक करावे त्यांच्या प्रेमाच्या पावित्र्याचा आदर करावा किमान राधेच्या चारित्र्याचे उगाचच जज बनू नये. ज्या कृष्णास राधा भेटत नाही ज्या राधेस कृष्ण भेटत नाही त्यांनी काय करावे? न मिळालेल्या जोडीदाराच्या निवड स्वातंत्र्याचे कौतुक करावे किमान न मिळालेल्या जोडीदाराच्या जोडीदाराची इर्षा करु नये. प्रेम पझेसिव्हनेस देत पण पझेसिव्हनेस आणि आशाभंगण्यातून येणारे दु:ख्ख दुसर्‍याच्या निवडस्वातंत्र्याची जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे दु:ख्ख आणि राग बाजूस ठेऊन खर्‍या प्रेमिका प्रमाणे प्रेयसाच्या अगदी प्रत्येक निर्णयावर सकारात्म्क प्रेम करावे, केवळ आणि विनाअट प्रेम करणारे एकदा प्रेमी राधा कृष्ण होऊन पहावे. खिलजीकाव्याचे विडंबन नाही अनुषंगिक प्रेर्ना मात्र आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5045 views

💬 प्रतिसाद
ख
खिलजि Wed, 02/19/2020 - 12:20 नवीन
================== राधेचा कृष्ण कि कृष्णाची राधा खरंच हे प्रेम कि गेमाची बाधा कलियुगात बहू भेटती कृष्ण सबला नारी व्यभिचाराने जीर्ण कळी उमलता खुडण्यात येते भुलवून तिजला भासवुनी कृष्ण कृष्ण थोर कि थोर त्या लीला आजही दुभंगती अबला राधा अलगद त्यांचे यौवन शोषूनी कृष्ण राहतो नामानिराळा राधा साजरी परी गोजिरी कुटुंबा कृष्णकृत्य जे कलियुगी , कृष्ण वेगळा तो कृष्ण वेगळा =================================
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 02/20/2020 - 03:45 नवीन
आवडली कविता. आणि पटलीसुद्धा.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 02/20/2020 - 04:41 नवीन
कविता आवडली पण पटली नाही विशेषतः ज्या कृष्णांना राधा असतात आणि ज्या राधांना कृष्ण असतात त्यांचे मनोमन कौतुक करावे हे अजिबात पटले नाही. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ गुरुवार, 02/20/2020 - 10:10 नवीन
किमान राधेच्या चारित्र्याचे उगाचच जज बनू नये. अगदी. साधी, सरळ ,पण विचार करायला लावणारी कविता.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 19 hours ago
  • सुंदर !!
    1 day 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा