Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

मिळालं का तुला माझं प्रेमाचं फूल सेंट केलेलं ?

ख — खिलजि, Wed, 02/19/2020 - 08:54
मिळालं का तुला माझं प्रेमाचं फूल सेंट केलेलं ? मी अजूनही ठेवलंय माझ्या इनबॉक्समध्ये तुझ्याकडून गिफ्ट आलेलं पाठवत गेलो येड्यावानी फुलावरती फुलं फ्लॉवरपॉट झाला असेल त्याचा नंतर कळलं तुझं लग्न आणि तुला झालेली मुलं हादरून गेलो उभाआडवा , काहीच सुचलं नाही लक्षच लागत नव्हते माझे , सारखा स्कीनवर बघत राही त्या एका गिफ्टने बदलवून टाकले पूर्ण जीवन माझे समजत होतो मीच स्वतःला प्रेमनगरीचे राजे सत्य समजता डोळ्यावरची पापणीही लवत नव्हती राजेशाही कोलमडून पार झोप उडाली होती इनबॉक्समध्ये तुझ्यातर्फे फक्त एकच गिफ्ट होती तिंहीं मजला जड होऊन आता नकोशी वाटत होती बुद्धू ती कि मीच खुळा याचा हिशेब जुळत नव्हता केव्हा कधी नि कुठं घडलं हे याचा शोधत होतो पत्ता सेंट करावं दुसरी अशी कुणी भेटतही नव्हती शोधून शोधून थकलो साऱ्या , सर तिची नव्हती पाहिलं प्रेम फुलासंगे जुळता जुळता राहिलं पानिपत झाल्यानंतर तिला कायमच ट्रॅश केलं सुरु झालं त्या मेलमध्ये आणि तिथेच सार संपलं झोपेची झेड आणि स्वप्नांचं ओझं देऊन बाजूला झालं =================================== सिद्धेश्वर विलास पाटणकर

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3378 views

💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 02/19/2020 - 10:15 नवीन
एवढे मनाला नका लावून घेउ, माझ्या इन बॉक्सात पण अशी २५ -३० फुले आहेत जपून ठेवलेली सगळ्यांचा हिशेब ठेवायला वयोमानाने आता जड जाते आहे, तेव्हा त्यासाठी एक सेक्रेटरी ठेवावी म्हणातो... बघा आहे का एखादी गरजू, तिचेही कल्याण होईल आणि माझेही काम पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 02/19/2020 - 11:09 नवीन
;)
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 02/19/2020 - 11:37 नवीन
एकदा प्रेमी राधा कृष्ण होऊन पहावे. ह्यो सादसुद मुक्तक अस्मादीकांनी खिलजीकाव्याने प्रेरीत होऊन लिवले आहे त्याचा अवश्य आस्वाद घ्येवा.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Wed, 02/19/2020 - 11:55 नवीन
@ पैंबू काका प्रतिसाद भारीच आवडला गेलेला है .. अक्कूककाकांना शेक्रेटरींच्या सिलेक्शनसाठी फोटू पाठवायला सांगण्यात आलेले है .. थोडा धीर धरावा , हि नम्र इनन्ती... @ मागाकाका आपली कविता तुरट वाचनाला घेणार है ...धन्यवाद
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 02/19/2020 - 12:02 नवीन
:)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 19 hours ago
  • सुंदर !!
    1 day 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा