Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

पोट साफ - Squatty potty - प्रॉडक्ट रिव्ह्यू

च
चामुंडराय
Sun, 02/09/2020 - 01:31
🗣 11 प्रतिसाद
ज्यांना "पडल्या पडल्या झोप येते आणि बसल्या बसल्या साफ होते" अशी मंडळी जगात सर्वात सुखी असे थोर विभूतींनी सांगून ठेवले आहेच. ह्या पैकी चांगल्या झोपेसाठी मी वेटेड (वजनदार) ब्लॅंकेटचा धागा पाडला होता (या निमित्ताने त्याची झैरात https://www.misalpav.com/node/46036) आणि जर कोणी ते ब्लॅंकेट वापरत असेल तर त्याबद्दल मत प्रदर्शित करण्याचे आवाहन केले होते. आता ज्यांना मलावरोध किंवा पोट नीट साफ न होण्याची तक्रार आहे त्यांच्या साठी रेचक किंवा औषधा व्यतिरिक्त एखादे उपकरण (प्रॉडक्ट) उपलब्ध आहे का ह्या बद्दल चर्चेसाठी या धाग्याचे प्रयोजन आणि उपकरण समीक्षा (प्रॉडक्ट रिव्ह्यू). बदलती, बैठी जीवनशैली, शारीरिक श्रम किंवा व्यायामाचा अभाव त्या बरोबरीने बदलती आणि सकस अन्नाचा अभाव असलेली आहारशैली, जेवणाच्या अनियमित वेळा ह्या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजे ही समस्या असावी. किंवा जंतू संसर्गाने देखील हे होत असावे. अर्थात येथील डॉक्टर मंडळी याबद्दल अधिक माहिती देऊ शकतील. ह्या व्यतिरिक्त आणखी काही कारण असू शकेल काय? या विषयावर अंजात्खनन करताना आणखी एका कारणाचा उलगडा झाला, तो म्हणजे शौच्याचा विधी करतानाची शारीरिक स्थिती (sitting posture). हे प्रकरण जरा इंटरेस्टिंग वाटल्याने अधिक शोध घेतल्यावर असे आढळले की उकिडवे बसून शौच करणे ही शरीर शास्त्राच्या दृष्टीने सगळ्यात योग्य पद्धत आहे ! सर्वसाधारणपणे शौच करण्यासाठी दोन पद्धती आहे. एक म्हणजे उकिडवे बसून (squatting) किंवा खुर्चीत बसल्यासारखे बसून (sitting). ह्या व्यतिरिक्त आणखी काही पद्धती जाणकार लोकांना माहीत असतील तर प्रकाश टाकावा (अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींचे उदाहरण सोडून). squatting साठी भारतीय पद्धतीचे संडास वापरले जातात तर sitting साठी आधुनिक पद्धतीचे कमोड किंवा टॉयलेट. आता कमोड म्हणायचे की टॉयलेट ह्या पुरातन विषयावर वाद नको. शेवटी काय, कार्यभाग उरकल्याशी मतलब, नाही का? कमोडचे डिझाइन हे "वासुदेवाचा प्याला" ह्या संकल्पनेवर आधारित आहे. ही संकल्पना समजण्या आधी जगात सर्वत्र squatting पद्धत वापरली जात होती किंवा "होल वावर इज आवर" अशी परिस्थिती असेल तर दुसरा पर्याय नसावा. उकिडवे बसणे हे खुर्चीवर बसण्याच्या पद्धतीपेक्षा जास्त शास्त्रीय आहे हे लक्षात आल्यावर कमोडवर बसूनदेखील उकिडवे बसल्याचा लाभ कसा मिळवता येईल ह्याचा विचार चालू झाला आणि एका नवीन प्रॉडक्टचा जन्म झाला. पाश्चात्य जगात जी वेगवेगळी फॅडस् येत असतात त्यातील हे एक नवीन फॅड म्हणजे "squatty potty". काय आहे ही स्क्वॅटी पॉटी? हा आहे एक स्पेशल डिझाइन असलेला साधारणतः ६ इंच उंचीचा कमोडवर बसून स्टूल करताना वापरायचा स्टूल !! कमोडवर बसल्यावर हा स्टूल पुढे ओढून त्यावर दोन्ही पाय ठेवले की गुढगे कमरेच्या वरती उचलले जातात आणि उकिडवे बसल्या सदृश्य स्थिती निर्माण होते. आणि तो स्टूल खूप दणकट वगैरे असायचीही काही गरज नाही. त्याच्यावर फक्त पाय ठेवायचे आहेत, उभे नाही राहायचे! म्हणजे बघा आपल्या साठी जे most natural posture आहे ते या पाश्चात्य मंडळीं साठी desired posture आहे तर. आंजा वर squatty potty चा एक छान व्हीडीओ सापडला. तो बघितला तर हे काय प्रकरण आहे ते स्पष्ट होईल. https://www.youtube.com/watch?v=pYcv6odWfTM आणि हि एक मजेदार झैरात. https://www.youtube.com/watch?v=YbYWhdLO43Q डिस्क्लेमर : ह्या कंपनीशी माझा काहीही संबंध नाही किंवा त्यांच्या उत्पादनाची हि शिफारस नाही. केवळ हि पॉटी म्हणजे काय हे कळावे ह्या कारणासाठी हि लिंक. एखादा नवीन शोध लागल्यावर किंवा संकल्पना पुढे आल्यावर त्याचे जीवनोपयोगी प्रॉडक्ट्स् मध्ये रूपांतर करून मार्केटिंग कसे करावे हे या लोकांकडून शिकावे. या स्क्वॅटी पॉटीचे असंख्य प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. इतकेच नव्हे तर यु ट्यूब वर DIY चे अनेक व्हिडीओज अपलोड केलेले आहेत. माझ्या मते भारतीय पद्धतीशी तुलना करता मुळात कमोड हायजेनिक नाही आणि squatty potty वापरूनही उकिडवे बसण्या इतपत अपेक्षित परिणाम साधता येत नाही परंतु पर्यायच नसेल तर squatty potty वापरणे उत्तम. आजकाल बहुसंख्य लोकांकडे (उच्च मध्यमवर्गीय मराठी - उमम) कमोडची सोय असलेली शौचालये असतात. ममम आणि कमम देखील ह्या बंदवाघिणी मध्ये सामील होण्यासाठी उत्सुक आहेत. पाश्चात्यांचे अंधानुकरण करण्याच्या आपल्या नेहेमीच्या शिरस्त्या प्रमाणे शारीरिक दृष्ट्या अयोग्य अश्या कमोड संस्कृतीचा आपण अंगीकार करत आहोत का? मलावरोध किंवा "होऊन देखील काहीतरी अजूनही आहे तेथे" तक्रार वाढण्यामागे हे एक कारण असावे का? बरं, तो विषय बाजूला ठेवू या. तुम्हाला जर हा त्रास असेल तर विधी करायला कमोडवर बसल्यावर एखादा छोटा स्टूल हाताशी... आपलं... पायाशी असलेला बरा. आणखी एक गोष्ट म्हणजे स्टूल करतानाच हा स्टूल वापरायचा आहे, कमोडवरच्या दुसऱ्या विधीसाठी त्याची आवश्यकता नाही म्हणे. आता हे असे का ते येथील डॉक्टरच सांगू शकतील. जमिनीवरच्या कमोड पेक्षा जमिनीत पुरलेले कमोडचे डिझाईन चांगले तर ज्यांना गुढगेदुखीचा त्रास आहे किंवा वृद्ध व्यक्तींसाठी जमिनीच्या वर असलेले कमोड + संडासच्या भांड्याचे डिझाइन चांगले. दोन्ही पद्धतीचे फायदे अशा प्रकारच्या कमोड मुळे मिळू शकतील. तर अशा स्क्वॅटी पॉटीचा कोणास अणभव आहे का? डझ इट रिअली हेल्प टू "गो" इझीली? यानिमित्ताने अश्या इतर प्रॉडक्टसचा विचार करता योग साधनेसाठी लागणारी आणि मार्केटमध्ये उपलब्ध असणारी विविध साधने (प्रॉप्स) आणि योगा इंडस्ट्री भारताबाहेर कशी भरभराटीला आली आहे हा मोठा अभ्यासाचा विषय आहे. आता या पुढची पायरी म्हणजे जमिनीवर बसून, मांडी घालून जेवण करणे हे शारीरिक दृष्ट्या सर्वोत्तम आहे असा शोध जेव्हा या पाश्चिमात्य लोकांना लागेल तेव्हा काय काय नवीन प्रॉडक्ट्स येतील आणि त्यांचे मार्केटिंग कसे केले जाईल हे बघणे मनोरंजक ठरेल.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8493 views

🗣 चर्चा (11)
च
चौथा कोनाडा गुरुवार, 02/13/2020 - 13:16 नवीन

छान !

  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 02/13/2020 - 13:29 नवीन
पैल्या व्हिडोतील म्युझिक (पर्रपर्र, टर्र्टर्र, टिबुकटिबुक, टिपिकटिपिक) आवडले, भारी अ‍ॅनिमेशन इफ्फेक्टस आहेत, व्हिडो आवडला ! दुसर्‍या व्हिडोतील अ‍ॅनिमेशन, ससुल्या आन सॉफ्टी आईस्क्रिम वैग्रे इनोसंट आहे, तो पण व्हिडो आवडला ! (ह्ये पैल्या प्रतिसादात सांगायचं र्‍हायलं होतं, म्हणोन ही कमेंट)
  • Log in or register to post comments
प
पिंगू Sat, 02/15/2020 - 15:19 नवीन
बद्धकोष्ठतेचा त्रास असणार्‍यांना या उत्पादनाचा काही एक उपयोग नाही. पोट साफ होण्यासाठी मुळातच अन्नपचन चांगले व्हायला हवे.
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Sat, 02/15/2020 - 18:45 नवीन
.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/16/2020 - 07:54 नवीन
माहितीपूर्ण धागा. धन्यवाद. सालं कमोडवर "होऊन देखील, काहीतरी अजूनही आहे तिथे'' असे वाटत राहते. हे बर्‍याचदा मानसिकही असते असे वाटते. दिवसभर मनात काही तरी बोचत असते. त्या पेक्षा पारंपरिक भारतीय पद्धतीच्या उकिडवे बैठे व्यवस्थेत ''फिलींग गुड'' ची भावना असते. दिवसभर फ्रेश वाटतं. अर्थात आता बर्‍याच लोकांना गुडघीदुखीच्या अडचणीमुळे 'कमोड' बरे पडते. घरात वृद्ध मंडळींसाठी ते बरं असतं. पण, आता त्यांच्या कसंनुसं चेहर्‍यामुळे मुळ प्रॉब्लेम कुठे आहे हे लक्षात येते. आता सर्च केल्यावर कमोडसमोरचा तो स्टूल सहाशे रुपयात दिसतो आहे, मागवायला काही हरकत नाही असे वाटते. सालं,sitting posture इतका अभ्यासाचा विषय असेल, होऊ शकतं असं वाटलं नव्हतं. धन्यवाद मिपा, तुमच्यामुळे असे बरेच विषय 'मोकळे' व्हायला मदत होते. :) -दिलीप बिरुटे (भारतीय बैठे व्यवस्थेवर विश्वास असलेला)
  • Log in or register to post comments
ग
गवि Sun, 02/16/2020 - 08:04 नवीन
"होऊन देखील, काहीतरी अजूनही आहे तिथे''
"जुदा होकेभी तू मुझमें कहीं बाकी है" हे गाणं म्हणायचंय का तुम्हाला?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/16/2020 - 08:21 नवीन
अहो, 'ती' भावना कोणती, 'ही' भावना कोणती. (कपाळावर हात मारलेली वाट्सप स्मायली) :) बाय द वे,sitting posture बद्दल विज्ञान, निसर्ग, व्यवस्था, या बद्दल आपलं काय मत आहे.? - दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गवि Sun, 02/16/2020 - 08:32 नवीन
मुळातच sit आणि shit या शब्दांत इतका बारीकसा फरक इंग्रजांनीही ठेवलाय. त्यावरून 'बसण्या'चे महत्व कळावे.
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Sun, 02/16/2020 - 20:32 नवीन
मराठी जनसमाजाला "बसण्या" चे महत्व आणि विविध अर्थ सांगायलाच नको. अगदी राष्ट्रभाषेतील "बैठने" का है क्या? पासून ते त्याचा धंदा "बसला" पर्यंत.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 02/17/2020 - 08:48 नवीन
डॉ साहेबांनी लिहिलेला प्रतिसाद अभ्यासपुर्ण वाटला.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Fri, 03/13/2020 - 10:18 नवीन
बादवे, काही ठिकाणी मी असे कमोड बघितले की ज्यावर पायांचा ठसा असतो, म्हणजे ज्याला उकिडवे बसायचे त्याला तसे बसता यावे आणि ज्याला खुर्चीवर बसल्यासारखी स्थिती हवी असेल त्याने (रिंग खाली टाकुन) तसे बसावे. तसेही लहान मुलांचे पाय जमिनी पर्यंत पोचत नसल्याने ती कमोडवर पण उकिडवीच बसतात. जाता जाता- साले आमच्या हापिसातील कही कमोड ईतके उंच आहेत की त्यावर नीट पोझिशन मध्ये बसताच येत नाही. त्यामुळे प्रथम आपल्या उंचीला योग्य कमोड शोधणे भाग पडते. बुटक्या माण्सांचे हाल तर विचारुच नका.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा