Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

कुणी स्पेस देता का रे स्पेस?

अ — अबोलघेवडा, Tue, 01/21/2020 - 05:19
(वैयक्तिक सुखांपुढे इतर सगळं तुच्छ वाटणाऱ्या जोडप्यांना समर्पित) सुखांची बिलकुल कमी नाही, मस्तच चाललंय आमचं स्पेस मात्र मिळत नाही, काय बरं आता करायचं येता जाता सिनेमे बघून, खुशालचेंडू जिणं जगतोय महिन्याकाठी पोशाखांवर भरमसाठ खर्च करतोय चंगळवादी मन झालंय, आयुष्य झालाय बाजार स्पेस मात्र मिळत नाही, दाखल करू का तक्रार? स्मार्टफोन हाती नसला की, जीव होतोय कासावीस विकत घ्यायला जातो तेव्हा, करत नाही घासाघीस ऐषारामात जगतोय आम्ही, माहीत नाही माघार स्पेस मात्र मिळत नाही, दाखल करू का तक्रार? शब्दांचा झालाय तुटवडा, सगळंच झालंय डिजिटल ईमोजींचं झालं आक्रमण, अन प्रेमही झालंय व्हर्चुअल औषधाला देखील उरले नाहीत, जिवलग झाले पसार स्पेस मात्र मिळत नाही, दाखल करू का तक्रार? मॉल मध्ये हिंडून हिंडून, आयुष्य झालंय बोथट एका क्लिकवर लोळतात सुखं, पायांशी आता झटपट चारचाकी वाहनात बसून, जगतोय आम्ही बेदरकार स्पेस मात्र मिळत नाही, दाखल करू का तक्रार? स्वयंपाकाला हल्ली असते बाई, प्रेम गेलंय चुलीत गरम पोळी आणि तूपाहूनही सरस, आमच्या सोईंचं गणित स्वतःपुरताच आनंद घेतो, इतरांचा शिवत नाही विचार स्पेस मात्र मिळत नाही, दाखल करू का तक्रार? सुखांना घालतात मुरड, हा झाला आता इतिहास बरोबर आता AC लागतो, त्याशिवाय जमतंच नाही प्रवास माझा आनंद माझा आराम, मग कुठलाही असेना का वार स्पेस मात्र मिळत नाही, दाखल करू का तक्रार? एकत्र असलं कुटुंब जरी, मनाने झालो विभक्त इतरांचा विचार करणं आता, वाटत नाही प्रशस्त पार्टी करतो मित्रांसंगे, सुखाचा करूनी एल्गार स्पेस मात्र मिळत नाही, दाखल करू का तक्रार? हाडं मोडून कामं करणं, झाली की हो जुनाट पद्धत सिझलर्स खाऊन जिमला जातो, बसायचं कशाला कुढत तरी आपण किती बिच्चारे, होतो मधूनच साक्षात्कार स्पेस मात्र मिळत नाही, दाखल करू का तक्रार?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1445 views

💬 प्रतिसाद
प
प्रकाश घाटपांडे Tue, 01/21/2020 - 06:00 नवीन
अविनाशकुलकर्णी याच्या मधे स्पेस दिली पाहिजे
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 21 hours ago
  • सुंदर !!
    1 day 21 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 21 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा