Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

फिटेल का हे ऋण माझे

ख — खिलजि, Tue, 12/31/2019 - 12:46
फिटेल का हे ऋण माझे विवंचना आत दाटली याच काळजीने मीच माझी वर जागा शोधली रोप मीच लावले बघून स्वप्न उद्याचे काय ठावं , याच जागी इथेच सुळी चढायचे रोज रोज तोच सूर्य तीच आग ओकतो रोज रोज मीच का पण ? तेच तेच भोगतो मीच जर का अन्नदाता रिक्त का रे चूल माझी ? घेतला नांगर हाती हीच का रे भूल माझी ? ऐकतो सरकारनामे अभय कर्जांना दिले फासली पाने पुन्हा ती भाव तैसेच राहिले ===================== सिद्धेश्वर विलास पाटणकर

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6832 views

💬 प्रतिसाद
द
दुर्गविहारी Tue, 12/31/2019 - 14:22 नवीन
जळजळीत वास्तव ! :-(
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 12/31/2019 - 15:57 नवीन
मीच जर का अन्नदाता रिक्त का रे चूल माझी ? घेतला नांगर हाती हीच का रे भूल माझी ? भारी
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 01/01/2020 - 04:37 नवीन
आवडली असे म्हणवत नाही. भावना पोचल्या इतकेच म्हणू शकतो. शेतकर्‍यांच्या प्रश्णांवर सगळे पोटतिडकीने बोलतात पण त्यांच्या समस्यांचे मूळापासून निराकारण करण्यात कोणालाही रस नसतो. (अगदी स्वतः शेतकर्‍याला सुध्दा) आणि याच कारणाने इतकी वर्षे होउन सुध्दा शेतकर्‍यांचे प्रश्ण सुटत नाहीत. उलट भावनिक आणि सहानुभूती देण्याच्या / मिळवण्याच्या नादात प्रकरण जास्त गुंतागूंतीचे होत चालले आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
फ
फुटूवाला Wed, 01/01/2020 - 08:54 नवीन
भावनिक आणि सहानुभूती देण्याच्या / मिळवण्याच्या नादात प्रकरण जास्त गुंतागूंतीचे होत चालले आहे.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 01/01/2020 - 15:18 नवीन
छान आहे कविता. आवडली.
  • Log in or register to post comments
स
स्वोर्डफिश Wed, 01/01/2020 - 20:23 नवीन
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 01/04/2020 - 14:00 नवीन
छान...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Teri Meri Dori... ;) - Sonali Vajpayee | Tera Mera Pyar
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 01/06/2020 - 14:08 नवीन
धन्यवाद सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे .. पैंबुकाकांशी पूर्णतः सहमत है .. पण या शीघ्र ओळी ( त्या राबणाऱ्या आणि परिस्थितीला कंटाळून वर गेलेल्या बळीराजांना मानवंदना ) डकवल्याशिवाय पर्याय नव्हता .....
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 21 hours ago
  • सुंदर !!
    1 day 21 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 21 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा