प्रसन्न
ते विस्मृत गाणे
धूसर होऊन
विरून जाते
पण नेणीवेच्या
अथांग डोही
अवचित दिसते
मग पुन्हा गीत ते
शब्दांच्याही
पल्याड नेते
अन् नकळत अश्रु
झरताना
ओठांवर येते
मग पुन्हा पुन्हा मी
घाव सोसुनी
लढत राहतो
अन् कितीही हरलो
तरी खळाळून
प्रसन्न हसतो
💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार
Fri, 12/27/2019 - 07:41
नवीन
छान लिहिली आहे, आवडली
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
स
सदस्य११
Fri, 12/27/2019 - 09:58
नवीन
आवडली कविता
- Log in or register to post comments