Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

(कपाळ)मोक्ष!! :-)

च — चलत मुसाफिर, Sun, 12/15/2019 - 06:57
सर्व व्यर्थता उमजत असते तरि चित्ताला थारा नसतो संदेशाची तिच्या प्रतीक्षा मी प्रतिचातक बनुनी करतो हस्तसंच मज गमे उपांगच क्षणिक दुरावा असह्य होतो 'अजुनी उत्तर का येईना?' प्रश्न मनाला कच्चा खातो सतरा कामांचा खोळंबा भार्या घोष ठणाणा करते तरी पालथी घागर माझी आंतरजालावर गडगडते शेवटची कधि 'दिसली' होती किती त्यावरी प्रहर लोटले मोजुन घटिका तिज गमनाच्या पंचप्राण कंठाशी रुतले अन्य पुरुष तर नसेल कोणी? भिवविति लाखो शंका हृदया 'निळ्या खुणे'ला विलंब होता चलबिचले मम अवघी काया कुठे वावगे, अधिक-उणे कधि चुकून बोलुन मी गेलो का, तपासतो ते पुनःपुन्हा मी तरी न होई निरसन शंका अखेर उगवे सूर्यासम ती हर्षवायु मज पाडी भूल कुडीत माझ्या प्राण परतती प्रेमवसंताची ये चाहुल "कुठे उलथली होतिस तू बे?" लटक्या रागे विचारतो मी "गेले होते स्मशानभूमित" पटकन येई जवाब नामी! "प्रभातसमयी फुरसत नसते भोजनसिद्धी, शाळा, बाई शंभरवेळा सांगुनही हे तुझ्या मस्तकी घुसतच नाही" पाठवतो मी हास्यआकृती ओठावरही हास्य उमलते जगात पसरे शांती, शांती मोक्षाची मज प्राप्ती होते --------- टीप: निळी खूण: व्हॉटसॕपवरची 'तुमचा संदेश वाचला गेला आहे' हे दर्शवणारी ब्लू टिक हास्यआकृती: स्माइली

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 10931 views

💬 प्रतिसाद
अ
अनन्त्_यात्री Sun, 12/15/2019 - 13:11 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Sun, 12/15/2019 - 15:43 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Mon, 12/16/2019 - 06:54 नवीन
कोणताही इंग्रजी शब्द न वापरता कायप्पाच्या संज्ञांची रचना बेमालूमपणे कवितेत करण्याचे तुमचे कसब वाखाणण्यासारखे आहे. बाकी एक शंका 'ती' कोण? :)
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Mon, 12/16/2019 - 11:18 नवीन
निखळ, निरागस कविता समजून वाचा. :-) प्रशंसेबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 12/16/2019 - 07:02 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Mon, 12/16/2019 - 11:19 नवीन
कृतज्ञ
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 12/16/2019 - 07:57 नवीन
मस्तच झालीय ... सद्यस्थितीस अनुकूल ... --^-- दंडवत स्वीकारा
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Mon, 12/16/2019 - 11:20 नवीन
पण दंडवत घालताना कपाळमोक्ष होणार नाही याची काळजी घ्या बरं का! :-)
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 12/16/2019 - 08:27 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Mon, 12/16/2019 - 11:21 नवीन
सूचक, समंजस हास्य! :-)
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Tue, 12/17/2019 - 04:35 नवीन
कविता छान. पण कवी आपल्या पत्नीशी फेस टू फेस न बोलता. व्हाट्सएपवर का बरे संवाद साधत आहे ? ते कळले नाही.
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Tue, 12/17/2019 - 05:35 नवीन
काही सूक्ष्मदृष्टी काव्यरसिक हा मुद्दा बरोबर पकडणार हे कविता प्रकाशित केल्यावर लक्षात आले. जर सुरुवातीला "संदेशाची 'तिच्या' प्रतीक्षा" असं असतं ('सतत प्रतीक्षा'ऐवजी) तर प्रश्न मिटला असता. अर्थात वाचकाला कवितेचा अर्थ तरीही समजतोच. तुमचा हा प्रतिसाद म्हणजे गंमतदार चावटपणाचे उदाहरण आहे. (स्वतःच्या!) पत्नीशी असा निर्मळ व नियमित संवाद व तसे नाते ज्यांचे असेल ते खरोखरच भाग्यवान म्हणावेत. प्रतिसादाबद्दल धन्यवाद. :-)
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Tue, 12/17/2019 - 05:52 नवीन
व्यवस्थापकाधिकार वापरून करणे जर शक्य असेल तर 'संदेशाची तिच्या प्रतीक्षा' असा बदल कराल का?
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Fri, 12/20/2019 - 16:13 नवीन
केलं हो! भारी कविता!!
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Sat, 07/08/2023 - 02:54 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Sat, 07/08/2023 - 04:25 नवीन
भारी कविता.आवडली.
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Sat, 07/08/2023 - 12:06 नवीन
वाचून अभिप्राय दिल्याबद्दल
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 07/08/2023 - 11:08 नवीन
बोरकर-कुसुमाग्रज-पाडगावकर यांची आठवण करून देणारे काव्य. हस्तसंच, निळ्या खुणा, हास्यआकृती वगैरे थोरच.
मोजुन घटिका तिज गमनाच्या
यातल्या 'तिज' चा 'तिला' असा अर्थ जास्त प्रचलित आहे. 'तिच्या ' असाही अर्थ आहे का? हा जरा संभ्रम आहे. कृपया खुलासा करावा. 'बाष्कळरसा'तली कविता खूपच आवडली. मन हे विटाळ अखंड चंचळ । न राहे चपळ एके ठायीं ॥ परि देखता निळ्या खुणा । लाहिजे तत्त्वता ब्रह्मसुख ॥
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Sat, 07/08/2023 - 12:04 नवीन
आम्ही हौशी कवी आहोत. व्याकरण चुकू शकते कविता गोड मानून घेतल्याबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 21 hours ago
  • सुंदर !!
    1 day 21 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 21 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा