(सूरनळीचे उपयोग)
एका कोपर्यात अंग फुगवून बसली होती सूरनळी
टोकावरल्या डोळ्यांनी मला पाहत होती ||
माझ्याशी बोलायला लागली ती जेव्हा
खरे नाही वाटले मला तेव्हा
तुम्हालाही माहित आहे ही आहे थापेची गोळी ||
"
अनेक गोष्टीं मधे उपयोग माझे जळी स्थ्ळी
तरी तुम्ही का बोलतात घालून घे रे सूरनळी
हेअर पीन ने कान कोराल तर त्याने सूजेल कानाची पळी ||
पूर्वी आदेशांना होता मोठा बाजार भाव
साहेबांच्या मागे धावायचे सगळे रंक आणि राव
आता मात्र न्याय आहे बळी तो कान पिळी ||
कधीही मी कामी येई सुटता कानी खाज
कोणत्याही कागदाचा तुकडा शोधा सोडून लाज
मोठ्या निगुतीने मग त्याची गुंडाळी वळी ||
उपयोग संपल्यावर तुम्ही मला कचर्यात टाकता
चोळामोळा करता आणि कुठेही भिरकावता
क्षणार्धात माझा उपयोग तुम्ही विसरुन जाता
मी मात्र तुडवली जाते कोणाच्याही पायदळी ||
कानात फिरवा बघा कशी झोप उडते
नाकात फिरवलेत तर फटाफट शिंक येते
नाक मोकळे होताच चेहर्याला येईल झळाळी ||
इतक्यात घाईने गुरुजी आले वर्गात
काय कचरा केला आहे? ओरडले मला जोरात
त्यांच्या ओरडण्याची मी केली मग सुरनळी
आणि विचारले घालू का ती योग्य स्थळी ||
पैजारबुवा,
💬 प्रतिसाद
य
यशोधरा
Mon, 12/09/2019 - 05:25
नवीन
=))
- Log in or register to post comments
क
कंजूस
Mon, 12/09/2019 - 05:32
नवीन
इंदुरी ट्याग कशाला तो सुरनळीला?
- Log in or register to post comments
ज
जॉनविक्क
Mon, 12/09/2019 - 09:06
नवीन
कहर!
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Mon, 12/09/2019 - 10:12
नवीन
पैजारबुवा, मूळ कविता झाकून ठेवली तर लग्नाच्या बाजारात हिलाच जास्त मागणी असेल.
एकदम झकास!!!
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Mon, 12/09/2019 - 12:00
नवीन
पाभे क्षमा करा पेरणा लिवायची राहिली.
कच्चा माल उत्तम प्रतिचा असेल तरच उत्तम दर्जाचे विडंबनारिष्ट बनवता येते.
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
ख
खिलजि
गुरुवार, 12/12/2019 - 10:21
नवीन
काल वाचायचं राहूनच गेलं .. झक्कास झालंय ,, फक्कड
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 12/14/2019 - 11:08
नवीन
आवडलं. ..
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
Mon, 12/16/2019 - 07:10
नवीन
:):)
- Log in or register to post comments