हैद्राबाद बलात्कार आणि पोलीस इनकॉउंटर
हैद्राबाद बलात्कार आणि पोलीस इनकॉउंटर
डॉ. प्रियांका रेड्डी या एका भगिनींवर पाशवी बलात्कार झाला नंतर स्वाभाविक आणि नेहेमी प्रमाणे जनमाणसातून त्या चार नराधमांना भर चौकात फाशी ते अजून बाकी देशातील बलात्कार प्रकरणातील शिक्षेचे दाखले देत त्यांना कठोर शिक्षा (खरे तर मरण) द्यावी हि सगळ्या भारतीयांची अपेक्षा ते हि लवकरात लवकर हि अपेक्ष होती कारण दिल्ली तील निर्भया बलात्कार आरोपी आजपर्यंत कोर्ट कचेरी त्यांचा जगण्याचा अधिकार आदी कारणांनी जिवंत आहे त्यात त्या निर्भयाची आई कोर्ट कचेरीत अजूनही तिला न्याय मिळावा म्हणून कोर्टात फेऱ्या मारत आहे.
त्यात आज पोलीस कोठडी संपत असताना सादर चारही आरोपी पहाटे तीन वाजता जिथे पाशवी बलात्कार करून निर्घृण हत्या केली गेली त्या ठिकाणी आरोपीना घेऊन गेले असता त्यांचा एन्काऊंटर करण्यात आला स्वाभाविक सर्वसामन्य जनतेने याचे स्वागत केले इतके कि सादर घटना स्थळी पोलिसावर फुलवर्षाव व फटके फोडून स्वागत केले गेले पण नेहमीप्रमाणी श्रीमती मनेका गांधी, अरविंद केजरीवाल आदिनीं सादर इनकॉउंटर विरोधात आवाज उठवत आरोप चालू केले आहेत माझे म्हणणे इतकेच आहे कि हे दुष्कर्म त्या चौघांनी केले असणारच इतकी खात्री आल्याशिवाय त्यांना यमसदनी पोलीस पाठवनार नाहीत खरे तर झाले तर खूप अभिनंदनीय आहे ...... हॅट्स ऑफ हेंद्राबाद पोलीस .
🗣 चर्चा
(161)
आ
आनन्दा
Fri, 12/06/2019 - 08:12
नवीन
मला एकंदरीतच हा एन्काऊंटर प्रकार फारसा आवडलेला नाही.
वेळ मिळाला तर सविस्तर लिहीन.
बघू
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 12/07/2019 - 17:19
नवीन
मलाही अशा प्रकारे पहाटे तीन वाजता आरोपिंना नेऊन ते पळून जात होते असे म्हणून त्यांना ठोकणे आवडलं नाही
हैदराबादेतील त्या डॉक्टर युवतीशी आरोपीनी जे कृत्य केलं ते माणुसकीला काळीमा फासणारे होते, अतिशय वेदनादायक ती घटना होती, चीड़ आनणारे असेच होते. समस्त भारतीयांच्या मनात आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी असे वाटत होते. काही देशांमधे अशा घटनांचे आरोपी निश्चित झाल्यावर, आरोपींना जाहीर गोळ्या घातल्या जातात किंवा अन्य क्रूर शिक्षा दिली जाते तशीच शिक्षा याही प्रकरणात द्यावी असे अनेकांना वाटत होते. आज तसेच घडले आहे.
अर्थात आता या विषयी न्यायिक चौकशी होईल, व्हायला पाहिजे. पोलिसांच्या कार्यवाहीवर प्रश्न उठतील. उठले पाहिजे. न्यायव्यवस्थेवर असलेल्या देशात असे घडावे का ? हे अतिशय वाईट आहे. आज अनेकांना चांगले वाटले असेल आरोपींना ठोकले म्हणून. पण पोलिसांनी येत्या काळात जर काही हिशेब पूर्ण करायचे म्हणून कोना निरपराधला ठोकलं तर मग पोलिसांच्या नावाने बोंब मारू नका.
आपल्याकडे न्यायपालिका आहे,एक व्यवस्था आहे तिचा आदर झाला पाहिजे, काही बदल आवश्यक आहेत, पण पोलिसांच्या कृत्याचं मी समर्थन करणार नाही. न्यायपालिकेत निवाङा होऊन त्यांना फाशीचा निकाल मला बघायला आवडला असता.
विलंब करणारी न्यायव्यवस्था आणि आजची पोलिसांची भूमिका भविष्यात मोठे वाद करणार हे निश्चित.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 12/06/2019 - 08:46
नवीन
मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली पाहिजे.
कुणी तक्रार करो ना करो.
मी पाचवीत असतांना, सार्वजनिक गणेशोत्सवात मिळालेला पुरस्कार , डब्यात चेंडू टाका, ह्या स्पर्धेत, परत करायच्या विचारात आहे.
पण 2 गोष्टी अडल्या आहेत.
1. पुरस्कार कुठे परत करायचा?
2. नक्की मला पुरस्कार म्हणून काय मिळाले होते ते आठवत नाही. बहुतेक "शामची आई" असेल. त्याकाळी हीच प्रथा होती.
- Log in or register to post comments
ह
हस्तर
Fri, 12/06/2019 - 09:43
नवीन
मी पाचवीत असतांना, सार्वजनिक गणेशोत्सवात मिळालेला पुरस्कार , डब्यात चेंडू टाका, ह्या स्पर्धेत, परत करायच्या विचारात आहे.
???
- Log in or register to post comments
ज
जॉनविक्क
Sat, 12/07/2019 - 15:08
नवीन
दया माझ्याकडेच बिनधास्त ;)
- Log in or register to post comments
स
सालदार
Fri, 12/06/2019 - 09:11
नवीन
जर खरच ते चौघे पळून जाते होते आणि स्वरक्षणासाठी पोलिसांनी गोळ्या चालवल्या असतील तर ठिक आहे.....
पण जसं सगळ्यांना वाटतय तसा जर हा इंस्टंट न्याय असेल तर अशा एनकाऊंटरच समर्थन होऊ शकत नाही. अशा एनकाऊंटर चं समर्थन हे आपली न्यायव्यवस्था कमकुवत असल्याचं समर्थन आहे. न्यायालयाने दिलेली फाशीची/ जन्मठेपेची शिक्षा हा न्याय आहे. एनकाऊंटर करुन न्याय देण्याची वेळ आपल्या देशावर येऊ नये हिच अपेक्षा. पोलिसांना मदतच करायची होती तर तपास जलद गतीने करुन योग्य ते पुरावे न्यायालयासमोर सादर करायला पाहिजे होते.
- Log in or register to post comments
स
स्वधर्म
Fri, 12/06/2019 - 09:26
नवीन
हा प्रकार सरळ वाटत नाही. पोलिस बंदोबस्तात नेलेले आरोपी, फार तर पळून जाण्याचा प्रयत्न करतील, पण ते पोलिसांच्या जीवाला कसला धोका निर्माण करू शकतील असे वाटत नाही. तसेच पहाटे चार वाजताची वेळही संशयास्पद आहे. खरोखर न्यायसंस्थेला आपल्या गतीबाबत तातडीने काहीतरी केले पाहिजे.
- Log in or register to post comments
उ
उपेक्षित
Fri, 12/06/2019 - 09:40
नवीन
स्वधर्म आणि सालदार यांच्याशी सहमत,
त्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे याबाबत दुमत नाहीच पण तात्पुरत्या उन्मादातून सगळीकडे जर हा प्रकार रूढ झाला तर मात्र अवघड होऊन बसेल. (या वरून गंगाजल चित्रपट आठवला)
- Log in or register to post comments
ह
हस्तर
Fri, 12/06/2019 - 09:44
नवीन
खाकी
- Log in or register to post comments
अ
अधर्म
Fri, 12/06/2019 - 21:59
नवीन
हे बाकी खर आहे. तो वसुली बाहेरून ऍसिड आणून (आख दिखाता हे मा...... असं काहीस म्हणून ) घालतो डोळ्यात....
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Fri, 12/06/2019 - 09:43
नवीन
पोलीस सांगतच आहेत ना, की आरोपी पळून जात होते म्हणून. पोलीस खरे सांगतच नाहीयेत असे का मानायचे?
निर्भया, उनाव, आसाराम, सेनगर, कठुआ - न्यायालयीन प्रक्रिया सुरू होऊन ह्यातील कोणत्या पीडिता महिला, मुलींना न्याय मिळाला? निर्भया मेली, तिचे आई वडील रोज मानसिक मरणे मरत असतील, आरोपी जगताहेत ना? अजून काही प्रकरणे इतक्यातच वर्तमानपत्रातून आली होती. अशी कृत्ये करणाऱयांना कायद्याची भीती राहिलेलीच नाहीये, हा मूळ मुद्दा आहे. आधी अशी व्यवस्था पैदा करा की अशा घटनाच घडणार नाही आणि मग theoretical - असं व्हायला हवं आणि तसं व्हायला हवं, आरोपीचे हक्क वगैरे गप्पा मारा. ( जनरल लिहीत आहे, तुम्हांला उद्देशून नव्हे)
जबरदस्त जरब, वचक बसवायची गरज आहे.
- Log in or register to post comments
ह
हस्तर
Fri, 12/06/2019 - 09:47
नवीन
आरोप सिद्ध होने महत्वचे
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Fri, 12/06/2019 - 10:14
नवीन
नाही कोण म्हणतंय? पण पळून जाण्यात यशस्वी झाले असते तर पोलिसांना त्याही बाजूने बोल लावला असतात ना?
- Log in or register to post comments
ज
जॉनविक्क
Fri, 12/06/2019 - 11:03
नवीन
आणी दहशतवादी सोडून अन्य कोणीही पोलिसांच्या तावडीतून पळून जात असता सगळे च्या सगळे फक्त मारलेच जाण्याची किती विदा उपलब्ध आहे ?
बाकी जे बेकायेशीररित्या मारले म्हणून आरडाओरड करत आहेत त्यांची गरज असे आरोपी मारण्या इतकीच महत्त्वपूर्ण असल्याने त्याचा विरोधही चूकच
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Sat, 12/07/2019 - 15:57
नवीन
>>>>>>>पोलिसांना मदतच करायची होती तर तपास जलद गतीने करुन योग्य ते पुरावे न्यायालयासमोर सादर करायला पाहिजे होते. <<<<<<<<<
न्यायालयावर डोळे बंद करुन विश्वास ठेवावा ईतकी लायकी भारतीय न्यायालय व्यवस्थेची नाही आहे. लोअर कोर्टापासुन सुप्रिम कोर्टा पर्यंतच्या न्यायाधीशांनी कबुल केलेल आहे की सोशल मिडीयाचा खुप दबाव त्यांच्यावर असतो.
हल्लीच पाहाण्यात आलेल्या एका केस मध्ये पोलिसानी आपले काम चोख बजावत लहान मुलींना शिकार बनवणार्या आरोपीला पकडले व त्यावर वाँटर टाईट केस बनवली. एका शेतमजुर असलेल्या लहान मुलीचा बलात्कार करुन खुन केलेला होता त्याने. पण कोर्टाला आरौपीवर दया आली. मग काय आरोपी बेल वर सुटला आणी मोकाट सुटलेल्या ह्या आरोपीने तिन अजुन जीव घेतले. आता कोर्ट मान्य करणार नाही की कोर्टाकडुन चुक झालेली आहे. ना कोणी कोर्टाला जाब विचारायची हिंम्मत करेल!
म प्र मध्ये २०१७ मध्ये एक ९ वर्षाची मुलगी बेपत्ता होते. शाळेतुन घरी येणारी मुलगी शाळेकडुन विलासपुरला जाणारी २.०० ची दुपारची बस चुकली म्हणुन चालत निघते पण घरी पोहोचत नाही. पोलिस चौकशी अंती फाईल बंद होते. २०१८ वर्षाखेर व २०१९ मार्चला अजुन दोन लहान मुली तश्याच नाहीश्या होतात. आता मात्र पोलिस कसुन तपासणी करतात. त्यांना सापडतो एक गुन्हेगार ज्याने २०१७ लाच एका दुसर्या गावातल्या शेत कामगार लहान मुलीला बलात्कार करुन ठार मारलेल होत. गुन्हा दाखल झालेला पण कोर्टानेच बेल दिली. बेल दिल्यावर ह्या आरोपीने अजुन तिन मुलींचा बलात्कार करुन निघ्रुण खुन केला !!
- Log in or register to post comments
स
सालदार
Tue, 12/10/2019 - 09:23
नवीन
न्यायालयाच्या लायकिबद्दल तुमच्याशी १००% सहमत आहे. पण आधीची न्यायव्यवस्था एवढी गचाळ असताना आणखी एक समांतर न्यायव्यवस्था आपण बनविण्यास प्रोत्साहन तर देत नाही आहोत हे तपासणे गरजेचे आहे. पोलिसांच्या हातात न्यायाचे कोलित देणे खुप महागात पडेल असे वाटते.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 12/10/2019 - 10:12
नवीन
न्यायव्यवस्था एवढी गचाळ असताना आणखी एक समांतर न्यायव्यवस्था आपण बनविण्यास प्रोत्साहन तर देत नाही आहोत हे तपासणे गरजेचे आहे. पोलिसांच्या हातात न्यायाचे कोलित देणे खुप महागात पडेल असे वाटते
सहमत.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ग
गवि
Fri, 12/06/2019 - 10:14
नवीन
अपरात्री तिथे ते का गेले? याला एक उत्तर ऐकलं ते असं की क्राईम सीन रि-क्रिएट करताना टाईमलाईनही पाळतात. म्हणजे त्या त्या वेळी त्या त्या ठिकाणी घेऊन जाणे आणि मूळ गुन्हा कसा घडला ते दृश्य समजून घेणे. यामागे बहुधा दिवसाच्या / रात्रीच्या ज्या वेळी गुन्हा घडला त्या वेळची त्या ठिकाणी असलेली स्थिती (अंधार, प्रकाश, गर्दी इ) याचा अंदाज यावा म्हणून असू शकेल.
प्रतिहल्ला केला तरच गोळ्या घालणे हे तत्व पाळल्यास ते नुसते (इजा न करता) पळून गेले असते तर कसं थांबवता आलं असतं? ते तसे पळून गेलेले योग्य ठरलं असतं का? तेव्हा लोकांनी पोलिसांवर टीका जास्तच तीव्र केली असती.
अर्थातच यातून एन्काऊंटर ही एक स्टँडर्ड प्रोसेस म्हणून योग्य ठरत नाहीच.
फक्त काही मुद्दे (त्यांनी हल्ला केला असता तरच गोळ्या घालणे, आणि मध्यरात्रीच तिकडे का गेले इतक्यापुरता मर्यादित मुद्दा)
- Log in or register to post comments
म
मित्रहो
Fri, 12/06/2019 - 19:09
नवीन
पोलीस ठाण्याबाहेर सतत इतकी गर्दी होती कि त्यांना दुपारी बाहेर आणणे शक्यच नव्हते.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 12/07/2019 - 17:28
नवीन
एन्काऊंटर ही एक स्टँडर्ड प्रोसेस म्हणून योग्य ठरत नाहीच.
सहमत.विषयच संपला.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ज
जॉनविक्क
Fri, 12/06/2019 - 10:25
नवीन
म्हणून हो. मारले गेले, मस्तच झाले, मारणे योग्य होते की न्हवते ते न्यायालय ठरवेल तत्पूर्वीच त्यांना दोषी अथवा निर्दोष ठरवणे घटनाबाह्य ठरते.
- Log in or register to post comments
श
शा वि कु
Sun, 12/08/2019 - 16:27
नवीन
+1
- Log in or register to post comments
श
शा वि कु
Sun, 12/08/2019 - 16:38
नवीन
+1
- Log in or register to post comments
श
श्वेता२४
Fri, 12/06/2019 - 10:46
नवीन
लोकांना इतका विचार करायची सवय लागलीय की, जी पिडीत आहे तीच्या हक्कांची किती सहज पायमल्ली झाली आहे तिच्याबरोबर च्या कुटुंबियांच्या सामान्य जीवनाची पायमल्ली झाली आहे, याचा कुणीच का विचार करत नाही. केवळ व्यवस्थेत असे काही करणे बसत नाही म्हणून ज्या पद्धतीने पिडीतेला न्याय मिळालेला आहे त्यावर आक्षेप घेणार्यांना मुळात ही व्यवस्था व मिळणारी शिक्षा हीच अपूर्ण व सदोष वाटत नाही का? ज्या पद्धतीने सामान्य माणसांकडून आज या एन्काऊंटरला समर्थन मिळतेय ते पाहून तरी डोळे बंद केलेल्या न्याय व्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजन पडावे. ती पिडीता नराधमांचे पाशवी अत्याचार सहन करत गुदमरून मेली. अस्तित्वात असलेल्या न्यायाप्रमाणे याही आरोपींना फाशी मिळाली असतीही. पण पिडीतेला कणाकणाने मरताना झालेल्या यातनांची भरपाई खटक्यात मिळणार्या फाशी ने कशी भरुन निघणार? दिल्लीच्या निर्भयाला तर अजुनही न्याय मिळालेला नाही. शिवाय एक आरोपी तर कमी वयाचा फायदा घेऊन सुटला ही.असली तकलादू न्याय व्यवस्था आहे. माझे तर एन्काऊंटरनेही समाधान झालेले नाही. फटक्यात मेले सगळे. बलात्कार प्रकरणात न्याय व्यवस्था ही पिडीतेच्या बाजूने काही आश्वासक पाऊल उचलू शकली तर भविष्यात पोलिसही असली पावले उचलणार नाहीत. तसंही आत्ता पोलिसांनी मुद्दाम केलंय की नाही माहित नाही पण जरी केलं असेल तरी मी म्हणेन भले शाब्बास!
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 12/06/2019 - 12:00
नवीन
सहमत आहे.
- Log in or register to post comments
व
विनोदपुनेकर
Fri, 12/06/2019 - 12:47
नवीन
सहमत
- Log in or register to post comments
M
mrcoolguynice
Fri, 12/06/2019 - 11:59
नवीन
हा जर डोमेस्टिक सर्जिकल स्ट्राईक मानला ....
तर ह्याचे श्रेय हायद्राबाद पोलिसांना की मुख्यमंत्री केसीआर ला ?
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 12/06/2019 - 12:02
नवीन
काळ्या रंगाच्या कोंबडीने दिले आहे की रंगीबेरंगी कोंबडीने?
हे विचारत बसू नये. ...
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 12/06/2019 - 12:02
नवीन
काळ्या रंगाच्या कोंबडीने दिले आहे की रंगीबेरंगी कोंबडीने?
हे विचारत बसू नये. ...
- Log in or register to post comments
M
mrcoolguynice
Fri, 12/06/2019 - 13:05
नवीन
नै ओ, ५६ इंची छाती बडवणारी जमात व त्याचे चाहते,
त्यांच्या पक्षाच्या मु मं च्या राज्यात असं काही झालं असतं, तर
गजर गाड्याचा करत असते..
- Log in or register to post comments
व
विनोदपुनेकर
Fri, 12/06/2019 - 13:12
नवीन
पोलिसांना राजकीय पाठबळ असल्याशिवाय इतक्या हाय प्रोफिल केस चे आरोपी असे इनकॉउंटर करणे खरेच शक्य आहे ?
- Log in or register to post comments
M
mrcoolguynice
Fri, 12/06/2019 - 14:14
नवीन
मग् उत्तर प्रदेशातील उंनाव घटने नंतर,
तिथले मुख्यमंत्री काय धोरण घेतील ?
तिथले पोलीस दल सध्या, हाताच्या पंज्याची , (तर्जनी व मधल्या बोटांची नलकांडी) पिस्तुल करून , तोंडाने
धांय धांय, आवाज काढून एन्काऊंट करत आहेत (प्रत्यक्ष शस्त्रे दारुगोळा नसल्याने)
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 12/06/2019 - 13:30
नवीन
आमच्या ओळखीच्या "चंपाबाई" पण असाच द्वेष करायच्या.
मोदी इथेच राहिल्या पण चंपाबाईला मात्र नारळ मिळाला.
- Log in or register to post comments
M
mrcoolguynice
Fri, 12/06/2019 - 14:05
नवीन
त्या सध्या कोथरूडच्या लोकप्रतिनिधी आहेत.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 12/06/2019 - 15:01
नवीन
आमच्या मिपावरील "चंपाबाई" उद्दाम, सचिन, पोटे ह्यांच्या बरोबर लावता झाल्या.
- Log in or register to post comments
M
mrcoolguynice
Fri, 12/06/2019 - 15:36
नवीन
नाही हो आजीबाई, मला अजिबात दुःख झाले नाही व त्या मतदार संघात माझे मतदान नाही.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 12/06/2019 - 16:58
नवीन
ताकाला जाऊन भांडे लपवायची, तुमच्या सारखीच चंपाबाईला पण खोड होतीच.
आणि त्या पण तुमच्या सारख्याच आमच्या वर खूप प्रेम करायच्या. गेल्या बिचार्या.....
अर्थात मोदी द्वेष तुमच्या इतका अंगात भिनला असेल, असे वाटले नव्हते. तब्येतीची जरा काळजी घ्या.
बायदवे, उद्दाम सचिन पोटे, कधी भेटले तर आमचा नमस्कार नक्की सांगा.
- Log in or register to post comments
M
mrcoolguynice
Fri, 12/06/2019 - 18:30
नवीन
मुविआजीबाई, औषधे घेत जा वेळच्यावेळी.
तुझा स्किझोफ्रेनिया कंट्रोलमध्ये राहील मग.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 12/06/2019 - 18:41
नवीन
करण्याचा, तुमचा हातखंडा आहे.
बादवे, उद्दाम सचिन पोटे, कुठे गेले?
- Log in or register to post comments
M
mrcoolguynice
Sat, 12/07/2019 - 02:30
नवीन
ते तुम्हाला माहिती आजी.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 12/07/2019 - 17:36
नवीन
मुख्यमंत्र्याचं कौतुक होऊन त्यांचे सीट्स भविष्यात वाढतील असे वाटते. नाय झालं तर झाल्या घटनेचा फायदा काही झाला नाही असे म्हणावे लागेल. किमान अजुन काही ठोकठाक व्हायला पाहिजे असे वाटते.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Fri, 12/06/2019 - 12:37
नवीन
Ok..
प्रश्न ते लोक मेल्याचा नाही, प्रश्न मानावाधिकारांचा पण नाही. ते लोक तसेही मरणारच होते, आज नाही तर दोन वर्षांनी. पण आजच त्यांना मरावं लागेल असे काय त्यांना माहीत होतं हा प्रश्न आहे.
साधारण सोशल मीडिया वरती प्रतिक्रिया पहिल्या तर हे सहज समजेल की ती एन्काऊंटर फेक होती याबद्दल समर्थन करणाऱ्या एकाच्याही मनात शंका नाही.
प्रश्न हा आहे की आपण केवळ ते मेले, त्यांना शिक्षा मिळाली म्हणून आनंद व्यक्त करून शांत बसायचे का?
ती गोरक्षक होती वगैरे खूप पुढचे मुद्दे आहेत, ती गोरक्षक होती हे ऐकायच्या खूप अगोदर, जेव्हा मी ही बातमी ऐकली तेव्हाच यात काहीतरी काळेबेरे आहे याबद्दल माझ्या मनात खात्री होती. का?
१. पोलीस रोज असे अनेक गुन्हे बघतात, त्यामुळे त्यांनी राग येऊन असे कृत्य केले असे होणे अशक्य आहे.
२. अन्य कोणत्याही बाबींपेक्षा पोलीस आपल्या नोकरीची अधिक काळजी करतो, जनता जनार्दन सेवा वगैरे नंतर, पहिली नोकरी, बढती वगैरे, म्हणजेच इथे, ज्या वेळेस सगळ्या जगाला ही फेक एन्काऊंटर आहे हे कळणारे, तिथे पोलीस असा हात घालणे अशक्य.
३. याचाच अर्थ असा होतो की कोणीतरी वरच्या माणसाने दबाव / प्रोत्साहन देऊन जबाबदारी घेण्याची हमी दिल्याशिवाय हे कृत्य होणार नाही.
आता प्रश्न असा आहे, की हा वरचा माणूस कोण असेल, आणि त्याने हे पाऊल का उचलले असेल?
हे दोन प्रश्न मला सकाळपासून छळतायत. मानवाधिकार वगैरे गेले चुलीत, पण या प्रकरणात या लोकांचा बळी देऊन कोणाला वाचवायचा तर प्रयत्न होत नाहीये ना?
ती गोरक्षक होती का हे मला माहीत नाही, असेल तर कदाचित या प्रकाराला धार्मिक रंग असू शकतो. प्रत्यक्ष गृहामंत्र्याने या प्रकारची पाठराखण करणे हे या सगळ्या प्रकरणाची गुंतागुंत वाढवणारे आहे.
- Log in or register to post comments
ज
जॉनविक्क
Fri, 12/06/2019 - 13:46
नवीन
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 12/06/2019 - 13:54
नवीन
तुमच्या घरच्या व्यक्ती बाबत असा प्रसंग घडला असता तर?
(माझ्या मनात पण तुम्ही म्हणता तसे प्रश्न येऊन गेले. पण मी तुम्हाला विचारला, तोच प्रश्न स्वतःला विचारला. ...उत्तर वेगळे आले....झालं ते उत्तमच झाले. ..कारण एक संदेश असा पण गेला आहे की, जास्त सुरसुरी आली तर निकाल वेगळा पण लागू शकतो. )
- Log in or register to post comments
ज
जॉनविक्क
Fri, 12/06/2019 - 13:56
नवीन
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Fri, 12/06/2019 - 14:02
नवीन
मी तिथे असतो तर मीही भावनावश होऊन तसाच विचार केला असता. मी कुठे त्यांना दोष देतोय?
पण मी तिथे नाहीये, आणि त्यामुळे मी भावना बाजूला ठेवून विचार करू शकतोय. प्रियंकाच्या खऱ्या गुन्हेगाराला अजून शिक्षा झालेली नाही असे माझे मत आहे.
यावर तुम्हाला काय म्हणायचे आहे?
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 12/06/2019 - 14:50
नवीन
आणि जोपर्यंत माणूस, ह्या पृथ्वीवर आहे, तोपर्यंत ह्या घटना होतच राहणार.
त्यामुळे, ह्या घटना सतत घडू नयेत, इतपत तरी काळजी घेतली पाहिजेच.
पण पुचाट कायदे ...हो ह्या बाबतीत कायदे पुचाटच आहेत...आणि आमच्या घरात नाही ना घडलेले, ही निष्क्रिय सामाजिक मानसिकता, अशा घटनांना कळत नकळत, प्रोत्साहनच देत असते.
इथे प्रश्न फक्त त्या एका "स्त्री" पुरता मर्यादित नाही.
आपण माणूस म्हणून जगण्यासाठी नालायक आहोत, हेच आपण परत परत सिद्ध करत आहोत.
किंबहुना गुन्हेगार लोकांना पण "स्त्रिया बद्दल" आदर असतो. तितका पण आपला पांढरपेशा समाज देत नाही.
त्यामुळे ह्या घटना टाळायच्या असतील तर एकच उपाय आहे, कठोर कायदे आणि त्वरित कारवाई.
(विषय गुन्हेगारी बद्दल निघालाच आहे तर, तुरूंगात ह्या गुन्हेगारांना, चमडी-वाले, कस्पटासमान वागणूक मिळते....कृपया माहितीचा स्रोत विचारू नये. मला माझा जीव प्यारा आहे.)
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Fri, 12/06/2019 - 15:38
नवीन
यात माझा मूळ मुद्दा येतच नाही.
प्रियंकाचा खरा गुन्हेगार अजून मोकाट आहे, असे माझे म्हणणे आहे, आणि तोपर्यंत या सेलिब्रेशनला काहीही अर्थ नाही.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 12/06/2019 - 16:49
नवीन
खरा गुन्हेगार कोण आहे?
- Log in or register to post comments
ज
जॉनविक्क
Sat, 12/07/2019 - 17:43
नवीन
4 पैकी 3 मायनर असल्याने त्यांची नावे उघड करता येत न्हवती परिणामी त्यांची जी नावे प मिडी यात दिली गेली ती काल्पनिक होती म्हणून ते तसे म्हणत असावेत
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »