Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

मेळघाट ...

ग — गणेशा, Wed, 11/27/2019 - 08:11
कुठे ललाटी, निष्प्रभ आभाळ रे.. पोटाच्या खळगीची, ही आबाळ रे.. तुमचे सूर्य तारे, तुमचेच मळे हिरवे गार रे,.. आटलेल्या पाण्यातला, आम्ही गाळ रे.. काळ्या जमीनीवर फक्त तुमचाच मान रे पाण्याविना आमचे रान सारे खडकाळ रे भविष्यात नसलेले माझे हे गाव रे भुकेले बालपण आमचे तू सांभाळ रे .. क्रुर नियतीचा नशिबी खोल वार रे मरण लिहिलेला माझा हा भाळ रे - -शब्दमेघ ... मेळघाट डायरी २७/११/२०१९ (खुप वर्षांनी काव्य विभागात पुन्हा या शिघ्र कवितेतुन)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4309 views

💬 प्रतिसाद
म
मुक्त विहारि Wed, 11/27/2019 - 08:41 नवीन
तुम्ही खूप मनापासून लिहिलं आहे. पण.... खूप मनाला लावून घेऊ नका.
  • Log in or register to post comments
म
मनिष Wed, 11/27/2019 - 08:43 नवीन
कवितेत पुनःप्रवेशाच्या शुभेच्छा.
क्रुर नियतीचा नशिबी खोल वार रे मरण लिहिलेला माझा हा भाळ रे
प्रत्ययाकारीपणे अंगावर येतंय रे.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Wed, 11/27/2019 - 11:51 नवीन
"" आटलेल्या पाण्यातला, आम्ही गाळ रे.. "" इथे थोडं काहीतरी भारदस्त हवं होत असं वाटतंय .. जसं कि "" आटलेल्या पाण्यातला, आमच्यासाठी गाळ रे.."' किंवा काहीतरी वेगळं .. पण एकंदरीत हेलावून टाकणारी झालीय .. मस्त
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 11/27/2019 - 18:32 नवीन
तुम्ही जास्त करेक्ट लिहिले आहे ... आमच्यासाठी गाळ रे भारी एकदम
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Wed, 11/27/2019 - 21:11 नवीन
तुझ्या सारखे मिपाकर दिसतात म्हणूनच माणुसकीवर थोडाफार विश्वास उरला आहे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 11/28/2019 - 04:15 नवीन
मेळघाटातील बहुतांश आदिवासी पाड्यांचे आता बाहेरील भागात विस्थापन झालेले आहे त्यामुळे त्यांच्यातील कुपोषणाचे प्रमाण नक्कीच काहीअंशी कमी झालेले आहे आता.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 11/30/2019 - 10:37 नवीन
आवडली कविता, चांङली लिहीली आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Sat, 11/30/2019 - 11:50 नवीन
क्रुर नियतीचा नशिबी खोल वार रे मरण लिहिलेला माझा हा भाळ रे :(
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 22 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 23 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 23 hours ago
  • सुंदर !!
    1 day 23 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 23 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा