Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

लवकर रिटायरमेंट साठी किती पैसे लागतील?

क
कोहंसोहं१०
गुरुवार, 11/07/2019 - 21:08
🗣 73 प्रतिसाद
माझा एक IT मधला मित्र आहे. वय वर्षे ४५. पुण्यामध्ये नामांकित ITकंपनी मध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे. परंतु नोकरीमधील अनिश्चितता, कामाचा ताण, कामातून आधी मिळत असलेला परंतु हळूहळू कमी होत गेलेला रस या सर्व कारणांमुळे वेळेआधीच निवृत्तीचा विचार करतोय. योग्य वेळी IT मध्ये योग्य ठिकाणी असल्यामुळे बऱ्यापैकी माया जमवली आहे. onsite आणि नोकरीमधील बढती वेळेवर मिळत गेल्यामुळे आर्थिक स्थिती चांगली आहे. त्याची पत्नी देखील साधारण तेवढ्याच वयाची आहे. गृहिणी आहे. दुर्दैवाने मूलबाळ नाही. आई वडील आहेत परंतु खर्चासाठी याच्यावर अवलंबून नाहीत आणि म्हातारे असले तरी पुढेही सधन असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या त्याच्यावर अवलंबून नसतील असे त्याचे म्हणणे आहे. पुण्यात स्वतःचे loan free घर आहे. हा व याची पत्नी अगदी frugal नसले तरी गरजेइतकाच पैसा खर्च करतात व त्यात समाधानी आहेत. दोघांना सध्यातरी कोणताही आजार नाही. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा महिन्याचा सर्व खर्च पकडून सध्या २०-२५००० इतका होतो. तो सध्या लवकरच (२-३ वर्षात) रिटायरमेंटचा प्लॅन करतोय. रिटायरमेंट नंतर आर्थिक कारणासाठी पार्ट टाइम काम करण्याचा विचार नाही. पूर्ण वेळ छंदासाठी देणायचा त्याचा मानस आहे. आई वडील हयात असेपर्यन्त पुण्यातच राहण्याचा प्लॅन आहे. त्याची आणि पत्नीची जीवनशैली गेल्या अनेक वर्षांपासून साधी आहे आणि ती तशीच राहील किंबहुना रिटायरमेंट नंतर अजूनहि फ्रुगल होईल. ४८ व्या वर्षी रिटायर झाल्यास सध्याची जीवनशैली, वाढलेले आयुर्मान पाहता रिटायरमेंट घेण्याआधी किती पैसे लागतील असे आपल्याला वाटते? एक विनंती: कृपया नोकरी बदल, पार्ट टाइम नोकरी यावर चर्चा नको. मी त्यावर २ तास वाद घातला पण पट्ठ्याने रिटायरमेंट चे नक्की केले आहे या निष्कर्षाप्रत आलो. त्याने हा विचार २-३ वर्षे आधी सुरु केला आणि तो अजूनही ठाम आहे. त्यामुळे चर्चा उरलेले सध्याच्या जीवनशैलीप्रमाणे जगायला आयुष्य जगायला किती पैसे लागतील यावरच मर्यादित राहिल्यास उत्तम.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 39824 views

🗣 चर्चा (73)
स
सोत्रि Fri, 11/08/2019 - 02:49 नवीन
पैसा हे साद्ध्य नसून साधन आहे. रिटायरमेंट म्हणजे काय? आणि त्यानंतर उरलेलं आयुष्य काय कारणार? हे प्रश्न किती पैसा लागेल ह्यापेक्षा महत्वाचे आहेत. नोकरीमधील अनिश्चितता, कामाचा ताण, कामातून आधी मिळत असलेला परंतु हळूहळू कमी होत गेलेला रस ह्या कारणांमुळे नोकरीतून किंवा एकंदरीत कॉर्पोरेट क्षेत्रातून बाहेर पडायचे हा निर्णय वैयक्तिक असला तरीही त्याचा अर्थ रिटायरमेंट नाही. पूर्ण वेळ छंदासाठी देणायचा त्याचा मानस आहे ह्यात काँक्रीट प्लान दिसत नाही. नोकरी सोडून दिल्या दिवसापासूनचा प्रत्येक दिवस, पुढची २५+ वर्ष, कसा व्यतीत करणार याचा विचार करून काँक्रीट प्लान तयार केलेला नसेल तर 'किती पैसा लागेल' हा प्रश्न अमूर्त (abstract) ठरतो असं माझं वैयक्तिक मत आहे.
सध्याच्या जीवनशैलीप्रमाणे जगायला आयुष्य जगायला
हे फारच व्यक्तिसापेक्ष आहे. तसंही सध्याची जीवनशैली इथून पुढे ३-५ वर्षांनंतर तशीच असेल ह्याचं भाकित कोणी करू शकत नाही. त्यामुळे आता ठरवलेली 'क्ष' रक्कम शाश्वत असू शकत नाही. - (२०२५ ला कॉर्पोरेट क्षेत्रातून बाहेर पडायचा निर्णय घेतलेला ) सोकाजी
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Fri, 11/08/2019 - 02:57 नवीन
रेफरंससाठी हा व्हिडीयो बघावा ! https://www.youtube.com/watch?v=KLINZRYIquE&list=PLvCceGF1d_IDoM7Kz4mt8s7WwyFZLvcvD&index=3&t=6s डिस्क्लेमर: हा व्हिडीयो बनविनार्या माणसाशी आणि त्याच्या कंपनीशी माझा दूरान्वयेही संबंध नाही. ह्या व्हिडीयोच्या रेफरंसचा उद्देश फक्त माहिती शेयर करणे हाच आहे यात कसलेही रेकमंडेशन नाही. - (आर्थिक प्लॅनर) सोकाजी
  • Log in or register to post comments
क
कोहंसोहं१० Fri, 11/08/2019 - 04:23 नवीन
एकदम सिम्पल प्लॅन कसा करावा यासाठी पाहायला म्हणून चांगला आहे परंतु NIFTY CAGR 17% आवाक्याबाहेरचा वाटतोय. उतारवयातील जास्तीचे खर्च जसे की मेडिकल वगैरे पण पकडले नाहीत. एक रेफरन्स विडिओ पहिला त्यात रक्कम खूपच जास्त वाटते https://www.youtube.com/watch?v=8nzt-L3L5Ik कदाचित दोन्हीचा सुवर्णमध्य हा चांगला पर्याय असू शकतो.
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Fri, 11/08/2019 - 04:53 नवीन
डिसक्लेमर ह्यासाठीच टाकला होता! :) - (सिंम्पल प्लॅनर) सोकाजी
  • Log in or register to post comments
आ
आदेश007 Fri, 11/08/2019 - 06:32 नवीन
सोकाजिंशी पूर्णपणे सहमत. आधी कुटुंबासाठी स्वतःचा आरोग्य विमा लगेचच काढावा. रिटायर होईपर्यंत प्री existing decease exception मुदत निघून जाईल. पुण्यात रहात असल्यामुळे किमान १५ लाखांचा विमा घ्यावा. फॅमिली फ्लोटर प्लॅन मिळतो. आजचा खर्च महिना २५,००० असेल तर साधारण दीड कोटी रुपयांचा निधी पुरेसा होईल असे वाटते. त्यातील काही पैसे ते शेअर बाजारात गुंतवू शकतात जेणे करुन चलन वाढीचा परिणाम फारसा होणार नाही. बाकी निधी स्टेट बँक किंवा मोठ्या खासगी बँकेत मुदत ठेवी च्या स्वरूपात ठेवू शकतात. सर्वात महत्त्वाचे की रिटायर होईपर्यंत पुढच्या दोन वर्षात भावी गुंतवणुकीबाबत तज्ञांची सल्ला आणि मदत घेऊ शकता.
  • Log in or register to post comments
प
पिंट्याराव Fri, 11/08/2019 - 06:59 नवीन
तू नळीवर financial planning money bee असे शोधल्यास शिवानी दाणी यांचा एक उत्कृष्ट व्हिडिओ उपलब्ध आहे या विषयावरचा. मला लिंक शेअरता येत नाहीय... क्षमस्व. nifty cagr 17% खूप जास्त वाटतो.
  • Log in or register to post comments
प
पिंट्याराव Fri, 11/08/2019 - 06:59 नवीन
तू नळीवर financial planning money bee असे शोधल्यास शिवानी दाणी यांचा एक उत्कृष्ट व्हिडिओ उपलब्ध आहे या विषयावरचा. मला लिंक शेअरता येत नाहीय... क्षमस्व. nifty cagr 17% खूप जास्त वाटतो.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 11/08/2019 - 09:33 नवीन
मी ५० व्या वर्षी निवृत्त झालो व आय टी वगरे मध्ये काही नव्हतो . २००३ साली ९२०० र वर निवृत्त झालो. प्रत्येकाच्या जीवन जगण्याच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. निवृत्तीनंतर एका रात्रीत छंदाचे इंजेक्शन घेता येत नाही. त्यासाठी जन्माला येतानाचा छंदाचे संचित आणावे लागते. आरोग्य , स्वातंत्र्य व सत्ता ही संपतीची तीन रूपे आहेत. तुम्ही म्हणाला यात पैसा कुठे आला ? तो सत्ता या रूपातील एक भाग आहे. सत्ता पैसा व प्रेम यांच्या मिलाफाने मिळते. ८० टकके काम पैशाने होतेच होते पण २० टक्के काम केवळ प्रेमानेच होते. हे सगळे लक्षात घेता. आताच स्वतः: चा खाजगी आरोग्य विमा काढा ( मी तो न काढण्याची चूक केली आहे ) . म्हातारापणी दवाखाना वगळता सर्व खर्च कमी होत जातात . नव्हे कमी करायचेच असतात . असा सर्व विचार केला तर तुमच्या मित्राला महिना २५००० पेंशन वा व्याज मिळेल अशी किमान सोय हवी.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Fri, 11/08/2019 - 15:34 नवीन
वयक्तिक गरजा जीवनशैली याचा मेळ घालावा लागेल. पुढील आकडे मोठ्या शहरांसाठी 2020 साठी उचभ्रु असाल विषय मिटला अत्युच्च मध्यमवर्गीय किमान 2 कोटी उच्च मध्यमवर्गीय किमान 75 लाख मध्यमवर्गीय 50 लाख कनिष्ठ मध्यमवर्गीय 20 लाख
  • Log in or register to post comments
क
कोहंसोहं१० Fri, 11/08/2019 - 16:04 नवीन
सध्याचा खर्च महिना २०-२५००० आहे पुण्यात त्यांचा. मध्यमवर्गीयच म्हणले पाहिजेत. ८५ वर्षे जीवनमान धरून चालले तरी रिटायरमेंट नंतर ४० वर्षे काढायची आहेत दोघांना. कितीही स्वस्थ जगायचे ठरवले तरी ६०-६ नंतर तब्येतीच्या कुरबुरी सुरु होतात. सध्या मेडिकल इन्फ्लेशन खूपच जास्त आहे. उतारवयात होणारा मेडिकल चा खर्च, इन्शुरन्स चे एकतर वाढलेले हफ्ते किंवा मेडिकल खर्चाचे रिपेमेंट देण्यात करण्यात येणारी कुचराई हे सर्व पाहता ५०-७५ लाख पुण्यामध्ये पुरतील का (जरी सेविंग इन्व्हेस्ट केले तरी) हा मोठा प्रश्न आहे. यामागे काही गणित असेल तर जरूर सांगावे.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sat, 11/09/2019 - 00:30 नवीन
दर्जेदार निवास व्यवस्था, सुखद राहणीमान , सेवेला तत्पर आसा विनम्र स्टाफ(मेडिकल इमर्जन्सीसाठी अत्यावश्यक), समवयस्क लोकं आणी जेवणखाणपासून सर्व आयते, 70+नंतर हा पर्याय आपल्या मित्रासाठी उत्तम वाटतो सध्या पर हेड 15,000 ते चार्ज करतात आता तुम्हीच गणित करा ते किती वाढतील. पैसे साठवून कोणी रिटायर होत नाही योग्य ती गुंतवणूक करून ते महागाई नूसार वाढायची व्यवस्था करावीच लागेल यावर अर्थतज्ञच जास्त व्यवस्थित मार्गदर्शन करतील सुरू मिपाकर सुबोध खरे यांनी करावी अशी विंनती.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 11/09/2019 - 05:04 नवीन
माझ्या सारख्या १ % ज्ञान वाल्याकडून तुमच्या भलत्याच अपॆक्षा आहेत. मुळात मी हात पाय चालत आहेत तोवर काम करत राहणार आहे.असे मी बऱ्याच ठिकाणी जाहीरही केलेले आहे. तेंव्हा माझ्या शब्दकोशात "निवृत्ती" नाहीच. कशाला हात दाखवून अवलक्षण करताय? त्यापेक्षा महिना ८-१० % देणाऱ्या तज्ज्ञांचाच सल्ला चांगला असेल.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sat, 11/09/2019 - 17:55 नवीन
ज्यांना व्हायचे आहे त्यांना आपल्या अनुभव व मानसिकतेचा लाभ व्हावा म्हणून सुरुवातीचा खो तुम्हाला दिला आहे, आता तुम्ही खो कोणाला द्यायचा ते तुम्ही ठरवा...
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 11/09/2019 - 05:29 नवीन
पूर्वी मी असे वाचलेले आठवतेय की ज्यांना मूल नाही वा ज्यांची मुले त्यांना विचारीत नाहीत अशा नी बँकेत रिव्हर्स मॉर्टगेज चा करार करावा . मूल नसणे हे दुर्दैव आहे का यावर वाद होऊ शकतो पण मुले होऊन त्यांना आपली तशी गरज नसल्याने ती परकेपणाने वागतात हे उद्विग्न करणारे दुर्दैव नक्कीच असते. अशावेळी आपली स्थिती " कुणा ना माहीत सजा किती ते " अशी असते.( आपण किती जगू व कसे ? माझी आई म्हणायची "माणसाच्या मृत्यूदिनाला पुण्यातिथी का म्हणतात ? तर तो मरतो कसा पटदिशी वा सडून कुजून ? आयुष्याचे सारे पूण्य तिथे कामाला येते ! असो ) म्हणून आपली संपत्ती बँकेशी करार करून गहाण ठेवायची व पेन्शन सारखी रकम दर महिन्याला मिळवायची असा काहीसा तो प्रकार आहे ! त्याचीही चौकशी करा ! आपण गेल्यावर पूर्ण संपत्ती बँकेला मिळाली तरी त्याचा विषाद वाटायला आपण असतोच कुठे ?
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 11/15/2019 - 08:44 नवीन
मूल नसणे हे दुर्दैव आहे का यावर वाद ...
या पार्शभुमीवर ही माहिती द्यावीशी वाटते. आता तर "अपत्यमुक्त भारत" ही नवी चळवळ मुळ धरत आहे. त्यासाठी चाईल्डफ्री इंडिया ही संस्था कार्यरत झालीय. अपत्य प्रजनन यामुळे वैयक्तिक, सामाजिक नुकसान होते. हे टाळण्यासाठी संस्थेने प्रचार सुरु केला आहे. https://www.facebook.com/Childfree-Pune-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-111347046876902/
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 11/09/2019 - 05:52 नवीन
तुम्ही कोणत्या आर्थिक स्तरावरून निवृत्ती घेताय ह्या वर उर्वरित आयुष्य जगण्यासाठी किती पैसे लागतील हे अवलंबून आहे. जीवनशैली माणसाला बदलताना खूप त्रास होतो(उच्य आर्थिक गटातील जीवनशैली त्याच्या खालच्या स्तरावर जावून जगता येत नाही). आणि सर्वांना ते जमत नाही. त्या मध्ये पहिली भीती आपले स्नेही,मित्र मंडळी,शेजारी ह्यांच्या शी असलेली सुप्त स्पर्धा. साधे जीवन जगण्यासाठी महिना 20000 दोन माणसांसाठी खूप झाले . ही रक्कम व्यक्ती सापेक्ष,जीवनशैली सापेक्ष आहे . आणि हे निवृत्ती घेताना प्लॅन करून चालत नाही तर 10 ते15 वर्ष अगोदर पासून शिस्तबध्द पने गुंतवणूक किंवा बचत करून साध्य करता येते
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sat, 11/09/2019 - 18:00 नवीन
त्यांच्या पश्चात त्यांची संपत्ती माझ्या रिटायरमेंटसाठी देतील का ? तसा मी सध्याच रिटायर्ड आयुष्य जगतो आहे पण अधुन मधून कामात यायची हुक्की येत असते पण एकंदर अनुभव हेच सांगतो की कमवा किंव्हा साठवा तुम्ही व्यवसाय करत नसाल तर पैशाची चणचण तुम्हाला जाणवत राहतेच.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sun, 11/10/2019 - 03:02 नवीन
"व्यवसाय करत नसाल तर चणचण जाणवणारच" १००% सहमत ! महागाई वाढतच राहणार आणि साठवलेले रुपये काही वाढत नाहीत. आजचे १ करोड दहा वर्षांनंतर तितकेच राहणार. वस्तूंचे भाव दुप्पट होणार आणि व्याजदर कमी होणार. तेव्हा हलकासा का होईना, व्यवसाय करत राहिले तरच राहणीमान टिकू शकेल. निदान हातपाय चालताहेत तोवर तरी.
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Sun, 11/10/2019 - 05:08 नवीन
आजचे १ करोड दहा वर्षांनंतर तितकेच राहणार.
जर बँकेत किंवा तिजोरीत ठेवले तर. ते जर व्यवस्थित आणि योग्य इंस्ट्रुमेंटस मध्ये गुंतवले तर १० वर्षांत दुप्पटही होऊ शकतात. (इव्हेस्टर) सोकाजी
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 11/11/2019 - 04:57 नवीन
Well, जेव्हा त्या रकमेवर व्याज घेत नसू तेव्हा ते वाढतील. रिटायरमेंट नंतर त्यातून काहीतरी रक्कम लागणारच ना.
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Mon, 11/11/2019 - 11:50 नवीन
अगदीच तसं नाही. योग्य गुंतवणूक केल्यास व्याज घेउनपण पैसे वाढू शकतात. - (गुंतवणूकदार) सोकाजी
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 11/13/2019 - 05:04 नवीन
आजचे १ करोड दहा वर्षांनंतर तितकेच राहणार हे मान्य आहे. परंतु आज आपल्याला १ कोटीचे कमीत कमी ६% प्रमाणे ( म्हणजे आज व्याज दर ८ % आहे पण त्यातून २०% कर कपात धरली तर ६.४ % आहे ते पुढील २-३ वर्षात होणारी महागाई धरून ६% धरत आहे) महिना रुपये ५०,०००/- व्याज येईल. जर आपला मासिक खर्च ३०, ०००/ - असेल तर दर महा रुपये २०,०००/ - ची बचत होईल हि जर आपण पुनर्गुंतवणूक केली तर पाच वर्षात आपली अतिरिक्त गुंतवणूक (एक कोटी ला हात न लागता) १४ लाख २९ हजार १९७ होईल. पहा:- https://www.myloancare.in/recurring-deposit/rd-calculator/sbi या तर्हेने जर आपला खर्च महिना ३०,००० असेल तर येणाऱ्या बऱ्यापैकी कालावधी पर्यंत आपल्याला तोशीस न लागता किंवा जीवनशैली न बदलता आपलयाला सुखाने जगता येईल. हे त्रैराशिक ढोबळ मानाने मांडले आहे.( तत्व लक्षात घ्या) कोणि अर्थतज्ञ् याबद्दल आपल्याला नक्की सांगू शकेल. काही वेळेस स्थावर मालमत्तेत केलेली गुंतवणूक अशा वेळेस कमी येते. उदा. आपण एखादी व्यवसायिक जागा विकत घेतली असेल आणि ती भाड्याने देत असाल तर तिचे भाडे पण महागाईच्या प्रमाणात वाढत जाते. आणि त्यामुळे काही अंशी तरी आपल्याला लागणाऱ्या महागाईचा झळा कमी होतात. दुर्दैवाने आजार आणि मृत्यू केंव्हा येईल याचे नक्की भाकीत कुणीच करू शकत नाही. तेंव्हा आपल्याला पैसे पुरतीलच असे कोणी छातीठोकपणे सांगू शकत नाही .
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 11/13/2019 - 06:45 नवीन
वरवर पाहता हा ठोकताळा उपयोगी वाटतो. पण यामध्ये आकस्मिक खर्च धरलेले नाहीत. उदा. आजारपणातील खर्च, मालमत्तेवरील कर, घर व मालमत्ता यांचा दुरुस्ती मेंटेनन्स इ. खर्च, जे या प्लॅनला मोठं भगदाड पाडू शकतात. तसेच आज महिना ३००००/- मध्ये चांगल्या तर्हेने जगू शकू पण पाच वर्षांनी दरवाढ झाल्यानंतर याच स्टॅंडर्ड ने नाही राहता येणार. २०१५ ला दूध ३५रु. लीटर होते. आज ते ५० रु. लीटर आहे. बसभाडे ज्या अंतराला २५/- रु. होते ते आता सुमारे ४० रु झाले आहे. साधारण रिटायरमेंट पूर्वी पाच वर्षे आधी फर्निचर बनवले/ घेतले असेल तर वीसेक वर्षांत ते मोडकळीस येते. आजकालचे फर्निचर हो, जुने सागवानी नव्हे. आजकालची घरे साधारण २० वर्षात भरपूर दुरुस्ती कामास येतात. फ्लॅटसाठी सोसायटी मेंटेनन्स सुमारे महिना ३०००/- असतो. प्लस कामवाली बाई चे पगार इ. काय म्हणता मग ?
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 11/13/2019 - 06:47 नवीन
पाच वर्षांपूर्वी कपडे भांडी फरशी इ. साठी बाईला १५००/- रु. द्यावे लागत होते. इज ते २५००/- च्या जवळपास आहेत.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 11/13/2019 - 07:13 नवीन
मी कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी लिहिलेले आहे कि साधारण मध्यमवर्गीय कुटुंबाला घराचे कर्ज नसेल तर १० ग्राम सोन्याच्या भावात सहजपणे राहता येते. आणि त्यात वर्षात एकदा भारत सहल किंवा घरची उपकरणे दुरुस्ती किंवा काही कालावधी नंतर नवी घेणे हेही गृहीत आहे. फर्निचर इ चा भांडवली खर्च तुम्ही जर निवृत्तीच्या अगोदर केला नसेल तर तुम्ही निवृत्त होऊ नये. बाकी १९८० पासून अन्नपदार्थांची महागाई हि सरासरी २ % पेक्षा जास्त वाढलेली नाही. आपण निवृत्त झालात कि रोजचा प्रवास खर्च कमी होतो त्याबरोबर बाहेर खाण्याचा खर्च हि कमी होतो. अनेक गरजेच्या गोष्टी ज्या चैनीच्या झालेल्या असतात त्यांची गरज भासेनाशी होते. उदा दर वर्ष दोन वर्षांनी फोन बदलण्याची गरज राहत नाही. ऑफिसातील पार्ट्या इ चा खर्च कमी होतो. माणुस घरातच असला तर मोलकर्णीवरचा खर्च कमी होतो. उदा घरात वॉशिंग मशीन असले कि धुण्यासाठी( खरं तर कपडे वाळत घालण्यासाठी) बाईची गरज लागत नाही. डिश वोंशर असेल तर भांडी घासण्यासाठी बाईची गरज लागत नाही. आपल्या इज्जती साठी नको इतका आहेर लग्नात करावा लागत नाही. संचित ठेव संपत आली तरी शेवटी आपल्या घराचे रिव्हर्स मॉर्टगेज हा उपाय तर असतोच. अशी मते दोन्ही तर्हेने मांडता येतीलच आणि कितीही वेळ त्याचे दोन्ही बाजूनी समर्थन करता येईल. आजार आणि मृत्यू हे अटळ आहेत.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानव Wed, 11/13/2019 - 07:39 नवीन
मी कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी लिहिलेले आहे कि साधारण मध्यमवर्गीय कुटुंबाला घराचे कर्ज नसेल तर १० ग्राम सोन्याच्या भावात सहजपणे राहता येते.
हे अगदी खरे आहे. तरुणपण खूप महाग असते. कारण लग्न(ह्या छोट्या सापळ्यातून सुटका नाही.) ,मुले, त्यांचे शिक्षण (हा एक मोठा सापळा असतो), स्वतःचे घर, समाजातील आर्थिक प्रतिष्ठा वगैरे चौकट सांभाळूनच जगण्याचे आपल्यावर झालेले संस्कार आपलेच तरुणपण महाग करून ठेवतात. त्यामानाने म्हातारपण स्वस्त असते. इथे मेडिकलचा खर्च हा मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाबरोबर तुलना करता यावी इतका असू किंवा इतपत जाऊ शकतो. हेल्थ नीट ठेवण्यासाठी डॉक्टर्स सल्ला देतीलच. जर हेल्थ नीट राहिली तर मेडिकलचा खर्च तुरळक होऊ शकतो पण शून्य नक्कीच नाही. तेव्हा निवृत्तीपूर्वी वेल्थपेक्षा जास्त लक्ष हेल्थ कडे असावे असे वाटते. तरुणपणात आर्थिक सल्लागार लुटून नेतात आणि म्हातारपणी डॉक्टर्स दोन्हीला जबाबदार आपणच असल्याने दोन्हीचे प्लानिंग करण्यासाठी हेल्थ आणि वेल्थप्लानिंगचे जुजबी ज्ञान असणे गरजेचे आहे. सोन्याचा भाव आणि आपले बजेट जुळवण्याची सवय असेल तर निवृत्तीनंतर म्हातारपणी इतर खर्च कमी होत असल्याने सोन्याच्या चालू भावापेक्षा ७०% भावातच तुमचे खर्च निघू शकतात. आता हे खर्च भागवण्यासाठी लागणाऱ्या उत्पन्नाचे कोणते स्त्रोत आहेत ह्याची माहिती काढणे. (हे कष्ट घेणे अपरिहार्य आहे. ) आणि पूर्ण पासिव्ह इन्कमवर (तीही सोन्याच्या भावानुरूप) जगण्यासाठी खूपच मोठी रक्कम गुन्तवलेली असावी लागेल. २०४० साली तो भाव १ लाख रुपये तोळा (दहा ग्रामच जुना १२ ग्राम नव्हे ) असणार आहे असे म्हणतात. हे सगळे विचारात घेऊन म्हातारपण प्लान करावे. (शक्यतो आपला जोडीदार म्हातारा / म्हातारीपण कमावणारी असेल तर उत्तम.) जाताजाता पोटच्या सोन्यावर अवलंबून राहावे कि बाजारातल्या सोन्यावर ह्याचा विचार जे ४५ वर्षे वयाचे आहेत त्यांनी आत्ताच केलेला बरा.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sat, 11/09/2019 - 21:23 नवीन
माबो वर लै काथ्या कुटलाय म्हणे !! नॉर्मल जगायला 10 कोटी लागतात, थोडं लक्झरी जगायला 100 कोटी ! मिळवण्याची कॅपसिटी किती आहे तेवढे मिळवावे .
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 11/10/2019 - 06:09 नवीन
निवृत्ती नंतर साठवलेल्या पैस्यावर जगताना . काही नी असे मत मांडले आहे की महागाई वाढेल आणि पैसे वाढणार नाहीत. महागाई वाढली तरी पैशाची कीमंत स्थिर च राहते . वार्षिक 4% दराने व्याज मिळत च जाईल . आणि महागाई चा दर सुद्धा सरासरी तोच असेल. इथे एक फॅक्टर शास्वत आहे तो म्हणजे मृत्यु. 80 वर्ष हेच वय जास्तीतजास्त वय असू शकते. त्या पुढे जीवन असणारच नाही. फक्त 30 वर्षा साठी नियोजन करायचेआहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 11/11/2019 - 07:01 नवीन
८० व्या वर्षी आपण शारीरिक रित्या स्वस्थ पण निष्कांचन झाल्यामुळे परावलंबी झालात तर त्यासारखी दुर्दैवी स्थिती नाही. ८० वर्षानंतर आयुष्य नाही हे म्हणणे मुळापासूनच चूक आहे. परवाच निकाल दिलेल्या अयोध्या खटल्यातील "रामलल्ला विराजमान" या देवाचे मुख्य अधिवक्ता श्री के पराशरन हे

९२

वर्षाचे आहेत त्यांना भारतीय कायदेतज्ज्ञ परिषदेचे (बार) पितामह म्हणतात आणि त्यांनी हा खटला श्री रामलल्ला विराजमान यांच्यासाठी जिंकून दिला आहे. https://www.business-standard.com/article/pti-stories/k-parasaran-pitamaha-of-india-bar-emerges-hero-in-ayodhya-land-dispute-case-119110901468_1.html एक डॉक्टर म्हणून मी पाहत आलेल्या अनेक गोष्टी/ प्रश्न इ आता येथे मांडत आहे. वय वाढत जाते तसा वैद्यकीय उपचारांचा खर्च वाढत जातो. माझा एक सिद्धांत आहे. सरासरी वयाच्या ४४ वर्षांपर्यंत जेवढे उपचार माणसाला लागतात तेवढेच उपचार पुढच्या २२ वर्षात लागतात( म्हणजे ६६ पर्यंत) आणि तेवढेच उपचार पुढच्या ११ वर्षात म्हणजे ७७ व्या वर्षापर्यंत आणि तेवढेच उपचार पुढच्या साडे पाच वर्षात म्हणजे ८३ व्या वर्षापर्यंत आणि पुढे. पहिल्या ४४ वर्षात जेवढा खर्च येतो त्यापेक्षा २२ वर्षात जास्त ( सरासरी दीड पट) खर्च येतो कारण होणारी महागाई आणि असेच पुढे चालते. त्यातून माणसे जास्त जगली तर त्यांना दुर्धर आजार होण्याची शक्यता वाढते. मी घरचेच उदाहरण देत आहे. माझ्या आईला थायरॉईड ग्रंथीचा कर्करोग वयाच्या ७८ व्या वर्षी झाला. कारण ती ७८ वर्षे जगली. आज तिच्या उपचारांसाठी आम्ही ११ लाख रुपये खर्च केले ते सुद्धा टाटा सारख्या निमसरकारी रुग्णालयात (अर्थात हे पैसे आम्हाला परवडत होते म्हणून) आम्ही कोणत्याही तर्हेची "मदत" जी उपलब्ध असून ( आणि आमचे "संबंध"/contacts असून) घेतली नाही. पण देवदयेने ती पूर्ण बरी झाली आहे. यदाकदाचित तिला उद्या केमोथेरपी लागली तर त्याचा खर्च महिना १०,०००/- रुपये आहे. हे पैसे तिच्या निवृत्तिवेतनातुन ती देऊ शकेल. पण अशी सगळीच औषधे भारतात बनत नाहीत आणि हा खर्च महिना लाखात जाऊ शकतो. पूर्वी माणसे इतकी जगत नसत. त्यामुळे असे दुर्धर आजार व्हायच्या आत माणसे परमेश्वर चरणी विलीन होत असत आणि त्यामुळे त्यासाठी होणार खर्च हा मर्यादित होता. आता तुम्ही जास्त जगलात तर असे होणारे दुर्धर आजार जास्त असणार आहेत आणि त्यासाठी होणारा खर्च फार मोठा असू शकतो. एका माणसाने मला याचे उत्तर दिले कि "मला असा आजार झाला तर मी त्यासाठी पैसे खर्च करणार नाही" स्वच्छपणे सांगेन कि मला असे उपचार नकोत. मी त्यांना विचारले कि साहेब असा आजार "तुमच्या पत्नीस" झाला तर तुम्ही त्या "गेल्या" तरी चालतील मी "पैसे खर्च करणार नाही" असे म्हणू शकाल का? यावर त्या माणसाकडे सध्या तरी उत्तर नव्हते. असे अनेक अनुत्तरित प्रश्न माझ्यासमोर येत असतात ज्याची उत्तरे मला माहिती नाहीत आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर प्रत्येक माणसासाठी वेगळे असू शकेल. "आजार आणि मृत्यू" हे कुणाच्याही हातात नाही हे चिरंतन सत्य आहे. त्यामुळे मी २५- ३० वर्षे काम करेन आणि मग निवृत्त होईन आणि संचित पुंजीवर आयुष्य काढेन हा मार्ग सर्वाना पटेल/ परवडेल असे नाही.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 11/11/2019 - 10:04 नवीन
लवकर रिटायरमेंट .. हा शब्दच मुळी जीवनातून काढून टाकला तर तुम्ही कधीही म्हातारे होणार नाहीत आणि जरी झालात तरी काहीही फरक पडणार नाही .. आपल्याला जर लवकर कामातून मुक्त व्हायचे आहे तर मला असे वाटते कि आपल्याला काही जबाबदारीच नको .. आणि असेही लवकर कामातून मुक्त होऊन तुम्ही काय करणार ? जर फिरायचे असेल तर मनसोक्त मौजमजा करायची असेल तर हाताशी नक्की किती पैसे असावे याचे गणित कुणालाही जमणार नाही .. ती योजना आणि त्यामुळे केलेली साठवणूक कधीही तोंडघशी पडू शकते .. त्यामुळे हा लवकरात लवकर मोकळे व्हायचा प्लॅन डोक्यातून काढून टाका आणि काम करत असतानाच कशी मनसोक्त मजा करता येईल याचा विचार करा .. जर काम करताना कुणाचे दडपण जाणवत असेल तर दुसरीकडे नोकरी करा पण रिटायरमेंट म्हणजे पूर्णविराम .. तुम्ही आतापर्यंत कमावलेले कौशल्य जर देशाच्या विकासासाठी कमला येणार नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही .. राहता राहिला पैश्याचा विषय ,, तर ते विष आहे , जेव्हढे जास्त तेवढे अंगात भिनणार .. त्यापेक्षा जे हाती आहे त्याचा कसा उत्तम विनियोग करता येईल याचा विचार करा .. मार्केटात मी लाखाचे बारा झालेला माणूस है . त्यामुळे मी तिथून कमवा असे बिलकुल सांगणार नाही पण जे काही कमवाल त्यातील थोडी मदत गरजूनही करा म्हणजे आपल्या पुढील वाटचालीस योग्य दिशा मिळेल आणि डोक्यात असे विचार येणार नाहीत .. तुम्हाला एक युक्ती सांगतो , ती करून बघा .. नाही म्हणजे मी अजूनही कधी कधी करतो पण मला बघून ते सर्व म्हातारे थोडे कावरेबावरे होतात , पण तुमच्या इथे असेल तिथे नक्कीच करा .. एखादा वरिष्ठ ( रिटायर्ड झालेल्या ) नागरिकांचा हास्य क्लब हुडकून काढा .. जवळच असेल तर सोनेपे सुहागा .. माझ्या जवळच होता आणि अजूनही है .. वरळी सीफेसला .. तिथे बरोबर त्यांच्या टायमाला पोचायचं आणि नुसतं बघत राहायचं .. काहीबी करायचं नाही .. हि रिटायर्ड टाळकी , अशी काही धम्माल उडवतात कि काही विच्चारूच नका .. बिन तिकिटाचा हाऊसफुल्ल शो .. एकदम सुप्परडुप्पर हिट .. इथे तुम्हाला तुमचे उत्तर मिळेल .. प्रत्येकाच्या तोंडावर बारा वाजलेले असतात , तरीही बिच्चारे जीव मेटाकुटीला आणून हसण्याचा प्रयत्न करत असतात .. त्यांना आणि त्यांच्या त्या थोबाडांना अबघून माझी तर हस्सून हस्सून मुरकुंडीच वळते . इतके कि मला भानच राहायचं नाही .. घरून फोन आला कि मग मी घाईगडबडीत निघायचो पण तिथून निघायचं काही मन व्हायचं नाही .. आता त्यांनी सर्वजण त्यांनाच हसत असतात म्हणौन थोडी कम्पाउंडची उंची वाढवलंय पण हरकत नाही , मी मागच्या महिन्यातच आत जाऊन हा शो बघितला .. काहीजण अस्वस्थ झाले होते , मला बॉक्स ऑफिसमध्ये बघून पण मी हसत हसत तिथून पळ काढला .. हे करून बघा आणि मगच रिटायर्ड व्हा ...
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Mon, 11/11/2019 - 12:29 नवीन
ऐसेच मंगता जीनेकु...
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Mon, 11/11/2019 - 12:00 नवीन
एक हास्यक्लबात हसे त्याला दुजा हसू पाहे | एक दिनी तोही त्या हास्यक्लबात पुढे जात आहे || - (समर्थ) सोकाजी
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 11/14/2019 - 08:19 नवीन
एकदम बरोबर. बर्‍याच जणांना "जाते , दाणे , सुप...... " ही म्हण माहीत नसते .
  • Log in or register to post comments
P
palambar Tue, 11/12/2019 - 18:02 नवीन
मेडी क्लेम पंधरा लाख खूप कमी आहे. औषधे, चोवीस तास नर्स हा खर्च ही लक्षात घ्यायला हवा.
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Wed, 11/13/2019 - 07:53 नवीन
नॉर्मल जगायला 10 कोटी लागतात.... ????? अ‍ॅबनोर्मलच मरणार मी !!
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Wed, 11/13/2019 - 07:53 नवीन
मी कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी लिहिलेले आहे कि साधारण मध्यमवर्गीय कुटुंबाला घराचे कर्ज नसेल तर १० ग्राम सोन्याच्या भावात सहजपणे राहता येते.
साधारण मध्यवर्गीय 58 च्या आधी निवृत्तही होत नाही तेंव्हा हा विचार तूर्त नकोच. सध्या फोकस फक्त असाधारण गोष्टीकडे असुदे.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Wed, 11/13/2019 - 14:34 नवीन
त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा महिन्याचा सर्व खर्च पकडून सध्या २०-२५००० इतका होतो
त्यात वार्षिक महागाई ३-४% (फारतर ५%) धरुन पुढचे ३० वर्षाचा हिशेब लावता येईल. तसेच जमा राशी, त्यावर मिळणारे व्याज , पी एफ, इतर मिळकती या सगळ्याचा हिशेब लावणं कठीण नाहीच. तुमचे मित्र आय टी मध्ये आहे म्हणता तर हे साधे हिशेब एक्सेल वा ईतर काही खास अ‍ॅप्लिकेशन वापरुन गणिते मांडणे नक्कीच कठीण नाही. आणि या जोडप्याला मुल बाळ नाही व राहणीमान तसे साधेच आहे म्हणजे जमा राशी बरीच मोठी असेल नक्कीच (एक कोटी पेक्षा तरी जास्तच असावी)
आई वडील हयात असेपर्यन्त पुण्यातच राहण्याचा प्लॅन आहे
म्हणजे नंतर पुण्याबाहेर जाण्याची तयारी आहे असे दिसते. बहूधा पुण्यापेक्षा एखाद्या लहानशा /स्वस्त राहणीमानाच्या शहरात जाण्याचा विचार असावा असे दिसतेय. हा अतिशय उत्तम विचार आहे. त्यावेळी पुण्यातील घराची किंमत - नवीन ठिकाणचे घराची किंमत हा फरकही मोठा फायद्याचा ठरु शकतो. तसेच आईवडीलांच्या संपत्तीचा वारशाने मिळणारा वाटा पण विचारात घेता येईल. खेरीज म्हातारपणी नवीन घर विकत घेण्याऐवजी भाड्याच्या घरात राहण्याचा पर्याय विचारात घेता येईल. त्यामुळे मोठी स्थावर गुंतवणूक टाळून ते पैसे नियमित परतावा देणार्‍या गुंतवणूकीत टाकता येईल. याचे इतर फायदे म्हणजे इच्छा होईल त्याप्रमाणे घर बदलता येईल. एखाद्या ठिकाणाचा / गावाचा/ शहराचा कंटाळा आला किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी रहावेसे वाटले तर ते स्वप्न पुर्ण करता येईल. घर घेणे वा खासकरुन जुने घर विकत घेणे यात काही जोखीमही असते जसे फसवले जाण्याची शक्यता वा बाजारभाव माहीत नसल्यास खूप जास्त किंंमत मोजणे.. किंवा काही कारणामुळे ते ठिकाण अजिबात राहणेयोग्य न वाटणे - या स्थितीत घर भाड्याचे असेल तर सहजपणे तेथून निघता येईल्ल याउलट स्वतःच्या घरात माणूस अडकला जातो, त्याला योग्य किंमत देणारा ग्राहक मिळेपर्यंत ते विकताही येत नाही वा तेथे राहताही येत नाही. असो. तर सांगायचा मुद्दा हा की पुण्यातले घर विकून आपली निवासाबाबतची स्वप्ने (भाड्याने) पुर्ण करायची. मला सांगा आपल्यापैकी अनेकांना एखाद्या सुंदर स्थळी (उदा: महाबळेश्वर वा कोकण) गेल्यावर अनेकदा वाटले असेल ना की "इथेच घर असायला हवे"किंवा कुठे एखादा मस्त मोठा बंगला पाहिल्यावर वाटले असेल की "माझा पण असा मस्त बंगला असावा" पण अशी स्वप्नातील मालमत्ता विकत घेणे अनेकदा शक्य नसते किंवा व्यहवार्य तरी नसते. मग जर आयुष्यात इतर काही बंधने नसतील तर भाड्याने घर घेवून वेगवेगळ्या ठिकाणी राहून आपली स्वप्ने पुर्ण करण्यास काय हरकत आहे ? मग हौस फिटली /कंटाळा आला की द्यायचं सोडून..किंवा परवडत असेल तर आपलं स्वतःच घर न विकता फक्त भाड्याने देवून वा तसेच बंद ठेवूनही हा प्रयोग करता येईल. म्हणजे प्रयोग नाहिच झेपला तरी परतीचे दोर असतीलच. हो पण असं करताना आपल्या स्वभावाला ते जमतंय का ते ही बघावं लागेल. म्हणजे "नेहमीची जागा , नेहमीची माणसं आणि नेहमीच्या सवयी" यास तुम्ही महत्व देत असाल तर हा फिरस्तेपणा करु नये पण नवीन जागा, माणसे, सवयी यांच्याशी जुळवून घेणे आवडत असेल तर या पर्यायाचा जरुर विचार करा. असो. तुमचा मूळ प्रश्न म्हणजे किती पैसे लागतील.. तर मला वाटते खरेतर हा काही प्रश्न नाहीच. जेव्हा तुमच्या मित्राने इतका विचार केला आहे तर काही साधी गणितं तर निश्चितंच मांडली असतील. शिवाय "किती पैसे लागतील ?" याबाबत त्याने तुमच्याकडे सल्ला मागितला आहे असेही तुमच्या लिहण्यावरुन वाटत नाही. त्यामुळे मला वाटते की त्याची केस ऐकून तुम्हाला पडलेला प्रश्न फक्त तुम्ही मांडला आहे आणि "किती पैसे" यापेक्षा या जीवनशैलीशी (विनापत्य, चांगली सांपत्तिक स्थिती, कुणी अवलंबून नाही , इतर बंध फारसे नाहीत )संबंधित इतर पैलू जाणून घेणे जास्त महत्वाचे असावे. म्हणून माझा हा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 11/13/2019 - 14:47 नवीन
मी ६६ पूर्ण केली आहेत . आतापर्यंत तरी लहानपणी ताराचंद रुग्णालय पुणे ( ३ दिवस घटसर्प ) २००३ ( दोन दिवस हाताला कंपाऊंड फ्रॅक्श्चर ) एकूण दिवस ५ असा अनुभव आहे. अर्थात याचा अर्थ असा नाही की पुढे हाच नियम राहील .माझा आज कोणताही आरोग्य विमा नाही . पण माझंही मिळकत आहे त्यात ६६ टक्के बचत आहे. कारण मी कधीही व्होलवो ने नाशिकला न जाता भुसावळ एस्प्रेसने जातो. हे उदाहरण देण्याचे कारण असे की जीवनमानाच्या कल्पना कशा ठरवायच्या हे तुमच्या हातात असते. अगदी कर्करोग झाला तरी मरणाचा निर्णय ६५ व्या वर्षी घेणारे माझे एक नातेवाईक ही मला माहीत आहेत. ( व ते ६५ गाठून गेले ). आज मला मूत्रपिंडांच्या समस्येची सुरूवात झाली आहे व त्या बाबतीत आरोपण करायचे नाही हा माझा ठाम निर्धार आहे . कारण मिळालेलया आनंदात मी समाधानी आहे. त्याबरोबर पुढच्या पिढीसाठी अमुक लाख असे माझे काही निकष नाहीत . तरुणपणातील अनेक खर्च त्याच प्रमाणात म्हातारपणीही करु, तितकेच मस्त कपडे घालू, तितकाच आहेर करू , तितकेच सिनेमे पाहू ,तितकीच खादाडी करू असे मी तरी करीत नाही. सबब मेडिकल विमा सोडला तारा माझी गेम सेफ आहे !
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 11/15/2019 - 04:02 नवीन
एकदम छान प्रतिसाद अन निर्णय. एक आजारांसंदर्भातले इच्छापत्र - मेडीकल वील (इच्छामरणपत्र नव्हे!) असा काही प्रकार असतो की ज्यात मी आजारी पडलो की माझ्यावर कसे उपचार करावेत, डॉक्टरांनी काय करावे इत्यादी इत्यादी उल्लेख असतात. असे आजारांसंदर्भातले इच्छापत्र मी कुसूमाग्रजांचे वाचले आहे. त्यात त्यांनी स्पष्ट लिहीले आहे की खर्चीक उपचार नकोत, गुप्ते डॉक्टरांकडून उपचार करावेत, घरीच मरण आले तर उत्तम इत्यादी इत्यादी. त्यांच्या भावाच्या पुस्तकात आहे हे पत्र.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 11/15/2019 - 05:11 नवीन
साहेब असा आजार "तुमच्या पत्नीस" झाला तर तुम्ही त्या "गेल्या" तरी चालतील मी "पैसे खर्च करणार नाही" असे म्हणू शकाल का? या प्रश्नाला समर्पक उत्तर देणारा माणूस मी अजून तरी बघितलेला नाही. माझ्या माहितीतील एक नौदलातून निवृत्त झालेले सदगृहस्थ वय ६६ त्यांना रक्ताचा कर्करोग झाला होता (२००४-०५ सालची गोष्ट). यासाठी उपलब्ध असलेले औषध साधारण १.५ लाख रुपये एका इंजेक्शन साठी होते. अशी ५ किंवा ६ इंजेक्शन त्यांना द्यावी लागणार होती. ज्यामुळे त्यांना ८ महिने ते एक वर्ष अधिक जगता आले असते. यासाठी येणारा खर्च त्यांच्या मुलाने करण्याची तयारी केली होती. मुलगा मर्चंट नेव्ही मध्ये होता त्यामुळे पैशाचा प्रश्न नव्हता. पण माझ्या मिळकतीतील पैसे माझ्यावर फुकट घालवू नका ते माझ्या बायकोसाठी राहू देत म्हणून त्यांनी असे उपचार घेण्यासाठी स्पष्ट नकार दिला आणि धीराने ते मृत्यूला सामोरे गेले. त्यांच्या बायकोने आणि मुलाने डोळ्यात पाणी आणून मला हे सांगितले कि त्यांची इच्छा स्पष्ट असल्याने आम्हाला काहीही करता आले नाही.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 11/15/2019 - 06:57 नवीन
शेवटचा कठोर असा " तो" निर्णय घेताना फक्त पेन मॅनेजमेंट करा अशी अट ठेवून करण्याचा मानस हा अगदी व्यक्तिगत असतो जसा देहदानाचा ,जसा मरणोत्तर कोणतेही धार्मिक विधी न करण्याचा ! त्यात अनेक घटकांनी त्या माणसाची मानसिकता ठरत असते त्यामुळे आपण सोडून कुणाचाच निर्णय आपल्याला ठरवता येतच नाही ! असाध्य रोग व अकाली मृत्यू ही दोनच तर " खरी " दुःखे बाकी सर्व काल्पनिक .. जयमाला शिलेदार ..... त्यांच्या आत्मचरित्रात .
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 11/15/2019 - 07:50 नवीन
माझे हरनिया ची शस्त्रक्रिया झाली तेव्हा मी त्या स्थितीत माणसाची मानसिक स्थिती काय असते ह्याचा अनुभव घेतला आहे. किंवा माणूस अतिशय आजारी पडतो तेव्हा त्याची मानसिक स्थिती आणि मृत्यू च भय ह्याचा अनुभव घेतला आहे जेव्हा मी मलेरिया नी खूप आजारी होतो . एक तर अशा वेळी माणूस जन्म मृत्यूच्या पुढे गेलेला असतो. त्याला त्या स्थितीत मृत्यूच भय वाटत नाही . शरीरातील सर्व अवयव शितील झालेले असतात. मेंदू फक्त वेदनेला च प्रतिसाद देत असतो बाकी कोणताच विचार मेंदूत निर्माण होत नाही. धडधाकट असताना जे मृत्यू चे भय वाटतं ते गलिच्छ गात्र झाल्यावर वाटत नाही
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Fri, 11/15/2019 - 12:48 नवीन
चर्चा रिटायरसंदर्भात आहे हे खरंय पण ती आयुष्यातून न्हवे तर फक्त कामक्काजातून
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 11/15/2019 - 16:55 नवीन
निवृती चा सम्बन्ध जास्त करून म्हातारपणाशी पर्यायने वैद्यकीय खर्चाशी येतो. सर्व बाबतीतली छन्चोक टाळता येते पण एकदा डोक्टरच्या दाराची पायरी चढलो की फक्त कन्स्लटेशन फी वर मुद्दा सम्पत नाही. म्हणून हे असे वळण धाग्याला लागले. असा विषय माबो वर जरी निघाला असता व वेगळे प्रतिसादक असते तरी वळण असेच लागले असते. इतर खर्च व तब्येतीवरील खर्च यात फरक असा आहे की इतर खर्चात कर्म ( विचारशक्ती) कार्यरत असते पण आजारपण व शेवट यात मानव फार पराधीन आहे ! मला अनेक लोक विचारतात की तुम्ही आता काय करता ? मी २००३ ते २०१९ या कालात एकच उत्तर देतो " आयुश्याची मजा लुटत आहे ! " मग ते विचारतात " कामधन्दा काही नाही ? मी त्याना विचारतो " आयुश्याची मजा लुटणे याला कॄती ही करावी लागतेच ना ? " कर्मयोग म्हन्जे नोटा छापणे " अशीच ज्यांची व्याख्या आहे त्याना मी टाळतच असतो.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 11/15/2019 - 17:27 नवीन
असे असे प्रतिसाद वाचून तरुण पनीच भीती वाटायला लागलीय म्हातारं पणाची. आपली संस्कृती टिकली असती आणि विभक्त कुटुंबाचे fad आपल्या कडे आले नसते तर हे प्रश्न उभेच राहिले नसते. प्रत्येक व्यक्तीला ह्या स्थिती मधून जावे लागते . पुढे कधी चूक कळेल आणि एकत्रित कुटुंब पद्धती अस्तित्वात येईल. किती विचार पूर्वक आपल्या पूर्वजांनी कुटुंब पद्धती निर्माण केली होती. पण तिला पद्धतशीर सुरू ग लावला गेला .
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश Fri, 11/15/2019 - 22:25 नवीन
फालतू प्रश्नावर उत्तरे देणाऱ्यांचा उत्साह मोठा दांडगा! Image removed.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Mon, 11/18/2019 - 19:39 नवीन
असा मिपाकरांचा अनुभव असल्याने हे होत असावे.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Sat, 11/16/2019 - 06:01 नवीन
नेमके जीफ टाकायला कसं जमतं हो तुम्हाला? आपल्या या गुणाचा आपण तर बुवा पंखा आहोत.
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश Wed, 11/20/2019 - 18:47 नवीन
आभारी आहे श्वेता ताई _/\_ Image removed.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Mon, 11/18/2019 - 15:11 नवीन
रिटायर्मेंटनंतर वायफळ खर्च वाढणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागेल. नोकरी चालू असताना वीकेंडला चालणारे दारुकाम रोज होऊ लागले तर खर्च वाढतील. वेळ भरपूर आहे म्हणून सतत पर्यटन वगैरे करण्याने पण उगाच खर्च होतो. बाकी उपक्रमावर याची मोठी चर्चा झाली होती.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा