Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

महाग्रु म्हणतात चला हवा येऊ द्या... --------------

झ
झपाटलेला फिलॉसॉफर
Tue, 11/05/2019 - 13:34
🗣 8 प्रतिसाद
#साबळे: महाग्रू तुमच्या गाण्याबद्दल थोडं सांगा #महागृ: काय ए ना निलेश, मी जेव्हा जन्माला आलो आणि जे पाहिले ट्याह्या केले ते राग यमन मध्ये केले असं सगळ्या नर्सेस म्हणाल्या. मी जेव्हा रडायचो तेव्हा एखादी ठुमरी किंवा गझल गात आहे असे सर्वांना वाटायचे, एवढा मी गाण्याशी तादात्म्य पावलेलो आहे. ------------------------ #साबळे: सर तुमच्या आणि पंचम दां च्या नात्याबद्दल काय सांगाल ? #महागृ: त्यांचं आणि माझं नातं म्हणशील तर पंचम दा हा असा एकमेव माणूस आहे ज्याने मला स्पष्ट आणि तोंडावर सांगितलेले की तू कधी प्लेबॅक सिंगर होऊ नकोस, (नाहीतर लोकांचा पार्श्वगायकांवराचा विश्वास उडेल.) जर पंचम दांनी मला सांगितले नसते आणि मी पार्श्व गायन केले असते तर तमाम जनतेचा गाण्यावरचा विश्वास उडाला असता, किती हाल हाल झाले असते लोकांचे. आणि म्हणूनच लोकं पंचम दांना व्हिजनरी म्हणून ओळखतात ------------------ #साबळे: सर तुमच्या पार्श्व गायनाची स्पेशालिटी काय आहे #महाग्रू: प्रत्येक गायकाचे एक बलस्थान असते, माझे बलस्थान माझा पार्श्व भाग आहे, आणि तीच माझ्या पार्श्व गायनाची स्पेशालिटी आहे निलेश. ------------------------ #साबळे: सर तुमचा रोल मॉडेल कोण आहे ? तुम्ही रोल मॉडेल म्हणून कोणाकडे पाहता. #महागृ: वेल निलेश मनापासून सांगायचं तर मला जेव्हा रोल मॉडेल म्हणून कोणाला पाहायचे असते तेव्हा मी आरश्यात पाहतो. आरसा कधीही खोटे बोलत नाही निलेश त्या मुळे माझा रोल मॉडेल मी आरश्यात शोधतो. --------------------------- #साबळे: आज मॅडम पण इथे आल्या आहेत, आपण त्यांना विचारू यात की त्यांचे सरांच्या गाण्याबद्दल काय मत आहे. तर मॅडम तुम्ही काय सांगाल सरांच्या गाण्याबद्दल #मॅडम: मी ह्यांचे गाणे ऐकूनच ह्यांच्या प्रेमात पडले. ------------------- #साबळे: मॅडम, सर दूनियभर गाणे म्हणत असतात, पण ते घरात तुमच्यासाठी गातात का ? #मॅडम: हो तर, ते घरात तिरुमला शेंगदाणा तेलात तळलेले वडे खाऊन गातात. आणि (जमेल तेवढं लाजून) खरं सांगु का श्रिप्रीया लहान असताना हे तिच्यासाठी रोज एक छान अंगाई गीत म्हणायचे. ते एवढे छान गायचे की श्रिप्रीया बरोबर मी सुद्धा झोपून जायचे. म्हणूनच श्रिप्रीया ला भावंड झालं नाही !!! -------------------- असो. तर मंडळी चर्चा तर होणारच, पण तुम्ही जाऊ नका पहात रहा चला हवा येऊ द्या, महागृंच्या सोबत संपादित *

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5845 views

🗣 चर्चा (8)
झ
झपाटलेला फिलॉसॉफर Tue, 11/05/2019 - 13:37 नवीन
स्रोत : मयुर कुळकर्णी
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Wed, 11/06/2019 - 04:17 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
ग
गड्डा झब्बू Wed, 11/06/2019 - 06:44 नवीन
भारी लिहलंय :-)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 11/06/2019 - 08:20 नवीन
निलेश : तुमचं आवडतं वाहन कोणतं? महाग्रु : मुंबईतील लाल डबलडेकर बस. वरची पुढची सीट.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 11/07/2019 - 10:17 नवीन
निलेशः तुम्ही केस कसे धुतात? म्हागॄ: दररोज केस पाण्याने धुतो. म्हणून माझे केस अजून काळेभोर आहेत.
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Fri, 11/08/2019 - 19:13 नवीन
मस्त ! भारी लिवलंय. म्हागृना वाचायला दिलं पाहिजे. अर्थात त्यांच्यावर काही परिणाम होणे शक्य नाही, याची कल्पना आहेच.
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Fri, 11/08/2019 - 19:13 नवीन
मस्त ! भारी लिवलंय. म्हागृना वाचायला दिलं पाहिजे. अर्थात त्यांच्यावर काही परिणाम होणे शक्य नाही, याची कल्पना आहेच.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 11/10/2019 - 18:10 नवीन
इथे म्हाग्ररूंची एक दुर्मिळ रत्नवत कामगिरी आहे : https://www.misalpav.com/comment/957276#comment-957276 -गा.पै.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा