Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

आमचं ठरलयं, संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय

प — पाषाणभेद, Sat, 11/02/2019 - 18:10
आमचं ठरलयं, संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय
चल उठ मराठी गड्या पुन्हा एकदा लढ लढा बोल की आता आमचं ठरलयं आमचं ठरलयं अन संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय ||धृ|| नको कानडी सोन्याचा घास लावील तो आम्हाला फास किती मार आता सहन करायचा? मुकाट अन्याय किती सोसायचा? सरकारनं अपमानाचं जीणं केलंय म्हणूनचं आमचं ठरलयं अन संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय ||१|| आमचंच आहे कारवार निपाणी बिदर खानापूर भालकी कोणाची टाप नाय म्हणण्याची बेळगावसगट हे पण घेवूच की सहीशिक्कामोर्तब आम्ही केलंय आमचं ठरलयं अन संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय ||२|| आमच्या आजानं खाल्ली काठी आमच्या बापानं खाल्ली लाठी नाही घाबरत आम्ही त्याला जरी पडली ती आमच्या पाठी तिन पिढ्यांनी संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलंय आमचं ठरलयं अन संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय ||३|| कानडी गड्या घे आता ऐकून सीमाभाग हा माझाच सांगतो ठासून शस्त्राविना हि लढाई मी लढणार मराठीभाषीक शेवटी एक होणार जय महाराष्ट्र कधी बोलतोय असं मला झालंय आमचं ठरलयं अन संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय ||४|| - पाषाणभेद एक नोव्हेंबर (सीमाभागासाठीचा काळा दिवस) २०१९

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2137 views

💬 प्रतिसाद
ग
गणेशा Sun, 11/03/2019 - 06:49 नवीन
छान लिहिले आहे
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 22 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 23 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 23 hours ago
  • सुंदर !!
    1 day 23 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 23 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा