Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

शिव सेनेचे काय होणार ?

ह
हस्तर
गुरुवार, 10/31/2019 - 14:14
🗣 121 प्रतिसाद
ज्या पद्धतीने हट्टी पणा आणि बोलघेवढे पण चाललंय भाजप वाले चिडलेले असणारच राजकारणात कोणी पण शत्रू मित्र नसते पण इथे बलाढ्य माणूस समोर आहे खडसे ,चिक्कीताई सगळ्यांचे पत्ते साफ केले आपलेच असून हे तर दुसऱ्या पक्षाचे आहे वर जनतेचे मनोरंजन होत आहे पण मुद्दाम केल्यासारखे आता वाटत नाही ,दिल्ली वरून पण महाराष्ट्र्र चे सरकार हरण्याना पेक्षा उशिरा (मग काही पण कारण असो ) होत आहे हे दिसतेय ,थोडक्यात महाराष्ट्र भाजपचा वट कमी आहे असे लोकांना वाटतेय २०१४ मध्ये बाळा साहेबांची पुण्याई होती आणि २०१९ मध्ये लोकल प्रश्नांनाची ढीलाइ त्यामुळे टिकली पण २०२४ मध्ये शिवसेना असेल का ? कारण काही झाले तरी भाजप खच्चीकरण करणारच ,मुद्दाम मंत्रिपद ना देऊन ( आयारामानं मात्र दिले ),पुण्या मुंबईत जागा ना देऊन बोळवण केली आता भाजप अजून करणारच जर शिव सेने मागण्यात तडजोड केली तर मानसिक खच्ची करण होईल ,अडून बसली आणि मागण्या पुंर्ण नाही झाल्या तर हसे होईल

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 59197 views

🗣 चर्चा (121)
क
कंजूस गुरुवार, 10/31/2019 - 15:04 नवीन
सगळंच मोडलं, सरकार राष्ट्रपती राजवटीत गेलं तर अपक्षांना आमदारकीचा फायदा होणार नाही. त्यामुळे ते बहुमत सिद्ध करण्यावेळी भाजपला मत देतील. शिवसेना तटस्थ राहिल्यास भाजप ११६ वि ११० अशी काठावर पास होऊ शकते?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 10/31/2019 - 16:16 नवीन
राज्यात सत्ता स्थापन करणे bjp ची गरज आहे . आणि सेना हाच योग्य पक्ष आहे bjp साठी बहुमत सिद्ध करण्यासाठी. राष्ट्रपती राजवट bjp भविष्यात कधीच इथे पाय रोवू शकणार नाही. अपक्ष आमदारांच्या पाठिंबा सर्व मंत्री पद धावे लागेल. Bjp वाल्यांना मंत्री मंडळात जागाच शिल्लक राहणार नाहीत
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले गुरुवार, 10/31/2019 - 16:18 नवीन
ईडी पीडा टळो आणि माझं बाळ उप मुख्य मंत्री होवो असे म्हणत उद्धव ठाकरे भाजपाशी समजोता करतील.
  • Log in or register to post comments
व
वकील साहेब गुरुवार, 10/31/2019 - 22:29 नवीन
तमाम मराठी जनतेच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Fri, 11/01/2019 - 07:18 नवीन
https://www.lokmat.com/editorial/editorial-instability-state-power-it-in... भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्याची देशातील किमान १५ राज्यांत सरकारे आहेत. या बहुतेक राज्यातील जनता सेनेवर या ना त्या कारणाने नाखूश आहे हे कसे?
  • Log in or register to post comments
म
मनिष Fri, 11/01/2019 - 08:58 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Fri, 11/01/2019 - 11:44 नवीन
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 11/01/2019 - 11:40 नवीन
सेना स्वत:च्या पायावर धोंडा मारुन घेतेय.सेनेलला धड वचक ठेवता येत नाहिये ना धड धोबीपछाड टाकता येतोय या सगळ्या गोंधळात सेना त्यांच्या अपरिुक्वपणाचे मुक्त दर्शन घडवतेय
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 11/01/2019 - 14:10 नवीन
भारत देशाच्या लोकशाहीत अनेक घोळ आहेत. त्याचे पुरेसे स्पष्टीकरण संविधानात नाही . या वर संबित पात्रा यांचे एक भाषण ही तू नळी वर आहे पण ते म्हणे भाजपाचे कोणीतरी असल्याने अनेक जण फाट्यावर मारतात. भारत देशात " पक्ष" या संस्थेची व्याख्या संविधानाच्या कुठल्याही पानावर आहे का ? संघटना करण्याचे स्वात्रंत्र्य इतका उल्लेख जरूर आहे. आपण मत पक्षाला देतो की माणसाला याचे विवेचन संविधानात आहे का ? माझया मते नाही. या मूलभूत घोळामुळे पक्षशिस्त वगैरे ला पक्षात शिक्षा असली तर कायद्यात नाही ! युती या गोष्टीला कायद्यात काही अर्थ नाही ! त्यामुळे जातीयवादी म्हणून आयुष्यभर ज्या पवारांनी भाजपाला हिणवले त्यांनी आता महाराष्ट्राची " काळजी" मला असा पवित्रा घेऊन हिंदुत्व वादी शिवसेनेशी सोयरीक केली तर त्यात नवल ते काय ? कारण अशी सोयरीक लोकांची फसवणूक असली तरी संविधानाला अमान्य नक्कीच नाही असे इतिहासाचं सांगतो.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 11/02/2019 - 03:04 नवीन
यदाकदाचित आदित्य मुमंत्री झाला तर राऊत श्रेय घेणार होते पण त्यांना "शिवसेना स्वाभिमानी पक्ष" याचा विसर पडला हे कां अध्यक्ष सोनियांनी नकार देऊन आठवण करून दिली. त्यामुळे मा. पवारांचा शर्टही ओलाच राहणार का?
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 11/02/2019 - 15:58 नवीन
राष्ट्रवादीने पुलोद च्या " प्रयोगाचा हवाला देऊन शरद पवार यानाच मुख्यमंत्री पद द्यावे अशी अट आता टाकावी . पुलोद चा प्रयोग संजय राऊताना आवडला आहे अशी कबुली त्यांनी दिली आहे . यात अनेक पक्षी भा ज पा मारू शकेल . पवार शेकाकर्यांच्य आत्महत्या थांबवू शकतात की नाही हे जनतेला आजमावून पहाताही येईल . सेनेची काहीशी जिरवता येईल . फडणवीस हा ब्राह्मण मुख्यामंत्री कसा होऊन शकतो असा तळतळाट बर्याच जणांचा झाला आहे त्या जखमेवर भा जा पा ने फुंकर घातली असा संदेशही जाईल तसेच एवीतेवी गडकरी पवार हे " तसे" दोस्त आहेत . पवारांचा " हात" धरून मोदी राजकारण शिकले ई ई गोडवे गाउन आपली आपटी अन आपत्ती दोन्ही भा ज पा ला लपविता येईल .
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 11/02/2019 - 16:01 नवीन
झी चोवीस तास वर अशी बातमी आलेलीही आहे की शरद पवार मुक्या मंत्री व आदित्य उमु !
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Mon, 11/04/2019 - 07:51 नवीन
महाराष्ट्र मध्ये भाजप बॅक फूट वॉर जाईल ,खडसे मुंडे तावडे सगळे मागे सारले आहेत ,फक्त फडण २० सध्या चेहरा आहेत ,जसे अटल जी गेल्यावर नमो यायला १० वर्षे लागली तसे होईल
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 11/02/2019 - 16:46 नवीन
दुसऱ्या पक्षांचं जाऊ द्या. स्वाभिमानाच्या वक्तव्याचं काय झालं? गद्दारी?
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sun, 11/03/2019 - 15:06 नवीन
उत्तम मनोरंजन चालू आहे. "एकच सत्य .. मुख्यमंत्री आदित्य" च्या घोषणा बाजूच्या गल्लित काही शिवसैनिकानी कालच दिल्या. 'रोखठोक' लिहिणारे ऐनवेळेस 'रोख' घेउन नमते घेतात असा अनुभव होता पण ह्यावेळी तसे दिसत नाही.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 11/03/2019 - 16:15 नवीन
भाजपा ने शिवसेनेला बाहेरुन पाठींबा देऊन शिवसेनेस सरकार बनवू द्यावे. राऊत साहेब कसे सरकार चालवतात ते बघावे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 11/03/2019 - 16:48 नवीन
निवडणुकी अगोदर सर्व्हे वर आपला विश्वास दाखवून जनतेनी भोळा पण दाखवून दिला. निकाल लागले सर्व sarvye तोंडावर पडले. सरकार युती चेच बनणार. संजय राऊत नाच्या bjp च्या परवानगी नेच भोळ्या जनतेला अजुन मूर्ख बनवत आहे
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Mon, 11/04/2019 - 05:58 नवीन
मी काही भा जा पा वाला नाही पण माझया मते पुन्हा निवडणुका हा शिवसेना नावाच्या सत्तापिपासू व कोणताही विधीनिषेध नसलेल्या पक्षाला ठेचण्याचा एकमेव मार्ग आहे ! अर्थात त्यात राज्यपालाची भूमिका निरणांयक !
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 11/04/2019 - 07:52 नवीन
आधी हाताने थोबाडं फोडून घेतली , आता कमळ बघून गाळात रुतत जायचं ... काहीही करा , जनता जनार्दन भोळी ती भोळिच राहणार ,, त्यांचं काही नाही व्हायचं ...
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 11/04/2019 - 07:58 नवीन
जे बाळा साहेबांनी त्यांच्या हयातीत केले होते .. ते मला नाही वाटत , आता कुणाला जमेल .. ते यथेच्छ खिल्ली उडवायचे .. मग समोर कमळाबाई असो कि इटालियन किटली ... कुणाचीही खैर ठेवायचे नाहीत .. राज तास प्रयत्न करतोय पण ते एक खांबी नेतृत्व आहे .. बाळासाहेबांनी सामान्यातूनच लोकनेते घडवले आणि हे दोघे ( उद्धव आणि राज ) खुर्चीची स्वप्न बघतायत .. मला नाही वाटत त्यांच्या हाती काही येईल .. हे असेच चालू राहिले तर शिवसेना हा , कॉर्पोरेट पक्ष बनेल हळूहळू आणि सामान्य जनतेवरची पकड सुटत जाईल .. जो , जनतेला आवर्जून वेळ देतो आणि निदान एका तरी ज्वलंत प्रश्नावर आंदोलन छेडतो तोच लोकनेता होऊ शकतो आणि त्याला मग मरण नाही .. उदाहरण द्यायचेच झाले तर श्रीमान बच्चू कडू यांचे देता येईल ..
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Mon, 11/04/2019 - 15:51 नवीन
बाळासाहेबांनी सुरेश प्रभू त्यांना पैसे पोहोचवत नाहीत म्हणुन प्रभुना मंत्री मंडळातून काढून टाका असे वाजपेयींना सांगितले . पुराव्यासाठी ह्या फिती मध्ये १५ ते १८ मिनिटे पहा. सध्याचा शिवसेनेचा मुख्यमंत्री पद आणि गृह, अर्थ, नगर विकास आणि महसुल ही खाती यांचा अट्टाहास हा कशासाठी आहे हे त्यावरून कळेल. https://www.youtube.com/watch?v=cVC8_jgTf6E
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Mon, 11/04/2019 - 08:14 नवीन
भाजप कुठे नीतिमत्ता ठेवतो? शिवसेनेचे चुकले हे मान्य पण १) पुण्यात शिव सेने ला एक पण जागा दिली नाही २) राणे हा शिव सेने चा शत्रू असून पक्षात घेतलंच ना ३) बऱ्याच सहकार मंत्र्यां ना पावन करून ह्यावेळी तिकीट दिले ४) आमचे ठरलेय ,पण काय ?
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 11/04/2019 - 09:06 नवीन
भाजपा ने जेंव्हा त्यांच्या काही मित्र पक्षांना त्यांच्या कमळ चिन्हावर निवडणुक लढवण्यास भाग पाडले, तेथेच मला तर त्यांची चुक वाटली होती.. मित्र पक्ष मग तो आठवलेंचा असुद्या नाहीतर जानकरांचा. आमच्या जवळील दौंड मध्ये तर असे ऐकले होते की, राष्ट्रीय समाज पक्षाचा एबी फॉर्म मिळाल्यानंतर ,फॉर्म भरण्या अगोदर राहुल कुल यांच्या हातात भाजपा चा एबी फोर्म पडला. ७०० च्या आसपास मताधिक्क्याने ते निवडुन ही आले. परंतु आपल्या पक्षाचे अस्तित्व याद्वारे मिटु शकते हे मला वयक्तीक वाटते. तसेच, भाजपा ने ५०-५० मान्य केले होते का? हा कळीचा मुद्दा आहे, आणि त्यांनी तो जर मान्य केला असेल तर शिवसेनेची भुमिकाच चुकीची असे तर स्पष्ट पणेआपण म्हणु शकत नाहीच. तरीही मला वयक्तिक वाटते भाजपा -शिवसेने चे सरकार येइल. परंतु भाजपाने याआधीच्या काही वर्षात, महबुबा मुफ्ती बरोबर आधी केलेले सरकार, गोवा आणि कर्नाटकातील सत्ता घेतानाचे राजकारण हे पाहता शिवसेनेने राष्ट्रावादी बरोबर जावु नये अशी म्हणण्याची नैतिकता गमावलेली आहेच. आणि त्याबरोबर २०१४ मध्ये राष्ट्रवादी च बाहेरुन पाठिंबा दाखवुन बहुमत सिद्ध करताना, शिवसेनेला ५ वर्षे कोंडित पकडले होतेच, हे सुद्धा दुर्लक्ष करता येणार नाही. राज्यपालाने मात्र, कोणत्याही पक्षाची बाजु ऐकुन न घेता, मोठ्या पार्टीला बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलवले पाहिजेच. ९ तारखे पर्यंत आधीचे सरकारचा कार्यकाळ आहे, त्या अगोदर नविन सरकार चे गटबंधन झालेले हवे. पण अजुन ही राज्यपाल कोणाला सत्तास्थापणे साठी बोलावत नाही, आणि येथे ही मग राज्यपाल असे का करत नाही हा प्रश्न उपस्थीत होतोच. राष्ट्रवादी ने माझ्या मते विरोधी पक्षात राहुन काम करावे, प्रभावी काम केल्यास २०२४ मध्ये राष्ट्रावादी सत्तेत नक्कीच येइल असे माझे मत आहे, कारण गेल्या ५ वर्षात भाजपाचे काम जनतेला दिसले आहेच, आणि नंतरच्या ५ वर्षात असेच चित्र राहिल असा माझा अंदाज आहे. असो
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Mon, 11/04/2019 - 08:14 नवीन
^^^ चौकटराजा
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 11/04/2019 - 08:28 नवीन
आमच्या घरात सर्व लोकमान्य पक्ष सामावले आहेत .. काका कट्टर शिवसैनिक .. बाळासाहेबांनी स्वतः आमच्या दुकानाचे उदघाटन केले होते .. तर दोन मामा राष्ट्रवादीत आणि एक मामा कट्टर काँग्रेस .. चुलत मामा सर्व शिवसेनेत आणि भाजपात .. आजोळच्या गणपतीला खरी धमाल यायची .. मिरवणूक बघण्यासारखी असायची .. पाच घरात एकच गणपती त्यामुळे सर्वजण यथेच्छ आपल्या पक्षाच्या टोप्या घालून मिरवायचे आणि नाचायचे .. आमच्या सारख्या पाहुण्या मंडळींचे हाल व्हायचे .. मी तर तीनही टोप्या खिशात घालून फिरायचो .. शिवसैनिकांमध्ये भगवी , तर भाजपाची त्या मामालोकांच्या गँगमध्ये ,, माझ्या सख्ख्या मामांची राष्ट्रवादी तर मोठ्या मामाची हातवाली .. विचारू नका .. एक मात्र नक्की , राजकारण घराघरात घुसले आहे आणि त्यांचे बुरसटलेले विचारही .. त्यामुळे , मी सहसा गणपतीला जाणे टाळतो .. नकोसे वाटते आणि या साऱ्या पक्षांचा मनापासून राग येतो , ज्यांनी गणपतीही सोडला नाही .. तर आपल्यासारख्या सामान्यांची काय भिशाद...
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Mon, 11/04/2019 - 08:32 नवीन
मनसे ?
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 11/04/2019 - 08:40 नवीन
सध्यातरी काही माहित नाही आहे .. कधी पुढील खेपेला जाणे झाले तर कळेल .. कुणीतरी भाऊ असतील जे नुकतेच तिथे भरती झाले असतील .. बघू टोपी भेट मिळाली कि घ्यायची ..
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Mon, 11/04/2019 - 08:44 नवीन
मनसे ला १३ वर्षे झालित राव , एक पण माणुस नाहि ?
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 11/04/2019 - 08:53 नवीन
कदाचित तिथे फक्त एकच माणूस आहे ज्याला लोक आधीपासूनच ओळखतात .. आणि त्याचं जाणं या लोकांना बिलकुल आवडलं नसेल .. असो "" राजकारण "" हा मुळातच घाणेरडा विषय आहे .. इथे कुणी कुणाचा नसतो .. आपला विषय जरा आवडीचा होता म्हणून भाष्य केले आठवणींसहित अन्यथा मी या धाग्यांवर फिरकतही नाही .. मतदानपण वेळ असेल तरच करतो अन्यथा नाही .. यावेळेस केले नाही .. दिवाळीची साफसफाई करत होतो .. मत द्या आगर नका देऊ .. दोन्हीची उत्तरे सारखीच आहेत .. आमच्या इथे अजूनही रस्ते धड नाहीत , मुंबईत राहूनही तर गावखेड्यातली वार्ताच नको .. सर्व साले , चप्पल फेकून मारण्याच्या लायकीचे आहेत .. या नेत्यांना ,, जींकडेजींकडे रस्ते खराब आहेत तिथे ओळीने खांबांना बांधून ठेवले पाहिजे , धूळ खात .. मग रात्री सोडायचे घरी जेवणासाठी फक्त , सकाळ झाली कि पकडून आणायचे आणि पुन्हा बांधायचे असे किमान सात दिवस तरी राजरोसपणाने केले पाहिजे .. एक व्रत समजून .. तर कुठे देशाचे भले होईल , अन्यथा नाही ..
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Mon, 11/04/2019 - 09:15 नवीन
उद्धव आणि ‘बेताल’
https://www.tarunbharat.net//Encyc/2019/11/4/agralekh-04-nov-2019.html
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 11/04/2019 - 09:48 नवीन
प्रत्येक नेत्याने फिरवलेल्या वक्तव्याची लोकमत चाचपणी करण्यासाठी बेताल,त्रिताल,,झपताल ठेवलेले असतात. प्रक्षोभ झाल्यास त्या ढग्ग्याला फोडता येते. डॉन लोकही असे करतात हे एका कादंब्रीत आहे. लास्ट डॉन /मेरटा ?
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Mon, 11/04/2019 - 19:55 नवीन
नाहि ब्वा मि तरि नाही
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Mon, 11/04/2019 - 21:08 नवीन
तबल्यावरील तालाचा एक प्रकार आहे. त्याला म्हणतात आडाचौताल .
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 11/04/2019 - 10:34 नवीन
शिवसेने बरोबर चर्चा आता राज्यस्तरावर करावी. केंद्रिय नेतृत्व आताच मध्ये बोलणार नाही. - अमित शहा, भाजपा. याचा अर्थ असा ही असु शकतो की यांनी ५०-५० फॉर्मुला आधी बोलले असल्याने, आता शिवसेनेच्या भुमिकेला उत्तर देणे जमत नसेल. आणि निवडणुकी आधी, भाजपाला जवळजवळ २२० ते २४० शीट येवुन त्यांना शिवसेनेची तशी जास्त अडचन होणार नाही असा अतीआत्मविश्वास भाजपाला झाला असल्याने त्यांनी ५०-५० मान्य केलेले असु शकते..
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Mon, 11/04/2019 - 11:30 नवीन
अमित शहा बोलले होते फडणवीस बोलणार मी असले बोलले नव्हतो मग फडणवीस अमित शहा ह्यानं म्हणणार तुम्ही कोण ठरवणारे मग अमित शहा स्वतःहून हात बाहेर काढणार
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Tue, 11/05/2019 - 13:12 नवीन
मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याबाबत भाजपने कानावर हात ठेवले आहेत. सत्तेचे समसमान वाटप म्हणजे मुख्यमंत्रिपदाचे वाटप कसे होऊ शकते, असा सवाल भाजपच्या सूत्रांनी केला. अमित शहा आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत मुख्यमंत्री उपस्थित नव्हते. त्यामुळे शिवसेनेचा जो दावा आहे, त्याबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती नाही. शिवसेनेसोबत झालेल्या चर्चेत मंत्रिमंडळात निम्म्या-निम्म्या जागावाटपाचे ठरले होते, अशी माहिती देण्यात आली. https://www.esakal.com/maharashtra/shivsena-bjp-politics-government-231950
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Mon, 11/04/2019 - 11:48 नवीन
भा जा पा चा पूर्वीचा अवतार जनसंघ असा लब्बाड नव्हता ! हे प्रमोद महाजन अवतरले आणि यांनी ठरावले की काँग्रेसला भा ज पा चे राजकीय गुरु करायचे ! ती शिकवण म्हणजे आयडीयालॉजी गेली खड्ड्यात ! आता महाजनांचीच शिकवण राऊत वापरीत आहेत !
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Mon, 11/04/2019 - 15:29 नवीन
तेलुगु देशम सारखे शिवसेनेचे खासदार त्यांचा लोकसभा-राज्यसभा पक्ष भाजपात विलीन करतील का ?
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Mon, 11/04/2019 - 15:39 नवीन
भाजपा मधे निम्म्यहुन लोक आयात केलेल आहेत
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 11/05/2019 - 05:05 नवीन
एकंदर या काथ्याकुटाचा कंटाळा आला आहे. बेताल वक्तव्ये आणि सामान्य जनतेचा कळवळा दाखवण्यासाठी गहिवर काढणारी भाषणे अति झाली. आता सरकार कोणी का बनवेना, माझ्या सारख्या सामान्य माणसाला त्यात अजिबात रस राहिलेला नाही
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 11/06/2019 - 06:08 नवीन
अगदी अगदी . मतदान करायला गेलो हाच मूर्खपणा केला. मतदान करा , आमच्या पक्षाला, आणि नंतर गद्दारी. तो करतो तर आम्ही का नाही? मग कशाला स्वाभिमानाच्या गमजा?
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 11/05/2019 - 05:32 नवीन
सेनेशी जर लग्न झालं असत माझ तर मी कधीच घटस्फोट दिला असता... काय हि रोजची कटकट.. धड नांदत नाही .. गेली पाच वर्ष युतीत असून सतत धुसफूस.. कंटाळा आला,, महाराष्ट्राची जनतापण ना!!!! द्याचं ना एक मत तर एका पक्षला बहुमत द्यायच ना, मग भले काँग्रेस का असेना.. आणि तिकडे बारामतीकर आणि त्यांचे समर्थक हे विसरतात कि लोकांना जर ते हवे असते तर त्यांना १०५ + आणि भाजप ला ५० असते चित्र असते.. पण उन्माद असा दाखवता आहेत कि जणू स्वतःला २०० जागा मिळाल्यात दुर्दैवाने प्रादेशिक पक्ष हे आता बहुतेक एका एका कुटंबाचे खाजगी उद्योग झाले आहेत, पवार साहेब पूर्वी काँग्रेस मधून बाहेर पडले नसते तर बरे झाले असते असे आता वाटते , निदान महाराष्ट्र भाजप आणि काँग्रेस अशी तरी लढत असती .. घराणेशाही नि त्यांना आणि शिवसेनेला दोघांना हि खड्यात घातलाय, काँग्रेस तर काय गेली ७० वर्षे एकाच कुटुंबावर चालतोय
  • Log in or register to post comments
त
तर्री Tue, 11/05/2019 - 07:41 नवीन
राम मंदिर अभियोगाची सुनावणी संपली आहे. निकाल केंव्हाही येवू शकतो आणि तो राम मंदिर बांधण्याच्या बाजूने यायची शक्यता खूपच जास्त आहे. शिवसेनेने हा धोका लक्षात घेणे गरजेचे आहे. ज्या पद्धतीने भा. ज प सरकार , शपतविधी ची टाळाटाळ करत आहे त्यावरून त्यांना मध्यावधी निवडणूक हवी आहे आणि त्या लादल्याचा दोष शिवसेनेवर फोडायचा आहे. वरील दोन घटनाचे एकत्रीकरण करून हा निष्कर्ष काढता येईल कि अल्प मातामधले सरकार स्थापायचे , ते पडले कि निवडणुका ! राम मंदिर च्या लाटेवर एकहाती सत्ता !! हा भा ज प चा प्लान असू शकतो. शिवसेना अस्थित्वाची लढाई लढते आहे आणि ह्या विनाश काळात अगदीच बालिश पणे वागते आहे. ह्या घोळत संजय राउत आणि उद्धव हे उथळ , पवार संधिसाधू आणि फडणीस हे संतुलित नेते म्हणून महाराष्ट्रासमोर आले आहेत.
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Tue, 11/05/2019 - 08:29 नवीन
फडणीस हे संतुलित नेते > संतुलित ज्या जागी दुसरेच वाचले राममंदिर वरून जिंकणे ९० च्या दशकात होत होते ,आता कोणाला जास्त रस नाही अन्यथा शिव सेने वॉर जेवढे मिपावर धागे निघाले तेवढे राममंदिर वॉर निघायला पाहिजे होते
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Wed, 11/06/2019 - 18:20 नवीन
त्यांनी आतापर्यंत सातत्याने योग्य राजकीय चाली केल्याचा इतिहास नाईलाजाने स्वीकारावाच लागतो. त्यात मागच्या निवडणूकीत युती होईल या समजात ते तोंडघशी पडले होते हे एकमेव त्यांचे अपयश होते असे वाटते, अर्थात मी जाणकार नाही समजण्यात चूक होऊ शकते
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 11/05/2019 - 08:04 नवीन
राम मंदिर बांधून झाले . म्हणून हुरुळून जावून येथील जनता bjp ला मतदान करेल असे नाही वाटत. फक्त up आणि बिहार मध्येच असले प्रकार घडतात . परत निवडणूक झाली आणि राम मंदिर पण झाले तरी दोन्ही bjp आणि शिवसेना पराभूत होतील आणि राष्ट्रवादी सत्तेच्या जवळ पोचेल.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Wed, 11/06/2019 - 18:22 नवीन
शरदपवारांनी जो एकहाती किल्ला लढविला त्यामुळे ते युद्धात निष्णात आहेत हे सिद्ध झाले आहे च.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 11/06/2019 - 19:05 नवीन
छत्रपतींचा महाराष्ट्र दिल्ली च्या तख्तापुढे झुकणार नाही असं पावसात भिजत भिजत म्हणायचं आणि मग दिल्लीत परवानगी घ्यायला जायचं ते पण एकेकाळी ज्यांना परदेशी म्हटलं त्या मॅडमची ? फारच 'जाणतं' राजकारण!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 11/06/2019 - 19:08 नवीन
https://www.indiatoday.in/india/story/maharashtra-tussle-comes-delhi-fadnavis-meet-amit-shah-sharad-pawar-sonia-gandhi-debate-sena-alliance-1615448-2019-11-04
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Wed, 11/06/2019 - 23:11 नवीन
ज्याला मी युद्ध म्हटले ते मतदानाच्या सोबतच लढून झाले
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा