Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

मिपाचा पहिलावहिला छापील दिवाळी अंक

प
प्रशांत
Wed, 10/23/2019 - 12:46
🗣 88 प्रतिसाद
झैरात झैरात झैरात 1 मंडळी, कळविण्यास अत्यंत आनंद होतोय की आपल्या लाडक्या मिपाचा पहिलावहिला छापील दिवाळी अंक उद्या आपल्या भेटीस हजर होतोय. आपला पहिलाच प्रयत्न असल्याने मर्यादित प्रती छापण्यात आल्या आहेत. अधिक माहितीसाठी आणि आपली प्रत राखून ठेवण्यासाठी मिपावर प्रशांत ला व्यनि करा किंवा prashaant.tayade@gmail.com येथे थेट संपर्क साधा. ऑनलाईन अंकापैकी निवडक लेख, दोन-तीन एक्स्क्लुसिव्ह कंटेंट आणि मिपावरची काही गाजलेली दर्जेदार पूर्वप्रकाशित गाळीव रत्नं असा हा संग्रह आहे. मुख्यतः स्मरणिका म्हणून संग्रही ठेवण्यासाठी. विशेषतः पहिला अंक, आणि कदाचित अग्रणी मराठी संकेतस्थळांपैकी छापील अंकाचा पहिलाच प्रयोग यासाठी या अंकाचं महत्त्व असेल.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 58847 views

🗣 चर्चा (88)
म
मनिष Sun, 10/27/2019 - 07:49 नवीन
अरे पुण्यातल्यांनी कुठून घ्यायचे? कट्टाही रद्द झाला ना भौ... :-)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 10/27/2019 - 08:08 नवीन
त्याबाबत लवकरच अपडेट करतो
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sun, 10/27/2019 - 07:41 नवीन
गेला बाजार रसग्रहण तरी ?
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 10/27/2019 - 07:43 नवीन
तुम्हीच शिवधनुष्य हाती धरा अन वाचकरूपी सितेच्या प्रतिसादांना वरा.
  • Log in or register to post comments
ह
हरिहर Sun, 10/27/2019 - 16:07 नवीन
मला दिवाळीअंक मिळणारे का? कधी, कुठे, कसा?
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 10/28/2019 - 12:34 नवीन
मुंबईतल्या लोकाना अंक कोणाकडे मिळेल
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Tue, 10/29/2019 - 07:56 नवीन
हाच प्रश्न
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 10/29/2019 - 08:06 नवीन
मिपाचे दिवाळी अंक प्रशांतकड़े पोहोचले आणि वितरणाचं प्लानिंग करतच होतो की त्यांच्या नात्यात असलेल्या जवळच्या व्यक्तिबद्दल दुःखद गोष्ट घडली म्हणून प्रशांतला तातड़ीने गावी जावे लागले त्यामुळे अनेकांना अंक मिळायला उशीर झालाय. प्रशांत आला की पुन्हा नव्याने अंक कसे पोहोचतील यासाठी प्रयत्न करूत , आपण दिलेला प्रतिसाद खुप मोठा आणि उत्साह वाढवीणारा आहे म्हणून ही पोच. Thanks All -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 10/29/2019 - 10:36 नवीन
माहितीबद्दल प्राडाँचे आभार. प्रशांत यांचे सांत्वन असो. -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Tue, 10/29/2019 - 09:56 नवीन
कारण इथे दिल्याबद्दल आभारी आहे. जर काही आकस्मात घडलं तर नाईलाज असतो. सर्वांनाच उत्सुकता आहे आणि मर्यादित प्रती छापल्या म्हणताना आपल्याला मिळेल की नाही याची हुरहुर आहे, बाकी अंक चार दिवस उशीराने आला म्हणून हरकत नाही
  • Log in or register to post comments
च
चॅट्सवूड Tue, 10/29/2019 - 13:31 नवीन
या अंकाच्या खूप प्रती विकत घेऊन नंतर ब्लॅक मध्ये विकला तर चालेल का?
  • Log in or register to post comments
स
समीरसूर गुरुवार, 10/31/2019 - 10:08 नवीन
मिपाची घोडदौड अशीच चालत राहो!!!
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा Sat, 11/02/2019 - 11:36 नवीन
आत्ताच प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सरांच्या हस्ते मिपाचा पहिलावहिला छापील दिवाळी अंक मिळाला. सरांना भेटण्याची पहिलीच वेळ होती. खरं म्हणजे कोणत्याही मिपाकराला पहिल्यांदा भेटत होतो. खूप छान वाटले भेटून. वैयक्तिक कारणाने सरांकडे जास्ती वेळ नसल्याने अल्प मुलाखत झाली. निवांत भेटण्याच्या अटीवर सरांनी निरोप घेतला. आता आरामात वाचेन. पहिल्या अंकाचा साक्षीदार झाल्याने प्रसन्न वाटतंय. या अंकासाठी मेहनत घेतलेल्या सर्व मिपाकरांचे आभार... बिरुटे सरांचे परत एकदा हृदयस्थ आभार.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 11/02/2019 - 14:57 नवीन
गुल्लुदादा,आपणास भेटून मलाही खुप आनंद झाला. आज ज़रा गड़बड़ होती, फार वेळ बोलता आले नाही. पण तुम्ही मिपाकरमित्र म्हणून मला आवडलात, आपण जानेवारी नंतर दोघे मिळून कट्टा आयोजित करू जे येतील ते येतील ते येतील. नाय आले तर नाय आले आपण दोघे फिरू. अंक आवडला ?? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा Mon, 11/04/2019 - 12:58 नवीन
सुरेख झालाय अंक...सर्वांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 11/03/2019 - 03:59 नवीन
आज सकाळी दहा साडेदहाच्या सुमारास पुण्यात अक्षरधारा, बाजीराव रोड येथे येत आहे, मजकडे २/३ प्रती असतील, इच्छुक मिपाकरांनी त्या सुमारास तेथे आल्यास दिवाळी अंक देणे सोयीचे ठरेल.
  • Log in or register to post comments
र
राजाभाउ Mon, 11/04/2019 - 09:51 नवीन
https://sukrutprakashan.com/books/misalpav-diwali-ank-2019 वरून अंक मागवला आहे. ७ ता. पर्यंत येईल म्हणे. वाट बघत आहे.
  • Log in or register to post comments
म
मनिष Mon, 11/04/2019 - 12:13 नवीन
अंक मिळाला, ऑनलाईन अंकाप्रमाणेच छापील अंकही सुरेख झालाय. ह्यासाठी मेहनत घेणार्‍या सगळ्याच टीमचे मनापासून आभार. __/\__
  • Log in or register to post comments
क
कोमल Sun, 11/10/2019 - 09:10 नवीन
मिपा छापील दिवाळी अंकासाठी माझा लेख निवडला गेल्याचा व्यनि संपादकांनी पाठवला तेव्हा फार आनंद झालेला. अंकाबाबत उत्सुकता होती. छापील अंक प्रदर्शित झाल्यानंतर त्यात असलेल्या चुकांबाबत चर्चा पण सुरू झाली. पहिल्याच अंकात काना, मात्रा च्या चुका असतील तर विशेष नाही असा माझा विचार होता. पण छापील अंक हातात पडताच एक गोष्ट लक्षात आली. माझा लेख दुसऱ्याच लेखकाच्या नावाने छापला आहे. फक्त अनुक्रमणिकाच नाही तर मुख्य लेखाच्या खाली सुद्धा माझे नाव नाही. फार निराशाजनक चूक. जबाबदारी कोणाची? आणि लेखात बदलाचे हक्क संपादक मंडळाला दिले होते, लेख दुसऱ्याच्या नावावर छपाईचे नाही. प्रूफ रिडींगला पार फाट्यावर मारल्याचे दिसत आहे. काना, मात्रा, उकार वगैरेंच्या चुका इथे निर्देशनास आणून दिल्या जातात, या छापील चुकांचे काय?
  • Log in or register to post comments
ग
गवि Sun, 11/10/2019 - 10:38 नवीन
या अंकात आपल्या लेखाबाबत ही गंभीर चूक झाली आहे. याखेरीज एक दोन लेखांत ऑनलाइन इमेज urlचे शब्द इमेजसोबत राहून गेले आहेत. शुद्धलेखन चुका मात्र अगदी किमान असतील असा प्रयत्न केला आहे. आपण उल्लेख केलेल्या चुकीबाबत कोणतीही कारणे देणं किंवा सारवासारव करणं याला अर्थ नाही. या अंकाची व्यवस्था बघणाऱ्या टीमचा सदस्य म्हणून या चुकीची जबाबदारी माझ्यावर आहे. मी आपली बिनशर्त जाहीर माफी मागतो. यापुढे अधिक काळजी नक्की घेऊ.
  • Log in or register to post comments
क
कोमल Sun, 11/10/2019 - 12:26 नवीन
काही प्रश्न, 1. मी ही बाब समोर आणायच्या आधी माहीत झाली होती का? - तसं असेल तर तसा जाहीर खुलासा याच्या आधीच का नाही केला गेला? - तसं नसेल तर अंक छापून प्रकाशित होऊनही कोणीच नीट वाचला नाही का? - की जोवर कोणाच्या नजरेस पडत नाही तोवर धकवून नेऊ असा विचार या मागे होता? - अंकाची किंमत सुद्धा काही कमी नाहीये की या गोष्टी कडे कानाडोळा करावा. म्हणजे समजा वर्तमानपत्रात वगैरे असं काही झालं असतं तर दुर्लक्ष केलं गेलं असतं. 2. मिपाचा पहिला छापील दिवाळी अंक म्हणून मोठ्या उत्साहात वाचक वर्ग तो विकत घेणार, संग्रही ठेवणार, काही वर्षांनी परत वाचणार तरी त्यातील ही चूक तशीच राहणार ना. त्याला rectify कसं करणार तुम्ही? इथे 'संपादन' नाही शक्य. 3. तुम्ही माझ्या प्रतिसादाला प्रतिसाद देऊन त्यात माफी मागत आहात मग ती जाहीर कशी झाली? ती फक्त या धाग्यापुरती मर्यादित झाली. 4. काही काळाने ज्या लेखकाच्या नावाने तुम्ही माझा लेख छापला आहे त्यांनी मलाच लेखाधिकार हक्काने गोत्यात आणलं तर? उद्या माझ्यावरही वाङ्मयचौर्य वगैर ठप्पा लागायला हे पुरेसे आहेच. 5. तुमच्या इथल्या माफीचा प्रतिसाद उद्या डिलिट झाला तर?
  • Log in or register to post comments
ग
गवि Sun, 11/10/2019 - 13:37 नवीन
ही बाब आगोदर लक्षात आली होती. छापील अंक अत्यंत मर्यादित लोकांमध्ये वितरित झाल्याने त्यातील ही त्रुटी नेमकी कुठे छापल्यास किंवा प्रकाशित केल्यास योग्य त्या समूहास तो खुलासा होईल हे आधी लक्षात आलं नाही. कोणाच्या नजरेस येत नाही तोवर धकवून नेण्याचा किंवा या चुकीबद्दल गप्प राहून ती दुर्लक्षित करण्याचा असा कोणताही उद्देश नव्हता. अंकाची किंमत जास्त आहे हा मुद्दाही योग्य. या अंकाला कोणताही स्पॉन्सर किंवा जाहिरात याचा आधार नाही. कोणताही नफा यातून कोणालाच अपेक्षित नाही. किंबहुना तोटाच निश्चित अपेक्षित आहे. काही लोकांनी उत्स्फूर्तपणे आणि निरपेक्षपणे हा भार उचलला आहे. त्यांना कमीतकमी नुकसान व्हावं इतकी काळजी घेऊन अंकाची किंमत ठरली आहे. कमी प्रती हाही यातला एक भाग आहे. अंकाची किंमत जी आहे ती आपल्याला परत करणं, आणि मिसळपाव वेबसाईटवर वेगळा धागा काढून माफी मागणं, आपण प्रशांतला नाव पत्ता दिला असल्यास लिखित माफीपत्र पाठवणे, असं आपल्याला जे योग्य वाटेल त्या मार्गाने हीच माफी परत मागण्याची तयारी आहे. कारण ती खरेच मनापासून मागण्याचीच इच्छा छापील अंक टीमची होती आणि आहे. येथील प्रतिसाद देखील पुढे अप्रकाशित न करण्याची विनंती मिसळपाव प्रशासनाला छापील अंक गटातर्फे मी करतो. या छापील अंकाच्या निर्मितीत खुद्द मिपा व्यवस्थापनच पूर्णपणे सामील असल्याने हे सहज शक्य आहे. मनिष या मिपावर परिचित आयडीचं नाव आपल्या लेखाशी लेखक म्हणून छापील अंकात जोडलं गेलं आहे. मिसळपावच्याच ऑनलाइन अंकात अर्थातच ते योग्य रीतीने आलं आहेच. मनिष या जुन्या जाणत्या मिपासदस्यांना मी विनंती करतो की या चुकीबद्दल माफी स्वीकारून कोमल यांना भविष्यात कोणतीही अडचण होणार नाही यासाठी सहकार्य करावे.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sun, 11/10/2019 - 20:11 नवीन
तुम्ही सदर चुकीची जाहीर कबुली नामांकित मराठी वर्तमानपत्रात दिल्याशिवाय मला वाटत नाही कोमल जी मॅटर सेटल करतील, ज्या लेव्हलवर त्या बॅटिंग करत आहेत ते पाहता हाच एक मार्ग आपल्यापुढे दिसतो ;)
  • Log in or register to post comments
ग
गड्डा झब्बू Mon, 11/11/2019 - 04:44 नवीन
झालेली चूक गंभीर आहे यात शंका नाही. आता ति सुधारणेही अशक्य आहे. तरी एक सूचनावजा विनंती करावीशी वाटते कि अजूनही वितरीत झाल्या नसतील अशा प्रतींमध्ये हाताने लिहून अथवा लेखिकेच्या नावाचे लेबल छापून अंकात ते चिकटवता येते का पाहावे. यापूर्वीच अंक हाती पडलेल्या मिपाकरांना एक स्वतंत्र खुलासा प्रसिध्द करून हि आणि आणखीन काही त्रुटी राहील्या असल्यास त्याविषयी सूचित करता येऊ शकेल. लेखिकेला झालेल्या मनस्तापासमोर किंमत, नफा तोटा हे मुद्दे गौण असून वरीलप्रमाणे काही केल्यास त्याची तीव्रता थोडी सौम्य होईल असे वाटते. चू.भू.द्या.घ्या.
  • Log in or register to post comments
म
मनिष Tue, 11/19/2019 - 10:20 नवीन
प्रवासानिमित्त गेले काही दिवस मिपापासून दूर होतो, इथे हे वाचले आणि माझे नाव दिसले म्हणून काही खुलासे -
  • कोमल यांचा राग/वैताग, निराशा अगदीच समजण्यासारखी आहे, त्यांच्या जागी मी असतो तर माझेही असेच झाले असते.
  • मिपाच्या छापील अंकात कोमल यांच्या सांस्कृतिक भारताचा धाकटा भाऊ : इंडोनेशिया ह्या लेखाचा लेखक म्हणून चुकून माझे नाव कसे छापले गेले हे मला माहित नाही, आणि त्याच्याशी माझा काहिही संबंध नाही. त्या चुकीची जवाबदारी योग्य व्यक्तिंनी आधीच घेतली आहे.
  • मी सांस्कृतिक भारताचा धाकटा भाऊ : इंडोनेशिया हा लेख लिहिला नाही, त्यामुळे त्यावर मी स्वामित्व अधिकार (copyright) सांगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही - भविष्यातही माझ्याकडून कोमल यांच्या ह्या लेखावर कुठलाही हक्क सांगितला जाणार नाही ह्याची मी खात्री देतो.
  • मी copyright ह्या विषयातला तज्ञ नाही, पण मिपाच्या छापील अंकात प्रसिध्द झालेल्या साहित्याचे व रेखाटनांचे सर्व अधिकार 'मिसळपाव डॉट कॉम' कडे असल्याचे नमूद केले आहे. माझ्या मते ते अधिकार संबधित लेखकांकडे आहेत असे नमूद करणे आवश्यक होते/आहे. अन्यथा भविष्यात पुस्तकरुपाने आपापले लेख प्रसिध्द करतांना मिपाची लेखी परवानगी लागेल. मिपाचे संपादक त्याचा योग्य खुलासा करतील अशी अपेक्षा आहे.
कोमल यांचा 'To see my name in print' हा मुद्दा समजला आणि मनापासून पटला देखील. मी देखील माझ्या ग़ज़ल का सफ़र.. हा लेख छापील दिवाळी अंकात छापण्याची अनुमती देतांना माझे संपुर्ण नाव कळवले होते, पण कदाचित घाईगडबडीत ते प्रसिध्द झाले नाही. मिपाचा छापील अंक प्रकाशित करतांना सगळ्याच संबधित लोकांनी खूप मेहनत घेतली आहे, आपापला वेळ आणि पैसे खर्च केले आहेत. त्याबद्दल त्या टीमचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, पण त्याचबरोबर त्यांनी थोडे काळजीपुर्वक, जवाबदारीने लेखांचे सर्व अधिकार संबधित लेखकांकडे असल्याचे नमूद करणे गरजेचे होते (त्याच गृहितावर मी माझा लेख ग़ज़ल का सफ़र.. प्रसिध्द करण्यास परवानगी दिली होती). तसेच संबधित लेखक-लेखिकांचे संपुर्ण नाव किंवा इच्छित नाव लेखाबरोबर, कवितेबरोबर द्यायला हवे होते असेही वाटते. आई-वडिलांना (जे ऑनलाईन वाचू शकत नाही) छापील अंक दाखवतांना त्यांनीही 'तुझे पूर्ण नाव नाही का'? हा प्रश्न नाराजीने विचारला, पण त्याबद्दल माझ्याकडे काही उत्तर नव्हते. पुढच्या वेळेस आवर्जून ही काळजी घ्यावी अशी संबधित संपादकांना विनंती. असो. इतक्या देखण्या, वैविध्यपुर्ण आणि दर्जेदार अंकात दृष्ट लागू नये म्हणून ही छोटीशी तीट लागली आहे असे मी समजतो. निदान माझ्या मनात तरी त्याबद्दल कुठलीही अढी नाही. आपल्याच लोकांनी हौसेने इतके सुरेख काम केले आहे, त्यांच्या काही चुका विसरून आपण त्यांना दाद देऊ शकतो ना?
  • Log in or register to post comments
क
कोमल Wed, 11/20/2019 - 15:39 नवीन
प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद मनिष. दिवाळी अंक आणि छापील अंक दोन्ही वाचनीय आहेत यात शंकाच नाही.
मिपाचा छापील अंक प्रकाशित करतांना सगळ्याच संबधित लोकांनी खूप मेहनत घेतली आहे, आपापला वेळ आणि पैसे खर्च केले आहेत. त्याबद्दल त्या टीमचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, पण त्याचबरोबर त्यांनी थोडे काळजीपुर्वक, जवाबदारीने लेखांचे सर्व अधिकार संबधित लेखकांकडे असल्याचे नमूद करणे गरजेचे होते
याच्याशी पूर्णतः सहमत. पुढील छापील अंकात अशा चुका होणार नाहीत हे धरून चालू. आणि त्यासाठी संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Sun, 11/10/2019 - 14:34 नवीन
आपल्या पहिल्या दिवाळी अंकात लेखक म्हणून कोमल यांचे नाव न छापता मनीष यांचे नाव छापले गेले आहे. ही चूक आहे त्याबद्दल या प्रकल्पाचा संपादक म्हणून मी जाहीर माफी मागतोय. हा प्रकल्प खूप कमी वेळेत पूर्ण करायचा असल्यामुळे सर्व टीम सदस्य यांनी खूप काम केले. त्यात अनेक गोष्टी राहून गेल्या. आपल्या समोर दोन पर्याय होते एक म्हणजे अंक रद्द करा आणि दुसरा म्हणजे खूप मेहनत घेऊन अंक प्रकाशित करा. कमी वेळात आपण हा अंक आणला आहे. या अंकाच्या मागे नफा हा भाव नव्हता. तर मिपाकरांच्या संग्रही हा अंक असावा एवढचा विचार होता. आपण मिपा चालवतानाच कुठेही नफा पाहिला नाहीये. काही अंक छापताना असा विचार केला नाही. त्यातून ही मोठी चूक झाली हे मान्य आहे. त्याबात तसा खुलासा कुठेही देता येईल. मिपाचा हा छापील अंक प्रत्यक्षात यायला अनेक सदस्यांनी खूप कष्ट घेतलेत. त्यातून कुणीही नफा या हेतूने काम केले नाही. अंक पाहिल्यास एकही जाहिरात नाही. त्यामुळे जो खर्च आला त्यासाठी किंमत तेवढी ठेवली आहे. अंकाच्या छपाईसाठी लागलेला अर्धा खर्च सुद्धा निघणे अपेक्षित नाही. तरी सुद्धा मिपा ज्या हौसेने चालवल्या जातंय त्याच हौसेने हा अंक काढलाय. जी झाली ती चूक आहे हे आम्ही मान्य करतोय. कृपया याला अन्य भावनेने घेऊ नये अशी विनंती आहे.
  • Log in or register to post comments
क
कोमल Sun, 11/10/2019 - 16:05 नवीन
प्रतिसादाबद्दल आभार नीलकांत. माझा अंकाच्या किंमतीचा मुद्दा मी चुकीच्या पद्धतीने मांडला असावा असं वाटतं. माझ्या म्हणण्याचा उद्देश होता की एका अंकाची किंमत जास्त आहे म्हणजे त्यामुळे संपूर्ण प्रोजेक्टची किंमत सुध्दा जास्त होते. मी प्रयत्न करते एक उदाहरण देण्याचा. समजा 1000 चा प्रोजेक्ट मध्ये एक वेबसाईट 5 पाने बनवून घेत असेल तर त्यात जास्त लक्षपूर्वक काम करावे लागते. तसेच जर दुसरी वेबसाईट 1000 मध्येच 50 पाने बनवून घेत असेल तर कामाची क्वालिटी आधी इतकी चांगली नाही राहत. त्याच प्रमाणे आपल्या अंकाची किंमत जास्त आहे, त्यात छोट्या छोट्या चुका राहू शकतात, पण ही चूक माझ्या दृष्टीने छोटी नाही. इतर कुठल्याही कमी किमतीच्या मासिकात लेखकाचे नाव चुकणे वगैरे झालं तरी मी हे म्हणून सोडून दिलं असतं की छोटं तर मासिक आहे, असं होणारच. तुम्हाला कोणालाही किंमत जास्त किंवा कमी यावरून दुखावल्याचा माझा हेतू नव्हता आणि तो कधीही नसेल. नीलकांत, मिपासाठी तुम्ही जे करत आहात त्याबद्दल कायम आदर आहेच. आणि मिपा मलाही तितक्या जवळचं आहे म्हणूनही झाल्या प्रकारचं जास्त वाईट वाटत असेल. अशीच गोष्ट आधीही माझ्या सोबत आकाशवाणी माध्यमातून झाली आहे, तेव्हा शाळेत लिहिलेली नाटिका हस्तलिखितातून परस्पर कोणीतरी घेऊन, कलाकारांसोबत ती बसवून आकाशवाणीवर प्रकाशित केली होती. त्यामुळे याचं दुःख मी ओळखून आहे. तुम्हाला अंकाची किंमत किंवा मिपाचा खर्च याबाबत दुखावण्याचा कधीही हेतू नव्हता. तसा गैरसमज झाला असेल तर क्षमा असावी. एक सजेशन फक्त होतं की वेळेअभावी असं होण्याच्या शक्यता असतील तर वेगळ्या एखाद्या सणाच्या दिवशी छापील अंक प्रकाशित केला असता तरी सगळ्या वाचकांनी तेवढ्याच आनंदाने तो डोक्यावर घेतला असता जेवढा आता घेतला आहे. _/\_
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sun, 11/10/2019 - 19:36 नवीन
प्रिंटिंग मिस्टक इज नॉट वांगमयचौर्य. जिथे भले भले प्रकाशन समूह प्रोजेक्ट्स कमालीच्या व्यावसायिकतेने राबवून माती खाता आणी नंतर करेक्शन जाहीर करतात तिथे पहिल्या हौशी प्रयत्नात होणारी गफलत आपण समजून घ्यावी. आता करायच्या गोष्टी ह्याच की अजून एक आवृत्ती निघणार असेल तर चूक सुधारा व झालेल्या चुकीची जाहीर माहिती त्यात द्या. पुढील दिवाळी अंकात सदरील चूक झाल्याचे नमूद करून त्यात लेखिकेची माफी मागा. शक्य असेल तर अजून एक प्रत संबंधितांनी स्वखर्चाने चुकीची दुरुस्ती करून लेखिकेला संग्रहासाठी भेट म्हणून द्यावी.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 11/11/2019 - 03:34 नवीन
शक्य असेल तर अजून एक प्रत संबंधितांनी स्वखर्चाने चुकीची दुरुस्ती करून लेखिकेला संग्रहासाठी भेट म्हणून द्यावी.
तसे करण्यापेक्षा त्यांच्या लेखाखाली आलेल्या दुसर्‍या नावाचे एक पान पुन्हा छापून अन त्याला प्रस्तावना म्हणून दिवाळी अंकाच्या संपादकांच्या सहीनिशी त्यांना पाठवून द्यावे. कोमल यांनी ते पत्र असलेले पान त्यांच्या हाती असलेल्या अंकामध्ये डकवून घ्यावे. दुसरे असे की ऑनलाईन अंकामध्ये कोमल यांचा जो धागा आहे त्याच्या सुरूवातीलाच ऑफलाईन अंकात झालेली गफलत जाहीर करावी. दिलगीरी व्यक्त करावी. तसेही हा अंक माहितीतल्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त वितरीत झाला आहे. ते बहुतेक येथील सदस्य असावेत. त्यामुळे ऑनलाईन अंकामध्ये ते हा खुलासा वाचतीलच. अन दुसरे नाव असलेले सदस्य कॉपीराईट घेणार नाहीत. तेवढा सुज्ञपणा येथील सदस्य दुसर्‍या सदस्याप्रती दाखवतातच. अंक खूप घाईत तयार केला आहे. वेळ, किंमत यांची सांगड घालत अन त्यांचा खाजगी वेळ या अंकासाठी मिपा तसेच अंकाच्या व्यवस्थापन सदस्यांनी यात घातला आहे. त्यांचे कौतूक आहेच. मोठ्यामोठ्या दिवाळी अंकांच्या प्रकल्पात तृटी असू शकतात. आता हार्डकॉपीतली चूक दुरूस्त करणे शक्यच नाही पण त्याबाबतचा खुलासा इतरत्र होवू शकतो.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Mon, 11/11/2019 - 04:26 नवीन
एकच पान छापून मूळ मिपा अंक उसवून तो परत जोडून लेखिकेला द्यावा असा विचारही आला होता खर्च वाचवा म्हणून परंतु ते मला अंप्रोफेशनल वाटले. हौशी असले तर मंडळाने केलेली चूक काय मोलाची आहे हे समजून येण्यासाठी आख्खी एक प्रतच परत छापणे मला योग्य वाटले ज्यामुळे प्रथम आवृत्तीची सर त्याला कायम राहील.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Mon, 11/11/2019 - 04:28 नवीन
म्हणून एक मिपाकर या नात्याने मला शरमही वाटते
  • Log in or register to post comments
क
कोमल Mon, 11/11/2019 - 07:29 नवीन
प्रत्येकाच्या व्यक्त होण्याच्या, मतप्रदर्शन करायच्या मर्यादा असतात, किंवा कधी कधी बाकी काहो कारण असू शकते. तुम्ही, पाभे, गड्डा झब्बू यांनी आपले मत व्यक्त केले त्याबद्दल छान वाटत आहे. जाता जाता हॅरी पॉटर मधील एक संवाद आठवला, जिथे नामांकित पत्रकार रिटा स्किटर हॅरीची मुलाखत ल्युना लवगुडच्या वडिलांच्या मासिकात छापणार असते. ल्युना रिटा ला सांगते, "Daddy don't pay people to write for the magazine. They do it because it's an honour. And ofcourse to see their name in print." माझीही तेवढीच अपेक्षा होती. To see my name in print. असो. :)
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Wed, 11/20/2019 - 16:25 नवीन
पण मी फार आळशी माणूस आहे. आपण खरोखर आपल्या नावानिशी एक अंक छापून घ्यावा असे माझे प्रांजळ मत आहे त्यामधे दिलगिरी पत्रही छापून घ्यावे. जेंव्हा जेंव्हा संबंधीत मिपाकरांची भेट होईल त्यांची प्रत्यक्ष सही तेथे अवश्य घ्यावी. त्या अंकाचा खर्च मी करायला तयार आहे आपले ऑनलाइन ट्रान्सफर डिटेल्स व्यनीमधून कळवावेत.
  • Log in or register to post comments
स
स्मिताके Mon, 11/11/2019 - 13:46 नवीन
यापैकी काही करता येईल का? पूर्वी "आहे मनोहर तरी" ची विक्री झाल्यानंतर आणखी चार पानं प्रकाशित झाली होती, आणि इच्छुकांनी पावती दाखवून ती घेऊन जावी असं निवेदन वृत्तपत्रांतून छापलं गेलं होतं, असं आठवतं. तसंच काहीसं सुचवते. सुधारित अनुक्रमणिका आणि दिलगिरी पत्र अशी एकत्रित पीडीएफ करून ती मिपाच्या सर्व सदस्यांना ईमेलद्वारे पाठवता येईल, मिपा संस्थळावरही दिवाळी अंकाबरोबर कायमस्वरूपी उपलब्ध ठेवता येईल. अजून काही अंक विकले गेले नसले तर त्या अंकांबरोबर तेवढं एक पान छापील स्वरूपात देता येईल.
  • Log in or register to post comments
श
शुभां म. Mon, 11/11/2019 - 08:24 नवीन
कालच आणला सुकृत प्रकाशनच्या ऑफिस मधून बाबांसाठी . दिवाळी अंकाप्रमाणे मिसळपावचे काही निवडक लेखमाला पण मिळतील का छापील स्वरूपात ? सतत ऑनलाईन वाचवत नाही म्हणून मी प्रिंट काढून वाचायचा प्रयत्न केला पण छापील पुस्तकच बरे वाटते वाचायला.
  • Log in or register to post comments
ग
गड्डा झब्बू Fri, 11/15/2019 - 21:44 नवीन
ते कोमल ताईंच्या बाबतीत झालेल्या गडबडी बाबत काही खुलासा होईल का? की पुढील वर्षीच्या अंकात देणार आहात ? म्हणजे पुढच्या वर्षी विचारावा म्हणतो..
  • Log in or register to post comments
स
सुमो Wed, 11/20/2019 - 16:09 नवीन
इतक्या देखण्या, वैविध्यपुर्ण आणि दर्जेदार अंकात दृष्ट लागू नये म्हणून ही छोटीशी तीट लागली आहे असे मी समजतो. निदान माझ्या मनात तरी त्याबद्दल कुठलीही अढी नाही. आपल्याच लोकांनी हौसेने इतके सुरेख काम केले आहे, त्यांच्या काही चुका विसरून आपण त्यांना दाद देऊ शकतो ना?
ज्जे बात ! जियो मनिष.... आणि कोमल यांनीही तितक्याच खुल्या मनाने पुढील अंकासाठी दिलेल्या शुभेच्छा पण भावल्या.. आभार दोघांचेही आणि पुढील दिवाळी अंकात तुम्हा दोघांचेही लेख वाचायला आवडतील. (वाचक) सुमो
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा