Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

गंमत घ्यावी..‌

प — प्राची अश्विनी, Sat, 10/19/2019 - 14:09
ज्या प्रश्नांना उत्तर नसते, वा ज्यांचे ना उत्तर सुचते, चौरस घेउन कागद काही, लिहून घ्यावे सुबक नेटके. करून होडी त्या सा-यांची, पाण्यावरती सोडुन द्यावी. काठावरती बसून आपण, त्या होडीची गंमत घ्यावी.. कुणी खोडकर खट्याळ मुलगा त्या होडीला उचलुन घेइल. हसेल क्षणभर.. पान जाळिचे शीड म्हणूनी वरती ठेविल. फुंकर घालुन हलके हलके पाण्यामध्ये लोटुन देइल .. त्या पानाचा भार केवढा?? इवली होडी कशास साहिल? डुबकी मारील एखादी वा लटपट लटपट पुढेहि जाइल.. नवीन पाणी नवा किनारा, दूरदूर वा-याने न्यावी .. काठावरती बसून आपण, त्या होडीची गंमत घ्यावी.. बैरागी कुणि घाटावरचा, त्या होडीच्या घड्या उघडुनी, ओल्या भिजल्या शब्दांनी तो भिजवुन घेइल अपुली वाणी. वैशाखाच्या वणव्यामध्ये गाइल मग तो पाउसगाणी. त्या गाण्यांचे मृद्गंधासम, वारा घेउन येइल अत्तर.. सूरांमध्ये, गंधामध्ये सापडेल बघ तुजला उत्तर! नवीन होडी पुन्हा एकदा..पुन्हा एकदा सोडुन द्यावी.. काठावरती बसून आपण त्या होडीची गंमत घ्यावी..

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7831 views

💬 प्रतिसाद
य
यशोधरा Sat, 10/19/2019 - 14:57 नवीन
वा, वा. कल्पना फार आवडल्या.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 10/19/2019 - 15:58 नवीन
भावार्थ खरेच सुंदर .. काय सुरेख कल्पना ..मस्तच ..
  • Log in or register to post comments
प
पहाटवारा Sat, 10/19/2019 - 16:31 नवीन
सुरेख !!
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sat, 10/19/2019 - 16:50 नवीन
वाह. खासंच!!
  • Log in or register to post comments
प
पलाश Sat, 10/19/2019 - 18:32 नवीन
विनाउत्तराच्या अथवा उत्तर सुचत नसलेल्या प्रश्नांचं उत्तर गाण्याच्या सुरात आणि अत्तराच्या सुगंधात शोधू पहाणारी ही होडीची गंमतीदार कल्पना आणि या होडीचा प्रवास फारच आवडला. कविता चालीतही म्हणून पाहिली. वाह, अप्रतिम!! _/\_
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sat, 10/19/2019 - 18:41 नवीन
आवडली !
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Sat, 10/19/2019 - 19:58 नवीन
छान
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 10/20/2019 - 04:01 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sun, 10/20/2019 - 05:50 नवीन
मनापासून धन्यवाद सर्वांनाच.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 10/21/2019 - 04:16 नवीन
सुंदर कल्पना!
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 10/21/2019 - 05:23 नवीन
अप्रतीम , आता प्राची अश्विनींनी आपल्या आता पर्यंतच्या लेखनावर आधारीत संग्रह प्रकाशित आवर्जून करावा असे आग्रहाने सुचवावेसे वाटते. जेव्हा कवितेची ओळख कविने होते अशा मिपाकर कविंमध्ये प्राची अश्विनींची गणना होतेच पण त्यांच्या काव्याचा या कवितेतून सांगितलेला सुगंध त्यांचा ग्रंथप्रकाशित होऊन उर्वरीत महाराष्ट्र - आणि बृहन महाराष्ट्र आणि इतरत्र सुदूर पोहोचावा ही सदिछा.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 11/02/2019 - 05:58 नवीन
खूप खूप धन्यवाद माहितगार...
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 10/22/2019 - 05:39 नवीन
मस्त कल्पना..... कविता आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Tue, 10/22/2019 - 08:09 नवीन
अतिशय सकस आणि अर्थपूर्ण! आणि शब्दरचना, पोत, सूर, शैली...सारे उत्कृष्टच! खूप आवडली!
  • Log in or register to post comments
स
सदस्य११ Tue, 10/22/2019 - 14:04 नवीन
छान कविता. कल्पनाही खूप सुन्दर आणी शब्द अगदी नेटके.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Fri, 11/01/2019 - 14:40 नवीन
फारच सुंदर कविता
वैशाखाच्या वणव्यामध्ये गाइल मग तो पाउसगाणी. त्या गाण्यांचे मृद्गंधासम, वारा घेउन येइल अत्तर.. सूरांमध्ये, गंधामध्ये सापडेल बघ तुजला उत्तर!
ह्या ओळी तर मस्तच.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 11/02/2019 - 05:59 नवीन
तुमच्या सर्वांच्या प्रतिसादांमुळे उत्साह वाढतो. मनापासून thanks.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 22 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 23 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 23 hours ago
  • सुंदर !!
    1 day 23 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 23 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा