Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
दिवाळी अंक

घारगे

ग
गणपा
Fri, 10/25/2019 - 02:30
💬 13 प्रतिसाद

मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका


घारगे




साहित्य : २ वाट्या लाल भोपळा सोलून त्याचा कीस १ वाटी किसलेला गूळ कणीक आणि तांदळाचं पीठ (अंदाजे कणकेच्या निम्मं) हे लागेल तसं. तळणासाठी तेल पिठीसाखर साजूक तूप चवीनुसार मीठ कृती : एका कढईत २ चमचे तूप गरम करून त्यात भोपळ्याचा कीस घालून परतून घ्या. नंतर त्यावर झाकण लावून कीस चांगला वाफवून घ्या. कीस शिजून मऊ झाला की त्यात गूळ घाला. गूळ वितळला आणि मिश्रणाला चांगली उकळी आली की आच बंद करा आणि हे मिश्रण गार करत ठेवा. मिश्रण गार झाल्यावर त्यात मावेल तेवढी तांदळाची पिठी आणि कणीक यांचं मिश्रण घाला. हे प्रमाण अंदाजानेच घ्या, साधारण पुरीसाठी भिजवतो तितपत घट्ट पीठ भिजवा. पुरी एवढ्या आकाराचे गोळे करून घारगे लाटून घ्या. कढईत गरम तेलावर घारगे लाल रंगावर खरपूस तळून घ्या. गरमागरम घारग्यांवर चहा गाळणीतून पिठीसाखर भुरभुरा. आवडीनुसार वरून साजूक तूपाची धार सोडा. IMG-20190621-124936
20191016-122815
अनुक्रमणिका

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 12542 views

💬 प्रतिसाद (13)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 10/26/2019 - 08:39 नवीन
नंबर एक. आवडली वेगळी पाककृती. अजून पाककृती करते राहा..!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sat, 10/26/2019 - 09:40 नवीन
आहाहा..मस्तंच!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 10/26/2019 - 09:51 नवीन
छान.
  • Log in or register to post comments
स
सुमो Sat, 10/26/2019 - 12:24 नवीन
छानच... पण गणपा टच मिसल्यासारखं वाटतय
२ वाट्या लाल भोपळा सोलून त्याचा कीस
इथे बाsरिक किसलेल्या लाल भोपळ्याचा फोटो असे पाकृच्या प्रत्येक कृतीचे कलात्मक फोटो हीच गणपा यांची खासियत आहे.
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश Sat, 10/26/2019 - 21:33 नवीन
लई भारी ! Image removed.
  • Log in or register to post comments
ह
हरिहर Tue, 10/29/2019 - 04:19 नवीन
मस्त पाकृ.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 10/29/2019 - 04:33 नवीन
आसावरी घारगे ला कॊम्पिटीशन गणपा घारगे :)
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 12/05/2019 - 21:06 नवीन
चला काका तुमचं आपलं काहितरीच. याला काय अर्थ ये का? ए शेंगदान्या, इकडं ये. काका काय म्हनतेत पाहिलं का? तुला रे काय घारग्यांची चव कळती का? गाढवच ए नुसता. व्हय तिकडं!
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 11/04/2019 - 15:30 नवीन
आवडली रेसिपी...घारगे हा खाद्यप्रकार मनापासून आवडतो!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 11/04/2019 - 16:24 नवीन
घारगे हा प्रकार आवडत नाही पण गणपाचं सादरीकरण मस्तच.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 12/05/2019 - 21:08 नवीन
मंग पयल्या तळणीचा माल ये हा. तोंडात टाका फक्त. लगेच पानी व्हईन बघा. आता याला काय अर्थ ये का?
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Mon, 11/04/2019 - 17:26 नवीन
याला आम्ही घार्या म्हणतो. पण लाटावे एवढे पीठ घालत नाही. हाताने लहान आकाराच्या गोल घार्या (नीट टाईप होत नाहीय हा शब्द) थाप तो. जरा जाडसर असतात व टुम्म फुगतात. याच्यावर आम्ही लोणी लाऊनच खातो. अहाहा आता करतेच.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 11/23/2019 - 05:06 नवीन
आता मी पण फोटो शिवाय पाक कृती टाकू शकतो.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 26 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 30 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 33 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा