घारगे
मिपा दिवाळी अंक २०१९
अनुक्रमणिकाघारगे

साहित्य : २ वाट्या लाल भोपळा सोलून त्याचा कीस १ वाटी किसलेला गूळ कणीक आणि तांदळाचं पीठ (अंदाजे कणकेच्या निम्मं) हे लागेल तसं. तळणासाठी तेल पिठीसाखर साजूक तूप चवीनुसार मीठ कृती : एका कढईत २ चमचे तूप गरम करून त्यात भोपळ्याचा कीस घालून परतून घ्या. नंतर त्यावर झाकण लावून कीस चांगला वाफवून घ्या. कीस शिजून मऊ झाला की त्यात गूळ घाला. गूळ वितळला आणि मिश्रणाला चांगली उकळी आली की आच बंद करा आणि हे मिश्रण गार करत ठेवा. मिश्रण गार झाल्यावर त्यात मावेल तेवढी तांदळाची पिठी आणि कणीक यांचं मिश्रण घाला. हे प्रमाण अंदाजानेच घ्या, साधारण पुरीसाठी भिजवतो तितपत घट्ट पीठ भिजवा. पुरी एवढ्या आकाराचे गोळे करून घारगे लाटून घ्या. कढईत गरम तेलावर घारगे लाल रंगावर खरपूस तळून घ्या. गरमागरम घारग्यांवर चहा गाळणीतून पिठीसाखर भुरभुरा. आवडीनुसार वरून साजूक तूपाची धार सोडा.

.png)
💬 प्रतिसाद
(13)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 10/26/2019 - 08:39
नवीन
नंबर एक. आवडली वेगळी पाककृती. अजून पाककृती करते राहा..!!
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Sat, 10/26/2019 - 09:40
नवीन
आहाहा..मस्तंच!
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Sat, 10/26/2019 - 09:51
नवीन
छान.
- Log in or register to post comments
स
सुमो
Sat, 10/26/2019 - 12:24
नवीन
छानच...
पण
गणपा टच मिसल्यासारखं वाटतय
इथे बाsरिक किसलेल्या लाल भोपळ्याचा फोटो
असे पाकृच्या प्रत्येक कृतीचे कलात्मक फोटो हीच गणपा यांची खासियत आहे.
- Log in or register to post comments
अ
अथांग आकाश
Sat, 10/26/2019 - 21:33
नवीन
लई भारी !

- Log in or register to post comments
ह
हरिहर
Tue, 10/29/2019 - 04:19
नवीन
मस्त पाकृ.
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Tue, 10/29/2019 - 04:33
नवीन
आसावरी घारगे ला कॊम्पिटीशन गणपा घारगे :)
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
गुरुवार, 12/05/2019 - 21:06
नवीन
चला काका तुमचं आपलं काहितरीच.
याला काय अर्थ ये का?
ए शेंगदान्या, इकडं ये. काका काय म्हनतेत पाहिलं का? तुला रे काय घारग्यांची चव कळती का? गाढवच ए नुसता. व्हय तिकडं!
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Mon, 11/04/2019 - 15:30
नवीन
आवडली रेसिपी...घारगे हा खाद्यप्रकार मनापासून आवडतो!
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 11/04/2019 - 16:24
नवीन
घारगे हा प्रकार आवडत नाही पण गणपाचं सादरीकरण मस्तच.
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
गुरुवार, 12/05/2019 - 21:08
नवीन
मंग पयल्या तळणीचा माल ये हा.
तोंडात टाका फक्त. लगेच पानी व्हईन बघा.
आता याला काय अर्थ ये का?
- Log in or register to post comments
श
श्वेता२४
Mon, 11/04/2019 - 17:26
नवीन
याला आम्ही घार्या म्हणतो. पण लाटावे एवढे पीठ घालत नाही. हाताने लहान आकाराच्या गोल घार्या (नीट टाईप होत नाहीय हा शब्द) थाप तो. जरा जाडसर असतात व टुम्म फुगतात. याच्यावर आम्ही लोणी लाऊनच खातो. अहाहा आता करतेच.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 11/23/2019 - 05:06
नवीन
आता मी पण फोटो शिवाय पाक कृती टाकू शकतो.
- Log in or register to post comments