Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
दिवाळी अंक

निरोप

म
मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 10/25/2019 - 02:30
💬 11 प्रतिसाद

मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका


निरोप




तुझा निरोप घेऊन निघाल्यावर मनाच्या कोपर्‍यातली 'तू' परत परत डोके वर काढतच राहतेस
.
काल रात्रीचीच गोष्ट तुझा बदामी डोळ्यांचा चेहरा माझ्या ओंजळीत भरून घेतल्यावर सुख हातात आल्यासारखे वाटले ...
.
एक आनंदाश्रू नकळत निसटला जेव्हा त्या डोळ्यांतून तेव्हा क्षणात ते सुख दवभरल्या गुलाबात परावर्तित झाले
.
भरून आलेला कंठ आवरत नजर फिरवली समोरच्या भव्य रक्तवर्णी गुलमोहराने भानावर आणले हातातले सुख निसटले
.
कधी कधी वाटते मी त्या गुलमोहरासारखाच आहे एकाकी पडल्यामुळे रक्तवर्णी धुमारे फुटल्यासारखा माथ्यावर भडक, पण आतून हिरवा
.
आतला हिरवा कोवळेपणा जाणवल्यावर, तिथे परत 'तू' डोकावतेस..
.
ही अशीच 'तू' परत परत डोकावून जातेस निरोप घेऊन आल्यावर
.
अन् मी मग त्या गुलमोहराला वाईटसाइट बोलत त्याच्या इतक्याच रक्तवर्णी डोळ्याने पहात बसतो..
.
'तू' परत डोकावण्याची वाट पहात. नाही, निसटलेल्या सुखाची वाट पहात..

20191016-122815
अनुक्रमणिका

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6849 views

💬 प्रतिसाद (11)
य
यशोधरा Sat, 10/26/2019 - 10:33 नवीन
मस्त लिहिलेय. बऱ्याच दिवसांनी वाचले मिका तुझे लिखाण.
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Mon, 10/28/2019 - 11:33 नवीन
मस्त. मिका टच.
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 10/28/2019 - 11:59 नवीन
मिका, लै भारी रे.. !!
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Mon, 10/28/2019 - 19:20 नवीन
वाह...सुंदर
मिका टच.
असेच म्हणते.
  • Log in or register to post comments
म
मनिष Wed, 10/30/2019 - 10:25 नवीन
मस्त मिकाजी.
कधी कधी वाटते मी त्या गुलमोहरासारखाच आहे एकाकी पडल्यामुळे रक्तवर्णी धुमारे फुटल्यासारखा माथ्यावर भडक, पण आतून हिरवा
  • Log in or register to post comments
इ
इनिगोय Wed, 10/30/2019 - 18:12 नवीन
:)
  • Log in or register to post comments
फ
फिझा गुरुवार, 10/31/2019 - 11:45 नवीन
मस्तय कविता ..... भावना , नेमक्या आणि अचूक कशा व्यक्त करायच्या तुमच्याकडून शिकायला हवं ..... कधी कधी वाटते मी त्या गुलमोहरासारखाच आहे एकाकी पडल्यामुळे रक्तवर्णी धुमारे फुटल्यासारखा माथ्यावर भडक, पण आतून हिरवा ------------------हे मस्त ....... सगळेच एकटे असतात .... असो . कविता छान !
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Fri, 11/08/2019 - 13:27 नवीन
काल रात्रीचीच गोष्ट तुझा बदामी डोळ्यांचा चेहरा माझ्या ओंजळीत भरून घेतल्यावर सुख हातात आल्यासारखे वाटले ... क्या बात....
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 11/09/2019 - 07:58 नवीन
फारच सुरेख आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 11/09/2019 - 09:20 नवीन
मी मग त्या गुलमोहराला वाईटसाइट बोलत त्याच्या इतक्याच रक्तवर्णी डोळ्याने पहात बसतो..
  • Log in or register to post comments
अ
अलकनंदा Tue, 11/19/2019 - 09:37 नवीन
गुलामोहराच्या रुपकाचा वापर आवडला. छान.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 34 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 42 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा