Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चार पाच प्लेट भाजी खरेदी

प
पाषाणभेद
Wed, 10/09/2019 - 01:06
🗣 7 प्रतिसाद
(हे या रेसेपीचे पुरस्कर्ते आहेत.) २०२० पर्यंत भाज्यांचे बरेच नॉर्म्स बदलणार आहेत, बिगर तेलाच्या भाज्या येणार आहेत तर आता भाजी घेणे किती सयुक्तिक आहे? रोज फारतर २५० किलोग्राम भाजी खरेदी करू शकते तर उकडलेली, तळलेली किंवा भाजलेली ह्यापैकी कशाने बनलेली भाजी सयुक्तिक आहे? अर्थात महिन्याभरात फारतर एखादे दुसरी भाजी महाराष्ट्रातील होवू शकते. शिवाय मंदीमुळे खरेच भाज्या जास्त किमतीला मिळत आहेत का किंवा त्यांच्या किमती अजून वाढतील का? नवीन नॉर्म्समुळे शिळ्या भाज्या आता घेणे फायद्यात ठरू शकते का? सद्या स्विगी उबेर इट्स हा पर्याय आहेच पण त्यांच्यासाठी वाट पाहणे आणि ते ऐनवेळेला दर वाढवतात. त्याहीपेक्षा ते वेळेवर येत नाहीत. त्यामुळे ते मागवणे अवघड आहे. तसेही बाहेरील भाज्या शौक म्हणून नाही तर गरज म्हणूनच मागवायच्या आहेत. पोटाचे दुखणे भयंकर वाढल्याने चार पाच प्लेट भाजी घ्यावी असा विचार आहे. खरोखर चार पाच प्लेट्सने सहा सात प्लेट्सच्या तुलनेत पोटाचे दुखणे थोडे सुसह्य होवू शकते का? शिवाय पैशाचा विचार करता शिळी भाजीच घ्यावी की ताजी? (वाचक भाज्यांऐवजी भजीही घेवू शकतात. सामग्री वरीलप्रमाणेच वापरावी लागेल. तिखट मिठ चवीप्रमाणे लावावे. वरतून कोथंबीर पेरल्यास दुसर्‍या वाचकाच्या तोंडाला पाणी सुटू शकते.)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4890 views

🗣 चर्चा (7)
ज
जालिम लोशन Wed, 10/09/2019 - 10:59 नवीन
खल्लास
  • Log in or register to post comments
न
नरेश माने Wed, 10/09/2019 - 11:26 नवीन
रोज फारतर २५० किलोग्राम भाजी खरेदी करू शकते.... >>>>> खरं की काय? २५० किलोग्राम गावजेवण असते का रोज?
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 10/09/2019 - 14:26 नवीन
ग्रामभोजन म्हणा!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 10/09/2019 - 11:29 नवीन
रोज २५० किलोग्राम भाजी? एका माणसाला? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Wed, 10/09/2019 - 13:15 नवीन
पेटसफा , कायमचूर्ण वगैरे देखील घेणं आपणास आवश्यक आहे असे वाटते
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 10/09/2019 - 14:23 नवीन
ग्राम असे कृपया वाचावे.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Wed, 10/09/2019 - 15:31 नवीन
हसून हसून मेलो... मस्त विडंबन... !!!!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा