दो डोळ्यांचे....
दो डोळ्यांचे झरते पाणी इथून मजला स्पष्ट दिसे
त्या पाण्याच्या आवेगावर ओठावरले गीत फिरे
डोळ्यांमधल्या रेषा तांबूस पूरी सांगते व्यथा खरी
सांगायाला शब्द कशाला झुळूक हळवी एक उरी
गदगद्णारे हृदय राजसा तुझा पोचतो इथे हुंदका
पाण्यालाही जागर असतो दिव्यात नसते केवळ ज्वाला
सहवासाचे अत्तर नाही तरी मिठीचा भास कोवळा
इथे तिथेही कुठेच नाही तरी बहराचा शुद्ध सोहळा
-शिवकन्या
💬 प्रतिसाद
य
यशोधरा
Fri, 10/04/2019 - 09:20
नवीन
वा! सुरेख!
- Log in or register to post comments
र
रातराणी
Fri, 10/04/2019 - 22:18
नवीन
अप्रतिम!!
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Wed, 10/09/2019 - 10:27
नवीन
ह्या ओळी खुप म्हणजे खुप आर्त वाटल्या.. निव्वळ अप्रतिम
पुन्हा पुन्हा वाचली कविता..
लिहित रहा... वाचत आहे..
- Log in or register to post comments