गंध अद्वैताचे
केसांचे हळवे वळसे
पाठीवर सळसळ हलके
सुटण्या धडपडती ओले
जणू कामशराचे चेले
मानेला लटके मुरके
ज्याने सगळे वेढे सुटले
मग कुंतलसंभाराचे
जणू प्रपात ते कोसळले
धुंद मोगरा हसे साजरा
गंधित झाला तुला माळता
क्षण शारीर करुनी गेला
मादकतेचा कोरा गजरा
चढता लाली तुझ्याच गाली
अवचित होई गोरामोरा
केशी लपवुनी अंग मखमली
चेहरा झाके विसरुनी तोरा
सुमनदलांची तनू थरथरे
मुग्ध मोकळी चुरगळ पसरे
उन्मनी तुझे हास्य मोहरे
गात्रीं तुझिया लक्ष मोगरे
धवलपुष्पी सुख उन्मळे
कुसुम हरपले मुरून गेले
भारुनी काया तुझी परिमळे
उरले गंधांचे अद्वैत आगळे ।
- अभिजीत
💬 प्रतिसाद
ज
जयंत कुलकर्णी
Mon, 09/23/2019 - 12:58
नवीन
मस्त... !
- Log in or register to post comments
म
मायमराठी
Wed, 09/25/2019 - 06:27
नवीन
प्रतिसादाबद्दल अनेकानेक आभार
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 09/25/2019 - 06:33
नवीन
अहाहा !
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
म
मायमराठी
गुरुवार, 09/26/2019 - 05:46
नवीन
अन्न, वस्त्र, निवारा या व्यतिरिक्त पाठ थोपटली जाणे ही फार महत्त्वाची गरज असते. अर्थात त्या कुवतीचे काम असायला हवं. सर, आपला अभिप्राय " वारी" पासूनच फार आदरणीय आहे.
- Log in or register to post comments