Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

(दुपारी)

ज — ज्ञानोबाचे पैजार, Wed, 09/18/2019 - 11:01
पेरणा अर्थात चाल :- बीज अंकूरे अंकूरे (जिथे चालीत निमुट पणे बसणार नाही तिकडे दडपून कोंबा) ही चाल जमली नाही तर "डोळे कशा साठी"च्या चालीत बसवा, तेही नाही जमले तर "शुरा मी वंदीले" ते ही नाही जमले तर "आज ब्लु है पानी पानी" ते ही नाही जमले तर "अरुणी किरणी धरणी गगन झलके" आणि ते ही नाही जमले तर नुसती वाचा.

(दुपारी)

तिच्या पायरवाची गाज, त्याने दडपली छाती, जैसे वीसमणी हातोड्याने घाव घणाचे घालती, तिच्या कपाळीची आठी असे संशय त्याच्या पाठी, लालबुंद डोळे जणू, तांबड्या रश्याचीच वाटी तिच्या पाठीचे भिंताड थर मेदाचा तो जाड, तिच्या भव्य कटीपुढे, भासे गजराज रोड .. तिच्या बाहूंचा मांडव, साडी गलबताचे शीड, तिची महाकाय काया ज्याचे ओझे अवघड.. सुस्त दुपारच्या प्रहरी, ती घोरे भयाकारी, मन थरारे थरारे, नाद ऐकोनी अघोरी पैजारबुवा,

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 12835 views

💬 प्रतिसाद
ज
जॉनविक्क Wed, 09/18/2019 - 11:08 नवीन
खपल्या गेलो आहे.
  • Log in or register to post comments
म
मायमराठी Wed, 09/18/2019 - 11:30 नवीन
थाई भाषेत ५ या संख्येला 'हा' असे म्हणतात. विडंबन वाचून ५५५५५५५ झाले :)).
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 09/18/2019 - 12:26 नवीन
पैजारबुवा रॉक्स =))
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 09/18/2019 - 15:37 नवीन
=)) =)) =)) आज दुपारी दुपारी । घेतली पैजाराने सुपारी ॥
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Wed, 09/18/2019 - 19:30 नवीन
हाण तिच्यायला !!! :-))))
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Wed, 09/18/2019 - 19:35 नवीन
भन्नाट
  • Log in or register to post comments
र
रातराणी Wed, 09/18/2019 - 22:36 नवीन
पैजारबुवा कधीच निराश करत नाहीत.. :)
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 09/19/2019 - 00:54 नवीन
झक्कास! मूळ पाककृती इतकीच ही अंडे घालून केलेली पण टेसदार लागतेय. =)) Sandy
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 09/21/2019 - 08:59 नवीन
एकदम खरे. दोन्ही कविता वेगळ्याच आहेत. यावर कुठलीही झाक नाही. नविन माल आहे एकदम.
  • Log in or register to post comments
न
नि३सोलपुरकर गुरुवार, 09/19/2019 - 09:12 नवीन
तिच्या भव्य कटीपुढे, भासे गजराज रोड .. =)) =)) =))
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे गुरुवार, 09/19/2019 - 10:59 नवीन
एक लंबर! बुवा... दंडवत!!
  • Log in or register to post comments
Y
Yogesh Sawant गुरुवार, 09/19/2019 - 11:42 नवीन
मूळ पाककृती पेक्षाही हि बदललेली पाककृती भन्नाट झालीये
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 09/21/2019 - 18:41 नवीन
धडधाकट धटिंगण धडक धांडोळा !!! अप्रतिम काव्य. नाखु
  • Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर Mon, 09/23/2019 - 00:26 नवीन
बाबौ .... लयी म्हंजे लईच बेस झालिया बगा =))
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 09/26/2019 - 11:27 नवीन
मस्त ... मी बहिणाबाईंच्या अरे खोप्या मध्ये खोपा या चालिवर वाचली. खास सुगरणीची कविता :)
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 09/27/2019 - 07:07 नवीन
:)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा