Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

दोरीवरचे कपडे

प — पाषाणभेद, Wed, 09/04/2019 - 11:07
दोरीवरचे कपडे दोरीवर कपडे कसेही वाळत असतात कपडे वाळत असतांना ते कसे दिसतात? शर्ट कधी हॅंगरला चिमट्याने टांगलेला असतो फाशी दिलेल्या कैद्यासारखा हालत असतो (यावरूनच फाशीला इंग्रजीत हॅंग करणे म्हणत असतील.) पॅन्टही अशीच असते हवेत तरंगत दोन पाय आधांतरी भुतासारखे लटकत नाडीच्या परकरांची गोष्ट निराळी असते भडक रंगाचे तंबूच वाटतात सर्कसचे साडी घालून घडी बसते वाळत वा-याने तिचा पदर असतो हालत किरकोळीच्या गोष्टी टॉवेल सॉक्स रुमाल गणतीत नका घेवू बाकीचे कपडे आहेत कमाल दोरीवर पडतात अंडरपॅन्ट बनियन ब्रा अन निकर वाईट दिसतात, काढून घ्या, तसेही वाळतात लवकर गाऊन उलटा असतो, खाली डोके वर पाय त्यात बाई घातली अन गाऊन खाली सरकला तर काय? कपडे वाळत असतांना आपण बाहेरून बघतो पण वा-याची मात्र मजा असते, तो आतून पाहतो - पाषाणभेद ०४/०९/२०१९

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9237 views

💬 प्रतिसाद
ख
खिलजि Wed, 09/04/2019 - 11:41 नवीन
अहो मीच तो वारा कुणालाच दिसत नाही तरी आहे मी खरा मी तर बाबा कपडे घालतो वाळायलाही आणि अंगावरही मीच सुकवतो माझे कपडे मोठे छोटे आणि तोकडे मीच तो जो अलवार फुंकरतो ,गुदगुल्या करतो मीच तो जो देतो इशारे मीच तो जो शहरतो अंग सारे मीच तो फुलवतो प्रेम सर्वदूर मीच तो जो नेतो कपडे दूरदूर मीच तो जो वाहतो कधी सैरभैर मीच तो जो करतो सर्व कपड्यांची सैर मीच तो जो पाहतो अंतरंगी मीच तो जो छेडतो नक्षी सप्तरंगी मीच तो असतो तरीही नसतो मीच तो जाणवतो अन खुणावतो विज्ञानास मीच तो वारा ,,, खट्याळ नाठाळ तरीही हवाहवासा तुम्हा सर्वास
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 09/05/2019 - 22:25 नवीन
छान. आपले आणि सर्व प्रतिसाद देणारे अन वाचन करणार्‍यांचे आभार.
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Wed, 09/04/2019 - 12:34 नवीन
कहर!! =))
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम गुरुवार, 09/05/2019 - 08:09 नवीन
जे बात
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 09/05/2019 - 08:33 नवीन
तश्या वाळवणाच्या कविता प्रकार आहे तर! कल्पना रोचक आहे. वाचकांची पत्रेवाला नाखु
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी गुरुवार, 09/05/2019 - 14:25 नवीन
पावसाचे पुन्हा दमदार पुनरागमन झाल्याने कवितेचे महत्व समजले. ;-)
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Fri, 09/06/2019 - 04:45 नवीन
छान, असा देखील एक विषय असतो तर ! आता ह्याचं इडंबन काय करायचं? बारमधील बाटल्या?
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 09/06/2019 - 20:42 नवीन
विडंबन झाले तर ठिकच आहे. पण विडंबनात दारू डोक्यात जाते. अर्थात ती वैयक्तीक आवड असू शकते. पुर्वी लेखाचेही विडंबन यायचे. पुर्वीचे मिपा राहीले नाही.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 09/14/2019 - 20:48 नवीन
खूपच अर्थपूर्ण, अनोखी आणि गंमतशीर कविता. .... पण ..... नाडीच्या परकरांची गोष्ट निराळी असते भडक रंगाचे तंबूच वाटतात सर्कसचे... सर्कशीचा तंबू एकखांबी असतो, त्यामुळे यातून आणखी काही गूsssssssढ वगैरे सुचवायचे आहे की कॉय, असा प्रश्न पडला आहे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 09/18/2019 - 07:48 नवीन
कविता पोचली प्रेरणा किंवा विडंबन करण्याची इच्छा आहे पण पाहू केव्हा मुहूर्त लागतो ते बाकी
सर्कशीचा तंबू एकखांबी असतो
@ चित्रगुप्त : प्रत्यक्षात दोन पावले असलेले चालते दुमडता येणारे खांब असतात परकरी तंबूला !!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 09/15/2019 - 13:39 नवीन
दफोराव,निरिक्षण शब्दात छान उतरवले आहे !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मेरा दिल तेरे लिये धड़कता है... :- Aashiqui
  • Log in or register to post comments
र
रातराणी Wed, 09/18/2019 - 06:52 नवीन
मस्तच!! आता वाळत घातलेले कपडे पाहिले की ही कविता आठवणार कायम :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा