चालू घडामोडी : सप्टेंबर २०१९
नमस्कार !
समस्त मिपाकरांना गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा !
आसाममधे एनआरसी ने प्रसिद्ध केलेल्या अंतिम यादीतून जवळ जवळ १९ लाख नागरीकांची नावे वगळली आहेत.
सुमारे १९ लाख नागरिक एनआरसीने जाहीर केलेल्या यादीतून बाहेर राहिले आहेत. शनिवारी सकाळी ही यादी जाहीर करण्यात आली. सरकारी कारवाई टाळण्यासाठी या लोकांना त्यांचे नागरिकत्व सिद्ध करावे लागणार आहे. यापूर्वी गेल्या जुलैमध्ये जाहीर झालेल्या एनआरसीच्या मसुद्यात ४१ लाख लोकांची नावे नव्हती. सुमारे ३ कोटी ११ लाख नागरिकांचा या यादीत समावेश आहे. राज्यातील बेकायदा स्थलांतरितांना बाहेर काढण्यासाठी ही यादी तयार करण्यात आली आहे. यापूर्वी १९५१मध्ये अशा प्रकारची यादी जाहीर करण्यात आली होती.
यादीत मोठ्या प्रमाणावर चुका झाल्या असण्याची शक्यता सर्वच राजकीय पक्षांनी व्यक्त केली आहे. ओवेसींनी भाजपावर पुन्हा एकदा मुस्लिम विरोधी असल्याचा आरोप केला आहे. ही यादी पुन्हा जरी तपासली आणि ५०% टक्के यादी जरी बरोबर म्हटली तरी ९-१० लाख हा घुसखोरीचा आकडा प्रचंड मोठा आहे. सरकार एवढ्या मोठ्या लोक संख्येवर कारवाई करु शकणार का हाच महत्त्वाचा मुद्दा आहे.
आदित्य ठाकरे निवडणूक लढविणार काय ? ह्यावर रोजच वर्तमानपत्रात छापून येत आहेत. मात्र "आमचं ठरलयं" असं दोन्ही पक्ष सांगतात त्यामुळे नेमके काय होईल याचा अंदाज अजून येत नाहिये.
राष्ट्रवादीचे बडे नेते तर सोडून चाललेतच पण आता पवारांचे नातेवाईक देखील सोडून चाललेत. कालच मुख्यमंत्र्यांनी पुढचा विरोधी पक्ष नेता काँग्रेस अथवा राष्ट्रवादीचा नसेल तर वंचित आघाडीचा असेल असे वक्तव्य केले. महाराष्ट्रातील निवडणूका दिवाळीपूर्वीच पार पडतील असा अंदाज आहे.
चतुर्थी आणी चतुर्दशीला नेहमीप्रमाणे गणेश भक्त गावी जाताना / येताना ट्राफीक जाम मधे तासन तास अडकतील, त्यांचे कसे हाल झाले, रस्ते कसे खराब झाले आहेत, कोणत्या गल्ली च्या राजाला किती किलो सोने मिळाले अशा नेहमीच्या बातम्या येत्या १० दिवसात जास्त प्रमाणावर दिसतील. मंदिमुळे सणावर कसा परिणाम झाला हे वाचायला मिळेल.
मिपावर एखाद दुसरा ध्वनीप्रदुषण, पर्यावरणात्मक / प्रबोधनपर लेख येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
या सर्व अडचणींवर मात करुन असे न म्हणता, या सर्व अडचणी आहेत तशा स्वीकारुन किंवा जमल्यास त्यांना वळसा घालून आपण गणरायाचे स्वागत करुया, १० दिवस राजकारणापासून शक्य झाले तर सुट्टी घेऊन नातेवाईक, कुटुंबियांना भेटूया, एकत्र येऊ या आणि गणेशोत्सव साजरा करुया. आणि हो, मिपा श्रीगणेश लेखमालेचा आनंद घेऊया.
धन्यवाद !
गणपती बाप्पा मोरया ! मंगलमुर्ती मोरया !
शिवाय, अश्या गोष्टी मोदी "मॅनेज" करत असतातअसे म्हणणारे हुश्शार लोक 'दिल्लीपासून - व्हाया मिपा - गल्लीपर्यंत' आहेत. =)) =)) =)) मात्र, असा दावा करताना तुमच्या,बाब्बो, POTUS जर मोदी मॅनेज करू शकत असेल तर त्यापेक्षा दुसरा लायक जागतिक नेता कोण हा प्रश्नच निकाली निघतो.या वाक्यात लिहिलेल्या, मोदींच्या जगावेगळ्या व अभूतपूर्व पात्रतेची भलावण ते करत आहेत, हे न दिसण्याएवढा अंध मोदीव्देष त्यांच्या डोक्यात भरलेला आहे ! =)) =)) =))मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सुमीत राघवनचा आदित्य ठाकरेंना खरमरीत टोला