ओठात दाटलेले...
ओठात दाटलेले ते भाव ओळखीचे
सांगू नकोस आता ते गाव ओळखीचे
हातात गोठलेल्या स्पर्षास वाव नाही
घेवू नकोस आता ते नाव ओळखीचे
सोडून तू दिलेली ती वेळ पाळतो मी
दावू नकोस आता ते घाव ओळखीचे
गावात बांधलेला वाडा उजाड आहे
पाहू नकोस आता ते ठाव ओळखीचे
सोडून तू दिलेल्या डावात अर्थ नाही
खेळू नकोस आता ते डाव ओळखीचे
निलेश देऊळकार
अडगाव बुll
9767888855
💬 प्रतिसाद
ह
हरवलेला
गुरुवार, 08/29/2019 - 03:56
नवीन
छान ! सुंदर रचना.
- Log in or register to post comments
र
राघव
Wed, 11/20/2019 - 02:14
नवीन
रचना ठीक.
दुसर्या द्विपदीची कल्पना वेगळी वाटली. पुलेशु.
- Log in or register to post comments