Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

महापूर

ब — बी.डी.वायळ, Fri, 08/23/2019 - 12:32
महापूर वरुणराजाच्या अंतरी आले | काळे मेघ जमा केले | अचानक बरसु लागले | भूमीवरी ||1|| पाऊस पडला मुसळधार | तंव नद्यांना आला पूर | बुडाली खेडी आणि शहरं | तयांमध्ये ||2|| सांगली आणि कोल्हापूर | तेथे आला महापूर | कित्येकांचे घर संसार | वाहून गेले ||3|| पाण्याची पातळी वाढता | लोकांची वाढली चिंता | पुढे काय होईल आता | कळेना काही ||4|| पुराचे पाणीजेंव्हा वाढले | लोकं घरात अडकुन पडले | कोणी गच्चीवरती चढले | भिती पोटी ||5|| मिडियांनी खबर घेतली | बातमी लोकांसमोर आणली | सरकारी यंत्रनाही धावली | मदतीला ||6|| एनडीआरएफ़चे जवान आले| बचाव कार्य सुरु झाले | जीव धोक्यात घालून गेले| पाण्यामध्ये ||7|| तेंव्हा नौसेनेचे ही जवान | आले मदतीला धाऊन | नौका दरोदरी नेऊन | मदत केली ||8|| सृष्टीमधील एक भूत | खवळले ते अकस्मात | त्याने एवढी वाताहात | होऊन गेली ||9|| आप तत्व खवळले | त्याने खूप नुकसान केले| संसार पुरात वाहून गेले | कित्येकांचे ||10|| घरे गेली पाण्याखाली | पिकांची नासाडी झाली | जनावरे वाहुन गेली | पुरासंगे ||11|| मदतीचे हात आले | सर्वांनी सहकार्य केले | जात पात विसरले | आपत काळी ||12|| डॉक्टरांची टीम गेली | निकःम सेवा केली | गोळ्या औषधे दिली | विनामूल्य ||13|| अहंकार ताठा गर्व | विसरुन गेले सर्व | तेथे माणुसकीचे पर्व | दिसून आले ||14|| महासंकट समोर ठाले | एकमेकां सहाय्य केले | डोळ्यांमध्ये अश्रु आले | तये वेळी ||15|| बी.डी.ळ 22/08/19

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2869 views

💬 प्रतिसाद
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 08/23/2019 - 18:23 नवीन
भावना पोहोचल्या. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Sun, 08/25/2019 - 16:32 नवीन
हेच म्हणतो लिहीत रहा. तुमची तळमळ पोहचली.
  • Log in or register to post comments
N
Namokar Mon, 08/26/2019 - 08:48 नवीन
छान लिहीले आहे
  • Log in or register to post comments
ब
बी.डी.वायळ Fri, 08/30/2019 - 13:47 नवीन
वाचकांचे आभार व प्रतिसाद देणार्याना धन्यवाद|
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 08/30/2019 - 17:13 नवीन
तळमळ पोचली. पुलेशु
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा