Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

स्वरराधा

प — प्राची अश्विनी, Fri, 08/23/2019 - 08:35
भैरव वा भटियार पहाट फुलवत येती, स्पर्श जणू कान्ह्याचे राधेला उठवुन जाती. ठाऊक तिला सारंग माध्यान्ही झुलवत येतो, "गंध" न त्यास स्वत:चा तरि वृंदावनी घमघमतो. यमन असा कान्ह्याचा यमुनेचे श्यामल पाणी. निनाद गोघंटांचा सांज करी कल्याणी. मालकंस वा जोग, अमृत बरसे गात्री. कान्ह्याच्या ओठी वेणू तिच्याचसाठी रात्री. कणकणात भिनली आहे मल्हाराची आस, मेघ पेटवून जातो मयूरपंखी प्यास. पण सूर भैरवीचा का राधेला माहीत नाही? युगे उलटली, अजुनी राधा तर वाटच पाही..

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4970 views

💬 प्रतिसाद
र
राघव Fri, 08/23/2019 - 09:05 नवीन
चांगली कल्पना. अर्थात् "प्यास" हा शब्द खटकला. :-) अवांतरः जिला ध्यानी-मनी-जीवनी केवळ कृष्णच सगळं आहे, तिला अजून कशाची वाट बघावी लागणार? असा प्रश्न मनांत डोकावून गेला.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 08/23/2019 - 12:59 नवीन
मोकळं स्पष्ट मत आवडलं. :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 08/23/2019 - 18:20 नवीन
कविता आवडली. लिहिते राहा.
युगे उलटली, अजुनी राधा तर वाटच पाही..
छान. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Fri, 08/23/2019 - 20:17 नवीन
ज्या मुलीची कृष्णजन्मानंतर कंसाच्या तुरुंगात अदलाबदल केली तिला काय वाटले असेल या भावनेवर पण एक कविता करा.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 08/24/2019 - 04:45 नवीन
सुरेख जमली आहे. दिल बाग बाग हो गया... अडकलेला बोळा निघून पाणी मोकळे झाले आणि पुन्हा खळखळा वाहू लागलेले दिसते आहे. हा निर्झर असाच खळाळत राहो ही सदिच्छा... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 08/24/2019 - 05:27 नवीन
प्राची अश्विनींच्या गाण्यांमधल्या राधेच्या लोभाची उधळण पाहून कृष्णालाही कृष्णाचा हेवा वाटेल, आम्हाला फक्त राग-लोभातले राग समजतात, प्राची अश्विनींच्या कवितेतले राग समजले नाही तरी त्या रागात फक्त कृष्णावरचा लोभ असतो हे माहित असल्याने फरक पडत नाही.
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Sat, 08/24/2019 - 18:18 नवीन
प्राची, 'मज कृष्ण भेटला नाही'..... त्या अप्रतिम कवितेची लय तुला परत गवसो ...
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Sun, 08/25/2019 - 09:48 नवीन
मस्त आवडली. सगळे राग घेवून नवीन कडवी अंतर्भूत करा आणि पुन्हा प्रसिद्ध करा.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sun, 09/15/2019 - 05:48 नवीन
पैजारबुवा, बिरुटे सर, जालीम लोशन, प्रमोद देर्देकर, शिवकन्या, माहितगार धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा