Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

राखी.

प — प्राची अश्विनी, गुरुवार, 08/15/2019 - 07:12
ओळखीतल्या सगळ्या मुलांना राखी बांधणारी छोट्टीशी बाला, काॅलेजमध्ये ज्याला टाळायचं त्यांनाच राखी बांधणारी मुग्धा. रक्षाबंधनाचे मेसेज फक्त कझिन्स ग्रुपमध्ये टाकणारी प्रगल्भा.. आणि तो सरसकट सगळ्यांनाच फाॅरवर्ड करणारी प्रौढा.. "तिच्या" या चारही रुपांना एकत्र ओवणारी तरीही अलगद विलगणारी पण खुलवणारी, ती राखी!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3902 views

💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 08/16/2019 - 06:04 नवीन
आधी राहुल गांधी आणि मग रामदेव बाबां बरोबर विवाह करायला उत्सुक असलेली बाला तनु आणि नानुच्या वादात नानुड्याची बाजू घेणारी निर्भिड कलीका, आपल्याच स्वयंवराचा टिव्ही वर बाजार मांडणारी विवाहोत्सुक स्त्री चूंबनाचे उत्तर कानाखाली आवाज काढत देणारी विद्युल्लता या चारही रुपांना एकत्र ओवणारी तरीही अलगद विलगणारी पण खुलवणारी, ती राखी! "खिलते है गुल यहा" म्हणत "मदहोश" होणारी प्रेमिका "झिल मील सितारोंका आंगन होगा" अशा स्वप्नात रंगलेली दिपशिखा "नाली का पानी कभी गंगाजल नही बन सकता" असे कडाडणारी सौदामिनी "मेरे बेटे आयेंगे, जमीन की छाती फाडके आयेंगे" असा दुर्दम्य आत्मविश्वास असलेली माता या चारही रुपांना एकत्र ओवणारी तरीही अलगद विलगणारी पण खुलवणारी, ती राखी! पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Fri, 08/16/2019 - 10:04 नवीन
साष्टांग दण्डवत.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Fri, 08/16/2019 - 13:37 नवीन
साष्टांग दण्डवत.
येक्झ्याटली पर्फेक्ट!! ______/\______ स्यान्डी
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 08/16/2019 - 06:55 नवीन
अजून काही रूपांची वर्णनं आलीत तर "अष्टसात्विक भाव" जागृत व्हायचे! अवांतरः छ्या.. बहिणींवरून एवढी वर्णनं आलीत.. त्यामानाने भाऊ म्हणजे सगळे एकाच साच्यात घडवलेलेत का काय, असं वाटायला लागलंय..!
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Fri, 08/16/2019 - 14:26 नवीन
मूळ कविता आणि पैजार बुवांची भर सगळेच मस्तं :)
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Fri, 08/16/2019 - 20:40 नवीन
छान जुगलबंदी.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा