Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

Hawaii ट्रिप बद्दल माहिती हवी ahe

च
चामुंडराय
Sat, 08/10/2019 - 17:52
💬 72
नमस्कार, नाताळ झाल्यावर मी hawaii ट्रिप चा विचार करत आहे. काही माहिती हवी आहे: साधारण प्लॅन असा आहे - ईस्ट कोस्ट -> maui -> oahu -> पर्ल हर्रबर -> व्हॉल्कॅनो नॅशनल पार्क -> होनोलुलू (waikiki टुरिस्ट हॉटस्पॉट) -> इस्ट कोस्ट १. ह्या साठी किती तासांचा प्लॅन करावा? मी ६ व्हॉल्कॅनो असा विचार करतोय २. आम्ही तिघांचं जण (बायको आणि आमची ४ महिन्यांची मनीमौ) असणार आहोत, तर वॊशिंग्टन हुन कॅब करावी असा विचार करत आहे साधारण कॉस्टली जाईल पण इतर काही ऑपशन दिसत नाहीये. असल्यास सांगावा ३. हॉटेल्स सांगावीत अजून काही ट्रीप्स असतील तर नक्की सांगा

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 38400 views

💬 प्रतिसाद
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 08/10/2019 - 19:44 नवीन
hawaii ट्रिप साठी वॊशिंग्टन हुन कॅब ?! जाणकारांच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Sun, 08/11/2019 - 00:27 नवीन
कॅब पेक्षा बस बरी पडेल काय, म्हात्रे सर ?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 08/11/2019 - 08:26 नवीन
प्रथम हिमालयात जाऊन, तेथे पाण्यावर चालायच्या सिद्धीचा क्लास उत्तम गुणांनी पास केलात तर, पायी जाणे सर्वात सोयीचे आणि स्वस्त पडेल... मंग वॉशिंग्टन राज्यातून जा किंवा वॉशिंग्टन डिसितून, कायबी फरक नाय पडत बगा. :)
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sun, 08/11/2019 - 08:50 नवीन
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 08/12/2019 - 20:12 नवीन
स्वतः न फिरता सल्ले दिले की असे होते....नव्वदच्या दोन चपटी आणि कांदा इतक्या भांडवलात लोकं चंद्रावर जाऊन येतात.....तुमका क्काय म्हायतचं नसा
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Wed, 08/14/2019 - 02:48 नवीन
टका सर, चपटी, कांदा आणि चन्द्र काय घेऊन बसलात? आमच्या पुण्यात टकाटक टाकून सूक्ष्म देहाने मंगळावर जाऊन आलेली मान्सं आहेत म्हटलं !!
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sun, 08/11/2019 - 21:35 नवीन
hawaii ट्रिप साठी वॊशिंग्टन हुन कॅब ?! जाणकारांच्या प्रतिक्षेत.
Me Too :)
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Sun, 08/11/2019 - 21:41 नवीन
.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sun, 08/11/2019 - 22:38 नवीन
Yup :)
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 08/19/2019 - 05:31 नवीन
प्रथम यावरील प्रतिक्रया वाचून वाटले कि काय हे! अगदी इसकाळ मधील मुक्तपीठ झालाय मिपा चा ...मूळ पोस्टिंग ची कुचेष्टा वैगरे मग थोड्या वेळाने वाचले कि "वॉशिंग्टन ते हवाई" असे विचारून मूळ विचारणाऱ्याने मिपाची खरंच चेष्टा केली आहे कि काय? आणि म्हणून लोक तिरपागडी उत्तरे देता आहेत? मग गुगल वर बघितल्यावर कळले कि कदाचित त्यांना "ओहाउ बेटावरील वॉशिंग्टन प्लेस https://www.google.com/maps/search/washington+hawai/@21.3217004,-157.9179951,12.21z नावाच्या ठिकाणापासून दौरा सुरु करायचाच कि काय ? तसे असेल तर प्रश्न काही चुकीचाच नाही अहो पण तसा खुलासा करा ना मग? लोक माहिती असेल तर मदत करतील! तशि
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Sat, 08/10/2019 - 20:55 नवीन
एक जगभर आहे आणी एक प्रशांत महासागरात.
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Sun, 08/11/2019 - 00:25 नवीन
जालो सर, मला शंका आली होतीच म्हणून आंग्ल भाषेत नाव लिहिले. हि तर आपली Kicki lakki chiki lakk chiki chum "हवा हवाई"
  • Log in or register to post comments
ग
गवि Sun, 08/11/2019 - 04:17 नवीन
ठाण्यास उतरणे सोयीचे पडेल. सहलीसाठी शुभेच्छा. वृत्तांत फोटो येउदेत.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sun, 08/11/2019 - 04:25 नवीन
आणि धागा लेखकाला असेही सूचवयाचे आहे की ठाणे इनक्लूड करतच असाल तर आपलं नाशिकही जवळच आहे पावसात मस्त वातावरण असल्याने सप्तशृंगी , त्र्यंबकेश्वरही भेट देण्यास उत्तम ठिकाणे आहेत
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 08/11/2019 - 08:30 नवीन
शिवाय, सद्या नाशिकला महापूर आला असल्याने पोहायची चांगली प्रॅक्टिस करता येईल, जी प्रशांत महासागरातून तरून जायला उपयोगी ठरेल.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sun, 08/11/2019 - 08:02 नवीन
तर वॊशिंग्टन हुन कॅब करावी असा विचार करत आहे ??
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Sun, 08/11/2019 - 16:22 नवीन
म्हणजे त्यानुसार उत्तर द्यायला !!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 08/11/2019 - 08:49 नवीन
नाताळ झाल्यावर मी hawaii ट्रिप चा विचार करत आहे. काही माहिती हवी आहे:
- टुअरिजमची प्रदर्शन भरवणाऱ्या TTF कंपनीचे तुमच्या शहरातल्या प्रदर्शनास जा. तिथे सर्व काम होईल.
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Sun, 08/11/2019 - 15:57 नवीन
कंकाका माफ करा हे TTF काही कळले नाही. *TF माहितीय्ये परंतु TTF म्हणजे काय? जरा बैजवार सांगता का?
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 08/11/2019 - 17:52 नवीन
हे ट्रावेल शोज - प्रदर्शन लावतात. साधारण पणे सप्टेंबर आणि फेब्रुवारीत पहिल्या आठवड्यात प्रदर्शन असते. TTF (भारतात अधिक बाहेर)आणि OTM(फक्त भारताबाहेर) या दोन कंपन्या पूर्वी एकत्र असत तेआता वेगळे झाले आहेत. इथे बरेच टुअर ओपरेटर आणि हॉटेलवाले आपापले स्टॉल्स लावतात, माहितीपत्रके देतात, तुम्हाला हवी तशी ट्रिप आखून बुकिंग करून देतात. -------- बाकी तुमचा लेख विनोदी लेखन असल्यास या माहितीचा उपयोग नाही. गल्ली चुकली.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 08/11/2019 - 12:41 नवीन
मांजर चालते का, हे एकदा क्याबवाल्याकडून कन्फर्म करून घ्या. एकदा भाडे ठरवल्यावर मग परत 'आमच्या क्याब मध्ये मांजर चालणार नाही', 'पाळीव प्राण्याचे 26 डॉलर एक्स्ट्रा' असले नखरे करतील. त्यामुळं आधी बोलून घ्या. ता.क. परतीच्या प्रवासाचे 50% एक्स्ट्रा असला काही नियम आहे का बघा. टोल कोण देणार ते बोलून घ्या. शक्यतो आरएमडी, विमल, मावा खाणारा ड्रायवर टाळा. एसी गाडीत घाण वास मारत्यात.
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Sun, 08/11/2019 - 16:18 नवीन
बरं झालं पैलवानभाऊ तुम्ही हा पॉईंट काढला. तसा माझ्याकडे माउचा पिंजरा आहे परंतु आधीच विचारून घेतलेलं बरं, नन्तर कटकट नको, नाही का? आणि हाफ रिटनचही विचारतो नाहीतर पुणेरी रिक्षावाल्यांसारखा प्रॉब्लेम याचा. पण टोलचा काही प्रॉब्लेम नाही, एक दम मनसे देऊ.
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Mon, 08/12/2019 - 02:07 नवीन
माझ्या या महतीप्रद धाग्यावर काही जुन्या जाणत्या जेष्ठ मिपाकरांनी टवाळकीचा सूर लावला आहे असे खेदपूर्वक नमूद करतो. आणि त्यामुळे मज जैसा नवं मिपा साहित्यिक हतोत्साहित होऊन मराठी सारस्वताचे जे अपरिमित नुस्कान होईल त्याची संपूर्ण जबाबदारी मिपाकरांवर असेल याची कृपया नोंद घ्यावी. _/\_
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 09/17/2019 - 06:10 नवीन
जेष्ठ मिपाकर असेच खवट असतात, तुम्ही दुर्लक्ष करा. तुम्ही चालू द्या. बाकी, तुम्ही नेमकं कुठून कुठे चाललात हे समजलं की परत येईन धाग्यावर. बाकी, आमच्या औरंगाबादला या, वेरुळ अजिंठा जाऊ. डोंगरमाथ्यांना हिरव्यागार शालूंनी वेढून घेतलं आहे. अहाहा.... -दिलीप बिरुटे (आपला हिरवागार)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 08/12/2019 - 02:27 नवीन
तुमच्यासारखा नवं मिपा साहित्यिक हतोत्साहित होऊ नये आणि तुमची सहल चाफ्याच्या फुलांच्या माळा घालून ( तशा घालून समुद्र किनाऱ्यावर तिकडे फिरतात म्हणे ) आनंददायी होण्यासाठी ज्येष्ठ पर्यटक मिपाकरांनी तुम्हास सावध केले आहे.
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Mon, 08/12/2019 - 04:44 नवीन
धन्यवाद ! म्हणजे लीला सह सहलीला जाऊन लिला करण्याची मनीषा पूर्ण होणार तर.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 08/12/2019 - 08:26 नवीन
तुम्ही, लीला आणि मनिषा या तिघांनाही सहलीसाठी शुभेच्छा ! (केवळ योग्य अश्या तुमच्या निवडक लीलांच्या) चित्रांसह सहलिचा वृत्तांत इथे जरूर टाका. ;) ;)
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Mon, 08/12/2019 - 13:21 नवीन
जरूर म्हात्रे सर, परंतु मिपा जाणकारांकडून सहली साठी आवश्यक त्या माहितीच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 08/12/2019 - 14:34 नवीन
हे वॉशिन्ग्टन कुठे आहे ? Hawaii मध्येच ?
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Mon, 08/12/2019 - 14:47 नवीन
अहो वाशीम बुद्रुक म्हणजे वाशिंग्टन हो. हवं तर पृथ्वीचा भूसपाट ( नक्षा ) काढून बघा.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 08/12/2019 - 14:38 नवीन
वॉशिन्ग्टन डी सी ते Hawaii https://www.tripadvisor.in/ShowTopic-g28932-i36-k7324566-Washington_DC_to_Hawaii-Hawaii.html
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Mon, 08/12/2019 - 22:44 नवीन
छे, छे, हाटेलबिटेल काही नको. तुम्ही ईष्ट्कोष्टातून कॅबने हवाई करून परत येणार ना? मग प्रत्येक ठिकाणाला १०-१५ मिनिटे पुरेत! तो आणि जाण्यायेण्याचा कॅबचा टाईम धरून जर भल्या सक्काळी निघालांत ना तर तिन्हिसांजेपर्यंत परत याल की!! आणि बरोबर दशम्या बांधून घेतल्यात तर दुपारच्या जेवणाचाही प्रश्न सुटला... हार्दिक शुभेच्छा. आणि परत आल्यावर इथे फोटू आणि वृत्तांत टाकायला विसरू नका. :)
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 08/13/2019 - 05:58 नवीन
हा ...... हा ...... हा ......
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय गुरुवार, 08/15/2019 - 04:22 नवीन
पिडां काका त्यातल्या त्यात 'हवा हवाई' ला जवळचे ... त्यामुळे त्यांची कमेंट म्हणजे ते आंग्ल भाषेत म्हणतात ना ते डीरेक्ट फ्रॉम अश्व मुख च की! बादवे - लहानपणी नेहमी डांबीस, डांबरट अश्या पदव्यांनी आभूषित केल्या गेल्या मुळे या शब्दांच्या व्युत्पत्ती बद्दल खूप उत्सुकता होती.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 08/15/2019 - 19:25 नवीन
पिडां काका त्यातल्या त्यात 'हवा हवाई' ला जवळचे ... त्यामुळे त्यांची कमेंट म्हणजे ते आंग्ल भाषेत म्हणतात ना ते डीरेक्ट फ्रॉम अश्व मुख च की!
खरं आहे. तिथे जाऊनही आलो आहे काही वेळा.... आमचं गोवाच की हो ते!!
लहानपणी नेहमी डांबीस, डांबरट अश्या पदव्यांनी आभूषित केल्या गेल्या मुळे या शब्दांच्या व्युत्पत्ती बद्दल खूप उत्सुकता होती.
मी ऐकलेली व्युत्पत्ती अशी: पूर्वी इंग्रजांच्या अंमलात देशी माणसाला शिव्या देतांना साहेबलोक 'डॅम बीस्ट' म्हणायचे. आपण त्याचा 'डांबीस' म्हणून स्वीकार केला! :)
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Fri, 08/16/2019 - 03:51 नवीन
ह्याच न्यायाने डॅम रॅट पासून डामरट बनला असेल काय?
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 08/16/2019 - 10:03 नवीन
असाच औच रॅट पासून "अचरट" डॅम डॉल पासून "डामडौल" आणि बॅड काउ पासून ..... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 08/16/2019 - 19:17 नवीन
आणि अच्रत बव्लत चा उगम?
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Sat, 08/17/2019 - 04:33 नवीन
आचरट, डामडौल या शब्दांची व्युत्पत्ती अशी आहे हे माहित नव्हते. बॅड काऊ तर भारीच. हे झाले आपण इंग्रजांकडून घेतलेले शब्द. परंतु गोऱ्यांनी भारतीयांच्या नावापासून काही शब्द तयार केलेत त्याचे काय? हार्दिक, सुखदीप, कुलदीप, दीक्षित इतिआदी ...
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Tue, 09/17/2019 - 11:41 नवीन
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Tue, 09/17/2019 - 13:24 नवीन
हो, आणि त्यांच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे आर (R ) हा सायलेंट असतो =))
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर Tue, 08/13/2019 - 20:57 नवीन
अजून काही ट्रीप्स असतील तर नक्की सांगा
सोबत संपूर्ण अष्टविनायक सहल आणि शिंद्यांची छत्री करायला विसरू नका. अजून आठवडा-दिड आठवड्याने निघाला ट्रिपवर, तर लगे हात पुण्याचा गणेशोस्व पण करून घेता येईल. कॅब करणार आहात म्हंजे अडचण नाही. तटी: पाऊसकाळ आहे. बाहेरचे पाणी प्यायचे टाळा. तटी २: वर प्रतिसादात डांबीसकाकांनी घरच्या दशम्या द्यायचे कबूल केले आहे तरी, कॅब ड्रायवरला गाडी लास-एंजेलिस वरून घ्यायला सांगावी म्हंजे सोयीचे पडेल
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 08/13/2019 - 21:19 नवीन
तटी: पाऊसकाळ आहे. बाहेरचे पाणी प्यायचे टाळा.
आता काय कॅबमधी सिन्टेक्स ठेवून टपावर बशीवताय काय सगळ्यांना? टपावर ठिवा म्हनलो असतो सिन्टेक्स पन ती पण भईरच झाली की. नायतर लेलँड किंवा व्होल्वो ची मिळती का एखादी चोवीसचाकी मल्टीअ‍ॅक्शल कॅब बघा. :)
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय गुरुवार, 08/15/2019 - 04:23 नवीन
अभय दादा, चोवीस चाकी कॅब घेतली तर तिची पुढची चाके एक बेटावर तर मागची चाके दुसऱ्या बेटावर अशी अवस्था व्हायची. त्या पेक्ष्या मी काय म्हणतो, पाने आणि स्कुरू डायवरचा टूल बॉक्स घेतोना बरोबर. जेव्हा गरज लागेल तेव्हा दोन हायड्रोजनचे आणि एक ऑक्सिजनचा ऍटम घेतो असेंम्बली करून, काय?
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 08/15/2019 - 19:30 नवीन
वर प्रतिसादात डांबीसकाकांनी घरच्या दशम्या द्यायचे कबूल केले आहे तरी,
हे म्हणजे परस्पर हलवायाच्या घरावर तुळशीपत्र!!! बाकी आमची लक्षुमी दशम्या करत नाय, कोंबडी-वडे चालत असतील तर गोष्ट वेगळी. :)
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Mon, 08/19/2019 - 04:47 नवीन
.
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Wed, 08/14/2019 - 12:01 नवीन
स्कायमेट चेक करा! एखादवेळेस तेंव्हा चक्रीवादळ असायचे.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Sun, 08/18/2019 - 02:43 नवीन
धागा गंमत म्हणून काढलाय का खरंच माहिती हवी आहे. वॉशिंग्टन म्हणजे वॉशिंग्टन डीसी नसून वॉशिंग्टन राज्य (सिएटल वालं) म्हणायचे असेल असं समजतो. तर तुम्हाला तिथून कॅब करून कुठपर्यंत जायचं आहे? हवाई पर्यंत? आपल्याकडे गूगल मॅप्स नावाची एक सुविधा आहे ज्यामुळे तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसे जायचे हे बघू शकता. ही सुविधा वापरून जर बघितलं तर वॉशिंग्टन आणि हवाई मध्ये मोठ्ठा प्रशांत महासागर आहे आणि वॉशिंग्टनच्या किनाऱ्यापासून हवाई फक्त २७०० मैल दूर असल्याने ब्रिज बांधलेला नाहीये. तर तुम्ही कॅब घेऊन कसे आणि कुठपर्यंत जायचा विचार करत आहात? बरं जो २७०० मैल समुद्र पार करून जाईल असा कॅब ड्रायवर आधीच ठरवून ठेवलेला आहे का? तो तुम्हाला सोडून परत येणार आहे का तिथेच थांबणार आहे? परत तुम्हाला हे पण बघायला लागेल की त्याची कॅब एका टॅंक फुल मध्ये किती मेल जाते आणि त्याप्रमाणात गॅसोलीन बरोबर घ्यावे लागेल कारण समुद्रात अजून तरी गॅस स्टेशन्स नाहीयेत असं मला वाटतं. कॅबवालयावरोबर भाव आधीच ठरून घ्यावा अशी एक आगाऊ सूचना सुद्धा करून ठेवतो. शक्य झाल्यास प्याकेज डील घ्या, म्हणजे मध्ये कटकट नको. तिथे पोचल्यावर मग हॉटेलने ठेवलेली पोरं त्यांच्याच हॉटेल मध्ये रहा असा आग्रह करत मागे लागतील. लोकेशन वगैरे नीट बघून घ्या आणि घासाघीस (रूम रेट साठी) करायला विसरू नका. हॉटेलमध्ये गेल्यावर तुम्ही केलेले साहस तिथल्या मालकाला ओरडून सांगा कदाचित तुम्हाला फुकट राहायला देईल. पुरावा म्हणून मधेच फोटो आणि व्हिडीओ घ्यायला विसरू नका. नीट जाहिरात केल्यास तुमचे नाव गिनिज बुकात सुद्धा येईल. टीप: जर विमानाने जायचा विचार असेल तर त्याची डिल्स शोधू शकता. किंवा क्रूझने जायचा पण पर्याय आहे. कुठलाही पर्याय निवडला तरी प्याकेज डील घ्यावे अशी सूचना करतो ज्यात खाणे पिणे पण समाविष्ट असेल. नाहीतर अश्या ठिकाणी खाणे पिणे बरेच महाग असते आणि ठिकाणे शोधायला वेळही जाऊ शकतो. क्रूझने जायचा विचार केला तर लॉस अँजेलिस पासूनही बऱ्याच क्रूझ जातात.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sun, 08/18/2019 - 19:54 नवीन
काही कळेना झालंय
हे गंम्मत म्हणून लिहलेय की खरंच काही कळेना झालंय ?
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Mon, 08/19/2019 - 04:42 नवीन
धागा गंमत म्हणून काढलाय का खरंच माहिती हवी आहे. काही कळेना झालंय. देवा, अशी शंका का बरे मनी (माऊ नव्हे) आली?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 11 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 11 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 11 hours ago
  • सुंदर !!
    1 day 11 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 12 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा