छंदशास्त्र
ऋ
Sat, 11/08/2008 - 10:23
नवीन
आमच्या पाहण्यात असे आले आहे की, अनेक नवोदित कवींची वृत्तांवर पकड नाहीअचुक निरिक्षण धोंडोपंत.. :) तुमच्या ह्या घोषणेने आनंद तर झालाच पण कदाचित वृत्तात लिहिता येऊ लागेल अशी आशाहि वाटली.. सदर पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा आणि मनापासून धन्यवाद! -(नवोदित नि'वृत्त' कवी) ऋषिकेश
Sun, 11/09/2008 - 17:01
नवीन
दुर्दैवाने मला कवितेची आवड नाही. माझ्या एका मित्राच्या मते हिच मला शिक्षा आहे.
आपण जर काव्य स्वाद, रसग्रहण आणि त्यातील इतिहास याचा आढावा घ्यायला मला एखाद्या कार्यशालेद्वारे निवडले तर मला नक्कीच आवडेल नव्हे मला उपकृत झालो असे वाटेल.
परवाच माझा एक मित्र रॉयकिणीकराबद्दल भरभरुन बोलत होता. त्याच वेळी त्याने नाशिकला असलेल्या त्यांच्या नातीशी माझा परिचयही करुन दिला तेंव्हा हे वैगुण्य मला जास्तच जाणवले.
असो, आपण एखादी कार्यशाळा नक्कीच घ्या.
Mon, 11/10/2008 - 11:35
नवीन
जर शक्य असेल तर छंदांची आणि वृत्तांची कार्यशाळा एखाद्या लेखाद्वारेच घेता येईल का? किंवा आताच सुरु केलेल्या छंद रचना स्पर्धेत छंद किंवा वृत्त सोदाहरण स्पष्ट करून मग त्या छंदात रचना करण्याची चढाओढ ठेवावी.
जुने रसाळ छंद व वृत्त याना उजाळा देण्याचा हा उपक्रम खरोखरीच उत्तम आहे.
पुण्याचे पेशवे