सरसर सरसर आली सर
सरसर सरसर आली सर
------------------------------------
सरसर सरसर आली सर
सरसर सरसर आली सर
सरसर सरसर आली सर
भरभर भरभर छत्री धर
धरू कशी ? सुटलाय वारा
छत्री उलटी झाली तर ?
सरसर सरसर आली सर
लवकर रेनकोट अंगावर
घालू कसा ? घालूनही जर
आतून सगळा भिजलो तर ?
सरसर सरसर आली सर
छत्री नको रेनकोट नको
धाराच झेलू अंगभर
पाऊस होऊ क्षणभर
सरसर सरसर आली सर
----------------------------
बिपीन
💬 प्रतिसाद
प
पाषाणभेद
Fri, 08/02/2019 - 21:10
नवीन
जीओ बिपीन
"पाऊस होऊ क्षणभर" यामुळे मेलो तुमच्या कवितेवर!!!!
- Log in or register to post comments
ज
जॉनविक्क
Sat, 08/03/2019 - 07:04
नवीन
हेच बोल्तो
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Fri, 08/02/2019 - 21:11
नवीन
रेनकोट शब्द खटकतोय. तो बदला फक्त.
- Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे
Sat, 08/03/2019 - 11:56
नवीन
जीओ बिपीन
"पाऊस होऊ क्षणभर" यामुळे मेलो तुमच्या कवितेवर!!!!
मस्त प्रतिक्रिया .
पण पाषाणभेद संकोच वाटतो , एवढी मोठी प्रतिक्रिया मिळाल्यावर .
( ती ओळ मला स्वतःलाही आवडली आहे .)
- Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे
Sat, 08/03/2019 - 11:57
नवीन
| जॉनविक्क
आभारी आहे .
- Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे
Sat, 08/03/2019 - 11:58
नवीन
पाषाणभेद
रेनकोटला मला योग्य मराठी प्रतिशब्द सापडला नाही
कोणाला माहिती आहे ? कोणी सुचवू शकेल ?
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 08/04/2019 - 08:03
नवीन
आवडली कविता. लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे
Sun, 08/04/2019 - 17:16
नवीन
आभार दिलीपजी आभार !
- Log in or register to post comments