Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

इंद्रधनू

प — पाषाणभेद, Sun, 07/28/2019 - 00:31
इंद्रधनू (आकाशात इंद्रधनुष्य पाहील्याने माझी मुलगी हरकली आहे अन ती मला बोलावते आहे.) आकाशी ते इंद्रधनू आले अहा! चला बाबा बघा ते पहा! ते पहा!! कितीक मनोहर मोदभरे आकाशीचे रंग खरे कमान तयाची वाकली माझ्यासवे पहा बरे दवबिंदूवर प्रकाश पडूनी आले ते वर उसळूनी उल्हासीत झाले मी चटकन या तुम्ही वर्ण वरी घेई तांबडा तदनंतर ये नारंगी पिवळा चमके तो रंग हिरवा निळा घेवूनी पारवा जांभळा आकाशी व्यापली प्रकाशमाला पर्जन्याचा अधिपती नरेश भेट जलाचे देई धरेस त्याच समयी ये सामोरी भास्कर किरणांस भिडता थेंब नीर गोफ इंद्राचा घेई आकार मज न ठावूक; राहील न राहील ते काळ किती ये वायू मग जाय क्षिती साठवूनी घ्या लोचनी त्वरा करा तुम्ही; बाबा या लवकरी - पाषाणभेद २८/०७/२०१९

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4314 views

💬 प्रतिसाद
फ
फुटूवाला Sun, 07/28/2019 - 03:40 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Sun, 07/28/2019 - 10:23 नवीन
आवडली. याला चाल कोणती लागेल?
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 07/29/2019 - 06:02 नवीन
याला "आरती ज्ञानराजा" ची चाल फीट बसते आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sun, 07/28/2019 - 10:42 नवीन
पण ठीक आहे. भावना छान व्यक्त केल्यात.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 07/28/2019 - 12:46 नवीन
मुलीने नाहीच केलेहो. लहान आहे ती. तिच्या भावना मी व्यक्त केल्यात. अन वर हरखली असा शब्द हवा. केदारनानांचे धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Mon, 07/29/2019 - 17:05 नवीन
अतिशय छान भावना समजून घेतल्या आहेत.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 07/28/2019 - 11:38 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sun, 07/28/2019 - 12:39 नवीन
आवडली. मस्तं.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा