काही समस्या
पुढील व्यथांवर प्रभावी, हुकमी उपाय कुणी सुचवू शकेल का....?
मुंबई शहर आणि त्याच्या उपनगरांमध्ये भटक्या कुत्र्यांनी मांडलेला उच्छाद, त्यांना रस्त्यात दूध बिस्किटे घालणाऱ्या काही भूतदया संस्था, घरातल्या शिळ्या चपात्या त्यांना रस्त्यातच घालणारे दयावान श्वानप्रेमी.
जागोजागी कबुतरांना दाणे घालणारे पक्षीप्रेमी.
अनेक मंदिरांच्या बाजूला गायींना घेऊन बसणाऱ्या, त्यांच्याकरता चारा आणि कसलेसे लाडू विकणाऱ्या बाया. या गायींचे मलमूत्र परिसरात करत असलेली घाण.
या समस्यांचा सर्वांनाच त्रास होत असावा, यावर काय इलाज करता येईल?
हा विषय काही जास्त गंभीर नाही जेवढे इथे काही लोक दाखवत आहेत
वस्तुस्थिती वेगळी आहे An estimated 35 million stray dogs live in India and according to World Health Organisation (WHO) India faces about 18,000 to 20,000 cases of rabies every year According to the WHO report about 36 pc of the world’s deaths from rabies happen in India itself. In March 2016, civic authorities from Mumbai disclosed in the Supreme Court that dog bites in Mumbai have taken 434 lives in the time period 1994 to 2015. According to reports more than 1.3 million people were bitten by dogs in Mumbai during this period. Why does India have such a greater number of stray dogs? The biggest reason behind the problem is open garbage. Stray dogs rely on garbage while hunting for eatables. https://mediaindia.eu/social-vibes/stray-dogs-a-major-problem-in-india/An estimated 35 million stray dogs live in India and according to World Health Organisation (WHO) India faces about 18,000 to 20,000 cases of rabies every year.+१०० यासंबंधात अजून एक सत्य सगळ्यांना माहीत होणे जरूर आहे, ते असे... भटक्या कुत्र्याने चावल्यावर (किंवा इतर कोणत्याही प्रकारे त्याची लाळ किंवा इतर शारिरीक स्त्राव माणसाच्या रक्तात मिसळल्यावर) त्वरीत रेबिजविरोधक लस योग्य त्या प्रमाणात टोचून घेणे अत्यावश्यक असते. कारण अनोळखी/भटका कुत्रा रेबिजने दुषित आहे की नाही हे सांगणे शक्य असेलच असे नाही (बहुदा नाहीच) आणि उशीर केल्यास माणसात रेबिजचा प्रादुर्भाव होण्याची मोठी शक्यता असते. त्यामुळेच, "घरी पाळलेले व नियमित रेबिज लसीकरण केलेले" या दोन्ही गोष्टी १००% खात्रीने माहीत असलेले कुत्रे सोडले तर, सरसकटपणे इतर सर्व अनोळखी आणि/अथवा भटक्या कुत्र्यांच्या चाव्यानंतर त्वरीत रेबिजचा इलाज सुरू करणे (rabies immune globulin आणि rabies vaccine) अत्यावश्यक आहे... त्यासाठी कोणत्याही तपासणीची गरज नाही. कारण, रेबिज हा असाध्य रोग आहे... त्यावर कोणत्याही उपचारपद्धतीत, कोणताही औषध-उपचार, नाही... मरणाची मात्र १००% खात्री आहे.