पूर्वी आपण जिथे भेटायचो , तिथे आता एक टपरी झालीय
पूर्वी आपण जिथे भेटायचो
तिथे आता एक टपरी झालीय
एक तपानंतर पुन्हा कप घेतला हाति
पण कटिंग इथली जर्रा बरी झालीय
वळणे घेत घेत तू तिथून , तर मी कुठून कुठून यायचो
कधी तू तर कधी मी , या इथेच झाडामागे तोन्ड लपवायचो
मी घाबरून तुलाच म्हणायचो , हळहळू तुझि डेरिंग बरी झालीय
त्या झाडामागे बराच इतिहास घडला
तो काळ सुवर्णाक्षरात लिहावा असा
पण नंतर तुटलो ते कायमचेच , जणू भेटलोच नव्हतो
आज इथे आलो तेव्हा " साठी " माझी पुरी झालीय
असेल तीही स्वतःच्या नातवंडांबरोबर खेळत
मीही आहे व्यग्र माझ्या जीवनात
तिच्या कपाळावर मळवट भरायची इच्छा होती
ती मात्र कायम अधुरीच ऱ्हायलीय
{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}
त्या झाडामागे बराच इतिहास घडलाया दोन ओळीच अनेक पदरी अर्थाच्या आहेत काय बरे झाले असेल झाडामागे ? अर्थात चावट मनांना जरी श्रुंगारच आठवला असेल तरीही मला खात्री आहे की कवी काहीतरी अजुन खोलवरचे सुचवत असावा एका आशयघन हिन्दी चित्रपट गीताचा मी स्वतः केलेला मराठी अनुवाद मला इथे मांडायचा मोह आवरत नाही सळसळ होती पानांची बागेत पिंपळाच्या असे भेटलो आम्ही दोघे छायेत पिंपळाच्या