तर्काच्या सीमेवर तेव्हा
स्थलकालाचे ताणेबाणे
जटिल, चिवट पण तटतट तुटले
घालित अवघड नवे उखाणे
जडातुनी चैतन्य उमलले
सप्तरंग लवथवले, मिटले
सप्तसूर झंकारुन शमले
भवतालाला भारून काही
पुन्हा निवांत झाले
तर्काच्या सीमेवर तेव्हा
अतर्क्य भेटुनी गेले
💬 प्रतिसाद
स
सोत्रि
Sun, 11/10/2019 - 06:33
नवीन
सुंदर आणि अफाट आहे हे!
- (अनन्त्_यात्री नावाची दखल घेतलेला) सोकाजी
- Log in or register to post comments
ज
जॉनविक्क
Mon, 11/11/2019 - 18:35
नवीन
(तर्काच्या सीमेवरील अतर्क्य)- जॉनविक्क
- Log in or register to post comments
र
राघव
Wed, 11/13/2019 - 07:29
नवीन
छान!
तर्कबुद्धीच्या पलिकडे असलेला, एक नवाच रोमांचकारी अनुभव, अवचित येण्याच्या क्षणाचे वर्णन खूप आवडले. :-)
दुसरी कविताही त्याचेच वर्णन सांगतेय, होय ना?
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Wed, 11/13/2019 - 10:33
नवीन
मला अभिप्रेत असलेले नेमक्या शब्दात मांडल्याबद्दल आभार!
- Log in or register to post comments