Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी : जूलै २०१९

ध
धर्मराजमुटके
Wed, 07/03/2019 - 18:05
🗣 86 प्रतिसाद
१. भारतात शाकाहारी भोजनालये आपल्या नावामागे / पुढे वेगवेगळ्या पदव्या लावतात. उदा. प्युअर व्हेज / शुद्ध शाकाहारी / वैष्णव रसोई इ. इ. जसजसे दक्षिणेकडे जावे तसतसे ही पदवी हाय क्लास / हाय क्वालिटी व्हेज अशी बदलत जाते. एका ठिकाणी तर चक्क प्युअर व्हेज आणि नॉनव्हेज अशीही पाटी बघीतल्याचे आढळते. अशाच एका हाय क्वालिटी भोजनालयाची अखेर होणार काय ? बातमी : अर्श से फर्श तक: भारत के 'डोसा किंग' के पतन की कहानी २. अमेरीकेतील संभाव्य मंदीच्या बात म्यांनंतर सोने हा परत गुंतवणू कीचा फायदेशीर पर्याय बनणार का ?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 41779 views

🗣 चर्चा (86)
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/03/2019 - 18:38 नवीन
तुम्ही दिलेल्या बातमीतील डोसा किंगवर झालेल्या कायदेशीर कारवाईचा त्याच्या रेस्तराँमधील अन्नाशी (अन्नाची प्रत, स्वच्छता, इ) काहीच संबंध नाही... तो त्याच्या इतर बेकायदेशीर कारवायांमुळे कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 07/03/2019 - 18:45 नवीन
पण आपल्याकडे बरेचसे उद्योगधंदे एकखांबी तंबू असतात. संस्थापक / मालक नसल्यामुळे पुढील भविष्य कसे असेल असे मला म्हणायचे आहे. अर्थात मुले धंदा पुढे नेतीलच पण तरी पण एक उत्सुकता आहे. किंवा या नकारात्मक प्रसिद्धीचा काही तोटा होईल किंवा कसे ??
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 07/03/2019 - 18:59 नवीन
मी आता काँग्रेसचा अध्यक्ष नाही, आधीच राजीनामा दिला आहे – राहुल गांधी मी आता काँग्रेस अध्यक्षपदावर नसून पक्षाच्या कार्यकारी समितीने तातडीने बैठक बोलवून नव्या अध्यक्षाची निवड करावी असे राहुल गांधी यांनी बुधवारी स्पष्ट केले. मी आधीच राजीनामा दिला असून कार्यकारी समितीने नव्या अध्यक्षाची निवड करावी असे राहुल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आता काय होइल पुढे ?
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Wed, 07/03/2019 - 20:57 नवीन
(कदाचीत) काँग्रेसचं भलं होईल.
  • Log in or register to post comments
N
NiluMP Wed, 07/03/2019 - 23:22 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 07/04/2019 - 00:02 नवीन
आर्थिक युद्ध. कोणत्या देशाने कोणत्या देशाकडून काय विकत घ्यायचं किंवा नाही. १)दमबाजी, २)लादणे, ३)अडवणे, ४)मनाई.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 07/04/2019 - 06:21 नवीन
शून्यातून जे विश्व निर्माण करतात ते सर्व परिस्थिती मधून आलेले असतात . परिस्थिती प्रतिकूल असली तरी त्यांचं मनोधैर्य बिलकुल खचत नाही . पण त्यांच्या मुलांना सर्व आयते मिळालेलं असतं त्यामुळे त्यांनी संघर्ष केलेला नसतो . समोर थोडे जरी संकट आले तरी ते सैरभैर होतात . बऱ्याच उद्योग समूहाच्या वारसा न ची हीच अवस्था . कोटुंबिक भांडणात नेस्तनाबूत होतात किंवा संकटात
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले गुरुवार, 07/04/2019 - 07:37 नवीन
राजस्तानात जवळ जवळ सर्व शाकाहारी हॉटेलांवर अमुक पवित्र भोजनालय अशी पाटी असते.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ गुरुवार, 07/04/2019 - 16:16 नवीन
३० जुनला दिल्लीतील चांदनी चौकमधल्या दुर्गा मंदिराच्या परिसरात स्कूटी पार्किंग , दारु पिणे व तिथला घरांच्या जवळ लघुशंका करण्यार्याला हटकले म्हणुन त्या परिसरात रहाणार्या हिंदु माणसाची ह्या दोन मुस्लिम मुलांशी बाचाबाची झाली. हे झाल संध्याकाळी ते दोघे ३०० - ३५० मुस्लिम लोकांचा जमाव घेऊन " नारा ए तदबीर" , "अल्ला हु अकबर" अश्या घोषणा देत त्या परिसरात रात्री १२ च्या सुमारास दाखल झाले. ह्या वेळेचा फायदा घेत ह्या जमावाने १०० वेर्षापेक्षा जुन्या दुर्गा मंदिरावर हल्ला चढवला व सर्व मुर्तींची तोडफोड केली. पोलिसांनी मग येउन शांतता प्रस्थापित केली. ३ जुलैला एनडी टीव्हीच्या रविश कुमारला अचानक जाग आली आणि प्राईम टाईम मध्ये त्याने ही बातमी सांगीतली. म्हणे काही अराजक तत्वांनी मंदिराची मामुली तोडफोड केली. कटाक्षाने मुसलमान हा शब्द टाळला ! १०० वेर्षापेक्षा जुन्या दुर्गा मंदिरावर हल्ला चढवला व त्याची अपरिमीत हानी केली वैगेरे महत्वाची माहिती दिलीच नाही.
  • Log in or register to post comments
N
NiluMP गुरुवार, 07/04/2019 - 19:15 नवीन
नरेंद्र मोदीनी महात्मा न बनता मोदीच राहावे. काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या नादात मुसलमानांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करू नये. ठोस निर्णय हेरून लवकरात लवकर राम मंदिर आणि काश्मीरचा प्रश्न निकालात काढावा
  • Log in or register to post comments
M
mayu4u Fri, 07/05/2019 - 07:41 नवीन
अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारमन पहिल्या महिला अर्थमंत्री. देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री होण्याचा मान १९७०-७१ मध्ये इंदिरा गांधी यांच्याकडे गेला असला, तरी अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरणार आहेत. कारण इंदिरा गांधी पूर्णवेळ अर्थमंत्री नव्हत्या. १९७०-७१मध्ये इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना अर्थ खातं त्यांच्याकडे ठेवलं होतं. मात्र सीतारामन या खऱ्या अर्थाने पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत.
  • Log in or register to post comments
M
mayu4u Fri, 07/05/2019 - 08:47 नवीन
न्यू स्पेस इंडिया लिमिटेड नावाच्या शासकीय आस्थापनेची स्थापना.
  • Log in or register to post comments
अ
अमोल निकस Sat, 07/06/2019 - 18:25 नवीन
न्यू स्पेस इंडिया लिमिटेड नावाच्या शासकीय आस्थापनेचा फायदा काय ? ?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 07/06/2019 - 19:43 नवीन
पृथ्वी व्यतिरिक्त दुसऱ्या ग्रहावर जाणे हे तंत्र सर्व देशांना माहीत आहे. खूप वर्षा पूर्वी माणूस चंद्रा वर जावून आलंय . इस्रो ला ह्याच्या पुढचे तंत्र शिक्षण ghave लागेल . आपण विकसित देशांच्या १०० वर्ष पाठी आहे हे सत्य कधीच नाकारू नये.. ती आत्मप्रौढी आहे फक्त मनाला समाधान देईल
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 07/06/2019 - 21:01 नवीन
Rajesh188, माझ्या मते आपण १०० वर्षं वगैरे पाठीबिठी आजिबात नाही. इस्रोच्या वयाच्या मानाने यशदर बराच जास्त आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sun, 07/07/2019 - 08:15 नवीन
.>>> पृथ्वी व्यतिरिक्त दुसऱ्या ग्रहावर जाणे हे तंत्र सर्व देशांना माहीत आहे. - सुदान आणि येमेनला सुद्धा माहित आहे का? >>> आपण विकसित देशांच्या १०० वर्ष पाठी आहे हे सत्य कधीच नाकारू नये... - इथे "आपण" म्हणजे भारतीय / इस्रो असं तुम्हाला म्हणायचंय असं मी समजतो. तसा असेल तर तुमच्या मते जे कोणते विकसित देश आहेत त्या देशांनी १९१८ साली, (इस्रोपेक्षा १०० शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१८ साली, नाही का?) एकाच वेळी १०० उपग्रह आकाशात पदार्पित केले होते का? >>> ती आत्मप्रौढी आहे फक्त मनाला समाधान देईल. कमालीच्या घातक न्यूनगंडापेक्षा आत्मप्रौढी कितीतरी चांगली, नाही का? मतमतांतरांचा आदर आहेच, पण म्हणून आपण तथ्यांपासून ढळू नये, नाही का?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 07/06/2019 - 21:14 नवीन
Vovager सूर्य माला सोडून पुढच्या प्रवासाला गेले सुद्धा . आणि त्यांनी जी माहिती पाठवली आहे ती एडिट करून जगाला दिली जाते आहे आणि आपण अजुन चंद्र आणि मंगला भोवतीच अडकलो आहे
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 07/07/2019 - 09:22 नवीन
अवकाश संशोधनामागचा खरा उद्येश काय आहे, हे तुम्हाला खरेच माहीत आहे का ???!!! :)
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 07/07/2019 - 20:16 नवीन
अवकाश संशोधन जे आता पर्यंत झाले आहे त्याची काही percent ch माहिती सामान्य लोकांशी शेअर केली जाते . पृथ्वी वरील लोकांचे आयुष्य सुखी होण्यासाठी अवकाश संशोधनाचा काडीचा उपयोग नाही . पृथ्वी च्या कक्षेत फिरून पृथ्वी वर लक्ष ठेवणारे उपग्रह फक्त radio tv,mobile aani lashkari halchali var लक्ष ठेवणे ह्यातच सफल आहे (ते पण जमत नाही .म्हणून world trade center var halla होवू शकला ,,) पृथ्वी वर होणारी एक सुधा नैसर्गिक आपत्तीचा पूर्व सूचना ह्या आधुनिक यंत्रणेला देता आली नाही . विश्वाची उत्पत्ती शोधणे असे काही तरी मोठ्या गोष्टी केल्या जातात . पण रिअल मध्ये पृथ्वी वर घडणाऱ्या किती गोष्टी का घडतात ह्या प्रश्नाचे उत्तर अजुन तरी अनुत्तरीत आहे
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Mon, 07/08/2019 - 06:57 नवीन
पृथ्वी वर होणारी एक सुधा नैसर्गिक आपत्तीचा पूर्व सूचना ह्या आधुनिक यंत्रणेला देता आली नाही .
-- तुम्हाला या विषयावर भरपूर अभ्यास करण्याची खूप गरज आहे. जगाचे सोडा, दोन एक महिन्यापूर्वी भारतातील पूर्व किनार्‍याला धडक देणार्‍या (नाव आठवत नाही) वादळाची पूर्व सूचना मिळाल्यानेच अनेक लोकांचे वेळीच स्थलांतरण करुन त्यांचे प्राण वाचवण्यात यश आले होते.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 07/08/2019 - 11:15 नवीन
तुमचे बहुतेक प्रतिसाद, त्या विषयाचा अभ्यास न करता लिहिलेले व "मला असे वाटते म्हणून तेच्च वैश्विक सत्य आहे" अश्या प्रकारचे असतात. सद्याचे, अवकाश संशोधन आणि अवकाशप्रवास यासंबंधीचे, प्रतिसादही त्याला अपवाद नाहीत. अभ्यास वाढवायची गरज आहे, यात वाद नाही. आता तुमच्या माहीतीकरिता, चंद्रावर माणूस पाठवल्यामुळे, तुमच्या कल्पनेपेक्षा खूप जास्त फायदे मानवजातीला झालेले आहेत. त्यापैकी, काही मोठे महत्वाचे फायदे असे आहेत... 1. CAT scanner: this cancer-detecting technology was first used to find imperfections in space components. याचा वैद्यकशास्त्रातला उपयोग सर्वसामान्य माणसांनाही माहीत आहेच. 2. Computer microchip: modern microchips descend from integrated circuits used in the Apollo Guidance Computer. उत्तमोत्तम संगणक बनविण्यास याचा किती उपयोग आहे, हे सांगायलाच हवे काय? 3. Cordless tools: power drills and vacuum cleaners use technology designed to drill for moon samples. तुमचा मोबाईल आणि टीव्ही/एसीचा रिमोट हे यापैकी एक फारच खालच्या स्तरावरचे साधन आहे. 4. Ear thermometer: a camera-like lens that detects infrared energy we feel as heat was originally used to monitor the birth of stars. याचा वैद्यकशास्त्रात उपयोग होतो, हेवेसांन. 5. Freeze-dried food: this reduces food weight and increases shelf life without sacrificing nutritional value. याची अनेक उदाहरणे तुमच्या जवळच्या सुपरमार्केटमध्येच नव्हे तर कोपर्‍यावरच्या दुकानातही दिसतील. 6. Insulation: home insulation uses reflective material that protects spacecraft from radiation. हे वरून दिसत असले नसले तरी त्याचा अनेक घरांच्या बांधणीत उपयोग होतो. 7. Invisible braces: teeth-straightening is less embarrassing thanks to transparent ceramic brace brackets made from spacecraft materials. याचा वैद्यकशास्त्रात उपयोग होतो, हेवेसांन. 8. Joystick: this computer gaming device was first used on the Apollo Lunar Rover. याचा केवळ खेळण्यांतच नाही तर लढाऊ विमानांतही उपयोग केला जातो. 9. Memory foam: created for aircraft seats to soften landing, this foam, which returns to its original shape, is found in mattresses and shock absorbing helmets. हे विमान-चारचाकीच्या बैठका, दिवाणखान्यातल्या बैठकांपासून ते अगदी झोपायच्या खोलीतल्या गाद्यांपर्यंत वापर होणारे तंत्रज्ञान आहे. 10. Satellite television: technology used to fix errors in spacecraft signals helps reduce scrambled pictures and sound in satellite television signals. गावागावात पोचणारा टीव्ही याचमुळे, हेवेसांन. 11. Scratch resistant lenses: astronaut helmet visor coating makes our spectacles ten times more scratch resistant. अत्यंत उच्च तंत्राच्या उपकरणांपासून ते नेहमीच्या वापराच्या चष्म्यांपर्यंत हे तंत्रज्ञान वापरले जाते. 12. Shoe insoles: athletic shoe companies adapted space boot designs to lessen impact by adding spring and ventilation. खेळाडूंसाठी आणि विशेषतः फ्लॅटफूट नावाच्या आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी या गोष्टीचे किती मोल आहे हेवेसांन. 13. Smoke detector: Nasa invented the first adjustable smoke detector with sensitivity levels to prevent false alarms. सर्वसामान्य घरातील आणि सार्वजनिक जागांमध्ये याचा वापर केलेल्या उपकरणांनी जगभरात किती जीवहानी आणि संसाधनहानी वाचवली आहे याची मोजदाद करणे कठीण आहे. 14. Swimsuit: Nasa used the same principles that reduce drag in space to help create the world’s fastest swimsuit for Speedo, rejected by some professionals for giving an unfair advantage. स्वस्पष्टीकरणात्मक ! 15. Water filter: domestic versions borrow a technique Nasa pioneered to kill bacteria in water taken into space. हे तंत्रज्ञान, ऑफिस-रेस्तराँ-घर यांच्यामध्ये आजकाल जवळजवळ अनिवार्य झाले आहे आणि आरोग्याची २४ X ७ काळजी घेत आहे, हेवेसांन. खास भारताबद्दल बोलायचे झाले तर, वरच्यांमध्ये खालील फायदे मिळवा... १. गावागावात पोचलेली मोबाईल क्रांती आणि तिचे फायदे २. गावागावात पोचलेला टीव्ही आणि त्याचे फायदे ३. देशाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी मिळणारी उपग्रहांची मदत : यात संरक्षक (शत्रूवर नजर ठेवणे) आणि आक्रमक (हल्ला करण्यासाठी मदत) अश्या दोन्ही प्रणाली येतात. उदा: बालाकोटवर केलेल्या हल्ल्याच्या पूर्वतयारीत आणि हल्ल्यात भारतिय उपग्रहांची मदत अमुल्य होती... त्यामुळेच सर्व कारवाई भारतिय सैन्याला शून्य धोक्यासह यशस्वीपणे करता आली. ५. भारताच्या संरक्षण व्यवस्थेत दाखल झालेल्या आणि दिवसेदिवस क्षमता वाढत असलेल्या क्षेपणास्त्रांसंबंधीचे मूलभूत ज्ञान अवकाशतंत्रज्ञानातून विकसित होते, हे वेगळे सांगायला नकोच. ५. उपग्रह वापरून केलेले हवामान अंदाज किती उपयोगी असतात हे सांगायला नकोच... भारताच्या पूर्व व पश्चिम किनार्‍यावर आलेल्या वादळांमध्ये किती जीवहानी व इतर नुकसान टळले, हे माध्यमांत वाचले असेलच. ६. इस्रोने, अवकाशयानांसाठी, लहान आकाराच्या व वजनाच्या पण भरपूर वीज साठविणार्‍या बॅटर्‍यांचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. ते व्यापारी संस्थांना इलेक्ट्रिक कार आणि इतर उपयोगांसाठी लागणार्‍या बॅटर्‍या बनविण्यासाठी देण्याचे नुकतेच जाहीर झाले आहे. कदाचित तुमच्या पुढच्या वीजचारचाकीसाठी किंवा तुमच्या शहरात चालणार्‍या वीजबसमध्ये हे तंत्रज्ञान वापरले जाईल. :) असो ही यादी मारूतीच्या शेपटीसारखी वाढत जाणारी आहे. विस्तारभयास्तव इतकेच मोजके फायदे लिहिले आहेत. सर्व फायदे लिहू गेल्यास पुस्तक लिहावे लागेत. पण, वरील फायदे, माझा मुद्दा पूर्णपणे समजावून द्यायला पुरेसे आहेत. सबळ माहिती अथवा अभ्यासाशिवाय बेधडक विधाने करण्याने, तुम्ही कळत-नकळत स्वतःची विश्वासार्हता गमावत आहात, हे तुमच्या नजरेस आणून द्यावेसे वाटले म्हणूनच हा प्रतिसाद दिला आहे. बाकी सगळे तुमच्यावर अवलंबून आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 07/08/2019 - 11:38 नवीन
माझी पोस्ट बिलकुल योग्य नव्हती तर त्या मध्ये बऱ्याच ठिकाणी घोड चुका होत्या . पण एकदा पोस्ट प्रदर्शित झाल्या नंतर एडिट करायची सोय नाही . तुमचं म्हणणे योग्य आहे . पुढे काळजी घेईन रोखठोक पने चूक दाखवल्या बद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 07/08/2019 - 11:42 नवीन
मनाचा मोठेपणा दाखवून चूक कबूल केल्याबद्दल आभार. मनमोकळेपणे चूक मानणे, ही सुधारणेची आणि विकासाची पहिली पायरी असते.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 07/08/2019 - 11:43 नवीन
मनाचा मोठेपणा दाखवून चूक कबूल केल्याबद्दल आभार. मनमोकळेपणे चूक मानणे, ही सुधारणेची आणि विकासाची पहिली पायरी असते.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 07/07/2019 - 14:07 नवीन
चंद्रावर सोळा सोमवार करायचे आहेत . संकष्टी होणार नाही.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 07/08/2019 - 11:12 नवीन
तिवरे धरण फुटल्या पासून मराठी वृत वाहिन्या चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत . रोजच कोणत्या ना कोणत्या धरणातील भिंती मधून होणारी पाण्याची गळती दाखवत नाहीत . पण ते दाखवताना त्यांच्या कडून मोठी चूक होत आहे असं वाटत . कारण जी गळती ते दाखवत आहेत त्याचे प्रमाण आपल्या घरात जेवढे नळाला पाणी येते तेवढच असते . खूप मोठा पाणीसाठा धरणात असताना छोट्या प्रमाणात पाण्याची गळती होणारच पण त्या मुळे धरणाला धोका आहे असा निष्कर्ष जे टीव्ही anchor काढत आहे . तो शास्त्रीय दृष्टी ने बघितलं तर योग्य नाही . तर ह्यातील जाणकारांनी धरणामधून किती प्रमाण पेक्षा जास्त पाणी गळती झाली तर तिला धोकादायक आहे हे समजल जाते ह्या विषयी मत व्यक्त करावे .
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 07/10/2019 - 06:51 नवीन
हा धागा खासकरून धाग्याचे राजकीय स्वरूप मी लक्ष्यवेध करत असलेल्या विषयाच्या दृष्टीने आजिबातच पोषक नाही. खरे म्हणजे लक्षवेधत असलेल्या विषयास वेगळ्या धागा लेख चर्चेची क्षमता आहे. 'इंग्रजी चित्रप्टातील हिंदूत्व' मी खाली केलेल्या विवरणापेक्षा लक्ष वेधू इच्छित असलेला गार्डीयनचा लेख स्वतःच अधिक बोलका -सहज समजणारा आहे त्यामुळे सरळ त्या लेख वाचनाकडे गेल्यास अधिक उत्तम How movies embraced Hinduism (without you even noticing) १) इथे इंग्रजी चित्रपटातील हिंदू तत्वज्ञान, लोक यांची प्रत्यक्षता नव्हे तर इंग्रजी/पाश्चात्य चित्रपटातील त्यांनी दाखवलेल्या कल्पनात कुठे कुठे हिंदू तत्वज्ञान, संस्कृतीशी अथवा हिंदूपणाशी समकक्षता आढळते ? २) या शीर्षकातील हिंदूत्व हा शब्द राजकीय अर्थाने नव्हे तर तत्वज्ञान आणि संस्कृती या अर्थाने हिंदूपणा आहे. ३) गार्डियनमधील लेखात म्हटल्याप्रमाणे इंग्रजी/ पाश्चात्य चित्रपट किंवा साहित्यात तुम्हाला हिंदूपणा सादृश्य समकक्षता कधी कुठेआढळल्या का ? प्रश्न ३ वेगळा धागा लेख काढण्या योग्य आहे इच्छूकांनी अवश्य काढावा.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 07/11/2019 - 05:39 नवीन
30 साल पहले लिए 200 रुपये का कर्ज लौटाने मुंबई आए केन्या के सांसद - ही बातमी. असेही लोक ह्या दुनियेत आहेत काय अजून ?
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 07/11/2019 - 15:24 नवीन
अजुन एक सुखद धक्का !
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ गुरुवार, 07/11/2019 - 17:40 नवीन
ईंदिरा जयसिंग व ग्रोव्हर यांच्या तर्फे गेले २० 'वर्षे चालवली जाणारी लॉयर्स कलेक्टिव्ह नावाची NGO ला गेल्या वर्षी सरकारने टाळं लावलेल होत . आता ह्या NGO च्या प्रमोटर विरुद्ध CBI ने तपास सुरु केलेला आहे !! ह्या NGO ने आता पर्यंत ८००० कोटी रु परदेशातुन फंड स्वरुपात आणले ! त्या रक्कमेच नक्की काय केल हे ईंदिरा जयसिंग व ग्रोव्हर ह्यांना सांगता आलेल नाही ! ईंदिरा जयसिंग व ग्रोव्हर ह्यांच्या दिल्ली मुंबई तील सर्व ठिकाणावर एकाच वेळा धाडी टाकण्यात आलेल्या आहेत ! ईंदिरा जयसिंग सुप्रिम कोर्टात वकिल आहेत ! समलैंगिक लोकांच्या हक्काबद्दल लढा देउन सुप्रिम कोर्टातुन आपल्या बाजुने निर्णय करुन घेतला!! ह्या गोष्टीला समजवुन घेण्यासाठी ईंदिरा जयसिंग व ग्रोव्हर ह्यांची पार्श्वभुमि बघावी लागेल ! ईंदिरा जयसिंग व ग्रोव्हर ह्यांच्या लॉयर्स कलेक्टिव्ह NGO ला AIDS विरुद्ध लढण्यासाठी हजारो कोटी मिळत होते !! पण हाय भारताची AIDS मधली प्रगती फारच स्लो !! हि प्रगती वाढवण्यासाठी खास प्रयत्न करणे लॉयर्स कलेक्टिव्ह NGO ला गरजेचे ठरले म्हणुन समलैंगिक लोकांच्या हक्का बद्दल ईतका कळवळा !!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/17/2019 - 16:52 नवीन
कुलभूषण जाधव यांच्यासंबंधातील खटल्यात, हेग येथिल आंतरराष्ट्रिय कोर्टाने (International Court of Justice), भारताचे सर्व दावे मानले आणि पाकिस्तानचे सर्व दावे अमान्य केले आहेत. हा आंतरराष्ट्रिय स्तरावर भारताने पाकिस्तानचा केलेला अजून एक मोठा पराभव ठरला आहे. यामुळे आता, (अ) पाकिस्तानच्या कांगारू लष्करी कोर्टाने दिलेल्या फाशीच्या निर्णयाला खीळ (स्टे) बसली आहे आणि (आ) (पाकिस्तान सतत नाकारत आलेली) कुलभूषणशी संवाद साधण्याची (काऊंसलर अ‍ॅक्सेस) परवानगी भारताला मिळेल... अर्थातच, बंद खोलीत लुटुपुटीची केस चालविण्याचा पाकिस्तानचा मार्ग बंद झाला आहे. यानंतरही, पाकिस्तानसारखे बनेल राष्ट्र सरळ सुतासारखे वागेल याची खात्री नाहीच. पण, आता त्याच्या सर्व बदमाष कारवाया जगासमोर आणून त्याच्यावर सतत दबाव राखणे भारताला सोपे होईल. अजून लढाई संपलेली नाही पण, या केसमधली ही एक महत्वाची पायरी भारताने जिंकली आहे. https://timesofindia.indiatimes.com/india/icj-rules-pakistan-must-review-kulbhushan-jadhavs-death-sentence/articleshow/70263667.cms https://timesofindia.indiatimes.com/india/kulbhushan-jadhav-case-eight-key-points-of-icj-verdict/articleshow/70264233.cms
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Wed, 07/17/2019 - 18:38 नवीन
अर्थात हे एक मत पाकिस्तानी juryचे होते.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 07/18/2019 - 09:17 नवीन
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय समुदायाचा कितीह दबाव आला तरीही कमांडर कुलभूषण जाधव याना कधीही सोडणार नाही हि वस्तुस्थिती आहे. कारण हा त्या राष्ट्राच्या "प्रतिष्ठेचा" प्रश्न बनला आहे. स्वतःच्या जनतेच्या नजरेत आपली स्थिती वाईट होणे हे कोणत्याही राज्यकर्त्याला/ लष्करशहाला परवडणारे नसते. त्यातून कुभूषण जाधव हे गुप्तहेर होते आणि ते पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाची हेरगिरी करायला आले होते आणि आपण कसे त्यांना शौर्याने आणि शिताफीने पकडले याचा डांगोरा पिटल्यावर त्यांना सोडून देणे हि राजकीय आत्महत्याच ठरेल. त्यामुळे त्यांच्यावर परत खटला चालवून त्यांना परत फाशी किंवा मरेपर्यंत जन्मठेपच दिली जाईल यात कुणालाही शंका नाही. परंतु पाकिस्तानचा खोटेपणा जितका उघड पडेल तितके कमांडर जाधव याना फाशी देणे हे कठीण जाईल आणि तुरुंगात का होईना पण ठेवणे भाग पडेल. कोणताही गंभीर गुन्हा न केलेले ५०० च्या वर भारतीय नागरिक पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. त्यांना ते सहज सोडत नाहीत तर अशा मोठ्या खटल्यातील आरोपीला सोडणे कसे शक्य आहे( दुर्दैवाने).
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प गुरुवार, 07/18/2019 - 13:37 नवीन
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय पाकिस्तान ला बंधनकारक नाही असे वाचनात आले . आता पर्यन्त दोन वेळा अमेरिका ने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय खूंटीला टांगुन आरोपी नां फाशी दिली आहे व न्यायालय अमेरिका चे काहीही बिघडवू शकली नाही . एकच आशा आहे की पाकिस्तान भिखारी देश असल्या मुळे आंतरराष्ट्रीय भिक मिळविणय साठी जाधव यांना मरेपर्यन्त जन्मठेप शिक्षा देण्याची शक्यता वाटते . बीबीसी न्यूज़ - जाधव जैसे मामलों में ICJ के फ़ैसलों की अनदेखी होती रही है http://www.bbc.co.uk/hindi/international-39962152
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 07/20/2019 - 08:39 नवीन
Cops bust Rs 5,000 crore heroin racket with links to Taliban तालिबान आणि पाकिस्तानी लोकांनी चालवलेल्या एका मोठ्या टोळीला दिल्ली पोलिसांनी पकडले आहे. ही टोळीची, अंमली पदार्थांच्या तस्करीची उलाढाल तब्बल रु५००० कोटी (रु पाच हजार कोटी) ची होती !
  • Log in or register to post comments
म
मारवा Sat, 07/20/2019 - 18:40 नवीन
प्रियंका गांधी यांनी ज्या सभ्यतेने संयमाने सुजाणपणाने संवेदनशीलतेने सोनभद्र प्रकरणात योगी सरकारच्या विरोधात जी भुमिका घेतली ती अत्यंत स्तुत्य् अनुकरणीय अशी आहे याच रीतीने जर प्रियंका गांधी काम करत राहील्या तर त्यांच्यात भारतीय राजकारणाला एक नविन दिशा देण्याची क्षमता आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 07/21/2019 - 07:51 नवीन

सोनभद्र येथिल दुर्दैवी व निषेधार्ह हत्याकांड

या दुर्दैवी आणि निषेधार्ह हत्याकांडातील पिडित लोकांना मदत व्हावी असे काही करण्याऐवजी या प्रसंगाचे राजकारण करण्याचाच जास्त प्रयत्न केला जात आहे... त्यात, उत्तर प्रदेशच्या कॉन्ग्रेस प्रभारी असलेल्या प्रियंका गांधी सर्वात पुढे आहेत, आणि इतर पक्ष व स्वतःच्या राज्यातल्या अराजकाकडे सतत दुर्लक्ष करणार्‍या ममता बॅनर्जीही फार मागे नाहीत. :( १. Explained: What happened in Sonbhadra, what's happening now | All you need to know २. गुगल विचारणा करून मिळू शकणारे अजून काही दुवे या प्रकरणाची त्रोटक पार्श्वभूमी : (अ) सन १९५५ साली, तत्कालीन कॉन्ग्रेसच्या राजवटीत, जमिन हडप करण्यासाठी, अवैधरित्या एक सोसायटी स्थापन करण्यात आली व तिच्याकडे जमिनीची मालकी देण्यात आली. (आ) नंतर, सन १९८९ मध्ये तत्कालीन कॉन्ग्रेसच्या राजवटीत, ती जमीन सोसायटीकडून एका व्यक्तीकडे अवैधरित्या हस्तांतरीत करण्यात आली. (आ) त्यासंबंधीचा खटला कोर्टात दीर्घकाळ आजपर्यंत प्रलंबित आहे आणि म्हणून सद्य सरकार या बाबतीत कारवाई करू शकत नाही. (इ) त्यामधील दोन बाजूत असलेले दीर्घकालचे वैर अचानक चिघळून हिंसा केली गेली. अश्या पार्श्वभूमीवर, योगी सरकारच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेऊन आणि १४४ कलमाचा भंग करत गुन्ह्याच्या जागेवर जाण्याचा आग्रह धरून, प्रियंका गांधींनी टेलिव्हिजनच्या झगमगाटात राजकिय भाकरी भाजून घेण्यापलिकडे काय साध्य केले आहे? लोक हुशार झाले आहेत आणि आता अश्या नौटंकी त्यांना मोहवत नाहीत, हे समजून घेण्यात कॉन्ग्रेस अजूनही कमी पडत आहे. किंबहुना, "राजकारण्यांनी यामध्ये पडून या गुन्ह्याला राजकिय रंग देवू नये" असे स्थानिक लोकांनी म्हटल्याचे माध्यमात पाहिले असेलच. यावरून तरी राजकारण्यांनी बोध घ्यायला हवा. सततची नकारात्मकता टाळून, काहीतरी सकारात्मक कार्य आणि योजना राबविल्याशिवाय, लोकांना कॉन्ग्रेसबद्दल ममत्व वाटणार नाही, ही बाळबोध जाण हुशार, मातब्बर आणि जुन्या-जाणत्या कॉन्ग्रेसी नेत्यांना अजूनही येत नाही, हे अनाकलनिय आहे. सरकार पक्षाला ओढूनताणून विरोध करणे आणि आंतरराष्ट्रिय मुद्द्यांवर पाकिस्तानची तळी उचलणे (पक्षी : आपलेच नाक कापून सरकारला अपशकून होईल अश्या समजात राहणे) यापुढे त्यांची बुद्धी जात नाही असेच दिसत आहे. एक वेळ प्रियंका राजकारणात नवीन असल्यान त्यांना हे समजत नसेल. पण, दुर्दैवाने, "कौन बनेगा पक्षाध्यक्ष?" या वैयक्तिक राजकिय चढाओढीच्या नाटकाचे अनेक उलटसुलट प्रयोग करण्यात गुंतलेल्या कॉन्ग्रेसच्या नेत्यांनाही, प्रियंका गांधींना यावेळीही योग्य सल्ला देण्यासाठी वेळ मिळालेला दिसत नाही. असेच होत राहिले तर, दुर्दैवाने, भारतात सबळ विरोधी पक्ष असण्याचे मनोरथ, केवळ दिवास्वप्नच राहतील. :(
  • Log in or register to post comments
न
नंदन Sun, 07/28/2019 - 10:42 नवीन
ही बातमी फॉक्स "न्यूज"वर आहे बरं. (ट्रम्पभक्तांनी नेमेप्रमाणे 'फेक न्यूज, फेक न्यूज' असा पढवलेला आरडाओरडा करण्यापूर्वी सांगितलेलं बरं! :)) तसा बाकीचा ट्विटरतमाशा चालू आहेच तात्यांचा, पण ही बातमी अगदी नेहमीच्या गोंधळापेक्षाही चित्तचक्षुचमत्कारिक वाटली! ओबामामामांनी व्हाईट हाऊस ट्रम्पतात्यांच्या हवाली करून अडीच वर्षं झाली तरी त्यांचे बिनडोक कांगावे काही संपत नाहीत* (आता बघा, व्हॉटअबाऊटरी करून ओबामा कसा बुशने इकॉनॉमी खड्ड्यात घातली म्हणून कांगावा करत होता, असं म्हणत ट्रम्पभक्त धावत येतील!! :)). काल तर चक्क व्हाईट हाऊसमधलं एअर कंडिशनिंग नीट चालत नाही, हा ओबामा प्रशासनाचाच दोष आहे असं तात्यांनी आपल्या (टॅक्सपेयर-फंडेड) सुट्टीवर जायच्या आधी जाहीर केलं! (चार प्रमुख वाहनकंपन्यांनी ट्रम्पतात्यांना फाट्यावर मारून थेट कॅलिफोर्निया राज्याशी गाड्यांचे मायलेज पर गॅलन लक्ष्य निर्धारित केल्यामुळे आणि गेल्या तिमाहीत चार टक्के सोडाच, पण तीन टक्के जीडीपी वाढीचं लक्ष्य गाठता न आल्याचं उघड झाल्यामुळे तात्या (नेहमीपेक्षा जास्तच) भंजाळले असावेत!!!) बाकी तथाकथित बिल्डरला साधं एसी दुरुस्त करवून घेता येऊ नये आणि तथाकथित 'डीलमेकर'ला वाहनकंपन्यांशी साधं डील करता येऊ नये? गंमतच आहे! “For instance, the Obama administration worked out a brand new air conditioning system for the West Wing and it was so good before they did the system,” he said. “Now that they did this system it's freezing or hot in here,” he complained. It’s common for presidents to blame their predecessors for problems plaguing the country, but this might be the first time the climate in the White House has been brought up by a presidential successor. दुवा: https://www.foxnews.com/politics/trump-blames-obama-administration-white-house-air-conditioning
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 07/28/2019 - 11:00 नवीन
"तुम्ही पक्ष सोडून का जात आहात?" - "जनतेची तशी मागणी आहे. प्रवाहाविरुद्ध जायचं का विकासाबरोबर हा प्रश्न निर्माण झाला. आम्ही विकासाबरोबर जायचं ठरवलं. आघाडीला सत्ता मिळेल असं जनतेला वाटत नाही. सत्तेशिवाय विकास होणार नाही." "साहेबांना सोडणार?" "साहेबांना कायम ह्रुदयात स्थान आहेच." (" पण सत्ता डोक्यात आहे.")
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Mon, 07/29/2019 - 12:59 नवीन

People across 180 countries will get to see the unknown side of PM @narendramodi as he ventures into Indian wilderness to create awareness about animal conservation & environmental change. Catch Man Vs Wild with PM Modi @DiscoveryIN on August 12 @ 9 pm. #PMModionDiscovery pic.twitter.com/MW2E6aMleE

— Bear Grylls (@BearGrylls) July 29, 2019
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Mon, 07/29/2019 - 13:14 नवीन
आता मोदी भाई सुद्धा यात आले होय ?
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Mon, 07/29/2019 - 15:42 नवीन
राफेल नोटंकीपेक्षा बरी आहे. पंतप्रधान झाले म्हणून क़ाय झाले? काही हौसमौज करू नए क़ाय माणसाने? चरसगांजा घेण्यापेक्षा, गुमनाम सहलीवर जाण्यापेक्षा, असहिष्णुताच्या नावाने बोंबा मारण्यापेक्षा हे बर्र!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Mon, 07/29/2019 - 15:50 नवीन
पुलवामा इथे सिआरपिएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी, जिम कार्बेट पार्कमधे याच कार्यक्रमाचे शुटिंग करण्यात व्यस्त होते प्रधानसेवक असे वाटते.
  • Log in or register to post comments
ग
गब्रिएल Mon, 07/29/2019 - 19:02 नवीन
डोले मिटून राऊलबाबाच्या मांगे मांगे धावनार्‍यांना राऊलबाबाची डोले मिटून खोटी बोंब मार्न्याची आदत लाग्ली आसल्यास आच्चर्य न्हाय. ढवल्या शेजारी पवल्या बांदला आसं कायकी म्हत्यांत नाय्का? =)) https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/pm-modi-cancelled-rally-was-angry-about-being-told-late-of-pulwama-attack/articleshow/68105557.cms?from=mdr
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Tue, 07/30/2019 - 08:01 नवीन
पुलवामात सुरक्षाव्यवस्थेत ढिसाळपणा झाल्याबद्दल व नंतरही मोदींना उशीरा सांगितल्याबद्दल सखोल चौकशी आणि बर्‍याच अधिकार्‍यांवर कारवाई झाली असेल नाही? नक्की कोणी हयगय केली काही कळलं का पुढे? मला वाटतं मोदीजी खूपच प्रेमळ आहेत. अधिकार्‍यांवर रागावतात; पण लगेच माफ करून टाकतात. साध्वीजींना कधीही माफ करणार नाही म्हणतात; पण तरी काही म्हणत नाहीत. अगदी माऊलीसारखे प्रेमळ आहेत आपले प्रिय मोदीजी. चो च्वीट!
  • Log in or register to post comments
ग
गब्रिएल Tue, 07/30/2019 - 08:17 नवीन
मियाँ गिरा लेकीन तंगडी उप्परीच है । =)) =)) =))
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Tue, 07/30/2019 - 08:20 नवीन
करेक्ट!! =)) =))
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Mon, 07/29/2019 - 18:51 नवीन
अचानक गुपचुप 20 / 25 दिवस थाईलैंड ला सुट्टीवर जाणाऱ्यापेक्षा हे उत्तम :)
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Tue, 07/30/2019 - 07:37 नवीन
=)) अगदी बरोबर बोल्लात! कोणता पंतप्रधान गेला होता?
  • Log in or register to post comments
ग
गब्रिएल Tue, 07/30/2019 - 08:18 नवीन
आपलं ठ्येवावं झाकून आनि दुसर्याच पाहावं (तोल जाईल इक्तं) वाकून =)) =)) =))
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा