Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

कविता पिंपळपान

अ — अत्रुप्त आत्मा, Mon, 07/01/2019 - 11:54
कविता सुचत नाही मन ही रितेच काही लिहू काय? म्हणता म्हणता सापडले ओले पान. ही कविता पिंपळपान! थेंब थेंबा जाग आली रेष रेषा बोलू लागली ना लिहिता आले कैसे मज लेखणिस भान? ही कविता पिंपळपान! हे असेच असते सारे ना सुचता हलते वारे पाचोळा नसता कोठे गर्द जागे होते रान ही कविता पिंपळपान! घरट्याच्या अवती भवती पाऊस थेंबांची गर्दी मी मिटून घेता दारे पाऊस करी मूकगान ही कविता पिंपळपान! म्हटले या पावसाला मन हळवे नकोच सोडू भिजवूनि जा चिंब मनाला मग लाभे पाऊस-दान ही कविता पिंपळपान! ===×====×====×===×=== अतृप्त... https://scontent-sjc3-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/65891576_2302597183159888_6148540301800636416_o.jpg?_nc_cat=108&efg=eyJpIjoidCJ9&_nc_oc=AQnWXRF_HhOj9XrJIBZf9b5pGvQkV5rnIpTXNvU_5h34rvIyasK7PwLlT3CN7jfuIPs&_nc_ht=scontent-sjc3-1.xx&oh=9c6292a5e8789277a8d3256b22183584&oe=5DB31DB1

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 14884 views

💬 प्रतिसाद
य
यशोधरा Mon, 07/01/2019 - 11:56 नवीन
घरट्याच्या अवती भवती पाऊस थेंबांची गर्दी मी मिटून घेता दारे पाऊस करी मूकगान ही कविता पिंपळपान! म्हटले या पावसाला मन हळवे नकोच सोडू भिजवूनि जा चिंब मनाला मग लाभे पाऊस-दान ही कविता पिंपळपान!
वा! वा!
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 07/01/2019 - 12:12 नवीन
हळवे झालात गुरुजी आज. छान जमून आलीय.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 07/03/2019 - 04:47 नवीन
गवि यांचेशी सहमत -बुवांच्या मार्मिक लेखणीचा फ्यान.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 07/03/2019 - 10:21 नवीन
आगोबाचा - पांडू प्रतिसाद! Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 07/01/2019 - 12:12 नवीन
''घरट्याच्या अवती भवती पाऊस थेंबांची गर्दी मी मिटून घेता दारे पाऊस करी मूकगान ही कविता पिंपळपान!'' केवळ सुरेख. लेखनाचा पोत सुधारतोय. लिहित राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 07/01/2019 - 15:39 नवीन
@केवळ सुरेख. लेखनाचा पोत सुधारतोय. लिहित राहा. --- धन्यवाद सर. __/\__ यशोधरा, गवि, जॉनविक - धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Mon, 07/01/2019 - 12:26 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 07/01/2019 - 16:48 नवीन
सुंदर कविता ! लिहीत रहा.
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 07/02/2019 - 05:08 नवीन
भावविभोर कविता,आवडली आहे. लेकाने कवीला नैसर्गिक कार्यापासून निसर्गाच्या सानिध्यात नेलेले आहे. वाचकांची पत्रेवाला नाखु
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 07/02/2019 - 06:20 नवीन
@लेकाने कवीला नैसर्गिक कार्यापासून निसर्गाच्या सानिध्यात नेलेले आहे. - दुषषष्ट!
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 07/03/2019 - 00:10 नवीन
पावसाळ्यात काम नसल्याने कवीला व्यावहारीक कार्यापासून निसर्गाच्या सानिध्यात नेलेले आहे - दुष्ट दुम्न. :-) बाकी प्रा. डॉ. बोलले ते बरोबरच आहे. साहित्य संमेलनात वाचन करण्याच्या पातळीची कविता आहे. पुरस्कारप्राप्त वगैरे. आणि पिंपळपानामुळे आध्यात्मिक बैठकदेखील मिळालेली आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 07/02/2019 - 07:06 नवीन
>>>लेकाने कवीला नैसर्गिक कार्यापासून निसर्गाच्या. सुचू द्या भो त्यांना दुसरं असंचं काही चांगलं. ही पहिली कविता असावी ज्यात तांब्या पीतळ आणि 'विधी'विषयाचा उल्लेख नाही. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 07/02/2019 - 06:10 नवीन
छान झाली आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ल
लीलाधर Tue, 07/02/2019 - 07:29 नवीन
विडंबन ही कविता पिंपळपान याचे विडंबन करण्याचा प्रयत्न कविता सुचत नाही मन ही रितेच काही लिहू काय? म्हणता म्हणता सापडले भोला पान ही कविता पानच पान ! चुना चुना आग झाली रेष रेषा बोलू लागली न खाता आले कैसे मज लेखणीस भान ही कविता पानच पान! हे असेच असते सारे न खाता हलते सारे पाचोळा नसता कोठे गर्द लालच होते पान ही कविता पानच पान! टपरीच्या अवती भवती खवय्यांची अतूट गर्दी तो मिटून देता पाने करीतो मूकगान ही कविता पानच पान! म्हटले या पानवाल्याला पान हळवे नकोच सोडू भिजवूनी दे खवय्याला मग लाभे दानच दान ही कविता भोला पान! ===×====×====×===×=== संत्रुप्त
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 07/02/2019 - 07:58 नवीन
अरे, काय हे! =)) पिंपळ पानाचे मघई पान करून टाकले होय! आता बुवा मारणार तुला!
  • Log in or register to post comments
ल
लीलाधर Tue, 07/02/2019 - 08:02 नवीन
बुवा कडून
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 07/02/2019 - 08:29 नवीन
आहेत पान"पराग" खुलासा संपला नाखु दुरुस्तीवाला भाऊ रंगारी पथ, सदाशिव पेठ पुणे
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 07/02/2019 - 08:51 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 07/02/2019 - 07:59 नवीन
अजून साफसफाई आणि भर अपेक्षित आहे. प्रयत्न उत्तम आहे.
  • Log in or register to post comments
ल
लीलाधर Tue, 07/02/2019 - 08:01 नवीन
तेव्हढे पानाचे लक्षात असू द्या
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 07/02/2019 - 08:11 नवीन
सँत्रुप्त लक दाद देणेत येत आहे!
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Tue, 07/02/2019 - 09:28 नवीन
कविता सुचत नाही पान ही रितेच काही लावू काय? म्हणता म्हणता सापडले ओले पान. हे १२०-३०० फुलचंदपान! थेंब थेंबा जाग आली रेष रेषा बोलू लागली ना लावता आले कैसे या चुन्यास भान? हे १२०-३०० फुलचंदपान! हे असेच असते सारे ना सुचता हलते वारे किवाम नसता का कोठे गर्द जागे होते रान हे १२०-३०० फुलचंदपान! ठेल्याच्या अवती भवती पिचकाऱ्यांच्या थेंबांची गर्दी मी मिटून घेता दारे गिर्हाईक करी मूकगान हे १२०-३०० फुलचंदपान! म्हटले या काथ्याला मन हळवे नकोच सोडू भिजवूनि जा चिंब पानाला मग लाभे तारेचे दान हे १२०-३०० फुलचंदपान! ===×====×====×===×=== अतृप्त..पानवाला
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 07/03/2019 - 11:39 नवीन
जमले हो जमले पान बनवा एक कलकत्ता मिठा डबल, १२० ३०० नवरतन किमाम, तुकडा सुपारी, रजनीगंधा चुना एक्स्ट्रा.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 07/02/2019 - 10:15 नवीन
फोटोसहीत कवितेचे पान! जमलं जमलं १२०% जमलं.
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 07/02/2019 - 16:30 नवीन
हे असेच असते सारे ना सुचता हलते वारे पाचोळा नसता कोठे गर्द जागे होते रान ही कविता पिंपळपान!
आवडले. :-)
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 07/03/2019 - 07:27 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Wed, 07/03/2019 - 10:59 नवीन
सुरेख आहे कविता.
  • Log in or register to post comments
इ
इरामयी Wed, 07/03/2019 - 17:34 नवीन
विडंबनांंपेक्षा मूळ कविताच सरस वाटते. विडंबनंसुद्धा मजेशीर!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 07/04/2019 - 12:45 नवीन
सर्वेषाम् धन्यवादम्. Image removed.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 07/04/2019 - 13:55 नवीन
पावसाबरोबरच गुर्जींचीसुद्धा दमदार हजेरी ! बंधुद्वयांची जुगलबंदी फारा दिवसांनी पहायला मिळाली. वेल्कम रे लीलाधरा
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Fri, 07/05/2019 - 04:47 नवीन
सुरेख, छान आहे कविता... आवडली परंतु आत्मु बुवांची कविता आणि विधी नाही, कुंथणे नाही, तांब्या नाही ... छे चुकल्या चुकल्या सारखे वाटतेय. थोडी कसर भरून काढावी म्हंतो पिंपळाच्या पानावर तांब्या अजून ओततो ग ... डब्बा टाकताना मिरची अजून सलते ग !
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 07/05/2019 - 05:52 नवीन
गुर्जी नेहमीच छान लिहितात, पिंपळपानापेक्षा नागवेलीत अधिक रंगतात हे सत्य.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा