Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

(काय करून आलो)

न — नाखु, Sat, 06/29/2019 - 14:28
वाचायला(च) गेलो, लिहून काय आलो? आमंत्रण नव्हते तरी ज्ञान पाजळून आलो .. ना अर्थ आशयाचा बोली.. लावून आलो . कावलेल्या समयी भडास काढून आलो .. होते कोण न कोण बघतोच मी कशाला ? बिना वातीचेच (मुद्दाम) कंदील लावून आलो ? धागे जरी भिकार डोके फिरवून आलो.. जाऊ मुळी न देता संधी साधून आलो . (जालिय विचारवंत आणि सल्लागारांना समर्पित)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 35040 views

💬 प्रतिसाद
य
यशोधरा Sat, 06/29/2019 - 15:10 नवीन
आमंत्रण नव्हते तरी ज्ञान पाळून आलो .
आमंत्रणाविना, तरीही पाजळून ज्ञान आलो.. असं चालेल का? पाजळून च्या ऐवजी मिरवून पण म्हणू शकता!
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 06/29/2019 - 16:07 नवीन
हेच लिहीलं होतं पण मोबल्या स्वयंसुधारक मोठ्ठा घोटाळा करुन ठेवतोय. त्याखाली जालिय विचारवंत आणि सल्लागारांना समर्पित ही ओळसुद्धा गंडली खुलासेदार वाचकांची पत्रेवाला नाखु
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 06/29/2019 - 16:16 नवीन
नव्या बाटलीतल्या जुन्या दार्वांचा उल्लेख पण करायचा होता!!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 06/29/2019 - 15:36 नवीन
मी पण धाग्यावर प्रतिसाद द्यायला आलो तुमचे विडंबन वाचून खुश होउन गेलो पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sat, 06/29/2019 - 15:47 नवीन
अनेक सन्माननीय मिपा सभासदांच्या परिस्थितीचे नेमकं चित्रण।
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 06/29/2019 - 15:56 नवीन
खिक्क।
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 06/29/2019 - 16:22 नवीन
हे लई भारी ! ते लई भारी ! नाखूबुवांचं ईडंबन लईच भारी !! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 06/29/2019 - 16:43 नवीन
कविता/गजल/विडंबन जे काही आहे ते झक्कास जमलं आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रशांत Wed, 07/03/2019 - 11:20 नवीन
+१
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Sat, 06/29/2019 - 16:54 नवीन
भारीच नाखु काका सद्यकालीन " हे पिऊन आले, ते करून आले " च्या पार्श्वभूमीवर हे खासच, स्पेशल नाखु टच :)
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Sat, 06/29/2019 - 17:51 नवीन
-)):
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 07/01/2019 - 06:11 नवीन
प्रकट वाचकांचे आणि मूक वाचकांचे आभार
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 07/01/2019 - 07:29 नवीन
धागे जरी भिकार डोके फिरवून आलो.. जाऊ मुळी न देता संधी साधून आलो . हे खासच :)
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Tue, 07/02/2019 - 08:28 नवीन
जमलंय!!! :-)
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 07/03/2019 - 07:34 नवीन
विडंबन मस्त!
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 07/07/2019 - 15:57 नवीन
किमानपक्षी आपण तरी वैयक्तिक पातळीवर न घेतल्या बद्दल विशेष आभार कुठलाही सल्लागार नसलेला सामान्य मिपाकर वाचकांची पत्रेवाला नाखु
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 07/03/2019 - 09:14 नवीन
चाहत्यांच्या जगात तुमच्या स्थाण मागत आलो इतकी रांग पाहून (गुपचुप)नंबर लावून गेलो.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 07/03/2019 - 09:23 नवीन
=))
  • Log in or register to post comments
प
प्रशांत Wed, 07/03/2019 - 11:19 नवीन
वल्ली चांगला प्रयत्न सुरु ठेवा
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Wed, 07/03/2019 - 11:45 नवीन
गल्ली चुकली काय ?
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 07/03/2019 - 16:59 नवीन
मिपाचालकांची ? गल्ली चुकली ?
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Wed, 07/03/2019 - 17:35 नवीन
बहुतेक मलाच काही त्यांच्या वाक्यांचा संदर्भ लागत नसावा, असो. माझे विधान अथवा प्रतिसाद डिलीट केला तरी चालेल. काही अडचण नाही. :)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/03/2019 - 17:36 नवीन
जुने "वल्ली" = आताचे "प्रचेतस", हे समजल्यावर तुमचा गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. :)
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sat, 07/06/2019 - 12:03 नवीन
हे डुप्लिकेट आयडीचे प्रकरण आहे होय, आत्ता लक्षात आलं कि मिपाचालकांची गल्ली कधी का चुकत नसते ते. असो. आपल्या विस्तृत माहितीबद्दल अतिशय धन्यवाद. -/\-
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 07/06/2019 - 15:12 नवीन
(शिक्षण मोड सुरू) हे "डुप्लिकेट आयडी"चे प्रकरण नाही. ते स्वतःच्याच आयडिच्या बदललेल्या नावाने (पक्षी : प्रचेतस) सद्या लिहितात. असा नावबदल केल्यास, जुने नाव (पक्षी : वल्ली) बंद होते. त्यानंतरचे नवे व आयडीचे नाव बदलण्यापूर्वी लिहिलेले, लेख व प्रतिसाद, नवीन नावावर (उदा : प्रचेतस) दिसू लागतात. मिपामालकांना विनंती करून हे करवून घेता येते. एकाच व्यक्तीने, एकाच वेळी दोन आयड्या काढून त्या आलटून-पालटून वापरल्यास (पक्षी : प्रत्येक आयडी वेगवेगळ्या व्यक्ती आहेत असा आभास निर्माण केल्यास), ते डुप्लिकेट आयडी"चे प्रकरण बनते. (शिक्षण मोड बंद) ;) :)
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sat, 07/06/2019 - 23:24 नवीन
हा हा हा... माहितीसाठी धन्यवाद. विषय काय होता आणि कसा संपला :), हे मिसळपाव.कॉम म्हणजे ना खरोखर एक मोठं गहन आहे गहन, याचा पार सामान्याला कधी लागूच शकणार नाही असं वाटतं. रत्न आहे हे अंजावरील. तसेच अफलातुन प्रकरण आहे प्रचेतस उर्फ वल्ली ताईंचे.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 07/07/2019 - 08:52 नवीन
वल्ली ताई नाहीत दादा आहेत !
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 07/07/2019 - 09:17 नवीन
=))
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sun, 07/07/2019 - 09:53 नवीन
भितींवर डोके आपटल्याची स्मायली कल्पावी. मिसळपाव.कॉम एक भुलभुलैय्या आहे हेच खरे. बाकी माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो असे म्हणतात ते उगीच न्हवे ;)
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 07/07/2019 - 13:20 नवीन
वहिनी पाहिजे ताई नको याची काळजी घ्यावी हीच नम्र विनंती
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Wed, 07/03/2019 - 13:08 नवीन
जबराव जबराव जबराव खिलजी खुश हुआ एकदम भारी बोलले तो शोल्लीड भारी है ये
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 07/03/2019 - 16:59 नवीन
जबराट इडंबन =))
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 07/03/2019 - 17:09 नवीन
मी थिंक करत होतो की ही कविता मा. श्री. हार्दिक पंड्या" जी को सादर समर्पित है की कसे :)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 07/04/2019 - 05:37 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 07/04/2019 - 09:39 नवीन
हाहाहा.. लय भारी.. मालकानु, आणखी थोडी भर घालायची परवानगी असावी.. --- कसल्या पिंका अन् कसलं काय.. प्रतिसादांचे मातीचे[च] पाय.. हळूच काही काड्या सारून आलो.. फकड्यांची संख्या वाढवून आलो.. आता नादच खुळा त्याचे करायचे काय? आपलेच बूड अन् आपलेच पाय..! ताटातले खरकटे वाढून आलो.. चवीने हाडूक चघळून आलो..!! -- राघव
  • Log in or register to post comments
भ
भीडस्त गुरुवार, 07/04/2019 - 11:17 नवीन
हौर आंदेव
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 07/06/2019 - 05:06 नवीन
कोण कोण आले प्रतिसादा, हळूच पाहण्या आलो!! साक्षात मालकांना पाहून गहिवरलो!! मिपा सदस्य तपाचे पुण्य कामी आलो!! सर्व नववाचकांचे आभार
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 07/06/2019 - 17:56 नवीन
बागडण्यास्तव गेलो, कसा बिघडून आलो? अक्षरही न उमगे तरी डेटा जाळून आलो..... . ना गावठी ना शहरी मनाचा आरसा जहरी ओळख पटवण्या स्वतःची स्वतःस माळून आलो.... . घटकेचे प्रवासी सगळे अर्ध्यात उमजून गेलो उरल्या अर्ध्याच्या हिशोबात सरत्या अर्ध्यास विसरुन आलो... . कुणाशी वा, कुणाशी संवाद कुणाशी खुन्नस हे ठरवूनच गेलो, म्यान तलवारी असताही परक्या नथीतून टोचून आलो.. . आता काही न कळेना.. कशासाठी कुठे गेलो? कोण होतास तू, काय झालास तू प्रश्नचिन्ह घेऊन आलो.... . वाह वाह वाह वाह (हेही माझीच)
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 07/06/2019 - 19:52 नवीन
दिलखुलास दाद दिली आहे. या निमित्ताने उपस्थित राहिले, वल्लीशेठ आणि अभ्याराजे हे काय कमी आहे. आणि चालकांना धागा दखलपात्र वाटला हे चेरी अॉन केक आनंदित वाचकांची पत्रेवाला नाखु
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 07/07/2019 - 14:19 नवीन
कच्चा माल चांगला असला कि इथे प्रतिभेची स्पर्धा दिसुन येते. :) अभ्या ने सुद्धा भारी लिवलं हाय !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #Breathless #ShankarMahadevan #VeenaSrivani
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा