Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

वजनदार!

च — चलत मुसाफिर, Mon, 06/24/2019 - 13:41
(याच प्रेरणास्थानाला उद्देशून लिवलेली आधीची कविता "बिज्जी लेखिकेची आळवणी" ) हरपता ती लेखनस्फूर्ती हाटेले घालुनी पालथी ओरपी लेखिका मिसळ वर घेई मिठाई सुरती भिववितो तिला तनुभार स्वप्नि ते आकडे दिसती निर्धार प्रतिदिनी करिते 'करु उद्याच सुरु भटकंती' लेखिका म्हणे सुप्रहरी 'मैलाची मारू फेरी..' पण कुठुनी ते होण्याला कुणि दिसे तिज सखी प्यारी गप्पांना येता बहर गुपिते ती चावट कहर व्यायाम राही बाजूला वर वाया प्रातःप्रहर व्यायाम जरी तो इष्ट मैत्रीण तिची गप्पिष्ट करि कुलंगड्या गावाच्या 'हा लागट, तो तर शिष्ट' गप्पांतच घटिका सरती त्या माघारी मग फिरती घरि देती यजमानांना त्या लोणकढ्यांच्या चळती 'किति खडतर होय भ्रमंती पायाचे तुकडे पडती करतो का कपभर मजला तुज हस्तास असे चव ती' पाघळतो नवरा अंमळ शर्करा टाकितो सढळ जे घटले होते ग्राम ते परतुनी होती प्रबळ काटा वजनाचा पाही ती खट्टू होउन जाई 'हा बिघडुन गेला का रे? आकडाच बदलत नाही!!' नवरा छद्मीसा हसतो 'मज तसेच वाटे' म्हणतो लेखिकेस येई भरुनी वजनाचा विसरही पडतो तिज सुहास्य उमले गाली प्रतिभा की प्रभातलाली? झणि लिहावया ती बसते फतकल मारुनिया खाली ये लेखनस्फूर्ती फिरुनी चिंताढग जाती विरुनी लेखणीस गमला रस्ता लेखिका पुनः उडे गगनी

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4449 views

💬 प्रतिसाद
य
यशोधरा Mon, 06/24/2019 - 14:31 नवीन
रबर लागवड कुठवर पोचली? भाग ३ कधी?
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Mon, 06/24/2019 - 17:56 नवीन
टोमणा पोचला :-)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 06/27/2019 - 07:47 नवीन
टोमणा नाही हो, खरेच विचारले. दीडेक वर्षापूर्वी रबर लागवड पाहून आले, त्याचे दुष्परिणाम सुद्धा बघून आले. तेव्हा तुम्ही केली असल्यास तुमचा अनुभव काय हे विचारायचे / वाचायचे होते. पैसा आणि गुंडगिरी ह्या जोरावर केरळी लोकांचे चांगलेच बस्तान बसले आहे काही भागांत.
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Fri, 06/28/2019 - 07:57 नवीन
हा हा हा! मला वाटले 'कविता करण्यापेक्षा रबर लागवड करा' असे सुचवताय की काय! रबर लागवडीचे सध्या भिजत घोंगडे आहे. हवी असलेली सारी जमीन अद्याप मिळालेली नाही. आणि हातही जरा तंग झाला.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 06/28/2019 - 08:02 नवीन
मला वाटले 'कविता करण्यापेक्षा रबर लागवड करा' असे सुचवताय की काय!
हायला! हे सुचवायला टोमणा कशाला? सरळ लिहिले असते की! कोकणातल्या जमिनींचे त्रांगडे असते खरेच. शुभेच्छा तुम्हाला जमीन मिळण्यासाठी आणि रबर लागवड करण्यापेक्षा इको टुरिझम चे काही जमते का बघा, असे सुचवते. फायदाही असतो, जमीनही सुजलाम् सुफलाम्.
  • Log in or register to post comments
इ
इरामयी Mon, 06/24/2019 - 16:10 नवीन
व्वा! छान कृती. यूट्यूबवरची तुमची निखारा मिसळ्सुद्धा मस्तच!
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Mon, 06/24/2019 - 17:57 नवीन
डोक्यावरून गेले आहे. कसली मिसळ?
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 06/27/2019 - 05:53 नवीन
निखारा मिसळीचा नादच खुळा, भले भले लोक तिकडे आडवे होताना पाहिले आहेत. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा