Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

कुरबुर झाली

प — पाषाणभेद, Sun, 06/23/2019 - 10:21
कुरबुर झाली (काल रात्री साडे तीन वाजता पाणी बचतीवर एक पथनाट्य लिहीले. एका व्हाट्सअ‍ॅप गृपमध्ये येथील सदस्य दुर्गविहारी अन दीपक११७७ यांनी झोप घेत चला अन काही कुरबुर झाली असेल असे विनोदाने लिहीले. सकाळी मी ते वाचले अन मग त्यांना देण्याचे उत्तर या गीतलेखनातून लिहीले.) तुझ्यासंग माझ्यावाली कुरबुर झाली ग कुरबुर झाली त्यानेच माझी झोपायाची ग झोपायाची पंचाईत झाली ||धृ|| काल मी तुला नाही दाखवला सिनेमा प्लेक्समंदी आवड तुला पाहायाची अंधारात सिनेमा कोप-यामधी तिकीट नाही मिळाले तर येवढ्यावरून चिडली अन मग तुझ्यासंग माझ्यावाली कुरबुर झाली ग कुरबुर झाली||१|| नाही घेतली ग घेतली मी तुला साडी जरी पैठणीची नाही भरवला मी तुला नाही भरवला काल तुला पेस्ट्री केक मावावाला विसरलो मी तुझा वाढदिवस माफी मला मागावी लागली अन मग तुझ्यासंग माझ्यावाली कुरबुर झाली ग कुरबुर झाली त्यानेच माझी झोपायाची ग झोपायाची पंचाईत झाली||२|| - विसराळूभेद पाषाणभेद २३/०६/२०१९

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3073 views

💬 प्रतिसाद
द
दीपक११७७ Sun, 06/23/2019 - 11:31 नवीन
हा हा छान
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Sun, 06/23/2019 - 12:09 नवीन
हायला ! एकंदरीत अच्च झालं तलं. ;-)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 06/23/2019 - 14:54 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sun, 06/23/2019 - 17:26 नवीन
अजून बरंच काही भेदता.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा