Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

धागा चालेना, धागा पळेना... धागा संथ चाली, काही केल्या पेटेना

च — चामुंडराय, Sun, 06/23/2019 - 03:23
कवी " बी " यांना विनम्र अभिवादन धागा चालेना, धागा पळेना धागा संथ चाली, काही केल्या पेटेना गेलो ट्यार्पीच्या बनी म्हंटली ट्रोलांसवे गाणी आम्ही सुरात सूर मिळवून रे गेलो डू-आयडीच्या बनी डूख धरला मी मनी ट्रोलांसवे गळाले आयडीभान रे चल ये रे, ये रे ट्रोल्या टोचू उचकवू घालु काड्या टाकू पिंका पिंक पोरी पिंक पोरी पिंक हे मिपाचे अंगण अम्हां दिले आहे आंदण ट्रोलिंग करू आपण सर्वजण रे आयडी विषयाचे किडे यांची धाव प्रतिसादाकडे आपण करू शुद्ध "पिंक"पान रे धागा पेटला आला बहरून ट्रोलांनी दिला विषय भरकटून कोण मी - ट्रोल? कोठे डू-आयडी जण रे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 11618 views

💬 प्रतिसाद
श
श्वेता२४ Sun, 06/23/2019 - 03:47 नवीन
झकास जमलीय. मस्तच
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 06/23/2019 - 04:48 नवीन
=))
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Sun, 06/23/2019 - 09:35 नवीन
मस्त लिहीले आहे.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sun, 06/23/2019 - 09:45 नवीन
फक्त इतकेच सिमीत राहू नका, अजून विविध विषय हाताळा. आपल्या क्रिएटिव्हिटीला सलाम.
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Sun, 06/23/2019 - 10:43 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 06/23/2019 - 14:58 नवीन
हे मिपाचे अंगण अम्हां दिले आहे आंदण ट्रोलिंग करू आपण सर्वजण रे हेच गेल्या दोन-तीन वर्षांत अनुभवयास येत आहे
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 06/23/2019 - 20:59 नवीन
=))
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 06/24/2019 - 06:38 नवीन
मस्त, झकास लिवले आहे, माझे हे हात शिवशिवत आहेत. डोक्यातले बटाटे शिजायला लागले आहेत. टाकतोच यावर अजून फोडणी, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
इ
इरामयी Mon, 06/24/2019 - 13:02 नवीन
अगाध!
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय गुरुवार, 06/27/2019 - 02:09 नवीन
सर्व प्रतिसादकांचे आभार _/\_ धागा चालेना, धागा पळेना दहाच्या पुढे काही जाईना !!
  • Log in or register to post comments
म
महेश जोगलेकर गुरुवार, 06/27/2019 - 03:23 नवीन
प्रतिक्रिया लिहिता येतात पण मला नवीन धागा च सुरु करीत येत नाहीये ? उजव्या बाजूस "नवीन लेखन" असे शीर्षक दिसतंय त्यावर टिचकी मारल्यानंतर काही तरी लिहिण्याची खिडकी उघडेल असे वाटले होते परंतु तसे ना होता "नवे लेखन" हि यादी समोर येते? कोणी म्हणते मिपा वॉर सध्या काही तरी तांत्रिक अडचण आहे , कारभारी म्हणतात कि "नवीन लेखन" यावर टिचकी मारा दुसरे असे कि समजा परवलीचा शब्द बदलला , इमेल आले कि एक एरर संदेश येतो ! काय कळत नाहीये
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय गुरुवार, 06/27/2019 - 04:22 नवीन
नव्या लिखाणावर टिचकी मारल्यावर साहित्य प्रकार निवडा आणि लिखाण करा मात्र कृषी आणि प्रश्नोत्तरे साठी ऍक्सेस डिनायीड येतो आहे. काही प्रॉब्लेम आहे का?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/27/2019 - 07:54 नवीन
मिपावर नवीन धागा लिहिण्यासाठी... १. "लेखन करा" या पर्यायावर क्लिक करा. ("नवीन लेखन" नाही... तो मिपावर नवीनच प्रसिद्ध झालेले लेख दाखवतो.) २. पुढे आलेल्या पानावर धाग्यांच्या प्रकारांची यादी दिसेल, त्यातून हव्या असलेल्या धाग्याच्या प्रकारावर क्लिक करा. ३. त्यानंतर पुढे आलेल्या पानावरील एडिटबॉक्समध्ये धाग्याचा मजकूर लिहा व (असल्यास) चित्रे टाका. चित्रे टाकण्यासाठीची प्रक्रिया येथे सापडेल. ४. लेखाच्या वर असलेल्या, सर्वात वरच्या टेक्स्टबॉक्समध्ये लेखाचे शीर्षक लिहा. ५. लेखाच्या प्रकाराप्रमाणे, (लेखाच्या वर असलेल्या टेक्स्टबॉक्समध्ये) त्याचे वर्गिकरण लिहा किंवा (लेखाच्या खाली असलेल्या टेक्स्टबॉक्समध्ये) त्याचा लेखनप्रकार आणि लेखनविषय निवडा. ६. लेखाच्या खाली असलेला "पूर्वपरिक्षण" पर्याय वापरून तात्पुरत्या प्रसिद्ध होणार्‍या लेखाचे (जो फक्त तुम्हालाच दिसतो) परिक्षण करा. जरूर असल्यास मजकूर/चित्रांत योग्य ते बदल (संपादन) करा आणि परत पूर्वपरिक्षण करा. लेख प्रकाशित करण्याअगोदर, हे तुम्ही कितीही वेळा करू शकता. ७. प्रकाशित केलेल्या लेखात तुम्हाला बदल (संपादन) करता येणार नाही. म्हणून, लेख समाधानकारक झाला आहे अशी खात्री झाल्यावरच "पूर्वपरिक्षण" पर्यायाच्या लगतच असलेला "प्रकाशित करा" हा पर्याय वापरा. विशेष सूचना : अर्धवट लिहिलेला मजकूर साठवण्याची सोय मिपावर नाही. त्यामुळे... १. अनेक बैठकींत लेख लिहित असल्यास, अर्धवट लिहिलेला मजकूर एमएस वर्ड किंवा तत्सम मजकूर (टेक्स्ट) साठविणारे अ‍ॅप्लिकेशन वापरून स्वतंत्रपणे साठवून ठेवा. परत मिपावर आल्यावर तो मजकूर मिपावर कॉपी करून लेखाचा पुढचा मजकूर लिहायला सुरुवात करा. २. किंवा, मजकूर लिहायला दुसरे एखादे सोईस्कर अ‍ॅप्लिकेशन वापरून पूर्ण केलेला लेख मिपावर कॉपी करून तो प्रसिद्ध करा.
  • Log in or register to post comments
ग
गड्डा झब्बू गुरुवार, 06/27/2019 - 10:08 नवीन
>>>आयडी विषयाचे किडे यांची धाव प्रतिसादाकडे आपण करू शुद्ध "पिंक"पान रे>>> +1
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Sat, 06/29/2019 - 12:49 नवीन
जबराव जबराव जबराव आवडेश भारी आवडेश
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा